मराठीतून शिकलेल्यांना उर्दू शाळांत नियुक्ती; नागपूर खंडपीठाने बजावल्या नोटिसा – Shikshak Bharti 2024
Maharashtra Shikshak Bharti 2024 @ https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/
Maharashtra Shikshak Bharti 2024 @ https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/- During the recruitment of teachers through the pavitra portal, candidates who completed their education in Marathi medium were appointed in Urdu medium schools. Urdu teachers filed a petition in the Nagpur bench of the Bombay High Court in this regard. The court stopped the process and issued notices to the government, four zilla parishads and two municipal councils. The order dated 3rd April 2024 asked him to file a reply by 12th June 2024. Candidates Read the complete details of Shikshak Bharti 2024 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
While appointing a teacher in primary and secondary schools, the candidate is considered eligible for appointment in the same medium school through which he has studied up to class 10 and 12. It was the policy of the government that the medium of that diploma should not be considered even if the teaching diploma is passed by any medium. The state government had taken a policy decision in this regard on August 28, 2001. Meanwhile, during the recruitment of teachers on the holy portal, candidates who have completed their education in Marathi medium were recruited in Urdu medium schools. In the Nagpur bench of the High Court, Urdu teachers Challenged through Ram Korode. The matter came up for hearing on April 3, 2024.
मराठीतून शिकलेल्यांना उर्दू शाळांत नियुक्ती; नागपूर खंडपीठाने बजावल्या नोटिसा
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीदरम्यान मराठी माध्यमात शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना उर्दू माध्यमाच्या शाळेत नियुक्त करण्यात आले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उर्दू शिक्षकांनी याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने ही प्रक्रिया थांबवत शासनासह चार जिल्हा परिषदा व दोन नगरपरिषदांना नोटिसा बजावल्या. १२ जूनपर्यंत त्यावर उत्तर सादर करण्याचे ३ एप्रिल रोजीच्या आदेशात बजावले.
- प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकाची नियुक्ती करताना त्याने ज्या माध्यमातून इयत्ता १०वी, १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले असेल त्याच माध्यमाच्या शाळेत त्या उमेदवाराला नियुक्तीसाठी पात्र समजले जाते. अध्यापन पदविका कोणत्याही माध्यमातून उत्तीर्ण केली असली तरी त्या पदविकेचे माध्यम विचारात घेऊ नये, असे शासनाचे धोरण होते. यासंदर्भात राज्य शासनाने २८ ऑगस्ट २००१ रोजी धोरणात्मक निर्णय घेतला होता. दरम्यान, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीदरम्यान मराठी माध्यमात शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना उर्दू माध्यमाच्या शाळेत नियुक्त केल्याचे प्रकार घडले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात उर्दू शिक्षकांनी ॲड. राम कारोडे यांच्यामार्फत आव्हान दिले. त्यावर ३ एप्रिल २०२४ रोजी सुनावणी झाली.
- त्यामध्ये न्यायमूर्ती नितीन संबारे, अभय मंत्री यांच्या न्यायालयाने मराठी माध्यमाच्या उमेदवारांना उर्दू अध्यापनाचे काम देणे, हे राज्यघटनेच्या कलम ३५० (अ) तसेच शासनाच्या आधीच्या धोरणाशी विसंगत असल्याचे नमूद केले. तसेच प्राथमिक शिक्षक, शिक्षणसेवक या पदासाठी निवड करताना उमेदवाराने इयत्ता १०वी, १२वीपर्यंतचे शिक्षण ज्या माध्यमातून घेतले किंवा अध्यापक पदविका ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली असेल, त्यापैकी एका माध्यमाच्या शाळेत उमेदवार अध्यापन करण्यास पात्र असायला पाहिजे, असे मत नोंदविले.
- शिक्षण आयुक्तांसह चार जिल्हा परिषदांना नोटिसा- उच्च न्यायालयाने राज्य शासन, शिक्षण आयुक्त पुणे, संचालक शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण पुणे, तसेच जिल्हा परिषद वर्धा, बुलढाणा, अकोला, अमरावती, नगरपरिषद उमरखेड, धामणगाव यांना नोटीस बजावल्या. त्यावर १२ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे बजावले.
Maharashtra Shikshak Bharti 2024 @ https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/- The government’s decision to prescribe the revised criteria for accreditation is inconsistent with the RTE Act, which overcharges thousands of teachers and shuts down schools in remote areas. The Dhule district teachers’ body also demanded the government to cancel the two government decisions without delay, saying that the decision to implement the dress code for teachers was also a financial burden on the teachers and violated the fundamental rights. Candidates Read the complete details of Shikshak Bharti 2024 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
सुधारित संचमान्यतेचा निर्णय रद्द करा; जिल्हा शिक्षक भरती
संचमान्यतेचा सुधारित निकष विहित करणारा शासन निर्णय आरटीई कायद्याशी विसंगत असून, हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा, दुर्गम भागातील शाळा बंद करणारा आहे. तसेच शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णयही शिक्षकांवर आर्थिक बोजा टाकणारा, मूलभूत हक्कांचे हनन करणारा असल्याचे म्हणत हे दोन्ही शासन निर्णय विनाविलंब रद्द करावेत, अशी मागणी धुळे जिल्हा शिक्षकभारतीने शासनाकडे केली.
- सुधारित संचमान्यतेमुळे हजारो शिक्षक व शेकडो मुख्याध्यापक अतिरिक्त ठरणार आहेत. विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाला शिक्षक व कला, क्रीडा व संगीत शिकण्याचा अधिकार नाकारणारा हा शासन निर्णय आहे. त्यामुळे संचमान्यतेचे निकष बदलावेत. प्रत्येक शाळेत किमान शिक्षक संच निर्धारित करावा, संचमान्यतेमध्ये प्रत्येक विषयाला शिक्षक दिला पाहिजे.
- प्रत्येक विद्यार्थ्याला कला, क्रीडा, संगीत शिक्षक मिळाला पाहिजे. तसेच विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह भोजन मिळाले पाहिजे. शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नयेत, अशी मागणी शिक्षकभारतीने केली.
- ड्रेसकोडला विरोध – राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र हा निर्णय शिक्षकांवर आर्थिक बोजा टाकणारा, शिक्षकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे हनन करणारा असल्याची टीका करत शिक्षकभारतीने केली. एकाहून अधिक गणवेश घेताना शिक्षकांना आर्थिक भुर्दंड बसेल.
- अंशतः अनुदानित किंवा नाममात्र वेतन देणाऱ्या शाळेतील शिक्षकांना गणवेश देण्याची कोणतीही जबाबदारी सरकार घेणार नाही. त्यामुळे शिक्षकांच्या ड्रेसकोड सक्तीचा आदेश शासनाने रद्द करावा, अशी मागणी शिक्षकभारतीने केली. मागण्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांना दिले.
- शिक्षकभारतीचे राज्य संघटक सचिव अश्फाक खाटीक, नाशिक विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे, जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा सचिव नानाभाऊ महाले, जिल्हा कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, तालुकाध्यक्ष किरण मासुळे.
- साक्री तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, दामोदर पाटील, राजेश शिरुडे, राहुल फुले, अनिल पाटील, सी. एन. चौधरी, मुश्ताक शेख, इम्रान शेख, डी. एन. पाटील, एम. पी. फुलपगारे, एम. बी. कोळी, ए. बी. पाटील आदी उपस्थित होते.
There is an atmosphere of happiness across the state as the demand of the teachers in the state that the existing teachers should be given an opportunity to transfer before implementing the new recruitment process through the pavitra portal has been fulfilled. Rajesh Savarkar, state publicity head of the teachers’ committee, said the path for transfers has been paved in the near future. Candidates Read the complete details of Shikshak Bharti 2024 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
The Maharashtra State Primary Teachers’ Committee had given a boost to the teacher recruitment process by following up for a long time to fill up the vacant posts of primary teachers in the state. Meanwhile, on June 21, 2023, the school education department had issued an order for transfer after the state president of the teachers’ committee Vijay Kombe, general secretary Rajan Korgaonkar, office secretary Kishore Patil, approached school education minister Deepak Kesarkar to give the newly appointed teachers a chance to transfer before giving them a chance to transfer.
However, zilla parishad teacher transfer powers come under the jurisdiction of the Ministry of Rural Development. Last week, state office-bearers of the Maharashtra State Primary Teachers’ Committee had approached the ministry level seeking a separate order from the rural development department in this regard. Finally, an order in this regard has been issued by Girish Mahajan’s department.
नवीन भरती प्रक्रिया राबविण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी!
पवित्र पोर्टलद्वारे नवीन भरती प्रक्रिया राबविण्यापूर्वी सध्या कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी, अशी राज्यातील शिक्षकांची मागणी पूर्ण झाल्याने राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या माध्यमातून यश मिळाले असून ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित केल्याने राज्यातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याची मागणी पुर्णत्वास गेली आहे. नजिकच्या काळात बदल्यांचा मार्ग सुकर झाल्याची माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दीर्घकाळ पाठपुरावा करीत शिक्षक भरती प्रक्रियेला चालना दिली होती. दरम्यान, शिक्षक बदल्यांच्या धोरणाचा शासन स्तरावर फेरविचार सुरु झाल्याने शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे सरचिटणीस राजन कोरगांवकर, कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २१ जून २०२३ रोजी शालेय शिक्षण विभागाने बदल्यांसाठी आदेश पारीत केला होता. मात्र जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांचे अधिकार ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. त्यामुळे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी याबाबत मंत्रालय स्तरावर ग्रामविकास विभागाकडून स्वतंत्र आदेश निघावा यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर गिरीश महाजन यांच्या विभागामार्फत याविषयीचा आदेश निघाला आहे.
Maharashtra Shikshak Bharti 2024 Results, Merit List Declared now. The recruitment process for the post of shikshak is being done through the Pavitra portal. The General Merit List of the candidates recommended for selection in the management who have opted for the first phase of interview has been published today on 25/02/2024. On behalf of the School Education Department, heartiest congratulations to all the aspirants recommended for selection and best wishes to all for further academic work. The recruitment process for the post of teacher is being done through the Pavitra portal. The general merit list of the candidates recommended for selection in the management who have opted for the first phase of interview has been published today on 25/02/2024.
शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Shikshak Bharti General Merit list
Shikshak Bharti 2024 Advertisement Details – The process of registering priorities and locking priorities on the Pavitra portal for teacher recruitment is going on smoothly. Meanwhile, the judicial process on the teacher recruitment process is underway. State Education Commissioner Suraj Mandhare said the facility of locking priorities is being continued till Tuesday as the next phase of action cannot be taken till a clear order of the court is received.
In the teacher recruitment process, 1,41,447 aspirants have generated priorities on the Pavitra portal till date, while 1,35,855 aspirants have also locked priorities. Meanwhile, some of the writ petitions filed in the Aurangabad bench of the High Court in this regard have been ordered by the court, while the judicial process is underway on one writ petition. Meanwhile, the next step of action cannot be taken till a clear order of the court in this regard, which is being continued till Tuesday. All the candidates and concerned should take note of this,” Mandhare said.
शिक्षक भरतीत प्राधान्यक्रम ‘लॉक’ करण्याची सुविधा आजपर्यंत सुरू
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदविण्याची आणि प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रियेवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचे स्पष्ट आदेश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता ये नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा मंगळवारपर्यंत (ता. १३) सुरू ठेवण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर आजपर्यंत एक लाख ४१ हजार ४४७ अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत, तर एक लाख ३५ हजार ८५५ अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉकदेखील केले आहेत. दरम्यान, या संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या काही रिट याचिकांमध्ये न्यायालयाचे आदेश झाले आहेत, तर एका रिट याचिकेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट आदेश येईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता येत नाही, ही सुविधा मंगळवारपर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवार व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मांढरे यांनी सांगितले..
About 1.18 lakh of the eligible aptitude holders for teacher recruitment in the state have registered their preferences on the pavitra portal in the last two days. State Education Commissioner Suraj Mandhare said that the deadline for granting preference order to eligible aspirants awaiting recruitment of teachers has been extended till February 12.
Meanwhile, the aspirants have complained that the teacher recruitment portal has been continuously shut down for the last two days. Mandhare said the holy portal is slowing down to some extent as more than 75,000 users are logging in at a time.
The actual process of recruitment of a total of 21,678 vacancies of teachers in the much-awaited local bodies and private educational institutions in the state has started recently. According to the recruitment process, 16,799 posts of teachers will be filled without interview and 4,879 posts of teachers with interview.
शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम नोंदविण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
राज्यातील शिक्षक भरतीस पात्र अभियोग्यताधारकांपैकी जवळपास एक लाख १८ हजार अभियोग्यताधारकांनी गेल्या दोन दिवसांत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविला आहे. शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम देण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
- दरम्यान, शिक्षक भरतीचे पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने बंद पडत असल्याची अभियोग्यताधारकांची तक्रार आहे. त्यावर, एकावेळीस जवळपास ७५ हजारांहून अधिक वापरकर्ते लॉगिन करत असल्याने पवित्र पोर्टल काही प्रमाणात संथ होत असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले.
- राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेनुसार मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.
- त्यासाठी पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी यापूर्वी गुरूवारपर्यंतची मुदत दिली होती. परंतु आता या मुदतीत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.
- शिक्षक भरतीच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविताना अनेक पात्र उमेदवारांचा गोंधळ उडत आहे. तसेच भरती प्रक्रियेचे संबंधित संकेतस्थळ वारंवार बंद पडत आहे. त्याचा फटका अभियोग्यताधारकांना बसत असून पसंतीक्रम नोंदवून अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत.
- अनेकदा अर्ज भरताना मध्येच संकेतस्थळ बंद पडणे, सर्व्हर हॅग होणे, अशा समस्यांचा सामना पात्र अभियोग्यताधारकांना करावा लागत आहे. त्यामुळे पसंतीक्रम देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पात्र अभियोग्यताधारकांकडून होत होती.
- ”दोन लाख १७ हजार अभियोग्यताधारकांपैकी जवळपास एक लाख १८ हजार अभियोग्यताधारकांनी गेल्या दोन दिवसांत पोर्टलवर पसंतीक्रम नमूद केला आहे. सर्व पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम देण्यासाठी अधिक वेळ मिळावा, याकरिता पसंतीक्रम देण्याची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात येत आहे. पसंतीक्रम देण्याचे काम पूर्ण झालेल्या अभियोग्यताधारकांना त्यांचे पसंतीक्रम लॉक करण्याची सुविधा शुक्रवारपासून (ता. ९) उपलब्ध करून देण्यात येईल.” – सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त
- ”शिक्षक भरतीच्या पोर्टलवर पसंतीक्रम देताना पात्र अभियोग्यताधारक गोंधळून जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात मदत केंद्र सुरू करावे” – संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन
Shikshak Bharti 2024 Advertisement Details – A total of 21,678 vacancies of teachers in local bodies and private educational institutions in the state have been sought. Accordingly, the actual process of recruitment of 16,799 posts without interview and 4,879 posts with interview has started. Candidates are provided with necessary instructions and user manual to specify the priority. Website for Candidates to Login : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in. The period for candidates to lock their post wise preference is 8th and 9th February 2024. The merit list will be released after the completion of the prioritization process, its probable schedule will be released soon. For all related matters, correspondence should be done on ‘[email protected].
राज्यात २१ हजार शिक्षकांची भरती सुरू जाहिरात प्रसिद्ध; प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी ८ व ९ फेब्रुवारीचा कालावधी
राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे.
- राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या चाचणीसाठी एकूण दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिली ते बारावीसाठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
- शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम, बिंदुनामावली, विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांच्या एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. सोशल मीडियावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव, खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाच्या विविध विषयांवरील धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून, त्यात तंत्रज्ञानाचादेखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यांवर तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे, असेही मांढरे यांनी सांगितले.
भरतीच्या प्रक्रियेतील आकडेवारी –
- १,६३,०५८ प्रमाणित अर्ज
७,८७० प्राधान्यक्रम दिलेले
गटनिहाय रिक्त पदे
- पहिली ते पाचवी – १०२४०
- सहावी ते आठवी – ८,१२७
- नववी ते दहावी – २,१७६
- अकरावी ते |बारावी – १,१३५
माध्यमनिहाय रिक्त पदे
- मराठी – १८,३७३
- इंग्रजी – 939
- उर्दू – १,८५०
- हिंदी – ४१०
- गुजराथी – १२
- कन्नड – ८८
- तमीळ – ०८
- बंगाली – ०४
- तेलगू – ०२
रिक्त जागांचा तपशील
- जिल्हा परिषद ३४ – १२,५२२
- महापालिका – १८ – २,९५१
- नगरपालिका – ८२ – ४७७
- खासगी १,१२३
- शैक्षणिक संस्था – ५,७२८
महत्त्वाच्या सूचना
- प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि ‘यूजर मॅन्युअल दिले आहे.
- उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी संकेतस्थळ : https://tait2022.mahateacherrecruitment.org.in
- उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम लॉक करण्यासाठी कालावधी ८ आणि ९ फेब्रुवारी
- प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल
- संबंधित सर्व बाबींसाठी ‘edupavitra2022@ gmail.com या ईमेलवर पत्रव्यवहार करावा.
The recruitment schedule for eligible candidates who have registered on the holy portal awaiting teacher recruitment will be announced soon. State Education Commissioner Suraj Mandhare said that the process of finalising the advertisement for the recruitment of teachers is expected to be completed by the end of this week after which all the final advertisements will be seen in the form of recruitment without interview and recruitment with interview. The education department has issued a press release regarding the recruitment. He holds a D.Ed. for Semi-English. There is a provision to take English medium. Similarly, candidates holding B.Ed qualification along with Professional Qualification D.Ed for posts in classes VI to VIII are eligible.
The managements, who had registered on the holy portal by January 22 for the recruitment of teachers, were given time till January 24 to finalize the advertisement. On January 25, the government decided to fill up the posts required for semi-English of zilla parishad and reserve the vacant posts for resource persons as per the government decision of October 13. All CEOs were given time till January 30 to make the change. Candidates Read the complete details of Shikshak Bharti 2024 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
राज्यात लवकरच शिक्षक भरतीचा कार्यक्रम
- शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पवित्र पोर्टलवर नोंदणी झालेल्या पात्र उमेदवारांच्या भरतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. शिक्षक भरतीच्या जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवडय़ाच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती आणि मुलाखतीसह भरती या प्रकारात पाहायला मिळतील, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
- पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या जाहिराती कधी प्रसिद्ध होतील या प्रतीक्षेत लाखो उमेदवार आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून विविध पातळय़ांवर काम केले जात आहे. नुकतीच शिक्षक भरतीच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला. या बैठकीत मुलाखतीसह पदभरतीच्या जाहिरातीमध्ये काही दुरुस्त्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या. तसेच अचूक जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आल्याचेही मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
- शिक्षक पदभरतीसाठी 22 जानेवारीपर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक 24 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर सरकारने 25 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच 13 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार साधन व्यक्तींसाठीची रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. हा बदल करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंतची मुदत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली होती.
- शिक्षण विभागातर्फे भरतीबाबत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात सेमी इंग्रजीसाठी डी.एड. इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे. त्याचप्रमाणे सहावी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डी.एडसह बी.एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
The process of publishing advertisements for vacant posts in the much-awaited teacher recruitment process in the state has finally started. Some zilla parishads have advertised on the holy website and so far around 12,000 posts have been advertised. The exact picture of teacher recruitment will be clear by 15th January 2024, education department officials declared. Candidates Read the complete details of Shikshak Bharti 2024 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
The recruitment of teachers in the state has attracted the attention of lakhs of eligible candidates. The recruitment process was pursued several times through agitations. Recruitment for 30,000 posts of teachers in zilla parishad schools has been announced. It has been approved to fill up 80 per cent of the vacant posts in the state. As objections were raised over the scrutiny, instructions were given to put aside 10 per cent of the seats and publish the advertisement for 70 per cent of the posts. The process of district councils, city councils and small local bodies has been completed. Now, the process of finalising some of the largest private entities is underway. The process will be completed in the next 10 days and advertisements of those institutions will be published. After that, it will be clear how many posts of teachers will be recruited.
शिक्षक भरतीच्या जाहिराती सुरू; आठवडाभरात चित्र स्पष्ट
- राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेतील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. काही जिल्हा परिषदांनी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात दिली असून आतापर्यंत सुमारे १२ हजार पदांची जाहिरात निघाली आहे. १५ जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीचे नेमके चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
- राज्यातील शिक्षक भरतीकडे लाखो पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे. भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या ३० हजार पदांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. बिंदुनामावली तपासणीवर आक्षेप नोंदवण्यात आल्याने १० टक्के जागा बाजूला ठेवून ७० टक्के पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि छोट्या स्थानिक संस्थांची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता काही मोठ्या खासगी संस्थाच्या बिंदुनामावलीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून त्या संस्थाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर नेमक्या किती पदांवर शिक्षकांची भरती होणार हे स्पष्ट होऊ शकेल.
- इंग्रजी मध्यमांना झुकते माप? -पवित्र संकेतस्थळावरील जाहिरातींमध्ये जिल्हा परिषदांसाठी इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना झुकते माप देण्यात आले असल्याचा आरोप शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत आहे. तर भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
Shikshak Bharti 2024 – As many as 7,720 posts of teachers have been advertised by the school education department on the pavitra portal by a total of 156 managements in the Maharashtra state. Online applications are invited from eligible candidates with educational and professional qualifications and registered in the pavitra portal system. Thousands of candidates were relieved when at least a few seats in the much-awaited teacher recruitment were advertised. Candidates who have entered the ‘Aptitude and Intelligence Test 2022’ can apply online as per the advertisement by entering personal information in the pavitra portal system.
The eligible candidates can apply online on the portal by mentioning the preference order for the eligible posts. The post will be filled from candidates who have studied in English, such as one teacher at the central school level appointed to teach English language teaching techniques to teachers of other schools of the center at the Zilla Parishad center school level. However, Marathi medium candidates have opposed it.
शिक्षक भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध
राज्यात एकूण १५६ व्यवस्थापनांकडून तब्बल सात हजार ७२० शिक्षकांच्या पदांची जाहिरात शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर दिली आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणाऱ्या आणि पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बहुप्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षक भरतीतील किमान काही जागांची जाहिरात निघाल्याने हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला. ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी पवित्र प्रणालीमध्ये वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेल्या उमेदवारांना जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
संबंधित पात्र उमेदवारांना पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकविण्यासाठी नियुक्त केंद्र शालास्तरावर एक शिक्षक याप्रमाणे इंग्रजीतून शिक्षण झालेल्या उमेदवारांमधून हे पद भरण्यात येणार आहे. परंतु, त्याला मराठी माध्यमाच्या उमेदवारांनी विरोध केला आहे.
Shikshak Bharti 2024 updates – At a time when lakhs of candidates are waiting for the recruitment of teachers in the Maharashtra state, the school education department has now directed the chief executive officers and education officers of all zilla parishads in the state to demand only 70% of the posts while advertising on the holy portal instead of 80% of the total vacant posts.
The Teacher Aptitude and Intelligence Test 2022 will be held from February 22 to March 3, 2023 to fill up the vacant posts of teachers in the Maharashtra state. It was done. The candidates who have appeared for this examination have completed the self-certificate required for recruitment to the post on the Pavitra portal. In the meantime, the roster was required to be certified on the basis of aadhaar certified student numbers for 2022-23 and as per the government decision of July 6, 2021 of the General Administration Department. Even before the process of checking the point names started, there were demands from public representatives, organisations and candidates to correct them at various levels. Accordingly, the education department clarified the process of verifying the service records of the teachers and updating the point names.
शिक्षक भरती ७० टक्केच जागांवर – राज्य सरकारचा निर्णय
राज्यात लाखो उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असताना आता शालेय शिक्षण विभागाने एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के जागांऐवजी केवळ ७० टक्के पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करावी, अशी सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारे उमेदवार नाराजी व्यक्त करत आहेत.
राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चे २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ दरम्यान आयोजन
करण्यात आले होते. या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्व-प्रमाणपत्र पूर्ण करून घेतले आहे. दरम्यानच्या कालावधीत २०२२-२३ च्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे संचमान्यता आणि सामान्य प्रशासन विभागाच्या ६ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार बिंदुनामावली (रोस्टर ) प्रमाणित करणे आवश्यक होते. बिंदुनामावली तपासण्याची कार्यवाही सुरू होण्यापूर्वीच लोकप्रतिनिधी, संघटना, उमेदवार यांच्याकडून विविध स्तरावर ती अचूक करण्याबाबत त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार शिक्षकांचे सेवाविषयक अभिलेख पडताळून बिंदुनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
सद्य:स्थितीत बिंदुनामावलीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. २१ जून २०२३ मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास सरकारने परवानगी दिली आहे. पण बिंदुनामावलीतील दुरुस्तीबाबत लोकप्रतिनिधींकडून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावरून कार्यवाही करणे आवश्यक असल्याने एकूण रिक्त पदांच्या टक्क्यांऐवजी टक्के पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करण्यात यावी, अशा सूचना शासन स्तरावरून आल्या आहेत.
रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे, ती पदे भरावयाची आहेत. परंतु बिंदुनामावली संदर्भात काही वैध आक्षेप असल्यास त्यांचे योग्यरीत्या निराकरण झाल्यानंतर उर्वरित १० टक्के रिक्त पदे भरतीची कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.
विधिमंडळात शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात चर्चा झाली. काही ठिकाणी बिंदुनामावलीबाबत आक्षेप नोंदवले गेले आहेत. त्या आक्षेपांचे निराकरण पुढील आठ दिवसांत करून उर्वरित दहा टक्के भरती करण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे. बिंदुनामावलीमध्ये काही फेरबद्दल झाला, तर काही पदांची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी दहा टक्के पदे ठेवण्यात येत आहेत. – सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त
वित्त विभागाने ८० टक्के रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी दिली असून, उर्वरित २० टक्के रिक्त पदांच्या बिंदुनामावलीतील घोळ, अतिरिक्त समायोजन करायचे असताना सोलापूरमधील बिंदुनामावलीतील चुकीमुळे सरक आस्थापनांतील १० टक्के पदे कपात करून जाहिरात देणे चुकीचे आहे. एकाच टप्प्यात जिल्हा परिषद आणि खासगी संस्थेच्या ८० टक्के पदांची जाहिरात देऊन त्यांना तत्काळ नियुक्त्या देत उर्वरित प्रतीक्षा यादी जाहीर करावी.
– संदीप कांबळे, अध्यक्ष. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना
Shikshak Bharti 2023 for 30,000 posts updates – Education Commissioner Suraj Mandhare has directed to take action to provide immediate advertisements on the holy website in the teacher recruitment process. It has been announced to recruit 30,000 shikshak in the state. For this, the aptitude test has been conducted and the result has been declared. However, the technical process of point-by-point inspection and teacher adjustment has been delayed. The facility of publishing advertisements for teacher recruitment on the Pavitra Portal website has been made available only in October.
In view of this, the Education Commissioner issued a circular to the Chief Executive Officers of all ZP in the state to advertise on the Pavitra Portal website. For advertisement on the Pavitra Portal, the facility of social reservation of vacant posts, groups of teaching, subject-wise vacancies has been provided on the login of primary education officer. After that, the information recorded by the Primary Education Officer has to be verified and if correct, approved by the CHIEF Executive Officer login for the vacant posts.
After clicking on generated advertisement on the login of the primary education officer, the advertisement for the vacant posts of teachers in the zilla parishad will be prepared. Instructions have been given to verify the information of reservation-wise vacancies, group, subject-wise vacancies required for this action and keep them ready for advertisement. It has been clarified that necessary action should be taken for immediate advertisement as per the instructions on the holy website to ensure that the recruitment of teachers is done without delay.
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… शिक्षण आयुक्तांनी दिला महत्त्वाचा आदेश
- राज्यातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या राज्यभरातील हजारो उमेदवारांना दिलासा देणारी बातमी आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळावर तत्काळ जाहिराती देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. राज्यात शिक्षकांच्या तीस हजार भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी अभियोग्यता चाचणी घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र बिंदुनामावली तपासणी, शिक्षक समायोजन अशी तांत्रिक प्रक्रिया लांबली आहे. शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सुविधा ऑक्टोबरमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र अद्याप जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नसल्याने त्यासाठी उमेदवारांनी उपोषण, आंदोलनेही केली.
- या पार्श्वभूमीवर पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले. पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती संकेतस्थळावर नोंद करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर देण्यात आली आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी नोंद केलेली माहितीची पडताळणी करून ती योग्य असल्यास बिंदुनामावली, विषयनिहाय रिक्त पदांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लॉगिनद्वारे मान्य करायची आहे.
- त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर जाहिरात तयार करणे (जनरेट ॲडव्हर्टाइजमेंट) यावर क्लिक केल्यावर जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदांची जाहिरात तयार होणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आरक्षणनिहाय रिक्त पदे, गट, विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती विनाविलंब होण्यासाठी पवित्र संकेतस्थळावरील सूचनांनुसार तत्काळ जाहिरातदेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
Shikshak Bharti 2023 in Thane updates – As per the latest situation in Thane city is that in many schools, schools are run by hourly teachers and not teachers. As a result, the attendance rate of municipal schools has dropped drastically. The condition of municipal schools in Thane city is pathetic and out of 68 schools, only 34 have been funded for repairs. In the winter session of Nagpur, MLA Sanjay Kelkar demanded additional funds to strengthen the education system and recruitment of 200 teachers. On this occasion, Education Minister Uday Samant instructed the civic administration to recruit teachers to provide additional funds.
About two hundred teachers are needed and the proposal is pending with the government, Kelkar demanded to approve it. In response to Kelkar’s question, Education Minister Uday Samant assured of additional funds for repairs; Thane municipal administration was instructed regarding the recruitment of teachers.
दोनशे शिक्षकांची लवकरच भरती – शिक्षणमंत्र्यांचे ठाणे पालिला प्रशासनाला निर्देश
ठाणे शहरात पालिका शाळांची अवस्था दयनीय असून ६८ शाळांपैकी फक्त ३४ शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी वाढीव निधी देण्यात यावा, याचबरोबर दोनशे शिक्षकांची भरती करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. या वेळी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वाढीव निधी देण्याबाबत शिक्षक भरतीच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या.
- ठाणे शहरातील महापालिकेच्या शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली असून अनेक शाळा बिनशिक्षकी आहेत. याची पाहणी करून आमदार संजय केळकर यांनी ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणली होती. हीच बाब त्यांनी लक्ष्यवेधीवर बोलताना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
- महापालिकेच्या ३४ शाळा आणि ११ बालवाड्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे; मात्र शहरात ६८ शाळा नादुरुस्त असून संरक्षक भिंती, इमारतीचे बांधकाम, पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसून तासिका शिक्षकांकडून शाळा चालवल्या जात आहेत. त्यामुळे पालिका शाळांचा हजेरीपट मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
- शहराची रंगरंगोटी होत असताना शिक्षण व्यवस्थादेखील सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी ज्यादा निधी देणार आहात का, असा प्रश्न विचारत केळकर यांनी सुमारे दोनशे शिक्षकांची गरज असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पडून असल्याचे सांगितले. त्याला मंजुरी देण्याची मागणी केळकर यांनी केली. केळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दुरुस्तीसाठी जादा निधी देण्याबाबत आश्र्वासित केले; तर शिक्षकांच्या भरतीबाबत ठाणे महापालिका प्रशासनाला सूचना केल्या.
Shikshak Bharti 2023 Online Registration – The education department has decided to recruit another 20,000 teachers. Accordingly, the process for recruitment of teachers will be implemented soon and employment opportunities will be available to D.Ed and B.Ed holders. The process of filling up the posts of 13,500 teachers in the state has been going on for the last few days and so far many teachers have been given appointment letters. Accordingly, teachers are being admitted in various schools, yet it has been decided to recruit teachers again as there is a large number of vacant posts of teachers in government schools. It is being said that if teachers are recruited every year, it will help in increasing the number of students in DEd College.
डीएड-बीएड धारकांना संधी! राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती; लवकरच राबवणार प्रक्रिया
शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरण्यात अडचण येत आहे. यामुळे दरवर्षी शिक्षक भरती झाल्यास डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.
https://mahateacherrecruitment.org.in/ Now from 1st September teacher recruitment through Pavitra portal has started. There will be recruitment of 23 thousand posts in Zilla Parishad, municipal and municipal schools and 8 to 10 thousand posts in private aided schools. Candidates have to register on ‘Pavitra’ from 1st to 22nd September. Currently, candidates have to register on ‘Pavitra’ and they have to upload information according to priority, caste and subject. After that, the merit list of the candidates will be published after verifying the documents and marks according to the final point list of the respective Zilla Parishad and the final selections will be made. Candidates Read the complete details of Shikshak Bharti 2023 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
23 हजार शिक्षकांची भरती सुरु! ‘पवित्र’वर नोंदणीसाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदत; ऑक्टोबरअखेर पूर्ण होणार भरती प्रक्रिया
साडेपाच-सहा वर्षांची प्रतीक्षा संपली, आता १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये आठ ते दहा हजार पदांची भरती होणार आहे. १ ते 22 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना ‘पवित्र’वर नोंदणी करावी लागणार आहे.
- राज्यभरात जिल्हा परिषदांच्या जवळपास ७० हजार शाळा असून त्याअंतर्गत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नयेत म्हणून ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.
- पण, आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. साधारणत: ऑक्टोबरअखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाल्यावर एकत्रितपणे भरतीला सुरवात होईल.
- सध्या ‘पवित्र’वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यात त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील, असे भरतीचे टप्पे आहेत.
- ‘खासगी’ची पदे ३ महिन्यानंतर पुन्हा भरता येणार – खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील बिंदुनामावली व संचमान्यतेनुसार जेवढी रिक्त पदे असतील, त्यानुसार त्यांना ‘पवित्र’वर जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. पण, काही शाळांना आताच्या भरतीत सहभागी होता नाही आले आणि काही दिवसांनी त्यांची पदे रिक्त झाल्यास पुन्हा तीन महिन्यांनी भरतीत सहभागी होता येणार आहे. नवीन बदलानुसार आता खासगी संस्थांमधील शिक्षकांची भरती ‘पवित्र’वरूनच होणार आहे. त्यासाठी तीन उमेदवारांना त्या शाळांवर मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे.
- आता जिल्हाअंतर्गत बदली कायमची रद्द – प्रत्येक वर्षी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून राबविली जाते. आता ही बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. पण, अनेकदा पूर्वीच्या शाळांना पुरेसे शिक्षक होते, पण बदल्यांमुळे तेथे शिक्षक कमी पडतात, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यामुळे आता नवीन शिक्षक भरतीवेळी उमेदवारांकडून एकाच शाळेवर कायमस्वरूपी नोकरीसाठी तयार असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. जिल्हाअंतर्गत बदलीची पद्धत आता बंद होणार आहे. तसा प्रस्ताव आहे, पण त्यावर अजून निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
- शिक्षक भरतीची स्थिती
- शासकीय शाळांची पदे – २३०००
- ‘खासगी अनुदानित’ची पदे – ८ ते १० हजार
- अंदाजे एकूण पदभरती – ३३,०००
- बिंदुनामावली अंतिम जिल्हा परिषदा – १२
How to Registration from Pavitra Portal for Shiskhak Bhati 2023
कशी करायची नोंदणी –
- सध्या ‘पवित्र’ पोर्टल वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे.
- त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील; असे भरतीचे टप्पे आहेत.
The Pavitra Portal will be open on Friday (i.e.e 1st September 2023) for the recruitment of teachers and non-teachers. Eligible candidates will be given 15 days to register on the portal, School Education Minister Deepak Kesarkar informed. The school education department has been working on various procedures for the recruitment of teachers for the past few months. Aadhaar verification of 1.4 lakh students is still pending. Therefore, the work of consensus and roster has not been finalized. However, the government says that 9% of the consensus and roster work has been done. In the next two months, 30,000 teachers will be recruited in the first phase, followed by 20,000 teachers in the second phase, Kesarkar said. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
शिक्षक भरती; पवित्र पोर्टल शुक्रवारी सुरू
शिक्षक व शिक्षकेतर भरतीसाठी येत्या शुक्रवारी (१ सप्टेंबर) पवित्र पोर्टल सुरू करण्यात येईल. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पात्र उमेदवारांनी १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शिक्षक भरतीसाठी शालेय शिक्षण विभाग मागील काही महिन्यांपासून विविध प्रक्रियेवर काम करीत आहे. अजूनही १४ लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे संचमान्यता व रोस्टरचे काम अंतिम झालेले नाही. मात्र, ९५ टक्के संचमान्यता व रोस्टरचे काम झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पुढील दोन महिन्यांत पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल, तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.
