UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
Sarthi Open Online Application Scholarship Of Maratha Communities Upsc Program
Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (Sarathi) has announced a scholarship of Rs. 50,000 for Maratha students who have passed the pre-examination of Central Public Service Commission.
Sarathi’s organization implements many schemes for the welfare of students from Maratha, Kunabi, Kunabi-Maratha, Maratha-Kunabi communities. Through the same, a scholarship scheme has been started for the students who have passed the pre-examination of ‘UPSC’. The link to apply for it has been opened from today. The application deadline is December 15. Scholarships have been introduced for the main examination of the Central Public Service Commission. Candidates from the Maratha community should take advantage of this scheme, an appeal has been made by “Sarathi”
UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
Sarthi Open Online Application Scholarship Of Maratha Communities Upsc Program : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथ़ी) केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलेल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
“सारथी’ संस्थेतर्फे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्याच माध्यमातून ‘यूपीएससी’ची पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी आजपासून लिंक खुली करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबरपर्यंत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मराठा समाजातील उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन “सारथी’तर्फे करण्यात आले आहे.
मराठा समाजातील नॉन क्रिमिलेअर उमेदवारांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. ऑनलाइन अर्जानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल. त्याची वेळ, तारीख “सारथी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज कसा भरावा, त्याची माहिती संकेतस्थळावर सविस्तर देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज करावेत, असेही “सारथी’तर्फे कळविण्यात आले आहे.
सोर्स: सकाळ