सोलापूर जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती डिसेंबरमध्येच! विधानसभा आचारसंहितेमुळे थांबली प्रक्रिया; – Solapur ZP Teacher Bharti 2024

Solapur ZP Teacher Bharti 2024

Solapur ZP Teacher Bharti 2024 updates – Despite the recruitment of teachers in zilla parishad schools, solapur zilla parishad schools still have 600 teachers (Marathi, Urdu, Kannada medium). Positions in about 500 schools in the district are stuck in equalization because schools don’t have teachers in proportion to the number of students. According to RTE, there should be one teacher for every 30 students. However, not all schools have taken action. In view of this, it was decided to appoint retired teachers in schools with less than 20 marks in the past. The decision was amended again and now, as per the new decision, educated unemployed youth with DEd and BEd will be appointed on contractual basis in schools with less than 10 marks. His appointment will be for a single year for the first time, after which the primary education officer will take a decision on whether to give him a chance or not.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कंत्राटी शिक्षक भरती डिसेंबरमध्येच! विधानसभा आचारसंहितेमुळे थांबली प्रक्रिया; जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट दहापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक सोलापूर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्या शाळांवर आता प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या जवळपास ९६ शाळांचा पट दहापेक्षा कमी असून त्याठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. पण, विधानसभा निवडणुकीनंतर त्याची कार्यवाही होणार आहे.

  • जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक भरतीनंतरही सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांना अजूनही ६०० शिक्षक (मराठी, उर्दु, कन्नड माध्यम) कमी आहेत. शाळांना पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ५०० शाळांमधील पदे समानीकरणात अडकली आहेत. ‘आरटीई’नुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा, असा नियम आहे. पण, त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कार्यवाही झालेली नाही.
  • या पार्श्वभूमीवर पूर्वी २० पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला. या निर्णयात पुन्हा बदल करण्यात आला आणि आता नवीन निर्णयानुसार १० पेक्षा कमी पटाच्या शाळांवर डीएड- बीएडधारक सुशिक्षित बेरोजगार तरूणांना कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहे. त्यांची नियुक्ती पहिल्यांदा एकाच वर्षासाठी असणार असून त्यानंतर त्यांना पुढे संधी द्यायची की नाही याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी घेणार आहेत.
  • निवडणुकीमुळे हे शक्य नसल्याने डिसेंबरमध्ये त्याची कार्यवाही होईल – जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमधील सध्याची पटसंख्या मागविली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार त्या शाळांवर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. तत्पूर्वी, त्या शाळांवरील नियमित दोनपैकी एका शिक्षकाची दुसऱ्या शाळेवर बदली करावी लागणार आहे. आता विधानसभा निवडणुकीमुळे हे शक्य नसल्याने डिसेंबरमध्ये त्याची कार्यवाही होईल. – कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
  • ‘या’ निर्णयामुळे कमी होतील ‘अतिरिक्त’- २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता करताना आधारव्हॅलिड पटसंख्याच ग्राह्य धरावी, असे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. पण, शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर या निर्णयातून सवलत देत आधारव्हॅलिड पटावरील १० टक्के विद्यार्थी शाळेत आहेत पण त्यांचे आधारकार्ड नाही, त्यांचाही विचार केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पटसंख्येअभावी अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण कमी होणार आहे. पण, हा निर्णय कायमचा नसून यापुढे आधारव्हॅलिड पटसंख्याच ग्राह्य धरली जाईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Solapur ZP Teacher Bharti 2024 updates – The process of teacher recruitment is currently being implemented through the Pavitra portal. Private organisations have also been asked to upload advertisements. However, many schools have uploaded advertisements on ‘Pavitra’ even before the adjustment of additional teachers. The names of those schools will now be reported to the Education Commissioner’s Office. Those schools will be able to recruit new posts only after the adjustment of additional teachers. Meanwhile, the final list of additional teachers will now be released. The education officer has also prepared a list of private primary schools in the district where the posts of teachers are vacant.

In Solapur district, 107 teachers of private primary schools have become surplus. There are 52 teachers from minority schools, four from Urdu schools and seven from Kannada schools. Forty-four teachers from non-minority schools have also become surplus due to lack of marks. In schools where there are vacancies, additional adjustments will be made. Schools that do not make adjustments will not be allowed to recruit new teachers, the primary education officer said.

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच नवीन भरतीस मान्यता! सोलापूर जिल्ह्यात ‘खासगी प्राथमिक’चे १०७ शिक्षक अतिरिक्त; ZP शाळांमध्ये समायोजन शक्य

सोलापूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील १०७ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यात अल्पसंख्याक शाळांमधील ५२ शिक्षक असून उर्दू शाळांमधील चार तर कन्नड शाळांमधील सात शिक्षक आहेत. बिगर अल्पसंख्याक शाळांमधील ४४ शिक्षकही पटसंख्येअभावी अतिरिक्त झाले आहेत. ज्या शाळांमध्ये रिक्त पदे आहेत, त्याठिकाणी अतिरिक्तचे समायोजन होईल. ज्या शाळा समायोजन करून घेणार नाहीत, त्यांना नवीन शिक्षक भरतीला परवानगी मिळणार नाही, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

  • पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी खासगी संस्थांनाही जाहिराती अपलोड करण्याचे आदेश आहेत. पण, अनेक शाळांनी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनापूर्वीच ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड केल्या आहेत. त्या शाळांची नावे आता शिक्षण आयुक्त कार्यालयाला कळविली जाणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरच त्या शाळांना नवीन पदभरती करता येणार आहे. दरम्यान, आता अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यांची यादी देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी तयार केली आहे.
  • समुपदेशनाच्या माध्यमातून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना वेगवेगळ्या शाळांमध्ये समायोजन केले जाईल. त्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणे बंधनकारक आहे. पुढील आठवड्यात समायोजनाची कार्यवाही पूर्ण होईल. पण, अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही उपसंचालक स्तरावरून होते. त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त झालेल्या ६३ शिक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तूर्तास बिगर अल्पसंख्याक शाळांमधील ४४ शिक्षकांचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षकांचे समायोजन होईल.
  • बिगर अल्पसंख्याक शाळा मात्र शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा विषय उपसंचालकांच्या हाती असतानाही काहीच कार्यवाही होत नाही हेही विशेषच. आता जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांवरील ५२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कधीपर्यंत होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
  • काम झेडपी शाळांमध्ये, पण पगार खासगी शाळेतून – पाच वर्षांपूर्वी अतिरिक्त झालेल्या १६ शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये नेमणूक देण्यात आली. पण, त्या शिक्षकांना कायमची नियुक्ती त्याठिकाणी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पण पगार संबंधित खासगी संस्थेतून होतोय. पाच वर्षांपासून हा प्रकार ‘जैसे थे’ आहे. आता त्या शिक्षकांना समायोजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्येच नेमणूक दिली जाणार आहे. तत्पूर्वी, त्यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

The Solapur Zilla Parishad on Monday uploaded the advertisement for the recruitment of teachers on the holy portal of the school education department. Solapur Zilla Parishad will now get a total of 468 teachers of Marathi, English, Kannada and Urdu medium. The process of teacher recruitment will be completed by the end of February. Solapur Zilla Parishad has 2,795 schools. In general, there were fewer teachers in the number of students as there was no recruitment of full vacancies in schools for about seven years. Now Education Minister Deepak Kesarkar has taken an important decision to recruit historic teachers. Accordingly, the Solapur Zilla Parishad has finalized the point list of vacant posts in Marathi, Urdu and Kannada medium schools from the Backward Class Cell.

