राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) परीक्षा लांबणीवर – UGC NET-SET Examine
UGC NET-SET Examine Date – The National Eligibility Test (UGC NET), scheduled to be conducted by the National Eligibility Test (UGC), scheduled to be held on January 15, has been postponed. The new date for the exam will now be announced separately.
There are 85 subjects available for this exam. The exam for the December session will be held from January 3 to January 16. However, there was a demand to postpone the exam scheduled for December 15 due to Makar Sankranti, Pongal and festivals.
In view of this, it has been announced that the exam, which was scheduled to be held only on January 15, has been postponed. The new date for the postponed January 15 exam will be announced separately. It has been clarified that the examination of January 16 will be held as per the earlier plan.
राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) परीक्षा लांबणीवर
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) १५ जानेवारीला घेण्यात येणारी विद्यापीठ अनुदान आयोग – राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट ) लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
- एनटीएचे संचालक राजेश कुमार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यूजीसी नेट परीक्षा डिसेंबर आणि जून अशी वर्षातून दोनवेळा घेण्यात येते. यूजीसी नेट या परीक्षेद्वारे सहायक प्राध्यापक पदासाठीची आणि कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीची पात्रता, तसेच पीएच.डी.साठी पात्रता ठरवली जाते.
- या परीक्षेसाठी ८५ विषय उपलब्ध असतात. डिसेंबर सत्राची परीक्षा ३ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत घेण्यात येत आहे. मात्र, मकरसंक्रांत, पोंगल आणि सण असल्याने १५ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.
- या पार्श्वभूमीवर केवळ १५ जानेवारी रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता पुढे ढकलण्यात आलेल्या १५ जानेवारीच्या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. तर १६ जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
UGC NET-SET Examine – According to the proposed provisions of the new draft, the rules for appointment will be amended. Accordingly, those who have obtained a master’s degree with at least 55 per cent marks can get appointment as assistant professors even if they have not passed the UGC NET exam. Candidates will be allowed to teach on the basis of their best academic performance. For example, a bachelor’s degree in mathematics, a master’s degree in physics, and a Ph.D. in chemistry. If the candidate is eligible to teach chemistry subject, then the ugc net passed candidates can teach the subject who has passed the NET examination even if their previous degree or master’s degree is in a different subject. Ph.D. for promotion to the ranks of Assistant Professor, Associate Professor and Professor in a University, College. Will be mandatory. The Academic Performance Indicator (API) system used in the promotion of professors has been scrapped.
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य ? – ‘यूजीसी’कडून प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू निवडीचे प्रस्तावित बदल जाहीर
किमान ५५ टक्क्यांसह पदव्युत्तर पदवी मिळविलेले उमेदवारही आता सहायक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. मानव्यविद्या, वाणिज्य, शिक्षणशास्त्र आदी ठरावीक विद्याशाखांसाठीच ही सवलत मिळणार आहे. तसेच, कुलगुरूपदासाठी पूर्ण वेळ १० वर्षे अध्यापनाची अट शिथिल करण्यात आली असून, उद्योगांतील वरिष्ठ पदावरील दांडगा अनुभव व शिक्षण- सार्वजनिक उपक्रमांतील योगदान कुलगुरूपदासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
- ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ नेमण्याची मुभा – प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस अंतर्गत उद्योग किंवा अन्य क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिकांना अध्यापन, संशोधनासाठी सामावून घेतले जाऊ शकते. ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ची नियुक्ती एकूण मंजूर पदांच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापक, प्राचार्य आणि अन्य पदे, तसेच कुलगुरूपदाची पात्रता, निवड प्रक्रियेच्या नव्या नियमावलीचा मसुदा सोमवारी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नवी दिल्लीत जाहीर केला. त्यामध्ये या तरतुदी प्रस्तावित आहेत. या मसुद्यावर हरकती- सूचना नोंदवण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठीची पात्रता, पदोन्नती यासाठी २०१८मध्ये नियमावली करण्यात आली होती. आता २०१८ ची नियमावली अधिक्रमित होऊन त्याची जागा २०२५ची नवी नियमावली घेणार आहे.
