Tesla Bharti- उमेदवारांना नोकरीची संधी; टेस्लामध्ये विविध पदांची भरती
Tesla Recruitment 2021-2022
The world-renowned company Tesla will be recruiting for various positions. The company’s CEO Elon Musk has given this information.. Tesla will be filling the vacancies of Hardcore AI (Artificial Intelligence Engineers). Tesla will be hiring engineers with full self-driving chip (FSD), dojo system, neural network, autonomy algorithms, and coding experience.
Tesla Recruitment 2021-2022: जगातील नामांकित कंपनी टेस्लामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यासाठी टेस्ला कंपनीतर्फे अर्ज प्रक्रियेचा तपशील देण्यात आला आहे. यासोबतच स्पेसएक्सची मालकी असलेल्या स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून २०२२ मध्ये भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होणार असून भारतीयांना नोकरीची संधी मिळणार आहे.
एलोन मस्क पुढील वर्षी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणाच्या तयारीत आहेत. यासाठी कंपनीतर्फे सध्या नियामक मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्टारलिंकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याची प्री-बुकिंग ७,२०० रुपयांपासून सुरू झाली आहे. यामाध्यमातून स्टारलिंक भारतातील उमेदवारांना नोकऱ्या देत असल्याची माहिती स्टारलिंकचे भारतातील प्रमुख संजय भारद्वाज यांनी दिली.
Tesla Career 2021-2022
ग्रामीण भारतात होत असलेल्या परिवर्तनाला गती देण्यासाठी सॅटलाइट इंटरनेट सेवा सुरू करणे हा एक छोटासा उपक्रम आहे. आपण पुढे जाऊ तशा नोकरीच्या संधी खुल्या होतील असे संजय भारद्वाज यांनी कंपनीच्या लिंक्डइन पेजवर लिहीले आहे. कंपनीला परवाना मिळताच याला आणखी गती येईल आणि पात्र उमेदवार आपला बायोडाटा पाठवू शकतील असेही ते म्हणाले.
स्टारलिंकमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कार्यकारी स्तरावर काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच त्याला कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान आणि मजबूत संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. उमेदवाराने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्सची भरती- Career in Tesla
- टेस्ला कंपनीतर्फ हार्डकोर एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्स पदांच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार असल्याचे इलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
- टेस्ला कंपनीमध्ये फुल सेल्फ ड्रायव्हिंग चिप (FSD), डोजो सिस्टम, न्यूरल नेटवर्क, ऑटोनॉमी अल्गोरिदम आणि कोडिंगचा अनुभव असलेल्या इंजिनीअर्सची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना टेस्लाच्या बॉट प्रोजेक्टमध्ये काम करता येणार आहे.
- या पदभरतीचा सविस्तर तपशील टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Elon Musk had earlier in July announced that the company’s construction work would begin at a faster pace with new manufacturing facilities. Students do not need a college degree to work with Tesla. Students can apply for a job at this plant after high school. The Tesla manufacturing plant is expected to employ more than 10,000 people by 2022.
एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा. टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2022 पर्यंत 10000 हून अधिक लोकांना काम देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे कॉलेज डिग्रीशिवायच टेस्लामध्ये (Tesla) नोकरीची संधी मिळणार आहे.
एलन मस्क यांनी याआधी जुलैमध्ये कंपनीचं कन्स्ट्रक्शन काम नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह वेगात सुरू असल्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना टेस्लासोबत काम करण्यासाठी कॉलेज डिग्रीची आवश्यकता नाही. विद्यार्थी हाय स्कूलनंतर या प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
Tesla Recruitment 2020: Tesla CEO Alan Musk is hiring engineers for its brain-machine interface company Neuralink. Mast did not have an academic background in neuroscience. In particular, he gave this answer in response to a question from Indian youth.
ब्रेन इंटरफेस विकसित करता येतो? मग एलन मस्कच्या कंपनीत मिळेल नोकरी
Neuralink Bharti 2020
टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क आपल्या ब्रेन-मशीन इंटरफेस कंपनी न्यूरालिंकसाठी इंजिनीअर्सची भरती करत आहेत. या कामासाठी न्यूरोसायन्सच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची गरज नाही असं उत्तर मस्त यांनी दिलं. विशेष म्हणजे हे उत्तर त्यांनी एका भारतीय तरुणाच्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून दिलं.
प्रणय पाटोळे असं या तरुणाचं नाव आहे. न्यूरालिंकसाठी काम करण्यासाठी न्यूरोसायन्स / इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग / रोबोटिक्स / बायोलॉजी ची शैक्षणिक पार्श्वभूमी असणे गरजेचे आहे का असा प्रश्न प्रणयने एलन मस्क यांना ट्विटरद्वारे विचारला होता. त्यावर मस्क यांनी उत्तर दिले.
मस्क यांनी उत्तरादाखल ट्विट केलं – ‘जर तुम्ही फोन / व्हेरिएबल्स (सिलिंग, सिग्नल प्रोसेसिंग, इंटक्टिव्ह चार्जिंग, पॉवर एमजीएमटी इत्यादी) च्या कठीण समस्या सोडवल्या असतील तर कृपया न्यूरालिंक इंजिनीअरिंगसोबत काम करण्याच्या पर्यायावर विचार करा.’ प्रणय याला टॅग करत मस्क यांनी थेट असे उत्तर दिले की, ‘न्यूरोसायन्सची पार्श्वभूमी असणे गरजेचे नाही.’
मस्क यांनी यापूर्वी ही घोषणा केली होती की २८ ऑगस्ट रोजी ते न्यूरालिंकमधील प्रगतीसंदर्भात महत्त्वाचे अपडेट देतील. अर्धांगवायूने ग्रासलेल्या लोकांसाठी उपकरणे नियंत्रित करण्यासंबंधीचे काम ही कंपनी करते. ज्यांना ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूसंबंधी अन्य विकार आहेत अशा लोकांना सशक्त बनवण्यासाटी मदत करण्यासाठी न्यूलालिंकने मागील वर्षी एका चिपमध्ये मेंदूशी संबंधित थ्रेड्सचे उद्घाटन केले होते. ही चिप दीर्घकाळ चालते. मस्क यांचा न्यूरालिंकबाबतचा हा संवाद रविवारी सुरू होता.
Tesla Recruitment Advertisement