TMC Fire Department Women Recruitment
TMC Fire Department Women Recruitment
ठाणे महापालिकेमध्ये अग्निशमन दलात ७० महिलांचे पथक
Thane Mahanagarpalika Recruitment 2019 – TMC Fire Department wants to womens recruitment 2019. Extensive efforts have been initiated to increase the capacity of Thane fire brigade to include women in the fire department. Since the proposal has already been prepared, further action is being taken with the permission of the Commissioner. The recruitment process will be started within the next month, senior officials of the Municipal Establishment Department said. More Recruitment Details are given below :
ठाणे महापालिकेकडून प्रक्रियेसाठी प्रस्ताव सादर
प्रत्येक क्षेत्रात महिलांना आरक्षण देण्यात आले असले तरी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील अग्निशमन पथकामध्ये अद्याप एकाही महिलेचा प्रवेश झाला नव्हता. परंतु ही त्रुटी लवकरच भरून काढली जाणार असून लवकरच अग्निशमन दलामध्ये ७० महिलांचे पथक सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रशासनाकडून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, विशेष नियोजन प्राधिकरणे, शासकीय उपक्रम यांच्या अग्निशमन सेवेसाठी कर्मचाऱ्यांना तांत्रिक स्वरूपाचे प्रशिक्षण मिळावे व प्रशिक्षित उमेदवार उपलब्ध व्हावे यासाठी उपलब्ध अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. एसएससी उत्तीर्ण आणि शारीरिक पात्रता असलेल्या महिला उमेदवारांना ठाणे महापालिकेमध्ये अग्निशामक म्हणून कार्यरत होण्याची इच्छा आहे. परंतु ठाणे महापालिकेने अग्निशमन विभागात महिला उमेदवारांची भरती केलेली नाही. सरकारच्या धोरणानुसार अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेल्या शेकडो महिला ठाणे महापालिकेतील भरतीच्या प्रतीक्षेत आहे, असा दावा तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात प्रशासनाला दिलेल्या पत्रात केला होता. महापालिकेच्या अग्निशमन सेवेत महिलांना सहभागी करून घेण्याविषयी महाराष्ट्र अग्निशमन सेवेच्या संचालकांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना केल्याचे शिंदे यांनी म्हटले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागातील महिला अग्निशामकांच्या भरतीनुसार ठाण्यातही कार्यवाही करण्याचे सुचवले होते.
महिनाभरात भरतीप्रक्रिया
ठाणे अग्निशमन दलाची क्षमता वाढवण्यासाठी महिलांना अग्निशमन विभागात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने व्यापक प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसे प्रस्ताव आधीच तयार झाले असल्याने आयुक्तांच्या परवानगीने पुढील कार्यवाही केली जात आहे. पुढील महिनाभरात ही भरतीप्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आस्थापना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.