Arogya Vibhag Exam – आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशीच TET
TET and Arogya Vibhag Exam on Same Date
Many job seekers have applied for the health department’s Group ‘D’ exam and the same candidate has also applied for the TET exam. Now they have a big problem, which exam to give? The Group D examination will now be held on October 31, the same day as the TET Teacher Eligibility Test.
TET Exam- TET Exam- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाही पुढे ढकलणार
आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशीच TET
आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत मोठा गोंधळ पहायला मिळाला होता. आरोग्य विभागीतल ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानकपणे रद्द करण्यात आल्या होत्या. या प्रकारच्या सावळ्या गोंधळावर विद्यार्थी वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच या परीक्षा रद्द करण्यात आल्याची सारवासारव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली होती आणि आता या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही या परीक्षांबाबतचा घोळ सुटता सुटत नाहीये. आता गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, त्याच दिवशी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे.
- नोकरीच्या शोधात असलेले अनेक पदवीधर आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच उमेदवाराने टीईटी परीक्षेसाठीही अर्ज केला आहे. आता त्यांच्यासमोर मोठी अडचण झालेली आहे की कोणती परीक्षा द्यायची?
- आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दुसरी कोणती परीक्षा आहे का याची चौकशी केली नसेल का? असा प्रश्न आता परीक्षार्थी विचारत आहेत. विशेष म्हणजे टीईटीची परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार होती.
- त्यादिवशी युपीएससीची असल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती आणि ३१ ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा आता राज्यभर घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी आता पुन्हा ही आरोग्य भरतीची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने पुन्हा एकदा राज्यशासनाचा सावळा गोंधळ संपतानाची चिन्हे दिसत नाहीयेत.
Latest big news regarding Arogya Vibhag Bharti 2021 is that the written examination of Arogya Vibhag Bharti has been postponed now… for complete details click here
परीक्षेच्या एक दिवस आधी पुढे ढकलण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ च्या परीक्षांची नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गट ‘क’ ची परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी तर गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या परीक्षांच्या नऊ दिवस आधी उमेदवारांना हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. परीक्षांसदर्भात आज पार पडलेल्या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी याची घोषणा केली.
MAHA TET Exam 2021
The ‘Maharashtra Teacher Eligibility Test 2021’ (TET) conducted by the Maharashtra State Examination Council was held on 10th October. But on this day, a written test has been organized by the Central Public Service Commission. The TET examination will now be held on October 31. For More Details click here