Satara Police Patil Bharti 2023
Satara Police Patil Bharti 2023
Satara Phaltan Sub Divisional Police Patil Bharti 2023 advertisement published now. Phaltan Sub Divisional Magistrate has announced the Police Patil recruitment program for the vacancies in 14 villages of Phaltan Taluka and the recruitment reservation of these villages has also been announced. Candidates have to submit their applications before the office of Sub Divisional Magistrate from 25th April to 4th May. Application forms, brochures etc. are available in the office of the Sub Divisional Magistrate. Candidates Read the complete details given below on this page regarding the Satara Police Patil Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
फलटण तालुक्याच्या १४ गावांतील पोलीस पाटील भरती जाहीर; अर्ज करण्याची शेवटची मुदत ४ मे
फलटण तालुक्यातील १४ गावांतील रिक्त जागांवरील पोलीस पाटील भरतीचा कार्यक्रम फलटण उपविभागीय दंडाधिकारी यांनी जाहीर केला असून या गावांचे भरतीचे आरक्षणही प्रसिध्द झाले आहे. उमेदवारांना आपले अर्ज २५ एप्रिलपासून ४ मे पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयात समक्ष सादर करावे लागणार आहेत. अर्ज, माहितीपत्रक व इतर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत.
पोलीस पाटील भरती जाहीर झालेली गावे व त्यांचे आरक्षण असे :
Satara Police Patil Bharti 2023
होळ – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), खामगाव – अनुसूचित जमाती (महिला), सासकल – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), अलगुडेवाडी – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), फडतरवाडी – अनुसूचित जमाती (महिला), वडगाव – भटक्या जमाती (ब) (महिला), तरडफ (भटक्या जमाती (ड) (महिला), कुरवली खुर्द – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), ठाकुरकी – अनुसूचित जमाती (महिला), भाडळी बु. – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), जाधववाडी (फ) – विशेष मागास प्रवर्ग (महिला), कोर्हाळे – भटक्या जमाती (ड) (सर्वसाधारण), कोपर्डे – भटक्या जमाती (ड) (सर्वसाधारण), तडवळे – आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक (महिला).
Required Documents for Police Patil
आवश्यक कागदपत्रे –
- अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा; त्याच्याकडे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
- महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
- मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
- कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक.