CEED Exam Results-आयआयटी २०२२ परीक्षेच्या निकाल जाहीर
CEED Exam Results
CEED Exam Results: The Indian Institute of Technology Mumbai (IIT Bombay) has announced the results of the entrance examination for the Master of Design (MDes) course. Candidates appearing for this examination can view the results by visiting the official website of IIT Mumbai ceed.iitb.ac.in
CEED Result 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (Indian Institute of Technology, IIT Bombay) ने मास्टर ऑफ डिझाइन (MDes) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. हा निकाल उमेदवारांनी सुचवलेले बदल किंवा हरकती लक्षात घेऊन तयार केलेल्या अंतिम उत्तरतालिकेवर आधारित आहे. आयआयटी मुंबईने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, स्कोअर कार्ड १२ मार्च २०२२ ते १४ जून २०२२ पर्यंत उपलब्ध असेल. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार होती.
२३ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या परीक्षेसाठी सीईईडी निकाल २०२२ जाहीर झाला आहे. आयआयटी मुंबईने या परीक्षेसाठी २५ जानेवारी २०२२ रोजी तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. सीईईडी परीक्षा देणारे विद्यार्थी आता अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतात.
थेट लिंकवरुन निकाल तपासण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
CCED Exam Results: This is an important update for the candidates who have appeared in Design PG and PhD Entrance Examination CEED 2022 at IIT. The results of Design PG / PhD Entrance Examination – Common Entrance Exam for Design (CEED) organized by Indian Institute of Technology, IIT Mumbai will be announced on March 8, 2022.
CEED 2022 Result: आयआयटीमध्ये डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षा सीईईडी २०२२ मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology, IIT) मुंबईद्वारे आयोजित डिझाइन पीजी/पीएचडी प्रवेश परीक्षा- कॉमन एन्ट्र्न्स एक्झाम फॉर डिझाइन(Common Entrance Exam for Design, CEED) च्या निकाल ८ मार्च २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे.
CEED २०२२ चा निकाल आयआयटीची अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाहीर केला जाणार आहे. आयआयटी मुंबईतर्फे १२ मार्च रोजी परीक्षेच्या वेबसाइटवर CEED २०२१ स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात येणार आहे.
मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, रुरकी येथील आयआयटी आणि IIITDM मधून चालविल्या जाणाऱ्या मास्टर ऑफ डिझाईन (M.Design) आणि PhD अभ्यासक्रम २०२२ मध्ये प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी CEED २०२२ घेतली जाते. यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली होती.
यानंतर संस्थेने २५ जानेवारी रोजी तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करून २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचा आढावा घेतल्यानंतर ३१ जानेवारी रोजी अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर, CEED २०२२ चा निकाल ८ मार्च रोजी जाहीर होणार होता.
१० मार्च रोजी UCEED २०२२ चा निकाल
दुसरीकडे, विविध आयआयटीमध्ये आयोजित केलेल्या डिझाईनमधील अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या UCEED २०२२ चा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षांसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज आले होते आणि ही परीक्षा २३ जानेवारीला झाली होती.
यानंतर तात्पुरती उत्तरतालिका २५ जानेवारीला आणि अंतिम उत्तरतालिका ३१ जानेवारीला जाहीर करण्यात आली. यूजी प्रवेश परीक्षेचे स्कोअरकार्ड १४ मार्चपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
UCEED परीक्षेची उत्तरतालिका जाहीर
UCEED Exam Answer Key : Indian Institute of Technology Mumbai (IIT Bombay) has announced the answer sheets for UCEED and CEED 2022 exams. Students appearing for UCEED and CEED 2022 exams will be able to view and download the answer sheet on the official website of IIT Mumbai at uceed.iitb.ac.in.
UCEED Answer Key 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने UCEED आणि CEED २०२२ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. UCEED आणि CEED २०२२ च्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईची अधिकृत वेबसाइटवर uceed.iitb.ac.in वर उत्तरतालिका पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.
- पोर्टलवर लॉगिन करून उमेदवार भाग-अ साठी त्यांचे वैयक्तिक प्रतिसाद पाहू शकतात. विद्यार्थ्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की 31 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणाऱ्या भाग-अ साठी सर्व प्रतिसादांचे अंतिम उत्तर की नुसार मूल्यमापन केले जाईल.
- UCEED आणि CEED 2022 भाग A उत्तर की उमेदवार पोर्टलवर उपलब्ध आहे. UCEED आणि CEED 2022 भाग A उत्तर की तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि लॉगिन लिंकमध्ये लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा. बातमीत देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन देखील उत्तरतालिका तपासता येणार आहे.
- UCEED, CEED 2022 च्या अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in वर जा. दिलेल्या UCEED आणि CEED २०२२ उमेदवार पोर्टल लिंकवर क्लिक करा. लॉगिनवर क्लिक करा आणि ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका. UCEED आणि CEED २०२२ उत्तरतालिका तपासा आणि संदर्भासाठी डाउनलोड करा.
- जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार UCEED आणि CEED २०२२ उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. उमेदवार २७ जानेवारी २०२२ पर्यंत उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवू शकतात. आक्षेप आणि दुरुस्त्यांवर आधारित, UCEED आणि CEED २०२२ अंतिम उत्तरतालिका जानेवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
- UCEED आणि CEED 2022 चा निकाल १० आणि ८ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध होऊ शकतो. यासंदर्भात अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी मार्चमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा