रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 386 कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती..!- ZP Ratnagiri Teacher Bharti 2025

ZP Ratnagiri Teacher Recruitment 2025

ZP Ratnagiri Teacher Bharti 2025 Result, Selection List – In Ratnagiri district, 386 contractual teachers have been appointed. Check out the list in the link below.. According to the information received, Ratnagiri and Dhule have been processed and contractual recruitment will not be done in other districts, which has been put on hold.  Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 386 कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्याची यादी खालील लिंक मध्ये पहा.. मिळालेल्या माहिती प्रमाणे रत्नागिरी आणि धुळे कार्यवाही झालेली आहे कंत्राटी भरतीची इतर जिल्ह्यात कंत्राटी भरती होणार नाही, त्यावर स्थगिती आहे. भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Selection List


ZP Ratnagiri Teacher Bharti 2024 – The results of the assembly elections have also been announced. After this, the code of conduct will now end and the stalled contractual teacher recruitment process will begin. On Monday, local DEd and BEd unemployed people met education officials in this regard. The process is expected to take place within a week, he said. There are 500 vacancies in the district. On September 5, the government decided to appoint retired teachers or unemployed unemployed with DEd-BEd as contractual teachers in schools with less than 20 marks in local bodies. The order was issued accordingly. After getting the appointment on a cut-off basis, the concerned teacher will get a salary of Rs 15,000 per month from the government. There will be 12 leave a year. This should be verified by the district-level committee and these candidates should be appointed immediately,” the order said.

रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीला मिळणार मुहूर्त

विधानसभा निवडणुकांचा निकालही लागला आहे. यानंतर आता आचारसंहिता संपुष्टात येणार असून रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सोमवारी याबाबत स्थानिक डीएड, बीएड बेरोजगारधारकांनी शिक्षणाधिकार्‍यांची भेट घेतली. आठवडाभरात ही प्रक्रिया होईल, असे सांगण्यात आले. जिल्ह्यात 500 जागा रिक्त आहेत. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक किंवा डीएड-बीएड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय 5 सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार आदेश काढला गेला. कत्राटी तत्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला 15 हजार रुपये हे मानधन मिळणार आहे. वर्षाला 12 रजा असणार आहेत. जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी, असे आदेशात म्हटले होते.

  • या आदेशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत 25 सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते. जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्याच अनेक शिक्षकांनी स्वत:च्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेत दिला आहे. यामुळे हे वातावरण आणखी चिघळलं होतं.
  • जिल्ह्यात साधारण: 600 च्या आसपास रिक्त जागा आहेत. या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. परंतु, आलेल्या अर्जांमध्ये परजिल्ह्यातील शिक्षकांच्या पत्नी तसेच परजिल्ह्यातील बेरोजगारांचे हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले होते.
  • ही प्रक्रिया कशी राबवावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. या मार्गदर्शन पत्रात उमेदवार हा स्थानिक असावा असे स्पष्ट म्हटलं आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा एक अर्ज आल्यास डीएड तसेच बीएड अर्हतेमध्ये अधिक गुण असणार्‍या उमेदवारांचा विचार करावा. रिक्त पदं असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणार्‍या उमेदवाराचा विचार करण्यात यावा. तर तालुक्यात देखील उमेदवार मिळाला नाही तर जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार व्हावा असे या पत्रात म्हटलं आहे. मात्र काही ठिकाणी पोलिस पाटील व सरपंचानी परजिल्ह्यातील उमेदवारांना रहिवाशी असल्याचा दाखला दिल्याने वादाचा प्रसंग निर्माण झाला होता.
  • ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली. यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली. आता आचारसंहिता संपुष्टात आली आहे. यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी सोमवारी स्थानिक बीएड, बीएड बेरोजगार संघटनेने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. यावेळी या बेरोजगारधारकांना आठवडा भरात ही भरती प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात आले. जिल्ह्यात 600 जागा रिक्त होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 100 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. आता उर्वरित 500 जणांना नियुक्तीपत्र आठवडाभरात मिळण्याची शक्यता आहे.
  • जिल्ह्यातील कंत्राटी तत्त्वावर प्राथमिक शिक्षक भरती अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियेला आचारसंहितेचा अडथळा आला होता. आता मात्र ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या प्रक्रियेत संपूर्ण स्थानिकच उमेदवारांना घ्यावे, ही आमची मागणी आहे. सुदर्शन मोहिते, अध्यक्ष डीएड, बीएड बेरोजगार संघटना, रत्नागिरी.

Ratnagiri Shikshak bharti 2024 – Despite the recruitment of 996 teachers in Ratnagiri Zilla Parishad schools, 22 schools have become zero-teacher schools. Despite the recruitment of teachers, 1,063 teaching posts are vacant in Ratnagiri district. The recent recruitment of teachers has also been inadequate as 22 schools have been declared zero teachers. The education department is struggling to send teachers from other schools to zero-teacher schools. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

The problem of zero-skilled schools in Ratnagiri district had arisen last year due to the large number of inter-district transfers of teachers. There were students but no guruji in many schools. At that time, some teachers were paid on contractual basis. At that time, there was a demand to recruit teachers in Ratnagiri district.

996 शिक्षकांची भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यात 22 शाळा शून्य शिक्षकी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 996 शिक्षकांची भरती होऊनही 22 शाळा या शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. शिक्षक भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 हजार 63 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 22 शाळा शून्यशिक्षकी ठरल्यामुळे नुकतीच झालेली शिक्षक भरतीही अपुरी ठरली आहे. शून्यशिक्षकी शाळांमध्ये दुसऱ्या शाळेतील शिक्षक पाठवताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

  • मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यामुळे गतवर्षीच रत्नागिरी जिल्ह्यात शून्यशिक्षकी शाळांचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थी आहेत पण गुरुजी नाहीत अशी अवस्था अनेक शाळांमध्ये झाली होती. त्यावेळी कंत्राटी पद्धतीने मानधनावर काही शिक्षक भरण्यात आले. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती करण्याची मागणी झाली होती.
  • अलिकडेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 996 शिक्षकांची भरती करण्यात आली होती. पहिली ते पाचवीपर्यंत 714 उपशिक्षक भरण्यात आले. सहावी ते आठवीपर्यंत 230 पदवीधर शिक्षक भरण्यात आले. आणि उर्दूचे 58 शिक्षक भरण्यात आले. ही भरती होऊनही जिल्ह्यात 1 हजार 63 शिक्षकांची पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • राजापूरात सर्वाधिक 8 शून्यशिक्षकी शाळा – शिक्षकांची भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 22 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 8 शून्यशिक्षकी शाळा राजापूर तालुक्यात आहेत. रत्नागिरी तालुक्यात 5 शाळा, संगमेश्वरमध्ये 3 शाळा, मंडणगडमध्ये 2 शाळा तसेच चिपळूण, दापोली, गुहागर आणि खेड तालुक्यात प्रत्येकी 1 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. या शाळांमध्ये दोन शिक्षक आहेत. त्यातील एक शिक्षक शून्यशिक्षकी शाळेत पाठवताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागली आहे. जिल्ह्यामध्ये एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावरही परिणाम होत आहे.

ZP Ratnagiri Teacher Bharti 2024 – The Ratnagiri Zilla Parishad had received a list of 1,068 teaching staff with recommendations from the recruitment of teachers implemented through the holy system. A list of 1,010 Marathi medium and 58 Urdu medium teachers was received. As soon as the list of teachers was received, the documents of all the candidates were checked. After verifying the documents, a total of 1,038 candidates were appointed through counselling in March 2024. But the code of conduct came into force during this period. Therefore, the counselling process was pending. However, the government approved the implementation of the appointment process in the districts where the voting process has been completed with the permission of the Election Commission. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांना मिळाले ९९६ नवीन शिक्षक नियुक्त

  • जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाली असून १ हजार ३८ पैकी ९९६ जणांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे. या प्रक्रियेवेळी ४२ उमेदवार अनुपस्थित राहिलेले होते. नियुक्ती पत्र दिलेल्या शिक्षकांना संबंधित शाळेवर १५ दिवसात हजर होण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
  • पवित्र प्रणालीमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरतीमधून रत्नागिरी जिल्हा परिषदेला एकूण १ हजार ६८ शिक्षक सेवकांची यादी शिफारशीसह प्राप्त झाली होती. त्यामध्ये १ हजार १० मराठी माध्यम व ५८ उर्दू माध्यम शिक्षकांची यादी प्राप्त झाली होती. त्या शिक्षकांची यादी प्राप्त होताच सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून घेण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर एकूण १ हजार ३८ उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यासाठी मार्च २०२४ मध्ये तारीख ठरविण्यात आली होती. परंतु या कालावधीत आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे समुपदेशन प्रक्रिया प्रलंबित होती.
  • तथापी निवडणूक आयोगाच्या परवानगीने ज्या जिल्ह्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तिथे नियुक्ती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली, शिक्षणाधिकारी बी. एम. कसार व त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत २० व २१ मे रोजी शिर्के प्रशालेत उमेदवारांना नियुक्ती देण्याकरिता शाळा देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील रिक्त पदांची यादी मोठ्या स्क्रीनवर उमेदवारांना दाखविण्यात आली. शासन निर्णयानुसार समुदपदेशनाकरिता प्रथम दिव्यांग उमेदवार, त्यानंतर महिला व शेवटी पुरुष उमेदवारांना गुणवत्ता क्रमानुसार शाळा निवडीची संधी दिली गेली. दोन दिवसाच्या समुपदेशन प्रक्रियेत १ ली ते ५ वी साठी उपशिक्षक ७१४, ६ वी ते ८ वी पदवीधर शिक्षक २३०, उर्दू माध्यमाचे शिक्षक ५२ असे एकूण ९९६ शिक्षकांची पदभरती करण्यात आली. जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळांना शिक्षक देऊन सर्व शाळांना शिक्षक मिळतील याची दक्षता यामध्ये घेण्यात आली आहे.

ZP Ratnagiri Teacher Bharti 2024 – For the last two years, a large number of vacant posts of teachers have become a headache for the education department. It was expected that the vacant posts of teachers in the district would be filled due to teacher recruitment, followed by district transfers. It has failed. Of the 940 sanctioned teaching posts in the taluka, 621 have been filled, but 317 posts are still vacant. While a large number of teachers are likely to be appointed in the new teacher recruitment, it will be challenging to fill the more than 300 vacancies. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

राजापुरात शिक्षकांची ३१७ पदे रिक्त

गेल्या दोन वर्षापासून मोठ्यासंख्येने शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा शिक्षण विभागाची डोकेदुखी ठरलेली आहे. शिक्षक भरती, त्यानंतर जिल्हा बदली यामुळे तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जातील अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली आहे. तालुक्यामध्ये मंजूर असलेल्या ९४० शिक्षक पदांपैकी ६२१ पदे भरण्यात आलेली असली तरी अजूनही ३१७ पदे रिक्त आहेत. नव्या शिक्षक भरतीमध्ये मोठ्यासंख्येने शिक्षकांची तालुक्यामध्ये नियुक्ती होण्याची शक्यता असली तरी रिक्त असलेल्या तिनशेहून अधिक जागा भरून काढणे आव्हानात्मक आहे.

  • विविध कारणांमुळे शाळांमधील पटसंख्या घटत असताना आजा जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक जागांवरून शिक्षण विभागाला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सातत्याने विविध कामांनिमित्ताने शाळांमधील कार्यरत शिक्षकांना जावे लागत असल्याने त्यातूनही पालकाचा रोष वाढतो आहे. कंत्राटी पद्धतीने भरणा झालेल्या शिक्षकांमुळे मोठ्यासंख्येने रिक्त जागांमुळे निर्माण झालेला पालकांचा रोष काहीप्रमाणात शमला असला तरी अद्यापही त्यावर पूर्ण तोडगा निघालेला नाही. रिक्त पदांची हीच स्थिती कायम राहिल्यास आगामी नव्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण विभागाला पुन्हा एकदा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
  • ७५ शिक्षकांची अन्य जिल्ह्यात बदली – जिल्ह्यांतर्गंत बदल्यांमध्ये अन्य तालुक्यातील केवळ सहा शिक्षक राजापूरमध्ये आलेले असताना, जिल्हा बदलीमध्ये तालुक्यातून तब्बल ७५ शिक्षक अन्य जिह्यामध्ये बदली होवून जाणार आहे. या शिक्षकांना तालुका, जिल्हा याच्यातून सद्यस्थितीमध्ये सोडण्यात आले नसले तरी, भविष्यामध्ये हे शिक्षक तालुका, जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये बदलीने जाणार आहे. त्यावेळी रिक्त होणाऱ्‍या ७५ जागांवरील शिक्षक नियुक्ती करताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
    ————
    एकूण मंजूर शिक्षक पदे ः ९४०
    कार्यरत शिक्षक ः ६२१
    रिक्त शिक्षक पदे ः ३१७
    ———–

While the process of recruitment of vacant posts of primary teachers of Ratnagiri Zilla Parishad schools has been stalled, the inter-district transfer of 346 teachers has been given the green signal in the sixth phase. However, the education department said that the transfer qualified teachers will not be released until new teachers are appointed. With these transfers, the number of vacant posts of teachers reached 2300. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

ZP Ratnagiri Teacher Bharti 2024 – On December 29, it was informed that the teachers’ login was eligible for transfer.346 primary teachers in the district have qualified for inter-district transfer. Those teachers will not be sent to the transfer site as there are currently vacant teaching positions in the district. Therefore, the transfer will remain on paper for the time being.
More than 1,000 teachers have moved out of the district in the last five years, including 715 last year and 350 before that. The number of visitors, however, is only 5 to 6. These transfers are becoming a matter of controversy in the district. Due to lack of recruitment, the number of vacant posts has increased and reached more than 2,000. Contractual teachers have been appointed as a temporary arrangement. But experts say it will affect the quality of education.

शिक्षकांची दोन हजार पदे रिक्त – आंतरजिल्हा बदलीसाठी ३४६ पात्र; प्राथमिकच्या प्रक्रियेचा सहावा टप्पा

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया रखडलेली असतानाच सहाव्या टप्प्यात ३४६ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र नवीन शिक्षक रुजू होईपर्यंत बदली पात्र शिक्षकांना सोडण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या बदल्यांमुळे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या २३०० पर्यंत पोचली.
ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार २०२२ मध्ये जिल्ह्यात रिक्त पदे नसल्यामुळे हजारो शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता आलेला नव्हता. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये विधवा, माजी सैनिक, आजारी या संवर्ग एकमधील आणि सर्वसाधारण गटातील शिक्षकांना संधी दिली गेली होती. सुमारे १ हजार शिक्षकांचे प्रस्ताव आले.
संवर्ग १ मधील सुमारे दीडशे प्रस्तावांची छाननी करण्यात आली. २९ डिसेंबरला शिक्षकांच्या लॉगीनला बदली पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली.जिल्ह्यातील ३४६ प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरले आहेत. सध्या जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे त्या शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे ही बदली सध्या कागदोपत्रीच राहणार आहे.
गतवर्षी ७१५, त्यापूर्वी ३५० असे गेल्या पाच वर्षात जवळपास एक हजारापेक्षा अधिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर गेले आहेत. येणाऱ्यांची संख्या मात्र ५ ते ६ इतकीच आहे. या बदल्या जिल्ह्यात वादाचा विषय बनत आहेत. भरती नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली असून दोन हजारच्यावर पोचली आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून कंत्राटी शिक्षक नियुक्त केले आहेत. परंतु त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • नवीन शिक्षक भरती होत नाही, तोपर्यंत आंतरजिल्हा बदल्या करू नयेत. अन्यथा ठाकरे शिवसेनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. शिक्षकांअभावी जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट झाली आहे. गुणवत्ता सुधारण्यासाठी परिपूर्ण शिक्षकांची आवश्यकता आहे. – संतोष थेराडे, माजी अध्यक्ष. जिल्हा परिषद.
  • ८० टक्के पदे भरणार ■ प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडली असून त्याबाबत ठोस निर्णय होत नसल्याचे नाराजी व्यक्त केली जात आहे. रोस्टर तपासणी पूर्ण झाली असून रिक्त पदे निश्चित झाली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रक्रिया सुरु होईल, अशी आशा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त असलेल्यापैकी ८० टक्के पदे भरण्यास परवानगी मिळाली आहे.

Konkan Shikshak Bharti 2024 updates – A few days ago, as many as 725 teachers from Zilla Parishad schools transferred to their respective villages. Even after that, the movement of transfer is going on at the Zilla Parishad level. Teachers were recruited in 2010 and then in 2017. Compared to that, due to continuous transfer of districts and due to retirement, the current situation is about 1500 to 2000 vacant posts. There are no teachers to teach in the education minister’s Konkan, the current situation is in Ratnagiri Zilla Parishad schools. If the education system of Konkan is to be saved, preference should be given to local teachers in recruitment, for this, teachers should be recruited using independent criteria, the demand of D.E.D., B.E.D. holders and they are going to attack Chief Minister Eknath Shinde who is visiting Ratnagiri district.

जिल्हा परिषद शाळांतील काही दिवसांपूर्वी तब्बल ७२५ शिक्षक जिल्हा बदली करून आपापल्या गावी निघून गेले. त्यानंतरही बदली करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहेत. २०१० व त्यानंतर २०१७ मध्ये शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने व सेवा निवृत्तीमुळे सद्यस्थितीला सुमारे १५०० ते २००० पदे रिक्त आहेत. शिक्षणमंत्र्यांच्या कोकणात शिकवायला शिक्षक नाहीत, अशी स्थिती सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आहे.

कोकणासाठी स्वतंत्र शिक्षक भरती होणार? डीएड्, बीएड्धारकांनी मुख्यमंत्र्यांकडं केली ‘ही’ मागणी

  • शिक्षक बदल्यांचे प्रमाण वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा रिकाम्या होत आहेत. परजिल्ह्यातून कोकणात शिक्षक येतात आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. त्यामुळे इथल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे.
  • कोकणची शिक्षण व्यवस्था वाचवायची असेल तर स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, त्यासाठी स्वतंत्र निकष वापरून शिक्षक भरती करावी, अशी मागणी डीएड्, बीएड्धारकांची असून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार आहेत.
  • जिल्हा परिषद शाळांतील काही दिवसांपूर्वी तब्बल ७२५ शिक्षक जिल्हा बदली करून आपापल्या गावी निघून गेले. त्यानंतरही बदली करण्याच्या हालचाली जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहेत. २०१० व त्यानंतर २०१७ मध्ये शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने व सेवा निवृत्तीमुळे सद्यस्थितीला सुमारे १५०० ते २००० पदे रिक्त आहेत. शिक्षणमंत्र्यांच्या कोकणात शिकवायला शिक्षक नाहीत, अशी स्थिती सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आहे.
  • दरवेळी परजिल्ह्यातील शिक्षकांची नेमणूक केली जाते, आणि ते शिक्षक ठराविक वर्षे नोकरी करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्या, अशी मागणी मागील १५ वर्षांपासून कोकणातील डीएड्, बीएड् धारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून ते अगदी मुंबईपर्यंत येथील डीएड्, बीएड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली.
  • मात्र कोकणातील आजपर्यंतचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, वर्षा गायकवाड, दीपक केसरकर अद्याप यावर तोडगा काढू शकले नाहीत. नोकरीवर रुजू झाल्यानंतर परजिल्ह्यातील हे शिक्षक ग्रामीण भागात न राहता शहराच्या ठिकाणी राहतात. बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्या घेण्यात जातात. काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत शिकवायला शिक्षकच नसतात, अशी स्थिती पहावसाय मिळते आहे.
  • तीन वर्षे कशीतरी ढकलल्यानंतर जिल्हा बदली करण्याचे वेध परजिल्ह्यातील शिक्षकांना लागतात. नवीन भरती सातत्याने रखडत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी नुकसान होते. हीच स्थिती रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्येही आहे. परजिल्ह्यातील शिक्षकांना येथील कोकणी बोली भाषा अवगत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, असे कोकणातील काही सरपंचांनी पत्र दिले आहे. स्थानिक शिक्षकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद केले आहे अशी मागणी कोकणातील डीएड्, बीएड्धारकांची आहे.

About 2000 posts are vacant in Zilla Parishad schools in Ratnagiri district. Every time the teachers are appointed from the district and those teachers go to their respective districts after working for a certain number of years. Therefore, for the last 15 years, the D.Ed., B.Ed degree holders in Konkan have been demanding that district transfer of teachers should be stopped and local teachers should be given priority in recruitment. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

रत्नागिरीतील प्राथमिक शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी डीएड, बीएड पदवीधारकांनी केली आहे. कोकणात परजिल्ह्यातून शिक्षक येतात आणि काही वर्षांनी बदली करून निघून जातात. जिल्हा परिषद शाळा वाचवायच्या असतील तर स्थानिक शिक्षकांना भरतीत प्राधान्य द्यावे, त्यासाठी स्वतंत्र निकष वापरून शिक्षक भरती करावी, अशी मागणी डीएड, बीएडधारक करत आहेत. पेसाप्रमाणेच स्वतंत्र निकष वापरून कोकणासाठी स्वतंत्र शिक्षक भरती करावी, अशी त्यांची मागणी आहे. भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

  1. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील ७२५ शिक्षकांची नुकतीच एकाच दिवशी जिल्हा बदली झाली आणि ते आपापल्या गावी निघून गेले. यापूर्वी २०१० आणि २०१७ साकील शिक्षक भरती झाली. त्या तुलनेत जिल्हा बदली सातत्याने होत असल्याने आणि सेवानिवृत्तीमुळे जिल्ह्यातील सुमारे २००० पदे रिक्त आहेत. दरवेळी परजिल्ह्यातील शिक्षकांची नेमणूक केल्री जाते आणि ते शिक्षक ठरावीक वर्षे नोकरी करून आपापल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी गेल्या १५ वर्षांपासून कोकणातील डीएड, बीएड पदवीधारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून मुंबईपर्यंतच्या उमेदवारांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने केली. तरीही भरतीप्रक्रिया करताना ऑनलाइन पद्धतीचाच अवलंब केला जात आहे. त्यामध्ये भरतीसाठी पोर्टल उघडण्यात येणार असल्याने पुन्हा परजिल्ह्यातील उमेदवार भरले जातील. त्यावर वेळीच रोख लावला गेला नाही तर अडचणी निर्माण होतील.
  2. सध्या उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाबदलीविरोधात ओस पडणाऱ्या कोकणातील शाळा वाचवण्यासाठी आता स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. गावागावातील लोकप्रतिनिधी, जाणकार नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत शाळा बचाओ आंदोलन सुरू केले आहे. पाठिंब्याची पत्रे कोकण डीएड, बीएड पदवीधारक असोसिएशनमार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत. असोसिएशनकडे आलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पत्रात कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हायचे आणि काही वर्षांनंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. नोकरीवर रुजू झाल्यानंतर परजिल्ह्यातील हे शिक्षक ग्रामीण भागात न राहता शहराच्या ठिकाणी राहतात. बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्या घेतात. काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत शिकवायला शिक्षकच नसतात, अशी स्थिती आहे. यात बदल करण्यासाठी स्थानिक उमेदवारांचीच भरती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ZP Ratnagiri Teacher Recruitment 2024- As Ratnagiri Zilla Parishad could not recruit teachers, the number of vacant posts is increasing. At present, 1 thousand 300 posts are vacant, out of which 700 teachers have been ordered to leave the government. There are currently 6 thousand teachers working in the district. So 1 thousand 300 posts are vacant. Now if these 700 teachers are released, 2000 posts will be vacant. Due to this, nearly 30 percent of the posts will be vacant. Read More details are given below.

Shikshak Bharti: एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे

ZP Ratnagiri Shikshak Bharti 2023: जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा हा राज्यात सर्वोत्तम मानला जातो. मात्र अनेक वर्षे जिल्हा परिषदेची शिक्षक भरती न होवू शकल्याने रिक्त पदांची संख्या वाढतच निघाली आहे. सध्या १ हजार ३०० पदे रिक्त त्यात आता ७०० शिक्षकांना परजिल्ह्यात सोडण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. एप्रिल ते १५ एप्रिल या दरम्यान त्यांना सोडावे असे म्हटले आहे.

ZP Teacher Bharti-मार्चअखेरपर्यंत जिल्हा परिषद शाळांमध्ये करणार भरती

यामुळे आता जिल्ह्यातील मुलांना शिक्षण द्यायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांचा विषय गाजत आहे. या प्रक्रियेत राजकीय पुढाऱ्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून

प्रशासनावर दबाव टाकण्यात येत आहे. हा विषय जिल्हा परिषदच्या अनेक सर्वसाधारण सभेतही गाजला आहे. जिल्हा बदलून जाणाऱ्यांची संख्या बघता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. म्हणजे हाताच्या बोटावर माजण्याइतकी आहे.

गेल्या दहा वर्षात जिल्हा बदलून जाणाऱ्या शिक्षकांना अगदी कोणत्याही अडथळा न आणता मुक्तहस्ते जि.प. प्रशासन सोडत आहे. राज्य शासनाने या बदलीत पारदर्शकता यावी म्हणून सन २०१८-१९ मध्ये एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. पण त्यामध्ये त्रूटी होत्या. ही प्रक्रिया सुरू असतानाच २०१९ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. यामुळे २०२०- २१, २०२०-२२ या वर्षात शाळा बंद असल्यामुळे बदली प्रक्रिया झाली नव्हती.

जवळपास ३० टक्के पदे आहेत रिक्त…

जिल्ह्यात सध्या ६ हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर १ हजार ३०० पदं रिक्त आहेत. त्यात आता या ७०० शिक्षकांना कार्यमुक्त केलं तर २००० पदं रिक्त होणार आहेत. यामुळे जवळपास ३० टक्के पदं रिक्त होणार आहेत. यामुळे शैक्षणिक कारभार कसा चालवायचा असा प्रश्न जि.प. समोर उभा राहिला आहे. सध्यातरी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!