नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा; नववर्षात होणार १० हजार शिक्षकांची भरती – ZP School Shikshak bharti 2024

ZP Teachers Bharti 2024 Notification, Vacancy & Application Form

ZP School Bharti 2024 – It has already been decided to hire contractual teachers in schools with less than 10 capacity. Once the guidelines in this regard are received, action will be taken accordingly. Those guidelines are awaited from the school education department. The government decided to appoint retired teachers in zilla parishad schools where the student number is from 1 to 20. Later, it was decided to change the decision and appoint contractual teachers (educated youth with DEd, BEd) on schools with a strength of up to 10. Read the complete details of ZP Teachers Bharti 2024 below on this page. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा; नववर्षात होणार १० हजार शिक्षकांची भरती

जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट १ ते २० पर्यंत आहे, अशा शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय निघाला. त्यानंतर त्या निर्णयात बदल करून दहापर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक (डीएड, बीएडधारक सुशिक्षित तरुण-तरुणी) नेमण्याचा निर्णय झाला. आता पुन्हा तो निर्णय थांबविण्यात आला असून कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. शालेय शिक्षण विभागाला यासंदर्भात आता नूतन शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

  • राज्यातील १४ हजार ७८३ शाळांमधील पटसंख्या १ ते २० पर्यंत असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २७६६ पैकी जवळपास दीडशे शाळा आहेत. त्यात ५३ शाळांचा पट दहापेक्षा कमी आहे. या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय झाला होता. पण, त्याची कार्यवाही थांबल्याने शासनाच्या धरसोड भूमिकेवर डीएड-बीएडधारक तरुण-तरुणी वैतागले आहेत. राज्यात ३० ते ३२ हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी ग्वाही तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी दिली होती. मात्र, अजूनही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सात हजारांवर शिक्षक कमीच आहेत. अजूनही समानीकरणाअंतर्गत हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक भरलेले नाहीत.
  • आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार असून ज्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रिक्तपदांचे रोस्टर (बिंदूनामावली) अचूक आहे, कोणाचीही हरकत नाही तेथील ८० टक्के पदभरती होणार आहे. दुसरीकडे खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील झालेली नाही. नवीन वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची खुशखबर येवू शकते. जवळपास १० हजार शिक्षकांची भरती होवू शकते, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
  • शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा – दहापेक्षा कमी पटाच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल. शालेय शिक्षण विभागाकडून त्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

ZP School Shikshak bharti 2024 – As many as 30% posts of teachers are still vacant in zilla parishad schools in the state. As per the finance department’s order, 80% of the posts of teachers are allowed to be filled, but 10 per cent of the 80% posts were reserved after NT-C category candidates objected to the point list. Now, a review has been conducted and 10% of the posts in all zilla parishad schools in the state will be filled. A proposal in this regard has been submitted by the school education department to the rural development department and the recruitment will start after getting a nod from them, said a reliable source in the education commissionerate. On the other hand, the SOP of interview of candidates sent by the Ministry of School Education to private institutions will also come. After that, the path for this recruitment will be cleared. Read the complete details of ZP Teachers Bharti 2024 below on this page. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Following Teacher Recruitment Status :-

  • In Zilla Parishads – 4,500
  • In private institutions – 5,500 
  • awaiting interview -6,000
  • Total teacher recruitment now – 16,000

खासगी संस्थांना शिक्षक भरतीचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन! आता मुलाखतीची नवी ‘एसओपी’; खासगी संस्थांसह झेडपीतील 10 टक्के मिळून होणार 10,000 शिक्षकांची भरती

खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील सहा हजार शिक्षकांची भरती काही दिवसांत होणार आहे. पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड केलेल्या संस्थांमध्ये एका पदासाठी दहा उमेदवार मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहेत. तत्पूर्वी, शालेय शिक्षण मंत्रालयाकडून मुलाखतीची नवी ‘एसओपी’ ठरविण्यात येत आहे. उमेदवाराची कागदपत्रे, त्यांचे व्यक्तिमत्व, पाठ सादरीकरण अशा बाबींवर ३० गुणांची मुलाखती होईल आणि त्याचे रेकॉर्ड संस्थांना जतन करून ठेवावे लागणार आहे.

  • राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची अद्याप ३० टक्के पदे रिक्त आहेत. वित्त विभागाच्या आदेशानुसार ८० टक्के शिक्षकांची पदे भरण्यास मुभा आहे, पण ‘एनटी-क’ प्रवर्गातील उमेदवारांनी बिंदुनामावलीवर आक्षेप घेतल्याने ८० टक्क्यातील १० टक्के पदे राखून ठेवण्यात आली होती. आता त्यासंदर्भातील आढावा घेण्यात आला असून राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या शाळांमधील १० टक्के पदे भरण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाला सादर केला असून त्यांच्याकडून होकार आल्यानंतर भरतीला सुरवात होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील विश्वसनिय सूत्रांनी दिली. दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्रालयाकडून खासगी संस्थांमध्ये पाठविलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीची ‘एसओपी’ देखील येईल. त्यानंतर या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • नव्या १० हजार शिक्षक भरतीची तयारी – जिल्हा परिषदांच्या शाळांमधील १० टक्के रिक्त पदे म्हणजेच अंदाजे साडेचार हजार शिक्षक आणि खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील पाच-साडेपाच हजार पदांच्या शिक्षक भरतीचे शिक्षण आयुक्तालयाकडून नियोजन सुरू आहे. आता नव्याने येणाऱ्या भरतीसाठी मराठा समाजाच्या ‘एसईबीसी’ प्रवर्गाचा समावेश असणार आहे. जिल्हा परिषदांमधील १० टक्के शिक्षक भरतीसाठी शालेय शिक्षण विभागाला ग्रामविकास विभागाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीला सुरवात होवू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.
  • समानीकरणात अडकल्या १० हजारांहून अधिक जागा – सध्या जिल्हा परिषदांच्या अनेक शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकच नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. सोलापूर जिल्हा परिषदांच्या दोन हजार ७७७ शाळांपैकी जवळपास २०० शाळांमधील ६०० पदे समानीकरणात अडकली आहेत. अशीच स्थिती राज्यातील बहुतेक जिल्हा परिषदांची आहे. साधारणत: दोन-तीन वर्षांपासून एकाच शाळेतील पदे समानीकरणात अडकल्याने पटसंख्या वाढूनही त्या शाळांना पुरेसे शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे समानीकरणाच्या शाळांमध्ये बदल किंवा शिक्षक भरती हेच दोन पर्याय त्यावर असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. शाळांमधील अंशकालिन निदेशकांचीही नेमणूक रखडलेलीच स्थिती आहे.
  • पुढील शिक्षक भरतीची स्थिती : –

    • जिल्हा परिषदांमध्ये – ४,५००
    • खासगी संस्थांमध्ये – ५,५००
    • मुलाखतीच्या प्रतीक्षेत -६,०००
    • आता एकूण शिक्षक भरती – १६,०००

How to Registration from Pavitra Portal

कशी करायची नोंदणी –

  • सध्या ‘पवित्र’ पोर्टल वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे.
  • त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील; असे भरतीचे टप्पे आहेत.

Online Registration Link

Online Apply for shikshak bharti

ZP Teachers Recruitment 2024 Complete details

  1. Shikshak Bharti: राज्यात पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती…
  2. Maha TAIT Exam 2023- टेट’ परीक्षा ऑनलाईन लिंक उपलब्ध ; लगेच अर्ज करा
  3. Maha TET 2023- १० हजार केंद्रांवर फेब्रुवारीअखेरीस TET परीक्षा
  4. जिल्हा परिषद संभाव्य प्रश्नसंच सोडवा 

ZP Bharti 2024 Syllabus

ZP Syllabus Download From the given link. The PDF of the zilla parishad Syllabus is available for downloading. All latest updates about ZP syllabus is given for downloading.


Nandurbar Teacher Recruitment: The vacant posts of primary teachers in the Scheduled Tribe category in Pesa area of Nandurbar Zilla Parishad will be filled on contractual basis. The education department has appealed to the eligible candidates to submit their applications. According to a letter from the Ministry of School Education and Sports, Government of Maharashtra, in case of non-availability of retired teachers from local government schools and aided schools of private educational institutions till the recruitment of regular teachers in schools in PESA area, then according to the Teacher Aptitude and Intelligence Test 2022, the recommended qualified candidates in PESA area will be appointed on a temporary basis on a contractual basis. Read the complete details of ZP Teachers Bharti 2024 below on this page. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

In this regard, applications are being invited to the Education Department (Primary) Zilla Parishad, Nandurbar office during office hours from July 22 to 26 to fill up 268 vacant posts of primary teachers in Pesa area of Zilla Parishad, Nandurbar. Eligible candidates should apply in the name of The Chief Executive Officer, Zilla Parishad, Nandurbar, for this appointment, the maximum age limit for retired teachers will be 70 years and the monthly salary of Rs 20,000 will be payable. Retired teachers and teachers in aided schools of interested local government schools and private educational institutions as per the Aptitude and Intelligence Test 2022, recommended candidates in PESA sector should submit the application along with retirement and other documents.

नंदुरबार जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया; 268 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती

नंदुरबार जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांच्या पत्रान्वये पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षकातून तद्नंतर निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांनमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणेबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, नंदुरबार मधील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची २६८ रिक्त पदे भरण्यासाठी २२ ते २६ जुलै अखेर कार्यालयीन वेळेत आवेदन पत्र शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, नंदुरबार या कार्यालयात मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या नावे अर्ज करावे, सदर नियुक्तीसाठी निवृत्त शिक्षकांना कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहिल व प्रतीमहिना मानधन २० हजार देय राहील. इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवा निवृत्त शिक्षक व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार यांनी निवृत्ती बाबत व इतर कागदपत्रांसह अर्ज सादर करावे.


ZP Teacher Recruitment 2024 – As per the latest news the shikshak bharti announced earlier is currently underway. Education officers will be able to upload advertisements for 10% of the 30% vacant posts in zilla parishad schools on the pavitra portal by the end of July or in the first week of August. On the other hand, private aided institutions will also be able to participate in the recruitment. Around 3,500 posts in zilla parishads and 6,000-6,500 posts in private institutions will also be filled. Read the complete details of ZP Teachers Bharti 2024 below on this page. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

The recruitment process of 30,000 teachers is in the final stages as announced by state Education Minister Deepak Kesarkar. He took the bold decision to recruit the biggest teacher in the last 10 years. This includes 22,000 posts in zilla parishad schools. According to the government’s decision, 20 per cent of the posts will remain vacant, but 10 per cent of the posts were kept vacant due to objections of the NT-C category in the Bindunamwali.

Those positions will now be filled in August. This time, private aided educational institutions which could not upload the advertisement of vacant posts on the holy portal last time will also get an opportunity. Apart from this, the municipalities and municipalities which could not upload the advertisement to fill the teachers in their schools due to incomplete names will also get teachers in the vacant posts at that time.

ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती; जिल्हा परिषदेतील साडेतीन हजार पदांचा समावेश

पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत. दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे. जिल्हा परिषदांमधील साडेतीन हजार तर खासगी संस्थांमधील सहा ते साडेसहा हजार पदे देखील त्यावेळी भरली जाणार आहेत.

  • राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील दहा वर्षांतील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील २२ हजार पदांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार २० टक्के पदे रिक्तच राहतील, पण बिंदूनामावलीतील ‘एनटी-सी’ प्रवर्गाच्या आक्षेपामुळे १० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती.
  • आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. यावेळी ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही संधी मिळणार आहे. याशिवाय बिंदूनामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही त्यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत.
  • खासगी संस्थांना ‘पवित्र’वरूनच उमेदवार – खासगी अनुदानित संस्थांच्या मनमानीला आवर घालत आता त्यांची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे. एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार त्या संस्थेत पाठविले जातात. मुलाखतीच्या माध्यमातून त्या दहापैकी एका उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करता येईल. त्या दहा उमेदवारांशिवाय अन्य दुसरा उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेताच येत नाही.
  • शिक्षक भरतीपूर्व ‘टीईटी’ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये -शिक्षक होण्यासाठी डीएड-बीएड उत्तीर्ण उमेदवारांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पास व्हावी लागते. त्यानंतर बीएडधारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ‘टीईटी’ घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासंबंधीची निविदा काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये ‘टीईटी’ घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ZP School Shikshak bharti 2024 – The Department of Education said in a press release. In the teacher recruitment process, 11,085 candidates were selected through merit list on February 25 in the category of recruitment without interview. Of these, 6,182 candidates have joined the schools in person. The recruitment process of the remaining candidates is in the final stages. The seats are lying vacant as candidates from the parallel reservation are not available after the merit list was released. Read the complete details of ZP Teachers Bharti 2024 below on this page. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

The state government had directed the recruitment process by re-verifying the availability of candidates belonging to the category of ex-servicemen and earthquake victims. Accordingly, the Sainik Welfare Department sought information from their district-level office and submitted it to the government. The government then approved the conversion of 484 posts of ex-servicemen leaving them vacant. The verification of the availability of candidates belonging to the earthquake affected category was done on the basis of self-certificate on the holy website. It was then decided to convert the vacant posts of this category into general posts of that social category.

शिक्षक भरतीमध्ये मोठी अपडेट… ३ हजार १५० उमेदवारांची झाली शिफारस!

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणातील भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पदांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रुपांतरित फेरीमध्ये ५ हजार ७१४ रिक्त पदांपैकी ३ हजार १५० पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, २ हजार ५६४ पदांच्या विषयांसाठी त्या आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने ती पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

स्वप्रमाणपत्रात दुरुस्तीची संधी… – स्वप्रमाणपत्रांमध्ये चुकीची, अर्धवट, अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये शिफारस झाली नाही, त्यांच्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करण्याची सुविधा दिली जाणार आहे. नव्याने जाहिराती घेऊन निवडप्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रातील बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारात २५ फेब्रुवारी रोजी ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादीद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी ६ हजार १८२ उमेदवार शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त आहेत. त्यात माजी सैनिक, भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवारांच्या उपलब्धतेबाबत पुन्हा पडताळणी करून भरतीच्या कार्यवाहीचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवून शासनाला सादर केली. त्यानंतर माजी सैनिकांची ४८४ पदे रिक्त ठेवून उर्वरित पदे रुपांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली. तर भूकंपग्रस्त प्रवर्गातील उमेदवारांच्या उपलब्धतेबाबतची पडताळणी पवित्र संकेतस्थळावरील स्व-प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात आली. त्यानंतर या प्रवर्गातील रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पदांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार रुपांतरित फेरीची कार्यवाही तीन आठवड्यांत पूर्ण करण्यात आली. रुपांतरित फेरीत शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये पहिली ते पाचवीसाठी १ हजार ६५७, सहावी ते आठवीसाठी १ हजार ४८३, नववी ते दहावीसाठी दहा उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
रुपांतरित फेरीतील निवडीच्या अनुषंगाने उमेदवारांची काही तक्रार असल्यास त्या नोंदवण्यासाठीचा तक्रार अर्ज पवित्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली पदे, मुलाखतीसह भरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न आहे. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांवर माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरी घेण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


ZP School Shikshak Bharti 2024 | ZP Teachers Bharti 2024 – Semi-English classes will be started in about 150 to 175 zilla parishad schools in Solapur district. For this, it has been decided in the meeting of the Education Committee of the Zilla Parishad to provide books and training to teachers by the Zilla Parishad. Meanwhile, for the first time, the zilla parishad has taken such a bold decision and the principals are confident that it will definitely increase the number of zilla parishad schools. Read the complete details of ZP Teachers Bharti 2024 below on this page. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

झेडपीच्या शाळांमध्ये भरणार आता सेमी इंग्रजीचे वर्ग; जिल्हा परिषद देणार पुस्तके अन्‌ शिक्षकांना प्रशिक्षणही

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे १५० ते १७५ शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, असा धाडसी निर्णय पहिल्यांदाच जिल्हा परिषदेने घेतला असून यामुळे निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढेल असा विश्वास मुख्याध्यापकांना आहे.

    • बुधवारी (ता. २९) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक पार पडली. तत्पूर्वी, जिल्ह्यातील १५० ते १७५ जिल्हा परिषद शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार त्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच त्या वर्गातील तथा शाळांमधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडूनच पुस्तके पुरविली जाणार असून शाळांवरील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही यावेळी ठरले. शाळांची पटसंख्या १० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते. ती सात ते आठ टक्के वाढविण्यात यश आले आहे. उर्वरित पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले.
    • शाळा एकत्रिकरणाचा अहवाल द्या – जिल्ह्यातील अनेक गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा (मुला-मुलींच्या) वेगवेगळ्या ठिकाणी भरतात. त्या एकत्रित करण्यात येणार आहेत. दुसरीकडे काही शाळांची पटसंख्या खूपच कमी आहे. अशा शाळांचा अहवाल देण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिले आहेत.
    • शाळांच्या मागणीनुसार सेमी इंग्रजीच्या वर्गास परवानगी – जिल्ह्यातील सुमारे १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. अशा इच्छुक शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके जिल्हा परिषदेकडून पुरविण्यात येणार आहे. तेथील शिक्षकांना त्यासंदर्भातील प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

ZP School Shikshak Bharti 2024 | ZP Teachers Bharti 2024 – The rural development department had implemented the inter-district transfer process a few days ago. However, due to the model code of conduct for the Lok Sabha elections, these teachers could not come to their respective districts. Now that the model code of conduct for elections is over, he can be relieved of his duties. However, this will be the last process of inter-district transfer. Newly recruited teachers will have to give in writing that they are willing to work in the same district until they retire. If a teacher in class 1 to class 5 is newly selected and goes for classes in grades 6 through 9, he or she will be allowed to go to an outside district. However, a once-recruited teacher will not return to the same position after a few years. The school education department has already announced a decision in this regard.

The recruitment of 11,085 teachers from zilla parishad and local bodies has been conducted and their selection list has also been published. However, his appointments were put on hold due to the model code of conduct for the Lok Sabha elections. Now that he has got the green signal, the documents will be verified and he will get appointments soon. However, now recruited teachers will not be able to go back to another district, they will have to work in the same district until they retire.

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद; नवीन भरती झालेल्यांना ‘या’ दिवशी नेमणुका तर पुढची नवीन भरती २० मेनंतर

जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ११ हजार ८५ शिक्षकांची भरती पार पडली असून, त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांच्या नेमणुका थांबल्या होत्या. आता त्याला हिरवा कंदील मिळाल्याने कागदपत्रांची पडताळणी होऊन त्यांना लवकरच नेमणुका मिळतील. मात्र, आता भरती झालेल्या शिक्षकांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही, एकाच जिल्ह्यात त्यांना निवृत्त होईपर्यंत ड्यूटी करावी लागणार आहे.

    • ग्रामविकास विभागातर्फे काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली होती. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येता आले नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्ती मिळू शकते. पण, आंतरजिल्हा बदलीची ही शेवटची प्रक्रिया असणार आहे. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत त्याच जिल्ह्यात काम करण्यास तयार असल्याचे लेखी द्यावे लागणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गावरील शिक्षक नव्याने निवड होऊन इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या वर्गांसाठी गेला तर त्यास बाहेरील जिल्ह्यात जाण्यास परवानगी असणार आहे. मात्र, एकदा भरती झालेला शिक्षक त्याच पदावर काही वर्षांनी पुन्हा स्वजिल्ह्यात जाणार नाही. शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच त्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.
    • निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यावर भरतीला सुरवात – राज्यातील जिल्हा परिषदांमधील जवळपास पाच हजार पदे तर खासगी अनुदानित संस्थांमधील पाच हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया २० मेपासून सुरू होईल. जाहीर झालेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सुरू करायला परवानगी मिळावी, अशी मागणी शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याला होकार मिळाल्यानंतर आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मागील भरतीवेळी ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा नव्याने पुढच्या भरतीसाठी अर्ज करावा लागणार नाही.
    • पहिल्यांदा बदली, पदोन्नती अन्‌ त्यानंतर नव्यांना पदस्थापना – जिल्हा परिषद शाळांवरील बदलीस पात्र शिक्षकांची पदस्थापना व पदोन्नतीची प्रक्रिया सुरवातीला होईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर शाळा सुरु होण्यापूर्वी नव्याने भरती झालेल्यांची कागदपत्रे पडताळणी होईल आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्याचे नियोजन आहे. – कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

For the past several years, there has been no teacher recruitment in Sangli district. This led to D.Ed. Students were focused on recruitment. Finally, the government has approved zilla parishad recruitment. As a result, the recruitment process for 576 posts will start by publishing an advertisement in the next 15 days. The state education department had decided to recruit teachers a few days ago. Accordingly, the movement has accelerated.

In the zilla parishad, the education department is working on a system to balance the data. All the information regarding recruitment by the administration will soon be recorded on the holy portal. Sources said the recruitment advertisement will be released later. There are 694 vacant posts of teachers in The Zilla Parishad’s Marathi medium in the district. A total of 922 seats are vacant, including 88 in Kannada and 40 in Urdu. As per the government decision, 70 per cent of the vacancies will be filled. As a result, teachers will be recruited for a total of 576 posts in Marathi medium, 62 in Kannada and 28 in Urdu.

राज्यातील २१ हजार शिक्षकांच्या भरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

सांगली जिल्ह्यातील ५७६ शिक्षक पदांची भरती होणार, पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया सुरू

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नव्हती. यामुळे डी.एड. विद्यार्थ्यांचे भरतीकडे लक्ष लागून होते. अखेर शासनाने जिल्हा परिषद भरतीला मान्यता दिली आहे. यामुळे ५७६ पदांसाठी येत्या पंधरा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षक भरती करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये आकडेवारीचा ताळमेळ लावण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. प्रशासनाकडून भरतीच्या अनुषंगाने सर्व माहिती लवकरच पवित्र पोर्टलवर नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर भरती जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमामध्ये ६९४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तसेच कन्नड ८८ आणि उर्दू ४०, अशा एकूण ९२२ जागा रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार रिक्त जागांच्या ७० टक्के जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे मराठी माध्यमामध्ये ४८६, कन्नड ६२ आणि उर्दू २८, अशा एकूण सुमारे ५७६ जागांवर शिक्षकांची भरती होणार आहे.

गेल्या ११ वर्षांत भरती नाही – २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच २००५ पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. केवळ २०१९ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत काही जागा भरण्यात आल्या. मात्र, या भरतीमध्ये काही पदांचा गुंता झाला होता. कित्येक वर्षे भरतीच झाली नसल्याने अनेक शाळेत एका शिक्षकास दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली. यातून गुणवत्ता ढासळत आहे. मात्र, पुढील काही दिवसांत हा प्रश्न निकालात निघणार आहे.


ZP School Shikshak Bharti 2024 | ZP Teachers Bharti 2024 – The Acharsanhita (i.e. code of conduct) for the Lok Sabha elections is expected to be announced by February end. Therefore, Zilla Parishad’s are required to upload advertisements on ‘Pavitra Portal’ on time and the deadline for this will be 5th January 2024. The school education department has then planned to take priorities from the candidates and make appointments before 16th February 2024 as per the merit list.

At present, 55,000 to 57,000 teaching posts are vacant in private aided schools, including local bodies in the state. Of these, 23,000 posts of teachers are vacant in Zilla Parishad schools, up to 5,000 in municipal, municipal and municipal schools and up to 27,000 in private aided schools. As per the finance department’s decision, 80% of the total vacancies are sanctioned.

All Zilla Parishad’s, Municipal Corporations and Municipal Council Schools in the state have taken the points from the backward class cell. The education commissioner is confident that the recruitment will be done on time. Before that, the process of inter-district transfer will be completed by December 25. After that, Zilla Parishad’s will have to upload the advertisement of vacant posts with them on the holy portal. Without it, candidates will not be able to fill priorities. The education department is now in the process of completing the process before the code of conduct.

आचारसंहितेपूर्वी झेडपीच्या नव्या शिक्षकांना नेमणुका! जाहिराती अपलोडसाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत; १६ फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपविण्याचे नियोजन

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीअखेर जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांकडून वेळेत ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड होणे आवश्यक असून ५ जानेवारीपर्यंत त्यासाठी मुदत असणार आहे. त्यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेऊन मेरिट यादीनुसार १६ फेब्रुवारीपूर्वी नेमणूका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ५५ ते ५७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये २३ हजार तर नगरपरिषद, नगरपालिका व महापालिकांच्या शाळांवर पाच हजारांपर्यंत आणि खासगी अनुदानित शाळांवर २७ हजारांपर्यंत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के पदभरतीस मान्यता आहे.

राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपरिषदांच्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली तपासून घेतली आहे. त्यामुळे पदभरती वेळेत होईल, असा विश्वास शिक्षण आयुक्तांना आहे. तत्पूर्वी, २५ डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही. आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे.

शिक्षकांच्या रिक्तपदांची सद्य:स्थिती

    • जिल्हा परिषदांच्या शाळा – २३,०००
    • खासगी अनुदानित शाळा – २७,०००
    • मनपा, नगरपरिषदांच्या शाळा – ५,०००
    • सध्या पदभरती – ७० टक्के

पदभरतीनंतरही राहणार ३० टक्के रिक्त

जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या ८० टक्के शिक्षक भरतीस मान्यता आहे. पण, बिंदुनामावलीवरील आक्षेप विचारात घेऊन १० टक्के पदांची भरती करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिल्याने सध्या ७० टक्केच शिक्षकांची भरती होईल. त्यामुळे आता भरतीनंतरही सात ते आठ हजार पदे रिक्तच राहणार आहेत. पण, ही भरती झाल्यावर शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा कधी, यावर कोणताही अधिकारी ठोसपणे सांगत नसल्याची स्थिती आहे.

रोस्टर अंतिम असल्यास ‘माध्यमिक’चीही भरती

    • ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली (रोस्टर) तपासून अंतिम केले आहे. त्यांनाही शिक्षक भरती करता येणार आहे. त्यासाठी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारांनी त्या शाळांचा पर्याय निवडला, अशा तिघांना (एका जागेसाठी) त्याठिकाणी पाठविले जाणार आहे. त्यानंतर संबंधित संस्थेने त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ZP Teachers Bharti 2023 https://mahateacherrecruitment.org.in/: Pesa Shikshak Bharti updates is here. Parallel reservation for teacher recruitment was not announced in the announced schedule of teacher recruitment in tribal taluka (PESA) area of the district. Because of this, PESA teachers, who were angry, stormed the Zilla Parishad on Friday (15th) and asked. After that the education department immediately announced parallel reservation. This reservation has been placed on the Zilla Parishad website. Primary Education Officer Nitin Bachhao appealed that no one should create confusion. The merit list and document verification schedule were also published on the Zilla Parishad website. Read the complete details of ZP Teachers Bharti 2023 below on this page. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

पेसा शिक्षक भरतीसाठी समांतर आरक्षण जाहीर; शिक्षकांच्या जि. प. वर धडकेनंतर कार्यवाही

जिल्हयातील आदिवासी तालुका (पेसा) क्षेत्रातील शिक्षक पदभरतीच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकात शिक्षक भरतीचे समांतर आरक्षण जाहीर केलेले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या पेसा शिक्षकांनी शुक्रवारी (ता.१५) जिल्हा परिषदेला धडक देत विचारणा केली. त्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ समांतर आरक्षण जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या बेवसाईटवर हे आरक्षण टाकण्यात आलेले आहे. कोणीही संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले.

    1. जिल्हयातील आदिवासी तालुका (पेसा) क्षेत्रातील शिक्षकपद भरतीस शासनाने परवानगी दिल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने भरती प्रक्रीया सुरू केली आहे. राज्यस्तरावरून शिक्षकांची यादी प्राप्त झाली असून, पडताळणी वेळापत्रक विभागाने जाहीर केले आहे.
    2. त्यानुसार, यादीची शनिवारी (ता.१६) व रविवारी (ता.१७) पडताळणी केली जाणार आहे. गुणवत्ता यादी व कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिध्द देखील करण्यात आले.
    3. मात्र, यात शिक्षकांचे समांतर आरक्षण जाहीर केलेले नव्हते. तसेच कोणत्या विषयांसाठी नेमके किती शिक्षकांची नियुक्ती होणार याबाबतची माहिती नसल्याने पेसा क्षेत्रातील व यादीत नावे असलेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर शुक्रवारी धडक मारली.
    4. यावेळी शिक्षकांच्या शिष्टमंडलाने थेट मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेत ही बाब निर्देशनास आणून दिली. त्यानंतर श्रीमती मित्तल यांनी लागलीच शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांसह संबंधित अधिका-यांना पाचारण करत विचारणा केली. यात समातंर आरक्षण विभागाने निश्चित करण्यात आलेले आहे.
    5. तसेच विषयानुसार शिक्षकांची संख्या ही कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर निश्चित होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी लागलीच समांतर आरक्षण जाहीर केले. उमेदवारांना हे आरक्षण पाहता यावे यासाठी वेबसाईटवर देखील ते प्रसिध्द करण्यात आलेले असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

There will be recruitment of 23,000 posts of Shikshak in Zilla Parishad, Municipal and Municipal schools and 8 to 10 thousand posts in Private aided schools. Candidates will have to register on the ‘Pavitra’ portal from 1st to 8th September. At present, candidates have to register on the ‘Pavitra’ portal and they have to upload information according to priority, caste and subject. After that the merit list of the candidates will be released after verifying the documents and marks according to the final point list of the respective Zilla Parishads and final selections will be made; There are stages of recruitment. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला!! ‘पवित्र पोर्टल’वर नोंदणी सुरु; ‘या’ तारखेपर्यंत आहे मुदत

बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. गेल्या साडेपाच ते सहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. अखेर दि. 1 सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये 8 ते 10 हजार पदांची भरती होणार आहे. 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांना ‘पवित्र’ पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

राज्यभरात जिल्हा परिषदांच्या जवळपास 70 हजार शाळा असून त्याअंतर्गत 65 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. साधारणत: ऑक्टोबर अखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाल्यावर एकत्रितपणे भरतीला सुरवात होईल.

Online Apply for shikshak bharti

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Geeta kumari says

    What I have to do for became a Govt
    Prt teacher in mumbai maharashtra ,have passed MA ,DELED and also ctet qualify ,continue in private sector please advice me ….

  2. Nisha Chavhan says

    How to apply for shikshak barti

  3. Admin says

    ZP Teachers Bharti 2023 Notification, Vacancy & Application Form

  4. Bhushan vilas Wagh says

    Please TET pass hai Bharti kra

  5. Bhushan vilas Wagh says

    Please Bharti kr ra

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!