तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टर माईंडला अटक, जाणून घ्या संपूर्ण माहिती- Talathi Paper Scam

Talathi Paper Scam 2023 Exam

Talathi Paper Scam 2023 Exam :- Datta Nalawade, the mastermind of the Talathi recruitment exam scam, has been arrested from Chhatrapati Sambhajinagar. Datta Kaduba Nalawade (27), a resident of Bhalgaon, has been arrested by the MIDC CIDCO police after a gap of nine months. On Saturday morning, the police arrested Datta Nalawade after he was found roaming around the Mill Corner area. In September, scams related to various competitive exams, including the Talathi exam, came to light in the city. Since then, Dutta has been evading the police. However, Dutta Nalawade has finally been arrested. Candidates Read the complete details given below on this page regarding the Talathi Paper Scam 2023 Exam and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टर माईंडला अटक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाईंड दत्ता नलावडेला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यांचा मास्टरमाईंड दत्ता कडूबा नलावडे (27, रा. भालगाव) हा तब्बल नऊ महिन्यांनंतर एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी (दि.15) सकाळी मिलकॉर्नर परिसरात निवांत फिरताना आढळताच पोलिसांनी दत्ता नलावडेच्या मुसक्या आवळल्या आहेत. सप्टेंबरमध्ये शहरात तलाठी परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांचे घोटाळे समोर आले. तेव्हापासून दत्ता पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, आता अखेर दत्ता नलावडेला अटक केली आहे.

तलाठी भरती सन २०२३ सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबाबत जाणून घ्या..!

तलाठी भरतीचा निकाल!! येत्या २६ जानेवारीला नियुक्ती पत्रे देण्याचे नियोजन सुरू आहे..!


Talathi Paper Scam 2023 Exam :- The successful candidates in the Talathi recruitment exam were supposed to get permission from the Central Election Commission for appointment after verifying the documents and filling up the priorities. However, it is now clear that this permission will be granted only after the model code of conduct is over. The candidates are in a quandary as it will take nearly a year for the talathi recruitment. Meanwhile, the possibility that these newly appointed talathis can be used for the election process has also faded. As a result, many students who have appeared for the Talathi exam are waiting. Candidates Read the complete details given below on this page regarding the Talathi Paper Scam 2023 Exam and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

तलाठी भरती; नव्याने नियुक्त होऊ घातलेले तलाठी कधी होणार रुजू

तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते. मात्र, ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे. तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे. यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत.

  • राज्यात गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ तलाठी जागांसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेबाबत आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करून भूमी अभिलेख विभागाने यंदाच्या मार्चमध्ये या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर केली.
  • पेसाअंतर्गत असलेल्या १३ जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने थांबविण्यात आली होती. मात्र पेसा क्षेत्र गावनिहाय असल्याने केवळ अशाच गावांमधील ५७४ पदांची निवड प्रक्रिया स्थगित करून अन्य १ हजार ७१८ पदांसह सर्व ३६ जिल्ह्यांमधील ४ हजार २१९ पदांसाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.
  • आचारसंहितेचा अडसर
    • ■ यादीनंतर उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्राधान्य नियुक्तीचा प्राधान्यक्रम देखील दिला होता. मात्र, याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या तलाठी पदांच्या नियुक्तीला नियुक्तीबाबत काय करावे, या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती.
    • ■ आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार केला होता.
    • ■ आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्त्ती द्यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीला मान्यता देणार देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर अर्थात जून नंतरच नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Talathi Paper Scam 2023 Exam :- In the Talathi recruitment exam, the successful candidates were supposed to get the approval of the Central Election Commission for appointment after verifying the documents and filling the priorities. However, it is now clear that this permission will be granted only after the model code of conduct is over. The state government had written to the Election Commission in this regard as there was a rule that the state government could not appoint any post as per the model code of conduct. The letter had requested that these candidates be appointed as the process started even before the model code of conduct began. Sources in the commission, however, said the appointment could not be approved.