- नव्या मसुद्यातील प्रस्तावित तरतुदींनुसार, नियुक्तीसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा होणार आहे. त्यानुसार, किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी मिळवलेल्यांना यूजीसीची नेट ही परीक्षा उत्तीर्ण न होताही सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती मिळू शकते. उमेदवारांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच्या आधारे अध्यापनाची परवानगी दिली जाईल. उदाहरणार्थ, गणितामध्ये पदवी, भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि रसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवलेला उमेदवार रसायनशास्त्र विषय शिकवण्यासाठी पात्र असेल, तर यूजीसी नेट उत्तीर्ण उमेदवार त्यांची पूर्वीची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी वेगळ्या विषयात असली, तरी ते नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विषयाचे अध्यापन करू शकतील. विद्यापीठ, महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी पीएच.डी. बंधनकारक असेल. प्राध्यापकांच्या पदोन्नतीमध्ये वापरली जाणारी ॲकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर (एपीआय) प्रणाली रद्द करण्यात आली आहे.
- यूजीसीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीनुसार, कुलगुरूपदासाठीच्या उमेदवारांना प्राध्यापक म्हणून काम केल्याचा किमान दहा वर्षांचा अनुभव संशोधन किंवा प्रशासकीय भूमिकेतील अनुभव असणे बंधनकारक होते. मात्र, आता नव्या प्रस्तावित तरतुदींनुसार, उद्योग, सार्वजनिक प्रशासन, सार्वजनिक धोरण किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये किमान दहा वर्षांचा वरिष्ठ स्तरावरील अनुभव आणि महत्त्वपूर्ण शैक्षणिक किंवा विद्वत्तापूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तीही कुलगुरू पदासाठी पात्र ठरू शकणार आहेत.
- कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेतील शोध समितीमध्ये कुलपती नामनिर्देशित सदस्य, यूजीसी नामनिर्देशित सदस्य, विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद, कार्यकारी परिषद, व्यवस्थापन मंडळ किंवा समकक्ष मंडळाचा नामनिर्देशित सदस्य यांचा समावेश असेल. समितीने पात्र उमेदवारांतून शिफारस केलेल्या तीन ते पाच उमेदवारांतून एका उमेदवाराची निवड कुलपतींकडून करण्यात येईल. कुलगुरूंची मुदत कमाल पाच वर्षे किंवा वयाची ७० वर्षे पूर्ण, यातील जे आधी होईल तितकी असेल. कुलगुरू निवड प्रक्रिया राबवून कुलगुरूंना जास्तीत जास्त एकदा पुनर्नियुक्ती देता येऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे.
- कंत्राटी नियुक्ती सहा महिन्यांसाठीच – ‘महाविद्यालय वा विद्यापीठांतील शिक्षकांच्या मंजूर जागांपैकी जागांवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करता येईल. मात्र, ही नियुक्ती कमाल सहा महिन्यांसाठी आणि गरज असेल, तेव्हाच करता येईल. पात्रता आणि निवड प्रक्रिया नियमित शिक्षक निवड प्रक्रियेप्रमाणेच असेल. कंत्राटी शिक्षकांचे मासिक वेतन हे नियमित शिक्षकांच्या एकूण वेतनापेक्षा कमी असता कामा नये. कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती एका शैक्षणिक सत्रापेक्षा जास्त असू नये आणि पुनरावलोकन केल्यानंतर आणखी एका सत्रासाठी पुनर्नियुक्ती करता येईल,’ असे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे.
A proposal to exempt 1,447 professors from 12 non-agricultural universities in the state from NET-SET has been sent to the University Grants Commission (UGC). The UGC committee will examine these proposals and decide whether to exempt the concerned professors from NET and SET.
नेट-सेटमधून सूट द्या ! – राज्यातील १२ अकृषीक विद्यापीठांतील १४४७ प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट मिळण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पाठवण्यात आला आहे. यूजीसीच्या समितीकडून या प्रस्तावांची तपासणी करून संबंधित प्राध्यापकांना नेट- सेटमधून सूट द्यायची किंवा नाही, या बाबतचा निर्णय घेतला जाईल.
राज्यातील १२ विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांतील १ हजार ४४७ प्राध्यापक ११ जुलै २००९ पूर्वी एम. फिल. ही पदवी प्राप्त केलेले आहेत. मात्र, यूजीसीने प्राध्यापक होण्यासाठी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण असण्याचा नियम केल्यामुळे या प्राध्यापकांबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना नेट- सेटमधून सूट मिळण्याचा मुद्दा २०१० पासून प्रलंबित आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यूजीसीला संबंधितांना सूट देण्याची विनंती केली. त्यानंतर ११ सदस्यांची समिती नियुक्त करून प्रस्ताव पाठवण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार प्रस्ताव सादर केले. मात्र, समितीने प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्याचे नमूद करून अभिप्राय सादर करण्याची सूचना केली. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी विद्यापीठांच्या कुलसचिवांना निर्देश दिले होते. त्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती, अशी माहिती उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
UGC NET Exam Results
UGC NET Exam Results: The UGC NET 2023 examination was successfully conducted at many centers across the country. UGC NET Result of University Grants Commission National Eligibility Test (UGC NET) will be released on the official website soon. The UGC NET 2023 exam was conducted from 21 February 2023 to 15 March 2023.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच UGC NET 2023 चा निकाल जाहीर करू शकते. या परीक्षेला बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. UGC NET परीक्षा पाच टप्प्यात घेण्यात आली आणि 15 मार्च 2023 रोजी संपली. UGC NET निकालासोबत NTA, UGC NET Answer Key आणि UGC NET कट-ऑफ मार्क्स देखील जारी करेल.
याशिवाय, उमेदवार https://ugcnet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करून UGC NET निकाल 2023 थेट पाहू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या चरणांद्वारे तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. UGC NET निकाल 2023 मध्ये उमेदवाराचे गुण, रँक आणि इतर संबंधित तपशील असतील. UGC NET परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार भारतभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) पदांसाठी पात्र असतील.
UGC NET 2023 ची परीक्षा देशभरातील अनेक केंद्रांवर यशस्वीपणे पार पडली. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (UGC NET) चा UGC NET निकाल लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल. UGC NET 2023 परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 15 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली.
असा चेक करा निकाल
- UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या.
- होमपेजवर NTA UGC NET निकाल 2023 लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक नवीन लॉगिन पृष्ठ दिसेल.
- लॉग इन करण्यासाठी सर्व आवश्यक तपशील जसे की रोल नंबर, जन्मतारीख किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
- तुमचा UGC NET निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल.
- UGC NET निकाल 2023 तपासा आणि सेव्ह करा.
UGC NET Exam Results: UGC NET Exam: Important News for UGC NET 2022 Exam Candidates UGC NET 2022 Result May declared tomorrow i.e. Saturday (05.11.2022) . Candidates who appeared for this examination can check their result by visiting the official website of UGC NET ugcnet.nta.nic.in. This exam was conducted in 4 phases across the country.
यूजीसी नेट परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) उद्या म्हणजेच शनिवारी UGC-NET चा निकाल जाहीर करेल. UGC चे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी शुक्रवारी या संदर्भात घोषणा केली आहे. उमेदवार त्यांचा निकाल UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर पाहू शकतील. निकाल पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची संधी मिळणार आहे.
NTA विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने UGC NET 2022 परीक्षा आयोजित करते. UGC NET सहाय्यक प्राध्यापक किंवा व्याख्याता पदासाठी आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप, JRF कार्यक्रमासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी आयोजित केली जाते.
मेदवार https://ugcnet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करून त्यांचा निकाल थेट पाहू शकतात. UGC अध्यक्ष ममिदला जगदीश कुमार यांनी निकाल जाहीर करण्याची तारीख जाहीर केली (UGC NET निकाल 2022). ट्विटमध्ये लिहिले आहे की, “यूजीसी नेट निकाल 2022 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) 5 नोव्हेंबर (शनिवार) रोजी घोषित करेल. निकाल NTA वेबसाइट https://nta.ac.in#UGC-NET वर उपलब्ध असेल.
देशभरात विविध तारखांना परीक्षा आयोजित करण्यात आली होती- 9, 11, 12, सप्टेंबर 20, 21, 22, 23, 29, 30, ऑक्टोबर 1, 8, 10, 11, 12, 13, 14 आणि 22, 2022. उत्तर की 1 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली. निकाल (UGC NET निकाल 2022) अंतिम उत्तर की नुसार तयार केला जातो आणि उमेदवारांच्या प्रतिसादावर आधारित, आवश्यक असल्यास, उत्तर की मध्ये बदल केले जातील.
CHECK UGC NET EXAM RESULTS – AVIALBE SOON
UGC NET Exam: Important News for UGC NET 2022 Exam Candidates UGC NET 2022 Result May Declare Soon. Candidates who appeared for this examination can check their result by visiting the official website of UGC NET ugcnet.nta.nic.in. This exam was conducted in 4 phases across the country.
शनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच UGC NET 2022 चा निकाल जाहीर करू शकते. या परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांचा निकाल UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन पाहू शकतात. ही परीक्षा देशभरात 4 टप्प्यांत घेण्यात आली.
याशिवाय, उमेदवार https://ugcnet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करून UGC NET 2022 चा निकाल देखील थेट पाहू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या चरणांद्वारे, तुम्ही तुमचा निकाल देखील तपासू शकता (UGC NET निकाल 2022). परीक्षेच्या अंतिम टप्प्यासाठी तात्पुरती उत्तर की जारी करण्यात आली आहे आणि आक्षेप नोंदवण्याची विंडो 24 ऑक्टोबर रोजी बंद होईल.
UGC NET निकाल 2022 कसा तपासायचा
- UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर, UGC NET निकाल 2022 लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
- तुमचा UGC NET निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
- UGC NET निकाल 2022 तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
यूजीसी नेट परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिक्षक होण्यासाठी पात्रता प्रदान करते, तसेच पीएच.डी.साठी प्रवेश सुविधा प्रदान करते. विद्यापीठ आणि उमेदवारांच्या कौशल्यावर अवलंबून उमेदवार सुरुवातीला रु. 25000 ते 50,000/- दरम्यान देखणा पगाराची अपेक्षा करू शकतात.
नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही खासगी महाविद्यालयात प्राध्यापक किंवा व्याख्याता पदासाठी अर्ज करू शकता. किंवा शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही तुमचे स्वतःचे कोचिंग सेंटर किंवा कोणत्याही संस्थेत उघडून नेट परीक्षेची ऑनलाइन किंवा ऑफलाइन तयारी करू शकता.
UGC NET Exam Results: CSIR NET Result 2021 CSIR-UGC NET June 2021 Exam Result has been declared by National Testing Agency. The exam was held between January 29 and February 15 to 17. Candidates should visit the examination portal csirnet.nta.nic.in for the results of CSIR UGC NET June 2021.
CSIR NET निकाल 2021 CSIR-UGC NET जून 2021 परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केला आहे. ही परीक्षा २९ जानेवारी आणि १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती. CSIR UGC NET जून २०२१ च्या निकालासाठी उमेदवारांनी परीक्षा पोर्टल csirnet.nta.nic.in ला भेट द्यावी.
विविध पाच विषयांमधील JRF किंवा लेक्चरशिप/ सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीच्या पात्रतेसाठी CSIR-UGC च्या राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या जून २०२१ च्या परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांचा निकाल आणि स्कोअर कार्ड तपासू शकतात. परीक्षा पोर्टल, csirnet.nta.nic.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून उमेदवार निकाल तपासू शकतात. CSIR UGC NET June 2021 स्कोअर कार्ड डाTनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आदि माहिती सबमिट करावी लागेल.
CSIR NET Result 2021 च्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यूजीसी नेट निकाल २०२१ पाहण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
UGC NET Exam Answer Key
The provisional answer sheet of CSIR UGC NET June 2021 has been published. The answer sheet can be viewed on the official website of the National Testing Agency (NTA) at https://csirnet.nta.nic.in/. Candidates sitting in the Council of Scientific and Industrial Research National Eligibility (CSIR UGC NET 2021) can check their marks by entering their application number and password or date of birth. The National Testing Agency (NTA) has also released the question paper of CSIR UGC Net June 2021.
CSIR UGC NET Answer Key 2022: सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ (CSIR UGC NET June 2021) ची तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट https://csirnet.nta.nic.in/ वर उत्तरतालिका पाहता येणार आहे. काऊन्सिल ऑफ साइंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च नॅशनल एलिजिबिलिटी (CSIR UGC NET 2021) मध्ये बसलेले उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून त्यांचे गुण तपासू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ( NTA) ने सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ ची प्रश्नपत्रिका देखील जाहीर केली आहे.
ज्या उमेदवारांना आपले उत्तर नीट तपासले गेले नाही असे वाटत असेल तर त्याविरोधात ते आक्षेप नोंदवू शकतात याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. या तारखेला रात्री ९ वाजेपर्यंत उमेदवार आक्षेप नोंदवू शकतात. उत्तरतालिकेला आव्हान देणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये नॉन-रिफंडेबल प्रोसेसिंग फी भरावी लागेल. यासोबतच त्यांना त्यांचा आक्षेप सिद्ध करणारी वैध कागदपत्रे सोबत जोडावी लागतील.
CSIR UGC NET Answer Key 2022: अशी करा डाऊनलोड
- सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ ची उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट-csirnet.nta.nic.in वर जा.
- होमपेजवरील संयुक्तसीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ परीक्षेसाठी आक्षेप लिंक डिस्प्लेवर क्लिक करा.
- एक नवीन लॉगिन पेज उघडेल.
- स्क्रीनवर तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख आणि लॉगिन भरा.
- सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ ची उत्तरतालिका दिसेल.
- प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील उपयोगासाठी जपून ठेवा.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ज्युनियर फेलोशिप (JRF) आणि लेक्चरशिप/असिस्टंट प्रोफेसरसाठी उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावरील पात्रता निश्चित करण्यासाठी सीएसआयआर परीक्षा २०२२ घेतली जाते. विज्ञान शाखेत मास्टर डिग्री असलेल्यांना सीएसआयआर नेट परीक्षा देता येते. यात सीबीटी माध्यमातून २ पेपर असून वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्न विचारले जातात.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
UGC NET Results: Important information is provided for the candidates awaiting UGC Net result. The University Grants Commission (UGC) has announced the dates for UGC NET December 2020 and June 2021 (UGC NET December 2020 and June 2021). A notice in this regard has been published on UGC’s official website ugc.ac.in and NTA website nta.ac.in. The results of the UGC Net will be announced in the next one to two days by the National Testing Agency (NTA). The link of UGC Net result will be activated on the official website ugcnet.nta.nic.in.
UGC NET Result 2022: यूजीसी नेट निकालाची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grant commission, UGC) यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ परीक्षांचे (UGC NET December 2020 and June 2021) निकालाची(UGC NET Result) तारीख जाहीर केली आहे. या संदर्भात यूजीसीची अधिकृत वेबसाइट ugc.ac.in आणि एनटीए वेबसाइट nta.ac.in वर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे येत्या एक ते दोन दिवसांत यूजीसी नेटचा निकाल जाहीर होणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले. यूजीसी नेट निकालाची लिंक अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर सक्रिय केली जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देखील @ugc_india या ट्विटर हँडलवर ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. याशिवाय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील त्यांच्या ट्विटर हँडलवर निकालाच्या तारखेची माहिती दिली आहे.
UGC NET Result date: निकालाचा तपशील
यूजीसीने जारी केलेल्या सूचनेनुसार, यूजीसी नेटचा निकाल १७ किंवा १८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नेट) च्या निकालाबाबत यूजीसी आणि एनटीए वेगाने एकत्र काम करत असल्याचे यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदेश कुमार यांनी म्हटले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत यूजीसी नेटचा निकाल लागावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले. प्रा. एम जगदेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी यूजीसीचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. याआधी ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू होते.
UGC NET Result 2021: या स्टेप्स फॉलो करुन करा डाऊनलोड
- स्टेप १: अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.
- स्टेप २: यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३: अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- स्टेप ४: तुमच्या विषयाच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ५: निकाल डाउनलोड करा. - स्टेप ६: निकालाची प्रिंट काढा.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
UGC NET Exam Results: The National Testing Agency (NTA) has set 24 Jan 2022 as the deadline for filing objections to the provisional answer sheets for UGC NET 2021. Candidates appearing for the examination in all the three stages can check by downloading the answer sheet from the official website ugcnet.nta.nic.in. Candidates are now awaiting the result date after the answer sheet is announced. The UGC Net Results 2021 is expected to be released between January 29 and March 25, 2022.
UGC NET Result 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने यूजीसी नेट २०२१ (UGC NET 2021) परीक्षेच्या प्रोव्हिजनल उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासाठी २४ जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आला. तिन्ही टप्प्यांत परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वरून उत्तरतालिका डाउनलोड करुन तपासू शकतात. उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर उमेदवार आता निकालाच्या तारखेची वाट पाहत आहेत. दरम्यान यूजीसी नेट निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.
यूजीसी नेटतर्फे जाहिर करण्यात आलेल्या तात्पुरत्या उत्तरतालिकेवर २४ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. तात्पुरत्या उत्तरतालिकेवर आक्षेप प्राप्त झाल्याच्या शेवटच्या तारखेपासून जास्तीत जास्त ६० दिवसांच्या आत निकाल घोषित केले जातात. त्यामुळे आक्षेप नोंदविण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी असेल तर उमेदवार यूजीसी नेट निकाल २०२१ ची तारीख २९ जानेवारी ते २५ मार्च २०२२ या कालावधीत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
निकाल जाहीर करण्यापूर्वी एनटीएतर्फे यूजीसी नेट २०२१ प्रश्नपत्रिका आणि रेकॉर्ड केलेले प्रतिक्रिया देखील जाहीर करते. या अधिकृत वेबसाइटवर दोन ते तीन दिवस उपलब्ध असतात. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या दोन्ही पेपरसाठी बसलेल्या एकूण उमेदवारांच्या ६ टक्के असेल.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
UGC NET Exam Results: University Grants Commission has announced the answer sheet of the National Eligibility Test 2020. The National Testing Agency has published the answer sheets of UGC Net June 2021 and December 2020 simultaneously on the official website ugcnet.nta.nic.in. After downloading the UGC Net Answer Sheet, candidates should check their answers. They can report objections if there are any errors in it. Candidates have been given time till January 24, 2022, for this.
यूजीसीकडून दोन परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर
UGC NET 2022: विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२० उत्तरतालिका जाहीर केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
डिसेंबर आणि जून टप्प्यातील यूजीसी नेट २०२१ च्या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून त्यांची उत्तरे तपासता येणार आहेत. वेबसाइट तपासण्यासाठी काही सोप्या स्टेप्स देखील देण्यात आल्या आहेत. ज्याच्या मदतीने उमेदवार त्यांच्या स्कोअरचा अंदाज लावू शकतात.
UGC NET 2022 UGC NET परीक्षा: यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर
How to Download UGC NET Exam Asnwer Key
- यूजीसी नेट उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.
- त्यानंतर होमपेजवर यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ साठी लिंकवर क्लिक करा.
- स्क्रिनवर उत्तरतालिकेचे पेज खुले होईल.
- यावर ऍप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा.
- उत्तरतालिका डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआउट घ्या.
यूजीसी नेट उत्तरतालिका डाऊनलोड केल्यानंतर, उमेदवारांना त्यांची उत्तरे तपासा. यामध्ये काही त्रुटी असल्यास ते आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी उमेदवारांना २४ जानेवारी २०२२ पर्यंत वेळ देण्यात आली आहे.
एनटीएने यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ परीक्षा तीन टप्प्यात घेतली होती. त्यानुसार, पहिला टप्पा २० नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आला. दुसरा टप्पा २४ डिसेंबर २०२१ ते २७ डिसेंबर २०२१ दरम्यान पार पडला. तिसरा टप्पा ४ आणि ६ जानेवारीला पार पडला. त्यात कन्नडच्या पुनर्परीक्षेचाही समावेश होता.
एकूण ८१ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व परीक्षांची उत्तरतालिका आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. त्यानंतर लवकरच निकालही जाहीर केला जाणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा