रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांना करता येईल अर्ज
SECR Sports Quota Railway Recruitment 2021
SECR Sports Quota Railway Recruitment 2021: South East Central Railway Bilaspur Division is inviting Online applications are invited from eligible Sportsperson in various sports disciplines in 7th CPC Pay Matrix Level-2 or 3, Level4 and Level-5 on South East Central Railway. More details are given below.
SECR Sports Quota Railway Recruitment 2021, Sarkari Naukri : रेल्वेमध्ये नोकरी मिळावी यासाठी लाखो जण प्रयत्न करत असतात. रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (South East Central Railway SECR) अनेक पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत इच्छूक उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच यातील 26 पदं ही क्रीडा कोटा अंतर्गत भरती केली जाणार आहे. (SECR Sports Quota Railway Recruitment 2021)
पात्रता- Eligibility for SECR Railway Bharti 2021
- यातील तांत्रिक पदांसाठी १२ वी पास अनिवार्य आहे.
- तर तांत्रिक नसलेल्या पदांसाठी दहावी पास असण्यासह आयटीआयचे शिक्षण असणे गरजेचे आहे.
- यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करू शकतात. पण त्यासाठी त्यांना 3 वर्षांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये भाग घ्यावा लागेल.
- यात कोणत्याही विषयात पदवी घेतलेले उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने काढलेल्या या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या उमेदवारांचा पगार दरमहिना 5200-20200 रुपये इतके असेल.
अर्जाची फी- Application Fees
- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी – 500 रुपये
- अनुसूचित जाती / जमाती आणि महिला गटातील उमेदवारांसाठी – 250 रुपये
निवड प्रक्रिया- Selection Process
क्रीडा चाचण्या आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. (SECR Sports Quota Railway Recruitment 2021)
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा
SECR Recruitment 2020
South East Central Railway Bilaspur Division has issued the notification for the recruitment of Trade Apprentice in various Trade Posts under The Apprentice Act 1961. There is a total of 432 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply online through the given link. The last date for submission of application form is 30th August 2020. More details about SECR Recruitment 2020 like application and application address are given below.
दक्षिण रेल्वे भरती 2020
तरुणांसाठी सुवर्णसंधी; दहावीच्या गुणांच्या आधारावर रेल्वेत मिळणार नोकरी
रेल्वेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला परीक्षेविनाच रेल्वेमध्ये नोकरी मिळू शकणार आहे, ही कोरोना काळातील सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरने ट्रेड अप्रेंटिससाठी बंपर रिक्त जागांवर भरती काढल्या आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या नोकरीबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.
परीक्षा न घेता निवडले जाणार रेल्वेत 432 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ज्यामध्ये दहावीच्या गुणांच्या आधारावर नोकरी मिळणार आहे. या पदांवर भरती आयटीआय कोर्सच्या गुणांवर आणि दहावीच्या गुणांवर आधारित असेल. दहावी आणि आयटीआयच्या उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर या नोकरीत उमेदवारांची निवड केली जाणार आहे
30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
या भरतींसाठी उमेदवारांना 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार अप्रेंटिसशिप इंडिया डॉट कॉमच्या माध्यमातून या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतींमध्ये 164 पदे अनारक्षित आहेत. तर 44 ईडब्ल्यूएस, 120 ओबीसी, 69 एससी, 35 एसटी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या भरती विविध ट्रेडसाठी होणार आहेत. अप्रेंटिसच्या भरती आहेत म्हणून त्यांची कोणतीही परीक्षा होणार नाही.
पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडे पदा संबंधित ट्रेडमध्ये दहावी मार्कशीट व आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवाराचे कमाल वय 24 वर्षे असावे. वय 01.07.20 पर्यंत ग्राह्य धरलं जाईल. ओबीसी प्रवर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा तीन वर्षे, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि वेगळ्या-अपंग व्यक्तींसाठी दहा वर्षे सवलत देण्यात आली आहे. या पदांसाठी तपशीलवार जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सूचना अवश्य पाहा. निवड झालेल्या उमेदवारांचे एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले जाईल. छत्तीसगड सरकारच्या नियमांनुसार त्यांना एक वेतन मिळणार आहे.
अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा.
Umesh gawai . [email protected] khamgaon.di buldana . Maharashtra