MPSC च्या सर्वच परीक्षांचा निकाल बदलण्याची शक्यता

MPSC Exam Results

The results of all MPSC exams are likely to change as per the new guidelines. Against this backdrop, an important meeting of the Maharashtra Public Service Commission will be held on June 7. This will include a decision on the stalled admission process.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महत्वाचे -MPSC वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एमपीएससीच्या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वच परीक्षांचा निकाल बदलण्याची शक्यता आहे. एमपीएससीने रखडलेल्या परीक्षा प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. मार्गदर्शक सूचनेनंतर एमपीएससीने कार्यवाही सुरु केली आहे. त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांना खुल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) मधून संधी मिळणार आहे. परीक्षांच्या निकालावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वच परीक्षांचा निकाल बदलणार असून पात्र उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याविषयावर उद्या ७ जून रोजी आयोगाची महत्वाची मिटींग होणार आहे. या मिटींगमध्ये काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखतींपूर्वी पुन्हा नव्याने निवड यादी तयार होणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षा होऊन उत्तीर्ण झालेल्यांना बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच मुलाखती झालेल्यांपैकी देखील काहीजण अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

Mega Bharti 2021 – विविध विभागातील सरळसेवा भरती MPSC मार्फत

 MPSC Exam 2021

Government decided to give 10 per cent reservation to the economically weaker sections in education and government jobs to the Maratha community, instructions were also sent to the MPSC regarding the recruitment process on Thursday. According to this, now the candidates selected from the ‘SEBC’ category for the stalled pre- and main examinations and interviews of the MPSC can avail the benefits from the open and EWS category.

MPSC SEBC खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ

MPSC SEBC खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ-एसईबीसी’च्या ज्या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गाकरिता अर्ज केला, मात्र विहित वयोमर्यादा ओलांडली, त्या विद्यार्थ्यांकरिता एक दिलासादायक बातमी आहे. अशा विद्यार्थ्यांच्या जाहिरातीतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना देय असलेल्या वयोमर्यादा व परीक्षा शुल्काबाबतची सवलत कायम ठेवावी व त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य सरकारने एमपीएससी आयोगाला दिल्या.

नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे मराठा समाजातील काही उमेदवार आरक्षणामुळे पात्र ठरले असतील तरी मुलाखतीनंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल.

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेताच एमपीएससीलाही भरतीप्रक्रियेसंदर्भात गुरुवारी सूचना पाठविल्या आहेत. यानुसार आता एमपीएससीच्या रखडलेल्या पूर्व व मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी ‘एसईबीसी’ वर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गातून लाभ घेता येईल.

एमपीएससीला पत्र पाठवून ‘एसईबीसी’ वर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) रूपांतरित करून निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल सुधारित केल्यानंतर केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्याच मुलाखती, परीक्षा व शारीरिक चाचणी घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. ज्या उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी सुधारित निकालानुसार ती घेण्यात यावी, अशा सूचनाही सरकारने एमपीएससीला केल्या आहेत.


MPSC Exam Results

The state government has cleared the way for the results of various examinations and interviews of the Maharashtra Public Service Commission (MPSC). Read more details as given below.

Mega Bharti 2021 – विविध विभागातील सरळसेवा भरती MPSC मार्फत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा मार्ग राज्य शासनाने मोकळा केला आहे. ‘एमपीएससी’ला पत्र पाठवून ‘एसईबीसी’ वर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) रूपांतरित करून निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल सुधारित केल्यानंतर केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्याच मुलाखती, परीक्षा व शारीरिक चाचणी घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.  सुधारित निकालानुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.

महत्वाचे -MPSC वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट

MPSC Recruitment 2021

पर्याय निवडण्याची संधी

‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ अथवा खुल्या प्रवर्गातून नियुक्तीचा पर्याय निवडता येणार आहे. सुधारित पात्रता यादी जाहीर करण्यापूर्वी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पर्याय घेऊन त्यानुसार ईडब्ल्यूएस अथवा खुल्या प्रवर्गातून नियुक्तीकरिता शिफारस करावी लागणार आहे.

 सुधारित याद्या

शासनाने आयोगाला दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत, त्या सर्व निकालांमध्ये ‘एसईबीसी’  वर्गासाठी राखीव  पदांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे आता ईडब्लूएस आणि खुल्या प्रवर्गाच्या याद्यांमध्येच सुधारणा होणार आहे.

 सवलत कायम

‘एसईबीसी’च्या ज्या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गाकरीता विहित  वयोमर्यादा ओलांडली असेल त्यांच्याबाबत जाहिरातीतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना देय असलेल्या वयोमर्यादा व परीक्षा शुल्काच्या सवलतीबाबतची सवलत कायम ठेवण्यात यावी व त्यानुसार पुढील कारवाई करावी, अशा सूचना शासनाने आयोगाला दिल्या आहेत


PSI Notification 2021

Maharashtra Service Public Commission – MPSC published the new notification regarding PSI. An important decision has been taken regarding the recruitment of PSI’s post. According to the decision, 60 marks will be required in the physical test for the post of PSI from now on. If a candidate gets 60 marks in the field examination after passing the pre-examination, main examination, he will be able to be interviewed. The new rules will apply to the announcement in 2020

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Service Public Commission – MPSC) म्हणजेच एमपीएससीने पोलिस उपनिरिक्षक (मुख्य) (PSI Mains) अर्थात ‘पीएसआय’ पदाच्या भरतीसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, इथून पुढे पीएसआय पदाची मुलखात देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुणं मिळवणं आवश्यक आहे, अशी माहिती आयोगाने परिपत्रक काढत दिली आहे.

तसेच या पदासाठीच्या शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच उमेदवाराला मुलाखत देता येणार आहे. म्हणजेच उमेदवाराच्या क्वालिफिकेशनसाठी फक्त मैदानी गुण गृहीत धरले जाणार आहेत. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

उमेदवाराने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्याला मैदानी परीक्षेत जर 60 गुण मिळाले तर त्याला मुलाखत देता येणार आहे. हे नवे नियम 2020 मध्ये निघालेल्या जाहीराला लागू असणार आहेत. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता ते शारीरिक चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादीतून वगळले आहेत. आता इथून पुढे ते फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी माहिती आयोगाने दिली आहे.


MPSC Exam 2021

Age Limit For MPSC Exam Will Be Increased

 Maharashtra Public Service Commission exams postponed due to corona epidemic Now a second wave of corona has pushed a paper of students forward. However, these students who have reached the age limit for recruitment in 2021 will definitely be given a chance.

खुशखबर! MPSC ‘च्या परीक्षांसाठी वाढवून मिळणार वयोमर्यादा

 कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांचा एक पेपर पुढे ढकलला आहे. परंतु, 2021 मध्ये होणाऱ्या पदभरतीत वयोमर्यादा संपलेल्या या विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे एक संधी वाढवून दिली जाईल. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

 काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 31 तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यासांठी 33 वयोमर्यादा आहे. तर राज्य सेवेच्या पूर्व परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 38 तर अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षीची परीक्षा अजूनही झाली नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेचा निकष ओलांडला असून त्यांना वाढीव संधी मिळावी, अशी मागणी स्टूडंट राईट्‌स असोसिएशननेदेखील लावून धरली होती.


Three examination sub-centers in Pune have been shifted for the MPSC Secondary Service Joint Pre-Examination organized by the Maharashtra Public Service Commission. The Commission informed through a press release that it is providing examination papers to the candidates as per the changed examination centers.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित MPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यातील तीन परीक्षा उपकेंद्रे बदलण्यात आली आहे. बदललेल्या परीक्षा केंद्रानुसार उमेदवारांना परीक्षापत्र उपलब्ध करून देत असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. एमपीएससीने पुणे जिल्हा केंद्रावरील तीन परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल केला आहे. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आले.

वाघोलीतील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये होणारी परीक्षा आता बुधवार पेठेतील एच. व्ही. देसाई महाविद्यालयात होणार आहे. तसेच अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे होणारी परीक्षा नºहे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे होणार आहे.


The MPSC competition examination will be held as per the schedule. As per the decision of Maharashtra Commission, MPSC competitive examination will be held as per schedule.

MPSC स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार. महाराष्ट्र आयोगाच्या निर्णयानुसार MPSC स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं.

MPSC Exam- Scribe अनुमत दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर

राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे.


MPSC Exam 2021: The Agricultural Service, Forest and Engineering Services examinations conducted through the Maharashtra Public Service Commission were conducted separately. However, now these three exams will be combined and it has been prepared by the Maharashtra Public Service Commission

MPSC च्या वन, कृषी, अभियांत्रिकीची होणार एकत्रित परीक्षा !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कृषी सेवा, वन आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जात होत्या. मात्र, आता या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार असून त्याची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. 2021 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीनुसार रिक्‍तपदांची भरती करताना त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेअंतर्गत 27 प्रकारची पदे भरली जातात. या पार्श्‍वभूमीवर कृषी, वन आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एकत्रित घेतल्या जाणार आहेत.

“एमपीएससी’च्या एकत्रित परीक्षेचे स्वरूप

शंभर प्रश्‍नांसाठी 200 गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे. या तिन्ही विभागांच्या मुख्य परीक्षा मात्र, स्वतंत्रपणे होतील. आयोगाने त्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. दोन गुणांच्या प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास 0.5 टक्के तर एक गुणाचे उत्तर चुकल्यास 0.25 टक्‍के गुण कपात केले जाणार असल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.


 Guidelines for MPSC Exam

The Maharashtra Public Service Commission has issued guidelines for pre-service examinations conducted by the commission. The exam will be held on Sunday, March 21, 2021.

MPSC Exam: MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परीक्षा येत्या रविवारी २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे.

आयोगाने परीक्षेच्या वेळी पालन करावयाच्या सूचना पुढीलप्रमाणे –

  • परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांनी किमान तीन पदरी कापडी मास्क वापरणे अनिवार्य.
  • – परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले किट प्रत्येक उमेदवाराला देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्रांकरिता करायचा आहे.
  • – परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यास हितावह वातारवण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करणे आवश्यक.
  • – कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे (ताप, सर्दी, खोकला इ.) दिसून येत असल्यास संबंधित परीक्षआ उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी / कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप आदी गोष्टी असलेलं पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल.
  • – सोशल डिस्टन्सिंगसाठी परीक्षा उपकेंद्रावरील योग्य माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका आदी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
  •  परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे.
  • – वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर पाऊच आदी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत.
  • – कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

Check Guidelines Here


 UPSC Exams From January 8 To 17! MPSC Exam In February?

UPSC and MPSC Exam: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has given a deadline of January 15 for candidates in the ‘SEBC’ category to opt for the open or central government’s ‘EWS’ option as the reservation for the Maratha community remains in abeyance. On the other hand, the UPSC  examination will be held from January 8 to 17. After that, the Maharashtra Public Service Commission examination will be held after February 15, senior sources in the general administration department have said.

 युपीएससी’ची 8 ते 17 जानेवारीपर्यंत परीक्षा ! ‘एमपीएससी’ची परीक्षा फेब्रुवारीत

 मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. दुसरीकडे 8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा;15 फेब्रुवारीनंतर ;होईल, अशी शक्‍यता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.

खुशखबर !… MPSC च्या परीक्षा जाहीर; आता तयारीला लागा

 आरक्षण बदलासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहीरात काढली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या ‘एसईबीसी’ आरक्षणास स्थगिती दिली. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी आता खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. त्यासाठी 5 ते 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.

 राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यभर लॉकडाउन करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आणि परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने आयोगाच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोनासंबंधीचे निर्बंध व नियमांचे पालन करुन परीक्षा घेण्याचे आयोगाने निश्‍चित केले आणि विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही वितरीत केले. मात्र, मराठा समाजाचे आरक्षण स्थगित झाल्याने पुन्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आयोगाच्या प्रश्‍नपत्रिका अद्यापही जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयातच पडून आहेत. दुसरीकडे हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु केल्याचेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, आयोगाने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना यापुढे अधिकाधिक सहा संधी तर अनुसूचित जाती- जमातीतील विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी असेल, असा निर्णय घेतला. तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊ संधी देण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील काळात कार्यवाही केली जाणार आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!