YCMOU पुनर्परीक्षार्थींना अर्जाची ‘मुक्त’कडून 22 पर्यंत मुदत- YCMOU Exam 2024
YCMOU Exam 2024
YCMOU Exam 2024 – Yashwantrao Chavan Maharashtra University will conduct the nineteen semester examinations of various courses from the third week of May. The re-appearing students will have to fill the exam form for the exam. The university has given a deadline of March 22 along with regular fees for the same. The schedule for the nineteen semester exams will be released in the last week of April. YCMOU Admission 2024
The exams will be conducted for subjects in 82 different courses. As per the current schedule, the deadline for submission of application forms without delay will be March 22. The last date for submission of exam forms with a delay of Rs 100 will be March 23 to 28. The last date for submission of exam forms, including a special late fee of Rs 500, will be from March 29 to April 2.
The fee for the written examination of certificate, diploma, degree, agricultural education diploma will be Rs 180 per paper. The post-graduate degree and all courses will be charged Rs 200 per paper for the written examination of the courses of professional, technical and science streams.
There will be a fee of Rs 220 for the practical or oral examination. The marksheet fee and late fee is Rs 100 each, while the delay fee is Rs 500. The university has issued an in-depth advisory regarding the process of filling the examination form and the care to be taken. Accordingly, the free university has appealed to the students to appear for the examination by submitting the examination form within the stipulated time, paying the bill for it.
YCMOU News : पुनर्परीक्षार्थींना अर्जाची ‘मुक्त’कडून 22 पर्यंत मुदत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विविध शिक्षणक्रमांची उन्हाळी सत्र परीक्षा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने नियमित शुल्कासह २२ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाणार आहे.
वेगवेगळ्या ८२ अभ्यासक्रमांतील विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सध्याच्या वेळापत्रकानुसार विनाविलंब शुल्क परीक्षा अर्ज भरण्यासाठी २२ मार्चपर्यंत मुदत असेल. शंभर रुपये विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २३ ते २८ मार्च राहील. तर पाचशे रुपये विशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २९ मार्च ते २ एप्रिल अशी असणार आहे.
प्रमाणपत्र, पदविका, पदवी, कृषी शिक्षणक्रम पदविका या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षेसाठी १८० रुपये प्रति पेपर इतके शुल्क असेल. तर पदव्युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी व्यावसायिक, तांत्रिक, विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षेसाठी दोनशे रुपये प्रति पेपर असे शुल्क असेल.
तर प्रात्यक्षिक किंवा मौखिक परीक्षेसाठी २२० रुपये शुल्क असणार आहे. गुणपत्रिका शुल्क आणि विलंब शुल्क प्रत्येकी शंभर रुपये असून, अतिविलंब शुल्क पाचशे रुपये आहे. परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया व घ्यावयाची काळजी यासंदर्भातील सखोल सूचनापत्र विद्यापीठाने जारी केलेले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत परीक्षा अर्ज सादर करताना, त्यापोटीचे शुल्क अदा करत परीक्षेला प्रविष्ट व्हावे, असे आवाहन मुक्त विद्यापीठातर्फे केले आहे.
YCMOU Admission 2023 – YCMOU B.Ed Admission 2023 last date is 12th September 2023. Yashwantrao Chavan in-service B.Ed by Maharashtra Open University. The admission process for the course in this education department has started. Interested and eligible students will have deadline till 12th September 2023 to fill online application form. The deadline for correction in the application is from 13th to 15th September 2023. The university has announced detailed instructions regarding admission eligibility and admission schedule. This process is being implemented for the admission of 2023 to 2025 batch. Various detailed details required by the students before filling the application form are mentioned in the notification letter. Candidates who are using this system for the first time should register user id and password to get it.
मुक्त विद्यापीठाचे बी. एड. प्रवेशअर्ज १२ सप्टेंबरपर्यंत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सेवांतर्गत बी.एड. या शिक्षणशास्त्र शाखेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. अर्जात दुरुस्तीसाठी १३ ते १५ सप्टेंबर अशी मुदत आहे. प्रवेश पात्रतेसंदर्भातील सविस्तर सूचना व प्रवेश वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. २०२३ ते २०२५ या तुकडीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध सविस्तर तपशील सूचनापत्रात नमूद केला. या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी यूजर आयडी व मिळविण्यासाठी नोंदणी पासवर्ड करावी.
Postponement of Open University Examination
अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्यापासून चाललेला गोंधळ निस्तरणे पाच दिवसांनंतरही मुंबई विद्यापीठाला जमलेले नाही. परीक्षा कशी होणार हे विचारण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी कलिना येथील शिक्षण संकुलात धाव घेतली. सव्र्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले असून मंगळवारी आणि बुधवारी होणारी मुक्त शिक्षण मंडळाची (आयडॉल) परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
आयडॉलसह विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच ‘लॉग इन आयडी’ मिळत नाही, ईमेल वेळेवर येत नाहीत, सराव चाचण्या झाल्या नाहीत, फॉन्ट दिसत नाही, अशा तक्रारी विद्यार्थी करत आहेत. मात्र, नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होऊन पाच दिवस झाले तरी विद्यापीठाला या अडचणी सोडवता आलेल्या नाहीत. आयडॉलच्या शनिवारी झालेल्या परीक्षेला दोन ते अडीच हजार विद्यार्थी मुकले. त्यावेळी परीक्षा पुन्हा घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले. मात्र, कार्यप्रणालीत काहीच सुधारणा झाली नाही. आयडॉलच्या मंगळवारी होणाऱ्या परीक्षेतही गोंधळ झाला. विद्यापीठाच्या सव्र्हरवर सायबर हल्ला असल्याचे विद्यापीठाने सांगितले. त्यामुळे मंगळवारी (६ ऑक्टोबर) आणि बुधवारी (७ ऑक्टोबर) होणाऱ्या आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. सायबर हल्ल्याबाबत तक्रार करण्यात येणार असून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने सांगितले.
विद्यार्थी संतप्त
संपर्क साधल्यावरही विद्यापीठाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. परीक्षा बुडणार आणि त्यामुळे केलेली मेहनत वाया जाणार या धास्तीने मुंबईतील विद्यार्थ्यांबरोबरच उपनगरांमधील विद्यार्थीही कलिना येथे जमले. ‘परीक्षा विभागाकडून काहीच उत्तरे दिली जात नाहीत,’ अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली. ‘विद्यार्थ्यांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांचा घाट घातला. परीक्षा कशी होणार हे विचारण्यासाठी सतत कलिना येथे यावे लागणार असेल तर विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्याचा उपयोग काय? त्यापेक्षा प्रत्यक्ष परीक्षाच घ्यावी,’ अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने व्यक्त केली.
अडचणी काय?
विद्यापीठाच्या विभागाच्या परीक्षाही सुरू आहेत. मात्र, तुलनेने तेथे अडचणी कमी आहेत. आयडॉलच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. एकाच वेळी अनेक विद्यार्थी लॉग इन करत असल्यामुळे अडचण निर्माण होते. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांची अचूक माहिती नाही. आयडॉलचे विद्यार्थी हे रोजच्या संपर्कातील नसतात. त्यांनी प्रवेश घेताना दिलेला ईमेल आयडी, संपर्क क्रमांक असतो. विद्यापीठाने परीक्षा घेण्यासाठी नेमलेली कंपनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या ईमेल आयडीवर लॉग इन आयडी पाठवते. त्यामुळे अनेकदा तो विद्यार्थ्यांना मिळत नाही, असे विद्यापीठातील एका प्राध्यापकाने सांगितले.
चौकशीची मागणी
विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे काम चेन्नईतील एका कंपनीला दिले आहे. या कंपनीला अशा स्वरूपाच्या परीक्षा घेण्याचा अनुभव नसताना काम दिले असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. राज्यात लाखो विद्यार्थ्यांच्या एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा होतात. मात्र, आयडॉलचे ९ ते १० हजार विद्यार्थी दरदिवशी परीक्षेसाठी असतात. तरीही विद्यापीठाला या परीक्षा घेणे का झेपत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ‘परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबत शोध समिती स्थापन करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी युवासेनेच्या अधिसभा सदस्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे परीक्षा घेण्याचे काम करणाऱ्या कंपनीला त्यांच्या कामाचे पैसे देण्यात येऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.