सध्या तलाठी भरती नियुक्ती नाहीच..; लाखो विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतिक्षेत

तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते. मात्र, ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे. आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार केला होता. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरु झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीला मान्यता देणार देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

  • त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर अर्थात जून नंतरच नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तलाठी भरतीसाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे. यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत.
  • राज्यात गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ तलाठी जागांसाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेबाबत आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करून भूमी अभिलेख विभागाने यंदाच्या मार्चमध्ये या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर केली.
  • पेसाअंतर्गत असलेल्या १३ जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने थांबविण्यात आली होती. मात्र पेसा क्षेत्र गावनिहाय असल्याने केवळ अशाच गावांमधील ५७४ पदांची निवड प्रक्रिया स्थगित करून अन्य १ हजार ७१८ पदांसह सर्व ३६ जिल्ह्यांमधील ४ हजार २१९ पदांसाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

Talathi Paper Scam 2023 Exam :- More than 200 candidates who qualified in the initial merit lists of the Talathi recruitment exam and verified the documents have been disqualified as per the revised merit list released by the Land Records Department. Interestingly, it also includes the candidate who scored the highest score of 214 in the state.

The state government had claimed that despite complaints of confusion at some examination centres in the Talathi recruitment examination and complaints of irregularities at the centres in Dharashiv and Latur, the recruitment was done in a transparent manner. However, following an order of the Sambhajinagar bench of the Bombay High Court, the land records department released the revised merit lists. More than 200 candidates who qualified in the initial merit list and verified the documents are now ineligible. The results of 70 suspected candidates have also been withheld.

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित गुणवत्ता यादीनुसार अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, यात राज्यात सर्वाधिक २१४ गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचांही समावेश आहे.

तलाठी भरती परीक्षेतील काही परीक्षा केंद्रांवर झालेला गोंधळ आणि धाराशिव, लातूर येथील केंद्रावरील गैरप्रकारांच्या तक्रारीनंतरही भरती पारदर्शक पद्धतीनेच झाल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात सुरुवातीच्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत. याशिवाय ७० संशयित उमेदवारांचे निकालही थांबवण्यात आले आहेत.

  • तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा एकूण ५७ सत्रांमध्ये १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर टीसीएस कंपनीने २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न-उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन केले.
  • त्यानंतर स्पर्धा परीक्षा समितीसह अनेक उमेदवारांनी भरतीमधील चुकांवर आक्षेप घेतला. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच निकाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी काही संशयित उमेदवारांची नावेही देण्यात आली होती.
  • मात्र, याकडे दुर्लक्ष करीत भूमी अभिलेख विभागाने जानेवारीत गुणवत्ता यादी जाहीर केली. परंतु, काही उमेदवारांनी परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये/त्यांच्या उत्तर सूचीत बदल करण्यात आले. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त केले गेले.
  • २१९ प्रश्नांतील बदलामुळे गुणवत्ता यादीमध्ये बदल झाल्याने जानेवारीतील गुणवत्ता यादीत पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार आता अपात्र ठरले आहेत.
  • महसूल विभागाने संपूर्ण तपासणी न करता निकाल जाहीर केल्याने हा गोंधळ उडाला. आम्ही नावे दिलेल्या संशयितांचा निकाल थांबवला आहे. आतातरी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करूनच नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे. – राहुल कवठेकर, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.

Under the Talathi Recruitment 2023 – 48 people who topped by solving the 2-hour paper in half an hour are suspected, one each from Nagar 3, Jalna 2, Sambhajinagar, Beed. The success of 48 candidates who topped the Talathi recruitment exam held in the state between August and September is now being questioned. The reason for this is that all of them solved the 2-hour paper accurately in just 30 to 40 minutes and the rest of the time these youths were sitting in the examination hall. His behavior was found suspicious. Their documents are being verified and checked by the district collector. The candidates concerned are suspected to have rigged the exam. 

तलाठी भरती:2 तासांचा पेपर अर्ध्या तासात सोडवून अव्वल ठरलेल्या 48 जणांवर संशय, नगर 3, जालना 2, संभाजीनगर, बीडच्या प्रत्येकी एकाची चौकशी. राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या तलाठी भरती परीक्षेत अव्वल ठरलेल्या ४८ उमेदवारांच्या यशावर आता शंका उपस्थित केली जात आहे. याचे कारण म्हणजे या सर्वांनी २ तासांचा पेपर अवघ्या ३० ते ४० मिनिटांत अचूक सोडवला व उर्वरित वेळेत हे युवक परीक्षा हॉलमध्ये बसून होते. त्यांचे हे वर्तन संशयास्पद आढळले. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व चाैकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. परीक्षेत गैरव्यवहार केल्याचा संबंधित उमेदवारांवर संशय आहे.


Talathi Paper Scam 2023 Exam : – A case has been registered against two candidates in Dharashiv who appeared for the exam at Guru Online Exam Centre in Latur at Anandnagar police station. Both of them are toppers in the selection list. More than 10 lakh candidates had applied for talathi recruitment while an average of eight lakh candidates had appeared for the exam. Talathi recruitment was in the news for many reasons, but now the Talathi recruitment scam has taken a decisive turn. It has come to light that the entire examination centre in Latur is managed.

The advertisement for more than 4,600 posts in talathi recruitment was released and the exams were conducted by TCS ION Company. After the examination, on January 5, 2024, the marks of all the candidates were normalized and the district-wise selection lists were released. It has come to light that irregularities have been reported at guru online examination centre in Latur city. It is suspected that the staff of the examination centre or the owner of the centre were involved.

तलाठी भरती घोटाळा : निवड यादीत टॉपर असलेल्या दोन उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल

लातूर येथील गुरू ऑनलाईन एक्झाम सेंटर येथे परीक्षा देणाऱ्या दोन उमेदवारांविरुद्ध धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही निवड यादीत टॉपर आहेत. तलाठी भरतीसाठी दहा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते तर सरासरी आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेत होतीच पण आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले आहे. लातुरातील अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर आली आहे.

  • तलाठी भरतीत ४,६०० पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि टीसीएस आयओएन कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर ५ जानेवारी २०२४ रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांचे सामान्यकरण करून जिल्हानिहाय निवड याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. लातूर शहरातील गुरू ऑनलाईन परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा केंद्राचा मालक यात सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
  • स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरतीत टॉपर असलेल्या काही उमेदवारांबाबत अनेक पुरावे होते, त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत विस्तृत तक्रार दिली होती. परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या कॉम्प्युटरचा एक्सेस एनी डेस्क, टीम व्ह्युअर किंवा तत्सम सॉफ्टवेअरचा वापर करून दुसऱ्या कॉम्प्युटरवर देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. तलाठी भरतीत लातूर येथील परीक्षा केंद्रावरून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती. पण फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारांवर कार्यवाही झाली आहे. परंतु इतर जिल्ह्यातील टॉपरसुद्धा यात सामील असल्याने त्यांची चौकशी कधी असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे. त्या शिफ्ट मधील ०.१% टॉपर उमेदवारांचे गुण सामान्यकरण प्रक्रियेत वापरले गेले होते, पण आता टॉपर उमेदवारच घोटाळेबाज असल्यामुळे दिलेल्या गुणांच्या आधारे तलाठ्यांना नियुक्त्या देणार तरी कशा असा सवाल उमेदवार विचारात आहेत. सदर गैरप्रकाराचा तपास न्यायालयीन चौकशी समितीव्दारे करावा म्हणून याआधीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता उच्च तंत्रज्ञानाने घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या पदभरतीचा तपास एसआयटीव्दारे करावा अशी मागणी होत आहे.
  • धाराशिव तहसीलदार निलेश काकडे यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात मयूर दराडे आणि प्रमोद केंद्रे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २९ आगस्ट २०२३ ला लातूर सेंटरवर घडला.
  • तलाठी भरतीत लातूर येथील एक परीक्षा केंद्र त्या परीक्षा केंद्राच्या मालकानेच मॅनेज केले होते. वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान वापरून उमेदवारांचे पेपर सोडविल्या गेले आहेत. महाराष्ट्रातील तलाठी भरतीमधील अनेक जिल्ह्यांतील टॉपर लातूर केंद्रावरून गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा केंद्राशी निगडित व्यक्तीचा पुतण्या, बहीण आणि इतर नातेवाईकांना गैरप्रकार करून उत्तीर्ण करण्यात आले आहे. आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील टॉपरबद्दल खुलासा केला आहे, येत्या काळात इतर जिल्ह्यांतील टॉपरबद्दल पुरावे सादर केले जातील. आमच्याकडे आता अनेक पुरावे असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे. इतका मोठा घोटाळा झाला असतानाही महसूल विभाग घोटाळेबाजांना नियुक्त्या देणार आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाल्याशिवाय कोणालाही नियुक्त्या देण्यात येऊ नये, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.

Even before the talathi recruitment was announced, the state’s competitive examination students’ union had demanded that the exam be conducted by the Maharashtra State Public Service Commission, alleging irregularities. Advertising Nominations filed. This was followed by an exam. However, now shocking information has come to light and it has come to light that the computer was hacked and the paper was given.

The state government announced the talathi recruitment exam, which has been stalled since 2019, in June 2023. In this, an advertisement was issued for the recruitment of Talathi for 4,600 posts in various districts of Maharashtra. More than 10 lakh candidates from across the state applied for the Talathi exam. The exam was conducted in 51 sessions from August to September 2023. However, now it has come to light that the computer was hacked and the paper was given at an examination center in Latur.

तलाठी भरती परीक्षेत कॉम्प्युटर हॅक करून दिला पेपर ? धक्कादायक माहिती समोर

तलाठी भरती जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेने गैरव्यवहाराचा आरोप करत ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती. जाहिरात निघाली उमेदवारी अर्ज भरले. यानंतर परीक्षा झाली. मात्र, आता धक्कादायक माहिती समोर आली असून, चक्क कॉम्प्युटर हॅक करून पेपर दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच या परीक्षेसंदर्भात उमेदवारांनी गैरव्यवहाराच्या तक्रारीचा सूर लावला होता. यानंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेने धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तपास करून या प्रकरणी मयूर दराडे व प्रमोद केंद्रे यास अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
  • 2019 पासून रखडलेली तलाठी भरतीची परीक्षा राज्य सरकारने जून 2023 मध्ये घोषित केली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी 4 हजार 600 पदांसाठी तलाठी भरतीसाठी जाहिरात काढली. तलाठी परीक्षेसाठी राज्यभरातून दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 51 सत्रात ही परीक्षा पार पडली. मात्र, आता या परीक्षेच्या लातूर येथील एका परीक्षा केंद्रावर काॅम्प्युटर हॅक करून पेपर दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
  • या प्रकरणी धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यांनी आनंदनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आलेल्या तक्रारीनुसार, प्रशासनाने चौकशी करून यात तथ्य आढळल्याने अधिक सखोल चौकशी केली. या चौकशीमध्ये हॅक करून प्रश्नपत्रिका सोडविल्याचे समोर आले आहे.
  • धाराशिव जिल्ह्यातील निवड झालेल्या खुल्या प्रवर्गातील निवड यादीमध्ये मयूर श्रीहरी दराडे व प्रमोद रामराव केंद्रे या दोन उमेदवारांच्या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख यांच्याकडे ही तक्रार वर्ग करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ‘टीसीएस’ कंपनीचे झोनल डिलिव्हरी मॅनेजर यांनी चौकशी केली. या चौकशीत हे दोन्ही उमेदवार दोषी आढळले. पोलिसांनी टीसीएस कंपनीच्या अहवालानुसार, केंद्रे व दराडे यांची चौकशी केली.
  • त्यांनी सांगितले की, लातूर येथील राजू कांबळे हा ऑनलाइनचे काम करतो. त्याची व केंद्रेची जुनी ओळख आहे. कांबळेंनी केंद्रे यास सांगितले की, 30 ते 35 लाख रुपये दिल्यास तलाठी परीक्षेचा पेपर फोडून देतो. त्यास केंद्रे यांनी संमती दिली. पुढे कांबळे यांनी केंद्रेची ओळख सचिन मुळे यांच्याशी करून दिली. राजू, सचिन व त्या अनोळखी इसमाने प्रमोद केंद्रे याची सर्व ओरिजनल कागदपत्रे घेऊन ठेवली, तसेच निवड झाल्यानंतर सर्व पैसे दिल्यानंतर कागदपत्रे घेऊन जा असे सांगितले.
  • प्रमोद हा या तिघांना फोनवर बोलतही होता आणि भेटलाही होता. प्रमोदने 29 ऑगस्ट 2023 रोजी लातूर येथील परीक्षा सेंटरवर परीक्षा दिली. या परीक्षेच्या 30 मिनिटे अगोदर सचिनने केंद्रेची एका अनोळखी माणसाबरोबर ओळख करून दिली. त्या अनोळखी माणसाने केंद्रेला सांगितले की, परीक्षा आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आणि परीक्षेसाठी इंग्रजी माध्यम निवडायचे.
  • सुरुवातीला परीक्षेतील सर्व प्रश्न पाहून घ्यायचे. त्यानंतर स्क्रीनवर एक दुसरा माऊस येईल. हा माऊस त्या प्रश्नाचे जे उत्तर असेल, त्या ठिकाणी तो कर्सर दाखवेल. त्या पर्यायावर क्लिक करायचे असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे केंद्रे यांनी उत्तरे सिलेक्ट केली. निवड झाल्यानंतर केंद्रे यांनी संबंधितांकडे कागदपत्राची मागणी करून त्यांना सहा ते सात लाख रुपये दिले.
  • याच प्रकरणातला दुसरा उमेदवार मयूर दराडे यानेही असे सांगितले की, त्याने 1 सप्टेंबर 2023 रोजी लातूर येथे तलाठीची परीक्षा दिली. या घडलेल्या गोष्टीची माहिती त्याच्या वडिलांना आहे. वडिलांनी सांगितल्यानुसारच त्याने तलाठी परीक्षा दिली. त्यालाही परीक्षा केंद्रावर एक अनोळखी इसम भेटला. त्याने सांगितल्याप्रमाणे लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून परीक्षेचे माध्यम इंग्रजी निवडले.
  • सुरुवातीला सर्व प्रश्नांना भेट दिली व नंतर आलेल्या दुसऱ्या माऊसने दाखवलेल्या पर्यायावर त्याने क्लिक केले. या दोन्ही उमेदवारांनी तलाठी परीक्षेमध्ये संगणक हॅक करून पेपर सोडविण्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार धाराशिव येथील आनंदनगर पोलिस स्टेशन येथे 379, 419, 420, 468 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत 66 66 (क) 66 (ड) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवी सानप करीत आहेत.

