मतदान केंद्रांवर विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती – Volunteers at Polling Booths
Students appointed as volunteers at polling booths
As you know the Vidhansabha election will be held on 20th November 2024 in all over Maharashtra. Regarding this, students will be involved in the assembly election process and will be appointed as volunteers this year. These students will help the differently-abled, elderly and sick voters at the polling booths and the principal should immediately appoint such students, the education officer said. This is the first attempt to involve students in the electoral process.
The election is scheduled for Nov. 20. The Election Commission has directed the appointment of this student at every polling station on this day so that there is no difficulty in exercising the right to vote to differently-abled voters, elderly voters and sick voters. Similar instructions were also given at a meeting of district collectors. Nagpur Education Officer Rohini Kumbhar directed the principals to appoint students of classes 9 to 12 as volunteers in their schools. It is learnt that the experiment was conducted in view of the difficulties faced at the polling booths.
मतदान केंद्रांवर विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती
यावर्षी विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी केले जाणार असून त्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार, आहे. हे विद्यार्थी मतदान केंद्रांवर दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी मतदारांना मदत करणार असून मुख्याध्यापकांनी तात्काळ अशा विद्यार्थ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे, हे विशेष.
- २० नोव्हेंबरला मतदान आहे. या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार, वयोवृद्ध मतदार, आजारी मतदार यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याकरिता या विद्यार्थ्याच्या नियुक्तीचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तशा सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बैठकीतही देण्यात आल्या. त्यानुसार मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील इयत्ता ९ ते १२ च्या विद्याथ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करावी, असे आदेश नागपूरच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी दिले. मतदान केंद्रांवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा प्रयोग करण्यात आल्याची माहिती आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांची नियुक्ती करायची आहे. यासाठी मुख्याध्यापकांनी त्यांना दिलेल्या लिंकवर विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ भरून चायची आहे. केंद्रांवर मदत म्हणून ही नियुक्ती राहणार आहे. स्काऊट गाईड व अन्य विद्यार्थ्यांना यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल. राष्ट्रीय कामात सहभाग नोटवल्याचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. रोहिणी कुंभार
- दोन सत्रात विद्यार्थी सेवा देणार – प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी ७ ते १२ पर्यंत दोन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी व दुपारी १२ ते ६ वा वेळेत दोन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नियुक्त करण्यात येणार आहेत. सेवा देणान्या विद्यार्थ्यांची माहितीही निवडणूक विभागाने दिलेल्या लिंकवर मुख्याध्यापकांनी भरायची आहे. विद्याथ्र्यांनी स्काऊट गाईड गणवेशात किंवा शालेय गणवेशात स्कार्फ, गॉगल परिधान करून मतदान केंद्रावर उपस्थित राहावे अशा सूचना आहेत. अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना आहेत.
Volunteers at Polling Booths