झाले काय?
* आयडॉलची कला आणि वाणिज्य शाखेची तृतीय वर्षांची परीक्षा मंगळवारी होती. शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपर्यंत लॉग-इन आयडी आणि पासवर्डची लिंक मिळाली नाही.
* त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. मदत कक्षाशी संपर्क साधला तरी उत्तरे मिळाली नाहीत.
* त्यामुळे शेकडो विद्यार्थी कलिना संकुलात जमले. तेथे सुरक्षारक्षकांनी आयडॉलच्या इमारतीची दारे बंद केली.
* त्यामुळे इमारतीबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी झाली. अखेर विद्यापीठाला आयडॉलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची वेळ आली.
कोणत्या परीक्षा रद्द
सव्र्हरवरील सायबर हल्ल्यामुळे आयडॉलच्या मंगळवारी अपेक्षित असणारी तृतीय वर्ष कला (बीए) आणि वाणिज्य (बी.कॉम.) या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्याचबरोबर बुधवारी होणाऱ्या तृतीय वर्ष संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान या नियमित परीक्षा, पुनपरीक्षार्थीच्या (बॅकलॉग) प्रथम आणि द्वितीय वर्ष कला, वाणिज्य शाखेच्या परीक्षा, एमसीए सत्र १ व २ या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सोलापुरात विद्यापीठातही गोंधळ
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाइन’ परीक्षेत सलग दुसऱ्या दिवशी तांत्रिक गोंधळ झाला. यामुळे ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यानच्या सर्व परीक्षा पुढे ढकलत त्या २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. सोलापुरात विद्यापीठ परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत, मात्र पहिल्या दिवसापासूनच ‘ऑनलाइन’ परीक्षेत ‘सव्र्हर क्रॅश’ झाल्यामुळे व्यत्यय आला. हा तांत्रिक गोंधळ दुसऱ्या दिवशीही सुरू होता. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ६, ७, ८ रोजी होणारी ‘ऑनलाइन’ परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता अनुक्रमे २१, २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी नियोजित वेळापत्रकानुसार होईल.
मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर
Nashik: Registrar Dr. Dinesh Bhonde said that the Maharashtra Open University examination was postponed due to the closure on the back of Corona. He also informed the students about how to study at home through e-books and various curriculum programs broadcast on Yashwani’s web radio with the help of a university website. Read More details as given.
करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या सहाय्याने विविध शिक्षणक्रमांचे ई बुक्स तथा यशोवाणी या वेब रेडिओवर प्रसारित होणाऱ्या विविध शिक्षणक्रमाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून घरबसल्या अभ्यास कसा करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेतील ९७ शिक्षणक्रमांना यंदा संपूर्ण राज्यभरातील जवळपास सव्वासहा लाखांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. दूरस्थ शिक्षण पद्धतीने राज्यभरातील एकूण एक हजार ९३७ अभ्यास केंद्रांद्वारे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन आणि शैक्षणिक समुपदेशनाचे काम सुरू आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी टाळेबंदीत विद्यार्थ्यांंना घरूनच अभ्यास करण्याची सूचना केली आहे. विद्यापीठाने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत काही वर्षांंपासून आपले अध्ययन साहित्य हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे. त्यात विविध विद्याशाखेची पाठय़पुस्तके, पूरक अध्ययन साहित्य हे मोफत वाचता येते. भ्रमणध्वनीवर अभ्यासाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. तसेच जीवन कौशल्ये, स्वयंअध्ययन कौशल्ये, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र यासह विविध शिक्षणक्रमांचे ऑनलाईन समंत्रण सत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर घेतली जात आहे. तसेच ‘यशोवाणी’ या वेबरेडिओवरून या विषयी माहिती दिली जात आहे.
विद्यापीठाच्या एकुण १५२ विविध शिक्षणक्रमांसाठी सहा लाख २४ हजार २६० विद्यार्थी प्रविष्ट असून, त्यात नवीन प्रविष्ट विद्यार्थी संख्या पाच लाख ७० हजार तर ५४ हजार २६० विद्यार्थी पुन:परीक्षार्थी आहेत, अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक रवींद्र ठाकरे यांनी दिली. इतर पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुक्त विद्यापीठाचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.
मुक्त विद्यापीठाच्या मे मधील परीक्षा स्थगित
मुक्त विद्यापीठाच्या ‘मे’मधील परीक्षा स्थगित…अभ्यासासाठी ‘या’ संकेतस्थळाचा होणार फायदा!
Nashik: The schedule of examinations held in May by Yashwantrao Chavan Maharashtra Open University has been postponed till further orders of the state government. Meanwhile, in Lockdown, students from all over the state of the University can study at home through e-books and various curriculum programs on Yashwani’s web radio through the website. At present, the University has instructed the students to study from home on the backdrop of “Lockdown”. Want to study, as well as life, self study skills Area, political science, psychology, social sciences, including the various sessions the University of Education No.online on the website of the University “Yasovani will ‘listen to the radio or the web.
सध्या “लॉकडाउन’च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना घरून अभ्यासाची सूचना केली आहे. विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळावर अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात विविध विद्याशाखांची पाठ्यपुस्तके व पूरक अध्ययन साहित्य मोफत वाचता येते. विद्यार्थ्यांनी घरी राहून विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या सहाय्याने अभ्यास करायचा आहे. तसेच जीवन, स्वयंअध्ययन कौशल्ये, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिकशास्त्र यांसह विविध शिक्षणक्रमांची ऑनलाइन सत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन “यशोवाणी’ या वेब रेडिओवरून ऐकता येणार आहेत.
नाशिक:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मेमध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे. दरम्यान, “लॉकडाउन’मध्ये विद्यापीठाच्या राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध शिक्षणक्रमांचे ई-बुक्स तथा “यशोवाणी’ या वेब रेडिओवर प्रसारित होणाऱ्या विविध शिक्षणक्रमांच्या कार्यक्रमांद्वारे घरबसल्या अभ्यास करता येणार आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या सहाय्याने अभ्यास
विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील 97 शिक्षणक्रमांसाठी यंदा राज्यातील सव्वासहा लाखांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. दूरस्थ शिक्षणपद्धतीने राज्यातील एक हजार 937 अभ्यास केंद्रांद्वारे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन व शैक्षणिक समुपदेशनाचे कार्य सुरू असते. नोकरी, व्यवसाय सांभाळून विद्यार्थी शनिवार, रविवारच्या सत्रास उपस्थित राहून अध्ययन करतात. सध्या “लॉकडाउन’च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना घरून अभ्यासाची सूचना केली आहे. विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळावर अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात विविध विद्याशाखांची पाठ्यपुस्तके व पूरक अध्ययन साहित्य मोफत वाचता येते. विद्यार्थ्यांनी घरी राहून विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या सहाय्याने अभ्यास करायचा आहे. तसेच जीवन, स्वयंअध्ययन कौशल्ये, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिकशास्त्र यांसह विविध शिक्षणक्रमांची ऑनलाइन सत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन “यशोवाणी’ या वेब रेडिओवरून ऐकता येणार आहेत. वेब रेडिओचे कामकाज व्यवस्थित चालावे, यासाठी दृकश्राव्य विभागाचे अधिकारी घरून काम करीत आहेत.
परीक्षांचे वेळापत्रक होईल जाहीर
राज्यातील सहा लाख 24 हजार 250 विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या एकूण 152 विविध शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. त्यात नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख 70 हजार व 54 हजार 260 विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी आहेत, अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक रवींद्र ठाकरे यांनी दिली. इतर पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांनंतर मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा होतात. त्यामुळे इतर पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुक्त विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
सोर्स: सकाळ