‘टीसीएस’ने चौकशीत काय निष्कर्ष काढले ?

  1. 1) उमेदवारांनी दुपारी 1:43 पासून, विभाग 13 वेळा बदलले गेले आणि काही प्रश्नांना 18 वेळा भेट देण्यासाठी क्रमांक पॅनेलचा वापर केला गेला आणि 3 प्रश्नांसाठी प्रतिसाद दिला गेला आणि परीक्षा संपेपर्यंत 1.43 PM दरम्यान दुसरा कोणताही प्रतिसाद बदलला नाही.
  2. 2) या दोन उमेदवारांच्या वरील तपशीलवार लेखापरीक्षण लॉगच्या विश्लेषणाच्या आधारे, पहिल्या 30 मिनिटांत सर्व प्रश्नांना भेट दिल्यानंतर त्यांना अंदाजे 40 मिनिटांत सर्व 100 प्रश्नांची उत्तरे देता आली. अशा परीक्षांमध्ये उत्तर देताना हे असामान्य वर्तन म्हणून हायलाइट केले जाऊ शकते आणि त्यामुळे या उमेदवारांवर संशय निर्माण होतो.

शिफारशी :

वरील निरीक्षणे आणि विश्लेषण निर्णायक नाहीत, परंतु असामान्य वर्तनामुळे निश्चितपणे संशय निर्माण झाला आहे. म्हणून TCS ION हे विश्लेषण निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील कृती करण्याची शिफारस करते.

  1. 1) परीक्षेदरम्यान या उमेदवारांच्या कोणत्याही असामान्य वर्तनासाठी दोन्ही उमेदवारांच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यामध्ये या उमेदवारांसह कोणत्याही परीक्षा कार्यकर्त्यामध्ये काही संवाद झाला आहे का ? हे पाहण्यासाठी तपासणेदेखील समाविष्ट असू शकते.
  2. 2) या उमेदवारांना तपास यंत्रणा पुढील चौकशीसाठी बोलावू शकतात आणि त्यांना इतक्या वेगाने अशा प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याची क्षमता सिद्ध करण्यास सांगितले पाहिजे.

Talathi Bharti 2023 Normalization Process Details – The On 5/1/2024, the district-wise merit list (generalized marks) of the candidates in the Talathi recruitment 2023 examination has been published. In the normalization process, the statistical formula is available on this website. Published on 27/9/2023. In this English statistical formula, the signs mentioned are being published in Marathi and examples showing how the coefficient increases or decreases.

Examples showing scoring increases include data on the mean (MTI and MIQ) for difficult sessions. So the example showing the scoring decline includes information on the averages (Mti and MIQ) in the simple session. The information for the remaining three symbols (Mgt, Mgq, Mgmq) is similar in both examples as the averages for all sessions. The candidate is also considered to have scored 120 basic marks.

महसूल विभागातील गट – क संवर्गातील तलाठी भरती सन २०२३ बाबत. सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबाबत जाणून घ्या .

  • दि. ५/१/२०२४ रोजी तलाठी भरती २०२३ परीक्षेतील परिक्षार्थीची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी (सामान्यीकृत गुण) Normalization Score प्रसिध्द करणेत आले आहे. सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सुत्र या संकेतस्थळावर दि. २७/९/२०२३ रोजी प्रसिध्द करणेत आली आहे. या इंग्रजी सांख्यिकी सुत्रामध्ये नमूद करणेत आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ व गुणांक वाढ किंवा गुणांक घट कशी होते हे दर्शविणारी उदाहरणे या सोबत प्रसिध्द करणेत येत आहे.
  • गुणांकन वाढ दर्शविणारे उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरीची माहिती (Mtiआणि Miq) घेणेत आली आहे. तर गुणांकन घट दर्शविणारे उदाहरणामध्ये सोप्या सत्रातील सरासरीची माहिती (Mti आणि Miq) घेणेत आली आहे. उर्वरित तीन चिन्हांची (Mgt, Mgq, Mgmq) माहिती सर्व सत्रातील सरासरीची बाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखी आहे. तसेच उमेदवारास १२० मुळ गुण’ मिळालेचे समजण्यात आले आहे.

After the Talathi Paper Scam in the examination for talathi recruitment came to light, the boat of recruitment of prospective talathis who have cleared the exam has been mired in controversy. There is confusion about how much the cut-off will be applied to the candidates, whether those who got marks between 150 and 200 are true, or whether they will have to take the exam again. As many as 11,000 candidates in the district are now on oxygen. The online examination for recruitment to 4,657 talathi posts in the state was conducted by TCS from August 17 to September 14.

The final merit list was released on January 5. The exam was of 200 marks; But many have got 214 marks, who were expected to get very low marks, have also crossed the mark of 150. There have been allegations that the paper was already leaked and dummy students were installed. Former MP Raju Shetti has also submitted a memorandum to Deputy Chief Minister Ajit Pawar, demanding that the exam be conducted through the MPSC. Talathi Paper Scam  More details are as below:

तलाठी भरती; कट ऑफ होणार की पुन्हा परीक्षा द्यायची

  • तलाठी भरतीसाठी झालेल्या परीक्षेतील घोळ उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा पास झालेल्या भावी तलाठ्यांच्या भरतीची नौका वादंगात सापडली आहे. परीक्षार्थीमध्ये कट ऑफ किती मार्काना लावणार, आता ज्यांना १५० ते २०० दरम्यान मार्क मिळाले ते तरी खरे आहेत का, किंवा पुन्हा परीक्षा द्यावी लागणार, असा संभ्रम आहे. जिल्ह्यातील ११ हजार उमेदवार आता ऑक्सिजनवर आहेत. राज्यातील ४ हजार ६५७ तलाठी पदभरतीसाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान टीसीएस कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.
  • यातील अंतिम गुणवत्तायादी ५ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. परीक्षा २०० मार्काची होती; पण अनेकजणांना २१४ मार्क मिळाले आहेत, ज्यांना अत्यंत कमी मार्क पडतील अशी अपेक्षा होती त्यांनीही मार्काचा १५० चा आकडा पार केला आहे. पेपर आधीच फुटल्याचा व डमी विद्यार्थी बसविल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन ही परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Talathi Paper Scam 2023 Exam– After the results of the Talathi recruitment exam were declared on 5th January 2024, there was a serious allegation of a major scam. Due to this, the Talathi recruitment examination has once again been in the midst of a controversy. In the Talathi recruitment 2023, the topper student has got 214 marks out of 200. The Competitive Examination Coordination Committee has questioned how this was possible when there was a gap of 14 days between the two exams. There has been a scam in the recruitment exam and there is now a demand for a thorough probe into it. Candidates Read the complete details given below on this page regarding the Talathi Paper Scam 2023 Exam and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Answer given by State Government about Talathi Paper Scam – The exam has been conducted through TCS company and whenever a large number of examinees are appearing for the exam and hence the number of sessions is high, the normalization process is forced. This is because considering the difficulty level of the questions taken in different sessions in different periods, it is a scientific process to apply the same measurement to all the candidates without injustice to the candidates. This method of marks generalization has been used in the past for recruitment of jobs in all types of major examinations such as Railway Recruitment Board, SSC, MHADA etc. This ‘Marks Generalization’ www.mahabhumi.gov.in has been published on this website dated 27/09/2023. However, due to ignorance about this process in the examination, some news channels/television channels have published reports about generalization marks. Since the marks normalization process is essential for the examinations conducted in multiple sessions, it has been conducted for the Talathi recruitment exam to avoid any injustice to any candidate.