सोलापूर झेडपीने शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर केली अपलोड; ‘इतक्या’ शिक्षकांची निघाली भरती

सोलापूर जिल्हा परिषदेने सोमवारी शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यानुसार आता सोलापूर जिल्हा परिषदेला मराठी, इंग्रजी, कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण ४६८ शिक्षक मिळणार आहेत. फेब्रुवारीअखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया संपविली जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. साधारणतः सात वर्षांपासून शाळांमधील संपूर्ण रिक्त पदांची भरती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक कमीच होते. आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऐतिहासिक शिक्षक भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली.

  1. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, महापालिकेचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
  2. ‘कन्नड’ची बिंदुनामावली अल्पावधीत पूर्ण करून काही दिवसांत त्याची मान्यता मिळविली आणि शेवटच्या दिवशी जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड केली हे विशेष. आता जानेवारी अखेर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरून द्यावे लागतील.
  3. प्राधान्यक्रमात उमेदवारांना किती जिल्हा परिषदांचा पर्याय द्यायचा याचे बंधन नाही. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल व संबंधितांना नेमणुका मिळतील. एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के पदे सध्या भरली जात आहेत.
  4. माध्यमनिहाय शिक्षकांची भरती
    • माध्यम व शिक्षक – मराठी -३१२, इंग्रजी – ९१, कन्नड -२५, उर्दू – ४० –  एकूण ४६८
    • जिल्हा परिषदेने मागितले ९१ इंग्रजी शिक्षक
    • सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात १७९ केंद्र शाळा आहेत. त्याअंतर्गत आता प्रत्येक केंद्र शाळेसाठी स्वतंत्र इंग्रजी शिक्षक घ्यावा लागणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेकडे सध्या इंग्रजीचे ६९ शिक्षक आहेत.
    • त्यामुळे इंग्रजी विषयासाठी अजून ९१ शिक्षक मिळावेत, अशी मागणी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या जाहिरातीतून केली आहे. त्यामुळे मराठी माध्यमांचे ३१२ शिक्षक भरले जातील. शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप असणार नाही.

Online Apply

Solapur Shikshak Bharti 2024


Solapur ZP Teacher Bharti 2024 updates – Solapur Zilla Parishad will recruit 678 teachers in Marathi and Urdu medium schools through the recruitment of new teachers. The details of the vacancies will be uploaded on the Pavitra portal by December-end after the backward classes cell finalises the points.  Priorities will then be filled out by prospective teachers who register in January 2024. The teachers concerned will be appointed as per the merit list. At the same time, vacancies of teachers in secondary schools and junior colleges will also be filled.

The process of recruitment of teachers in zilla parishads has started and now the recruitment of secondary teachers will also start. Around 550 teachers will be recruited in 1,054 aided secondary schools in Solapur district. However, aided secondary schools and junior colleges where the posts are vacant are required to initially get the roster checked by the education officer. After that, the point list will have to be finalized by the backward class cell. Finally, the schools concerned will have to upload the advertisement for the vacant posts on the Pavitra portal.

सोलापूर जिल्हा परिषदांमधील ‘माध्यमिक’मध्ये लवकरच ५५० शिक्षकांची भरती

जिल्हा परिषदांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, आता माध्यमिक शिक्षक भरतीलाही सुरवात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ५४ अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास ५५० शिक्षकांची भरती होणार आहे. पण, ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्यांना प्रारंभी शिक्षणाधिकाऱ्यांकडून रोस्टर (बिंदुनामावली) तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घ्यावी लागेल. शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन शिक्षक भरतीतून मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये ६७८ शिक्षकांची भरती होणार आहे. मागासवर्गीय कक्षाने बिंदुनामावली अंतिम केल्यानंतर डिसेंबरअखेर रिक्तपदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे.  त्यानंतर जानेवारीत नोंदणी केलेल्या भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल. त्याचवेळी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्तपदे देखील भरली जाणार आहेत.

पण, आता पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही. नोंदणीकृत उमेदवाराच्या प्राधान्यक्रमानुसार त्या उमेदवारांना संबंधित संस्थेत मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे. वशिलेबाजी, डोनेशन अशा गोष्टींना लगाम बसावा म्हणून शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे.
एका पदासाठी तीन उमेदवार – खासगी अनुदानित शाळांमध्ये (माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षक भरतीची पद्धती आता बदलली आहे. आता ज्या खासगी अनुदानित शाळांमध्ये पदे रिक्त आहेत, त्याठिकाणी एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच संबंधित शाळांमध्ये पाठविले जातील. त्या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असणार आहे. पूर्वी, एका पदासाठी दहा उमेदवारांना पाठविण्याचा निर्णय होता, परंतु त्यात बदल करून आता एका पदासाठी तीन उमेदवार असे समीकरण आहे.

‘माध्यमिक’च्या ८४ अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न – जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमधील शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त आहेत. त्यांची संख्या ८४ असून कोणत्या संस्थांमध्ये कोणत्या विषयांचे शिक्षक रिक्त आहेत याची माहिती घेतली जात आहे.

नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी सुरवातीला या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल, अशी माहिती ‘माध्यमिक’च्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एखादी शाळा अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करीत नसल्यास त्या शाळेतील रिक्तपद कमी केले जाण्याची दाट शक्यता आहे.


Solapur ZP Teacher Bharti 2023

There are 2,795 schools of Solapur Zilla Parishad under which nearly two lakh students are studying. TheBindu Namavili of the education department of the Zilla Parishad has been finalized and after discussion with the representatives of the social organizations, now theBindu Namavili will be submitted to the backward class cell for final approval. According to senior sources, the schools of Solapur Zilla Parishad will get 691 teachers from the recruitment of teachers based on Sanchanamanya and Bindu Namavili.

सोलापूर झेडपीला मिळणार ६९१ शिक्षक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आता बिंदुनामावली अंतिम मान्यतेसाठी मागासवर्गीय कक्षाला सादर केली जाणार आहे. संचमान्यता व बिंदुनामावलीनुसार होणाऱ्या शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांना ६९१ शिक्षक मिळतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.


जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील शंभर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत.

Solapur ZP Teachers updates is given here. The posts of 4 Education Extension Officers, 178 out of 199 Center Heads and 100 Headmasters are vacant in the district. These vacancies will be filled by promotion next month, Education Officer Sanjay Javier informed. Teachers’ unions are demanding that these posts be filled by promotion from primary teachers. However, the vacant posts of principals will be filled first by the education department. After that, the posts of Center Head and Extension Officer will be filled by promotion.

  1. जिल्ह्यात ४ शिक्षण विस्तार अधिकारी, १९९ पैकी १७८ केंद्रप्रमुख आणि शंभर मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे पदोन्नतीने पुढील महिन्यात भरण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली. या जागा प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नतीने भराव्यात यासाठी शिक्षक संघटनांकडून मागणी होत आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून प्रथम मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यात येतील. त्यानंतर केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत.
  2. अनेक शिक्षक हे सेवानिवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संप, मार्च अखेरमुळे शिक्षकांच्या पदोन्नतीस विलंब होत आहे. परंतु, पुढील महिन्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांच्या रिक्त जागी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जावीर यांनी सांगितले.
  3. शिक्षक संघटनांचे आंदोलन – जिल्ह्यात शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे पदोन्नतीने तत्काळ भरावीत, अन्यथा ५ एप्रिलपासून चक्रीउपोषण करण्याचा इशारा गुरुसेवा परिवाराने शिक्षण विभागाला दिला होता. आता एप्रिल महिन्यात भरती होत असल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

अतिरिक्त शिक्षकांची आता ‘DAIT’ व ‘SCERT’वर नेमणूक

Additional teachers are now appointed to ‘DAIT’ and ‘SCERT’ in the state. As per the latest information 540 posts are to be filled from the additional appointed teachers instead of new recruitment in the state. For the last three-four years, the schools did not present those additional teachers, nor did those teachers join there. In this background, the school education department has taken such a decision. Meanwhile, the officials have expressed the belief that the problem of adjustment of additional teachers that arises every year will now be resolved permanently due to the decision of the school education department. Read the more details given below and keep visit us for the further updates.

५४० अतिरिक्त शिक्षकांची डायट, एससीईआरटी व प्रादेशिक विद्या परिषदेत होणार नेमणूक

  1. सोलापूर : राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (एससीईआरटी) परिषद कार्यालयात विषय सहायक व समुपदेशकांची पदे भरली जाणार आहेत. त्याठिकाणी नव्याने भरती करण्याऐवजी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमधूनच ५४० पदे भरली जाणार आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून त्या अतिरिक्त शिक्षकांना ना शाळांनी हजर करून घेतले ना ते शिक्षक त्याठिकाणी रुजू झाले. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला आहे.
  2. जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील जवळपास बाराशे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यातील साडेसहाशेपेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. तरीपण, त्यांना शासनाकडून नियमित दरमहा वेतन दिले जात आहे. हा प्रकार बंद व्हावा म्हणून यापुढे समुपदेशन करून राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अशाच पद्धतीने शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विभागांमध्ये नेमले जाणार आहे. वेळप्रसंगी त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून दुसऱ्या जिल्ह्यात देखील पाठविले जाणार आहे.
  3. दरम्यान, दरवर्षी निर्माण होणारा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा पेच आता शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे कायमस्वरूपी मिटेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणार नाहीत, त्यांची पदे रद्द केली जाणार आहेत. त्यादृष्टीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पटसंख्या कमी झाल्याने राज्यातील जवळपास बाराशे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.
  4. त्यातील साडेसहाशेपेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. तरीपण, त्यांना शासनाकडून नियमित दरमहा वेतन दिले जात आहे. हा प्रकार बंद व्हावा म्हणून यापुढे समुपदेशन करून राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अशाच पद्धतीने शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विभागांमध्ये नेमले जाणार आहे. वेळप्रसंगी त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून दुसऱ्या जिल्ह्यात देखील पाठविले जाणार आहे.
  5. दरम्यान, दरवर्षी निर्माण होणारा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा पेच आता शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे कायमस्वरूपी मिटेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेणार नाहीत, त्यांची पदे रद्द केली जाणार आहेत. त्यादृष्टीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
    खासगी शाळांमधील १७३ पदे होणार रद्द
  6. पटसंख्येअभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे चार महिन्यांपूर्वी समायोजन प्रक्रिया पार पडली. त्या शिक्षकांना समुपदशेनातून शाळांवर नियुक्ती दिली. पण, काहीजण त्या शाळांवर रुजू झालेच नाहीत, तर काहीजणांना संबंधित शाळांनी सामावून घेतलेले नाही. या पार्श्वभूमीवर शाळांवर हजर न झालेल्या शिक्षकांचे वेतन आता थांबविण्यात आले आहे. दुसरीकडे ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतलेले नाही, त्या खासगी शाळांमधील तब्बल १७३ पदे व्यपगत (रद्द) करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना पाठवला आहे. त्यानुसार आता संबंधित शाळांमधील तेवढी पदे रद्द केली जाणार आहेत.

शिक्षण संचालकांच्या पत्रातील ठळक बाबी…

  1. शाळेचे नाव, माध्यम, विषय, नेमणूक व सेवानिवृत्तीचे वर्ष अशा २३ मुद्द्यांवर मागविली माहिती
  2. अतिरिक्त शिक्षकांवर आता विषय सहायक व समुपदेशकाची जबाबदारी
  3. ५४० अतिरिक्त शिक्षकांची डायट, एससीईआरटी व प्रादेशिक विद्या परिषदेत होणार नेमणूक
  4. शाळांवर हजर न होणाऱ्या शिक्षकांना आता दुसऱ्या जिल्ह्यात मिळणार समायोजन

Solapur ZP Teacher Recruitment 2023

Solapur ZP Teacher Bharti 2023:  As per the latest news regarding Soalapur ZP Shikshak Bharti 2023 is that As many as 178 posts out of 199 center heads are vacant in Solapur Zilla Parishad schools. There are 199 center head posts approved for the district, but as many as 178 posts are vacant. 50% of the total posts are filled by promotion and half of the posts are filled through State Public Service Commission. In the last few years, not a single center head has been received by the district through ‘MPSC. Read More details are given below.

ZP Bharti 2023 – जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ सुरू करण्याचे आदेश

शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे मेटाकुटीला आलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १९९ केंद्रप्रमुखांपैकी तब्बल १७८ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे ९३ शाळांना कामयमचे मुख्याध्यापक सुद्धा नाहीत. गटशिक्षणाधिकाऱ्यांची ११ पैकी तीनच पदे भरलेली आहेत. उपशिक्षणाधिकारी पण नाहीत, अशा स्थितीत जिल्हा परिषद शाळांचा गाडा हाकला जात आहे.

Solapur ZP Shikshak Bharti 2023

  • जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खासगी शाळांशी स्पर्धा करताना ‘गुणवत्ता’ हीच प्रमुख बाब पटसंख्या वाढविणारी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची प्रमुख जबाबदारी केंद्रप्रमुखांवर असते. किमान दहा शाळांची जबाबदारी एका केंद्रप्रमुखावर असते.
  • जिल्ह्यासाठी १९९ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत, पण तब्बल १७८ पदांवर केंद्रप्रमुखच नाहीत. एकूण पदांपैकी ५० टक्के पदे पदोन्नतीने व निम्मि पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जातात. मागील काही वर्षांत ‘एमपीएससी’च्या माध्यमातून एकही केंद्रप्रमुख जिल्ह्याला मिळालेला नाही. दुसरीकडे पदोन्नती रखडल्याने ७८ शिक्षकांना केंद्रप्रमुखाची संधी मिळालेली नाही. दुसरीकडे ९३ शाळांना मुख्याध्यापकच नाहीत.
  • त्यामुळे शिक्षकांकडेच प्रभारी मुख्याध्यापक पद सोपविल्याने त्यांचे कोणीच ऐकत नाही, अशीही स्थिती आहे. आंतरजिल्हा बदलीतून १२० शिक्षक जिल्ह्यात येणे अपेक्षित असतानाही ९० शिक्षक आलेच नाहीत. आपल्याकडील ६० शिक्षक त्यांच्या जिल्ह्यात रुजू झाल्याने रिक्तपदांची संख्या पुन्हा वाढली आहे. शिक्षकांची संख्या कमी झाल्याने पदोन्नतीचा विषय अनेक वर्षांपासून रखडलेलाच आहे. शिक्षक संघटनांनी अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली तरीदेखील पदोन्नतीचा विषय मार्गी लागलेला नाही. आता मार्च महिन्यात पदोन्नतीने पदे भरली जातील, अशी आशा आहे.

शिक्षण’मधील रिक्तपदाचे वास्तव

  • शिक्षक- ६३०
  • मुख्याध्यापक-९३
  • केंद्रप्रमुख-१७८
  • गटशिक्षणाधिकारी-
  • पोषण आहार अधीक्षक-१०

अधीक्षक नसल्याने पोषण आहारात गोंधळ

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत नियमित पोषण आहार दिला जातो. पोषण आहारावर नियंत्रण ठेवून सर्वांना तो व्यवस्थित मिळतो का, याची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी अधीक्षक असावा असा नियम आहे. परंतु, सोलापूर जिल्ह्यात मोहोळ वगळता उर्वरित दहा तालुक्यांना शालेय पोषण आहार अधीक्षकच नाहीत. त्यामुळे कोणाचा कोणाला मेळ नसल्याची स्थिती आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Shaitali Shinde says

    I am intrested

  2. Admin says

    Solapur Teachers Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!