There is important news for teachers in the state. An important update regarding the recruitment of teachers in 13 districts of the state has come out. The Education Department has issued instructions to the Chief Executive Officers of the concerned Zilla Parishads regarding the recruitment of teachers. Also, approval has been given to fill up 80 percent of the vacant posts in the Scheduled Tribes-Pesa sector accordingly. Due to this, teachers will now be recruited in the districts of Dhule, Gadchiroli, Jalgaon, Nanded, Pune, Nagar, Amravati, Chandrapur. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
राज्यातील १३ जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा
राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी हाती आहे. राज्यातील १३ जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षण विभागाने शिक्षक भरतीबाबत संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच त्यानुसार त्यानुसार अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, पुणे, नगर, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यात शिक्षक भरती होणार आहे.
- राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी १३ जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. ‘अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 ‘टक्के रिक्त पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या जिल्ह्यातील उमदेवारच पात्र असणार आहे. या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे’, अशी सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे.
- ‘१ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट-क मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती होत आहे. या भरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- या भरतीत ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (टेट) -२०२२’ परीक्षा दिलेल्या ‘एसटी-पेसा’ उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. टेट परीक्षा -२०२२ दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी, असे मांढरे यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
- तसेच , या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय यापुढे खुला ठेवण्यात यावा, असेही मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
30 thousand teachers will be recruited in the first phase of teacher recruitment. For that, the private institutions have to upload the information of their vacant teacher posts on the portal along with the point list. Later, three candidates will be sent from the state level for one seat in that school. Out of the three institutions have to select one candidate.
As per the Teachers Bharti Time table the advertisement will be uploaded on the portal between 15th to 31st August. Selection of candidates from local government schools will be based on merit list and marks in ‘TET’ and ‘CAIT’ test. For this the interested candidates have to register on the holy portal. After registration between 1st to 15th September, district, caste category, subject priority should be filled in holy portal. Then on October 10, the list of candidates qualified for the interview will be given to the private organizations through the portal. Verification of shortlisted candidates for schools in local bodies will be completed from 11th to 21st October. Candidates selected between 21st to 24th October will be counseled and appointed.
अखेर मुहूर्त सापडला! राज्यात 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती; वेळापत्रक जाहीर
संपूर्ण राज्यातील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. शिक्षक भरतीचे वेळापत्रक झाले. यामुळे अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची आतुरता आता संपणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकभरती आता ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षकांची कमतरता आहे. मात्र, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांना त्यांच्याकडील रिक्त शिक्षकांच्या पदांची माहिती बिंदूनामावलीसह पोर्टलवर अपलोड करावी लागेल. नंतर त्या शाळेत राज्य पातळीवरून एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जाणार आहेत. तीनपैकी संस्थेला एका उमेदवाराची निवड करावी लागेल. या प्रक्रियेमुळे खासगी संस्थांचा मनमानी कारभार थांबणार आहे.
- राज्य शासनाचा निवृत्त शिक्षकांना १० ते १२ पटसंख्या असलेल्या शाळांवर नियुक्तीचा निर्णय आहे. ही नियुक्ती शिक्षण सारथी योजनेंतर्गत होईल. निवड झालेल्या निवृत्त शिक्षकाला १० हजार रुपये मानधन दिले जाईल.
- सारथी योजनेंतर्गत ७० वर्षांपर्यंतचे निवृत्त शिक्षक नियुक्तीसाठी पात्र आहेत. निवृत्त शिक्षकांची नियुक्ती झाल्यास शिक्षक भरतीमधील रिक्त पदांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता आहे.
- अशी असणार भरती प्रक्रिया
- संच मान्यता पूर्ण होताच शिक्षक भरतीला सुरवात होईल. मात्र, त्यापूर्वी बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण होईल. १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान पोर्टलवर जाहिरात अपलोड होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार आणि ‘टेट’ व ‘सीएआयटी’ चाचणीतील गुणांवरून होईल.
- यासाठी इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यावर १ ते १५ सप्टेंबरदरम्यान जिल्हा, जात प्रवर्ग, विषयाचा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर भरावे लागेल. त्यानंतर १० ऑक्टोबरला खासगी संस्थांना मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोर्टलद्वारे दिली जाईल.
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी निवडलेल्या उमेदवारांची पडताळणी ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान निवड झालेल्या उमेदवाराचे समुपदेशन करून त्यांची नेमणूक होईल.
- प्रमाणपत्रात बदल करण्यासाठी येथे क्लिक करा
- Mismatch in TET notice for Candidate
- Candidates Instructions
- महत्वाचे- हजारो कलाशिक्षकांची पदे रिक्त
- Shikshak Bharti- राज्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच
- Shikshan Vibhag Bharti 2023
- एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 3479 शिक्षक पदाची भरती
- पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती पुढील महिन्यात होणार !
अर्ज कसा दाखल कराल आणि लॉक बद्दल माहिती देणारा व्हिडीओ
अर्ज कसा करावा सूचना
- Read All Other Important Instructions To Submit Your Application Forms
- Pavitra Portal Registration Details
30 thousand vacancy filled in this year
Marathi School Shikshak Bharti Details
whenever open pavitra portal to filling form and registration for the sanstha
सर b.ed अॅपियर स्टुडन्ट पवित्र पोर्टल मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो का