Samagra Shiksha – समग्र शिक्षांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन
Samagra Shiksha – Employees working under the management and contract system under the program will get an increase of 10 percent. A government order has been issued in this regard. Deputy Education Officer Anil Deokar said that special teachers working under contract system in the district will also benefit from it.
समग्र शिक्षांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन
शासनाने १५.१७ कोटींची केली तरतूद- समग्र शिक्षाअंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना १० टक्के वाढीव मानधन मिळणार आहे. त्यासाठी शासनाने १५ कोटी १७ लाख ३१ हजार ३८७ रुपयांचा निधी वितरित करण्यास २७ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या ५ हजार ६४५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सर्वशिक्षा अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. समग्र शिक्षाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत समग्र शिक्षाअंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने ५६४५ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १० टक्के वाढीच्या फरकाची रक्कम अदा करण्यासाठी १५ कोटी १७ लाख ३१ हजार ३८७ रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा निधी वितरित करण्यात आला आहे.
समग्र शिक्षाअंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना १० टक्के वाढीव मानधन मिळणार आहे. त्याविषयी शासन आदेश जारी झाला आहे. जिल्ह्यातील करार पद्धतीने कार्यरत विशेष शिक्षकांनाही त्याचा लाभ होणार असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी दिली.