Taluka Krida Adhikari Bharti -प्रशिक्षक होणार आता तालुका क्रीडा अधिकारी; लवकरच 80 जागांसाठी भरती
Taluka Krida Adhikari Bharti 2022
Maharashtra Taluka Krida Adhikari Bharti 2022: Important news for the interested candidates working in the field of sports, 80 posts of Taluka Sports Officer are going to be filled soon to develop the sports field in Maharashtra. Taluka Sports Officer Recruitment will be done through MPSC. The advertisement will be released soon through MPSC. Coaches under Directorate of Maharashtra State Sports and Youth Services will be promoted as Taluka Sports Officers. Read More details regarding Taluka Krida Adhikari Bharti 2022
MPSC Bharti -गट अ ते गट क संवर्गांची भरती आता दोनच संयुक्त परीक्षांद्वारे
प्रशिक्षक होणार आता तालुका क्रीडा अधिकारी; लवकरच 80 जागांसाठी भरती
माहाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्राचा विकास करण्यासाठी लवकरच तालुका क्रीडा अधिकारी पदाच्या 80 जागा भरल्या जाणार आहेत
यात विविध खेळांतील 44 प्रशिक्षकांना तालुका क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती मिळणार आहे. याचबरोबर 15 जागा या एमपीएससीच्या माध्यमातून भरल्या जातील, तर आणखी 20 जागा एमपीएससीमधून भरण्यासाठी क्रीडा खात्याकडून लवकरच जाहिरात काढली जाणार आहे. मात्र, थेट नियुक्तीमधील 54 खेळाडूंना प्रशिक्षक करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने राज्याच्या क्रीडा मंत्रालयाकडे पाठविला आहे.
महाविकास आघाडीतील राज्याचे माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी 54 खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावणार असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी कामाला वेगही दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले. महाराष्ट्राचे नवीन क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी 15 दिवसांत 80 तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या जागा भरणार असल्याची माहिती नुकतीच विधान परिषेद दिली. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी दै. ‘सामना’ने संपर्क साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. दै. ‘सामना’ने तालुका क्रीडा अधिकारी आणि 54 खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्नाचा वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.
श्रेणीनुसार प्रशिक्षक भरण्याचा प्रस्ताव -Taluka Krida Adhikari Recruitment 2022
- महाराष्ट्रातील 359 तालुक्यांसाठी सध्या 20 तालुका क्रीडा अधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे असलेल्या प्रशिक्षकांना पदोन्नतीने तालुका क्रीडा अधिकारी बनविण्यात येणार आहे.
- या रिक्त जागा खेळाडूंच्या थेट नियुक्ती योजनेतून भरण्याचा प्रस्ताव क्रीडा संचालनालयाने राज्याच्या क्रीडा सचिवांकडे पाठविला आहे. खेळाडूंच्या थेट नियुक्त्यांसाठी 2017-18 साली प्रस्ताव मागविण्यात आले होते.
- त्यातील 54 खेळाडूंची यादी तयारही केलेली आहे. मात्र, काही खेळाडू विशिष्ट खात्यातील पदासाठी अडून बसल्याने खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा विषय रखडला होता. तत्कालीन राज्य क्रीडामंत्री सुनील केदार यांनी खेळाडूंना आधी पाच वर्षे क्रीडा खात्यातच नोकरी करावी लागेल, असा मध्यम मार्ग काढला होता.
- त्या पार्श्वभूमीवर आता खेळाडूंना प्रशिक्षकपदी नेमण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. या 54 खेळाडूंपैकी कोणी कुठल्या दर्जाच्या क्रीडास्पर्धेत पदक जिंकले आहे त्यानुसार प्रशिक्षकांची श्रेणी तयार करून त्यांना नोकरी दिली जाणार असल्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले