तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास आज सुरुवात, जाणून घ्या कशी होणार प्रक्रीया.
Technical Education Admission 2020
The admission process for the three-year engineering diploma after 10th and the post-twelfth science diploma course is starting on Monday (10th). Admission forms can be filled by August 25. There are 341 Diploma Engineering Admission Centers in the state and 52 facilities in Aurangabad Division. Also, 248 facilities have been identified in the state and 53 in the Aurangabad division for pharmaceutical courses. Principals of Government Technical Colleges in each district of the Aurangabad Division have been appointed as Nodal Officers for the admission process.
तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास आज सुरुवात, जाणून घ्या कशी होणार प्रक्रीया.
औरंगाबाद : दहावीनंतर तीन वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका तसेच, बारावी विज्ञान नंतरच्या औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी (ता.१०) सुरुवात होत आहे. प्रवेश अर्ज २५ ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत.
पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यात ;३४१ तर, औरंगाबाद विभागात ५२ सुविधा केंद्रे आहेत. तसेच औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी राज्यात २४८ तर, औरंगाबाद विभागात ५३ सुविधा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आले आहे. प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातून आठवी नववी व दहावी उत्तीर्ण असण्याची पात्रता व आता बदलण्यात आली असून यावर्षी महाराष्ट्रातून केवळ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र राहतील.
प्रत्यक्ष न येणाऱ्यांसाठी.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे, तसेच सर्व कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्यासाठी शासकीय व अनुदानित संस्था या ई सुविधा केंद्र म्हणून काम पाहतील.
केंद्रावर येणाऱ्यांसाठी
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सुविधा केंद्रावर प्रत्यक्षपणे येऊन कागदपत्रांची तपासणी करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित तारीख व वेळ निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
असे असेल शुल्क.
सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थी, महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी, जम्मू-काश्मीर, लडाख या क्षेत्रातील विस्थापित विद्यार्थ्यांसाठी अर्जाचे शुल्क रुपये चारशे रुपये, महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थी व दिव्यांगासाठी अर्जाचे शुल्क तीनशे रुपये आहे.
राज्यातील अभियांत्रिकी पदविका संस्था – ४०१
एकूण जागा – १ लाख १९ हजार ५९५
औरंगाबाद विभागातील संस्था – ५८
औरंगाबाद विभागातील जागा – १७ हजार २१४
राज्यातील औषधनिर्माणशास्त्र पदविका संस्था – ३९५
एकूण जागा -२४ हजार ५६७
औरंगाबाद विभागातील संस्था – ८८
औरंगाबाद विभागातील जागा – ५७२८