संरक्षण दलात अधिकारी म्हणून भरती – एसपीआय प्रवेश अर्ज प्रक्रियेला लवकरच सुरुवात – SPI Admission 2024

SPI Admission 2024 Online Apply, Examine Pattern, Hall ticket etc., details given briefly.  In order to encourage boys and girls of the state to join the defence forces and to provide better training, the state government has set up a military pre-service education institute for boys at Chhatrapati Sambhajinagar and a military pre-service education institute for girls in Nashik. Currently, the admission process for 2024 has been started in both these places, which has created a huge opportunity for candidates interested in army recruitment training. The notification for admission to military pre-service educational institutions in Sambhaji Nagar and Nashik has been issued. From June 2024, Chhatrapati Sambhajinagar Boys’ Service Institute will invite online applications for admission to the 48th course of admission and for girls for admission to the second course in Nashik.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

These are the qualifications and conditions for admission to the Institute of Military Service Education:

  1. Being single is an important condition to get admission here.
  2. Boys and girls from Bidar, Belagavi and Karwar districts of Maharashtra and Karnataka state are eligible for admission.
  3. Candidates born between January 2, 2007 and January 1, 2010 will be admitted here.
  4. Candidates should have passed 10th or equivalent examination from the State Board in March / April / May 2014.
  5. Also, students and students who have appeared or appeared for the Secondary School (10th) examination to be held in March / April / May 2024 and who take admission in Class 11 in June-2024 will also be eligible.

राज्यातील मुले आणि मुलींना संरक्षण दलात अधिकारी म्हणून भरती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन केली आहे. सध्या या दोन्ही ठिकाणी २०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, या निमित्ताने लष्करभरती प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. संभाजी नगर आणि नाशिक येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत प्रवेशाची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जून २०२४ पासून छत्रपती संभाजीनगर मुलांच्या सेवा संस्था प्रवेशाच्या ४८ व्या कोर्ससाठी आणि मुलींसाठी नाशिक येथे दुसऱ्या कोर्स प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत.

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी या आहेत पात्रता आणि अटी :

  1. येथे प्रवेश घेण्यासाठी अविवाहित असणे ही महत्वाची अट आहे.
  2. महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्यांतील मुले आणि मुली या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत.
  3. ०२ जानेवारी २००७ आणि ०१ जानेवारी २०१० दरम्यान जन्म झालेल्या उमेदवारांना येथे प्रवेश दिला जाणार आहे.
  4. उमेदवाराने मार्च / एप्रिल / मे २०१४ मध्ये राज्य मंडळाकडून १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे गरजेचे आहे.
  5. तसेच मार्च / एप्रिल / मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा किंवा बसणारी व जून-२०२४ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी ही पात्र ठरणार आहेत.

SPI Admission Eligibility / पात्रता :

विद्यार्थी सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांमध्ये पात्र असावा.

  1. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांमध्ये उमेदवार पात्र असावा. हे निकष UPSC आणि संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  2. आवश्यक ऊंची : १५७ सेमी
  3. आवश्यक वजन : ४३ किलो.ग्रॅ.
  4. छाती : न फुगवता – ७४ सेमी, फुगवून – ७९ सेमी
  5. रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा.
  6. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी अशी अट आहे.

SPI Examine Pattern

लेखी परीक्षा आणि मुलाखतीविषयी : पात्र उमेदवारांची २८ एप्रिल २०२४ (तारखेत बदल होण्याची शक्यता) रोजी विविध केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षा पद्धतीविषयी :

  1. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर (MCQ) आधारित असून प्रश्नपत्रिका ही इंग्रजीत भाषेत असेल.
  2. सदर परीक्षा ६०० गुणांची असून यात, एकूण १५० प्रश्न असतील. यातील गणित विषयावर आधारित ७५ प्रश्न तर सामान्य ज्ञानावर आधारित ७५ प्रश्न विचारले जटिल.
  3. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
  4. लेखीपरीक्षेत साधारणपणे राज्य बोर्ड आणि सीबीएसई इयत्ता ८ ते १० च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील.
  5. या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारां मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

How to apply SPI Exam 2024

असा करा अर्ज :

  1. मुलांसाठी ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि मुलींसाठी ऑनलाइन अर्ज www.girlspinashik.com वर उपलब्ध आहेत.
  2. परीक्षा शुल्क रु. ४५० रुपये राहणार असून हे पैसे विनापरवाना तत्वावर भरावे लागणार आहेत. हे परीक्षा शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे उमेदवारांना भरता येणार आहे.
  3. परीक्षा शुल्क डीडी किंवा चलन माध्यमातून स्वीकारले जाणार नाही.
  4. आवश्यक अटी व शर्तींनुसार अर्ज भरला नाही तर अर्ज नाकारला जाईल आणि भरलेली फी परत केली जाणार नाही यादी नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  5. या प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे.

SPI Exam 2024 Hall Ticket

  • परीक्षेचे हॉल तिकीट : परीक्षेचे हॉल तिकीट हे वर दिलेल्या वेबसाइटवरुन दि. १० एप्रिल २०२४ नंतर डाउनलोड करता येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी spiaurangabad.com या संकेतस्थळावर भेट द्यावी तर मुलींनी www.girlspinashik.com या वेबसाईटला भेट द्यावी.
  • परीक्षेशी संबंधित सर्व सूचना या वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील.

SPI Admission


Sainik School Admission E-Counselling

Sainik School Admission : E-counseling will soon be started by Sainik School Society for admission in Sainik schools. It will be launched soon. For the first time, e-counseling system will be implemented in new schools. In this, education will be given according to the military school curriculum and national education policy. Once the application process starts, students will be informed by Sainik School Society to apply under e-counseling process. Dates for this will be announced soon by the society.

SSS Admissions E-counselling: सैनिक शाळांमध्ये प्रवेश  घेण्यासाठी सैनिक स्कूल सोसायटी  द्वारे लवकरच ई-काऊन्सेलिंग सुरु करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात लवकरच केली जाणार आहे. ई-काऊन्सेलिंगच्या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या शाळांमध्ये ही नवीन ई-काऊन्सेलिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट sainikschool.ncog.gov.in वर अधिक माहिती मिळू शकणार आहे.

Sainik School Admission

सैनिक शाळांमधील प्रवेशासाठी ई-काऊन्सेलिंग;लवकरच काऊन्सेलिंगच्या तारखा जाहीर करणार

संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशभरात स्थापन होत असलेल्या नवीन शाळांमध्ये प्रथमच ई-समुपदेशन प्रणाली लागू केली जाणार आहे. यामध्ये सैनिक शालेय अभ्यासक्रम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण दिले जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-समुपदेशन प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सैनिक स्कूल सोसायटीद्वारे कळविले जाणार आहे. त्यासाठी सोसायटीकडून लवकरच तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.

१० शाळा निवडता येणार

काऊन्सेलिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांच्या नोंदणीकृत फोन नंबर किंवा ईमेलवर नोंदणी लिंक पाठविली जाणार आहे. त्यामध्ये नवीन सैनिक शाळांमध्ये प्रवर्ग आणि लिंगाच्या आधारे रिक्त असलेल्या जागांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांचे पर्याय निवडता येणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळा आणि जागा वाटपासाठी पर्याय म्हणून १० शाळा निवडण्याची मुभा असेल. विद्यार्थ्यांना त्यांची ग्रेड आणि शाळा निवडीच्या आधारावर ई काऊन्सेलिंगनुसार शाळा वाटप केले जाणार आहे.

निकाल पोर्टलवर
अंतिम निकाल ई-काऊन्सेलिंग पोर्टलवर जाहीर केला जाणार आहे. यानंतरही विद्यार्थी एकतर आधी दिलेल्या शाळेची निवड स्वीकारू शकतात किंवा काऊन्सेलिंगच्या दुसर्‍या फेरीसाठी पर्यायी निवडीची माहिती अधिकार्‍यांना देऊ शकतात.

तसेच प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पहिल्या फेरीनंतरच अधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहे. प्रत्येक फेरीच्या अलॉटमेटनंतर तारीख, वेळ आणि ठिकाण यासारखे तपशील अंतिम उमेदवारांना प्रत्यक्ष पडताळणीसाठी पाठवले जातील. पहिल्या फेरीत निवड न झालेल्या उमेदवारांच्या जागा रिक्त राहिल्यास त्यांचा काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी विचार केला जाणार आहे.

महिलांचा सहभाग वाढविणार

  • सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर सरकार भर देत आहे. सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाची सुविधा आणि महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी पदभार देण्यासह अनेक पावले या दिशेने उचलण्यात आली आहेत.
  • सर्व सैनिक शाळांच्या रॅंकिंगचे तंत्र तयार करण्यासाठी संरक्षण विभाग आणि सैनिक स्कूल सोसायटीला सूचना करण्यात आली आहे. सैनिक हे एकात्मतेचे, शिस्तीचे आणि भक्तीचे प्रतीक असले तरी शाळा हे शिक्षणाचे केंद्र आहे.
  • संरक्षण आणि शिक्षण सैनिक शाळा आगामी काळात राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

Sainik College Admission

It has been decided to postpone the National Indian Military College entrance qualifying examination conducted by the State Examination Council. The exam was scheduled for June 5. Students can now apply for this exam till June 10.

नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश पात्रता परीक्षा स्थगित

 मिलीटरी कॉलेजची प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी नॅशनल इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश पात्रता परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा पाच जूनला होणार होती. इयत्ता सातवीत शिकत असलेल्या किंवा सातवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घेता येतो. त्यासाठी यंदा पात्रता प्रवेश परीक्षा पाच जून रोजी होणार होती. परीक्षेसाठी २१ मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार होते. आता मात्र हा कालावधी वाढवून १० जूनपर्यंत करण्यात आला आहे.


Sainik College Admission :सैनिकी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा लांबणीवर

Sainik School Admission: The entrance test for the National Military College on June 5 has been postponed due to the increasing prevalence of corona. The application process has also been extended. Applications can be filled till May 21 as per the revised schedule given by the State Examination Council.

सैनिकी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा लांबणीवर. सैनिकी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे 21 मेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

लॉकडाउनचा विचार करत परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत बदल करण्यात आलेला आहे. डेहराडून येथील या महाविद्यालयासाठी प्रवेशप्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे.

डेहराडून येथील लष्करी महाविद्यालयासाठी प्रवेशासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे. त्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परीक्षा पाच जूनला होणार होती. पण ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. आधी १५ एप्रिलपर्यंत अर्ज स्विकृतीची प्रक्रिया होणार होती, परंतु देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, विद्यार्थी, पालकांना अर्ज भरण्यास येणाऱया अडचणी लक्षात घेत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!