ट्विटमध्ये काय म्हणाले वडेट्टीवार?

Talathi Bharti scam

“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.

5 जानेवारी रोजी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.तलाठी भरतीत टॉपर विद्यार्थिनीला 200 पैकी 214 मार्क मिळाले आहेत.याच विद्यार्थीनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये फक्त 54 मार्क पडले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये 14 दिवसाचा गॅप असताना हे कसं शक्य झालं असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित करत निकालावर आक्षेप घेतला आहे. या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.

या सगळ्या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा चौकशीची मागणी केली आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतेय हे स्पष्ट होत आहे. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. तलाठी भरती परीक्षेतल्या घोटाळ्याचे पुरावे विजय वडेट्टीवार यांनी सादर करावेत. पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांची टीका

Talathi Paper Scam “200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणे म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखे आहे. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून ‘भाजपा सरकार है तो मुन्कीन है’ असंच म्हणावं लागेल. तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या देखील #FIR दाखल झाल्या, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी 25 लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास 1500 कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे. राज्यात एकही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला, परंतु हे चोर-गद्दारांचं निकामी सरकार मात्र आपल्या सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यासंदर्भात सरकार एवढं उदासीन का? याचं उत्तर आज मिळालं. सत्तेची एवढी मस्ती योग्य नाही हे सरकारमधील त्रिकुटाने लक्षात घ्यावं,” असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

तलाठी भरती परीक्षेत 200 पैकी 214 गुण कसे मिळाले? सरकारने लॉजिक सांगितलं, म्हणाले ते तर सामान्यीकृत गुण!

Talathi Bharti Exam  2023: तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फैरी झडल्या. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरत टीकास्त्रं सोडलं. आता महाराष्ट्र सरकारकडून यावर खुलासा देण्यात आलाय. विद्यार्थाला 200 पैकी 214 गुण मिळाल्याचा कुठलाही गैरप्रकार घडला नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलं आहे, असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

तलाठी भरती प्रक्रियेमध्ये 200 पेक्षा अधिकचे गुण काही उमेदवारांना मिळाल्याचं समोर आले होते. 200 गुणांचीच परीक्षा असताना अधिक गुण कसे मिळाले? हा मोठा गैरप्रकार आहे. भ्रष्टाचार आहे, अशा पद्धतीचे आरोप रविवारी केले. याबाबत सर्वच माध्यमात बातम्या प्रकाशित झाल्या आहेत,काही आमदार,काही मंत्र्यांनी सुद्धा हा गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.प्रत्यक्षात असा कुठलाही गैरप्रकार नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलं आहे,असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

200 पेक्षा जास्त गुण कसे मिळाले ?

सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

राज्य सरकारनं काय म्हटलेय ?

Talathi Paper Scam तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 17 ऑक्टगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण 149 प्रश्नांचे) केले. दिनांक 04/01/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर टीसीएस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे 57 प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सदर गुण सामान्यीकरण पद्धती www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/09/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 05/01/2024 रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण (normalised score) www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅब वर प्रसिद्ध करण्यात आले. दिनांक 07/01/2024 रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही. सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे. सदर ‘गुण सामान्यीकरण’ www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/09/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि परीक्षेतील या प्रक्रियेबाबत अनभिज्ञता असल्या कारणाने काही वृत्त पत्र/दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. गुण सामान्य करण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ती तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे.

तलाठी भरती परीक्षेचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. “तलाठी भरती परीक्षा” हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

Talathi Paper Scam “तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे. मागणी, आणि ती पण SIT चौकशीची..? आतापर्यंत या सरकारने जितक्या SIT स्थापन केल्या, त्याचे निकाल काय आले ? हे माहीत असूनही, तुमचा इतका मिळमिळीत विरोध का ? एक लिमिट मध्ये राहून विरोध करायच्या म्हणजे विरोध पण दिसेल आणि ED पण येणार नाही. असं काही आहे का ?”, असं विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक

तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला. या भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकारला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सत्तेतून खाली खेचण्याची गरज असल्याचेही रोहन सुरवसे पाटील म्हणाले. रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या ट्वीटद्वारे ही माहिती समोर आली आहे. एकाच विद्यार्थ्याला वनरक्षक परीक्षेत चोपन्न गुण मिळाले आहेत. तर, तलाठी भरती परीक्षेत दोनशे पैकी दोनशे चौदा गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असोत, की सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असोत. या परीक्षांतील पारदर्शकता पूर्णपणे संपली असून, अहोरात्र मेहनत करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम शिंदे-फडणवीस-पवार सरकार करीत आहे.
विशेष तपास पथकामार्फत चौकशी करा

या नतदृष्ट सत्ताधाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हिताशी काहीही देणे घेणे नसून, वशिलेबाजी आणि पैसे घेऊन सरकारी पदे पूर्णपणे विकली जात असल्याची शक्यता आहे. संपूर्ण तलाठी भरती परीक्षेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी. तसेच तलाठी भरती आणि वनरक्षक भरती रद्द करण्यात यावी,” अशी मागणीही सुरवसे-पाटील यांनी केली आहे.

तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी

Talathi Paper Scam 2023 राज्य सरकारने सरळसेवा पध्दतीने तलाठी भरती प्रक्रियाच्या परिक्षा घेण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले आहे. परिक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना २०० मार्काच्या पेपरला २१४ मार्क पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने परिक्षा कशा पारदर्शक पध्दतीने झाल्या असतील हे दिसून येते. यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे सोमवारी केली.

गेल्या अनेक वर्षापासून सरळसेवा भरती प्रक्रिया मध्ये ज्या कंपन्यामार्फत पेपर घेतल्या जातात त्या घोटाळा करतातच हे ब-याचवेळेस सिध्द झाले आहे. यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येवून शासनास परिक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आतासुध्दा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणणे असेल तर या निकालपत्रातील २०० पैकी १२५ पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससी परिक्षा घेऊन पात्रता सिध्द करण्यास संधी द्यावी. जर यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचा सरळसेवा भरती प्रक्रियेवर व शासनावर विश्वास बसेल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

तलाठी भरतीचा निकाल 2023- Talathi Bharti 2023 Results

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी   


 अकोला  अमरावती  अहमदनगर  कोल्हापूर  गडचिरोली  गोंदिया
 धुळे  नागपूर  नाशिक  नांदेड  नंदुरबार  परभणी
 पालघर  पुणे  बीड  बुलडाणा  भंडारा  मंबई
 मंबई उपनगर  यवतमाळ  रत्नागिरी  रायगड  लातूर  वर्धा
 वाशिम  सातारा  सांगली  सिंधुदुर्ग  सोलापूर  हिंगोली
 छत्रपती संभाजीनगर  चंद्रपूर  जळगाव  जालना  धाराशिव  ठाणे
  1. तलाठी भरतीकरिता हेल्पलाईन नंबर सुरु
  2. महाराष्ट्र तलाठी भरती लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज
  3. Talathi Bharti Syllabus – तलाठी भरती परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस
  4. Talathi Bharti Document List-तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
  5. तलाठी भरती ऑनलाइन रजिस्ट्रेशन, रिक्त पदांचे सुधारित मागणीपत्रक- Talathi Bharti 2023

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र तलाठी भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

♻️ महाराष्ट्र तलाठी भरती लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Talathi Bharti Examination Scam

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!