‘आरटीई’च्या रिक्त जागा; ‘प्रतीक्षे’तील मुलांना संधी..! – RTE Admission
RTE Admission Process 2025-2026 Online Registration
‘आरटीई’च्या रिक्त जागा; ‘प्रतीक्षे’तील मुलांना संधी – ६ हजार ३७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत निश्चित
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाची मुदत संपली असून, रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. सोमवारी रात्रीपर्यंत ६६ हजार ३७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
- यंदा राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५२ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर प्रवेशपात्र विद्यार्थ्यासाठी प्रवेशफेरी सुरू करण्यात आली. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत ६६ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
- प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रक काढून प्रवेश प्रक्रियेला आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल.
- जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी केला प्रवेश निश्चित
आरटीई संकेतस्थळावर मंगळवारी सायंकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. - त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात ६ हजार ६६१, नागपूर ३ हजार ५५९, नाशिक ३ हजार २९१, छत्रपती संभाजीनगर २ हजार ५७३, अहिल्यानगर २ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
RTE Admission Online Process 2025-2026 – The Directorate of Primary Education has extended the deadline for the admission process for 25% reserved seats under the Right to Education (RTE) Act. Students eligible for admission will be able to take admission from March 1 to 10. As of Friday evening, 46,926 students had secured admission. Director of Primary Education Sharad Gosavi issued a circular regarding the extension of RTE admissions. This year, 1,09,087 seats are available.
आरटीई प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना १ ते १० मार्च या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४६ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेश मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. यंदा १ लाख ९ हजार ८७ जागा उपलब्ध आहेत.
RTE Admission Process 2025-2026 Online Registration The amendments made from time to time in the Right to Education Act (RTE) and the RTE admission process will be combined and necessary amendments will be made in it. For this, the education department has appointed a seven-member committee headed by the education commissioner and the committee has been given two months to submit its report.
‘आरटीई’ प्रवेशांसाठी सुधारित नियम – शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) आणि आरटीई प्रवेश प्रक्रिया यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा एकत्रित करून त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली असून, समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
- शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शाळेच्या प्रवेशाच्या स्तरावर पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. अधिनियमात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांनुसार राज्य शासनानेही वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. मात्र, आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबवताना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत कालानुरूप सुधारणा करणे, प्रवेश प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवण्यासाठी सर्व नियमांचा एकत्रित समावेश करून नवीन अधिसूचना प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे नमूद करून समिती नियुक्त करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल असे जाहीर केले आहे.
- कार्यकक्षा निश्चित – समितीने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९च्या अनुषंगाने राज्य सरकारकडून अधिसूचित केलेल्या २०११च्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारस करणे, २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने अधिसूचित नियम, वेळोवेळी करण्यात आलेल्या सूचना एकत्रित करून आवश्यक बदल करण्यासाठी शिफारस, शुल्क प्रतिपूर्तीबाबत उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांबाबत उपाययोजना अशी कार्यकक्षा निश्चित केली आहे.
RTE Admission Process 2025-2026 Online Registration Date Extended – Under the Right to Education (RTE) Act, the deadline for applications for the admission process for 25 per cent reserved seats in private schools in the state has been extended. Parents will now be able to file their applications till February 2 and there will be no further extension. As of Monday evening, more than 252,000 applications had been filed.
Director of Primary Education Sharad Gosavi said in a press release. The RTE admission process is being implemented by the Directorate of Primary Education. Under this, students from economically weaker sections and deprived sections can get admission in private schools free of cost. Schools are reimbursed by the state government for the fees of students enrolled under RTE.
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असून, या पुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवार सायंकाळपर्यंत २ लाख ५२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते.
How to registered in RTE Portal
- “आरटीई” अंतर्गत अर्ज करताना पालकांनी पाल्यांचा परिपूर्ण अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावा.
- अर्ज करताना अचूक व खरी माहिती द्यावी.
- आरटीईअंतर्गत 25 टक्के अंतर्गत एखाद्या शाळेत प्रवेश घेतल्यास त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- आर्थिक वर्षात पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटांमध्ये समावेश होतो.
- 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी दहा शाळांची निवड करावी, ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाने सोडत काढण्यात येईल.
- पालकांनी पाल्यांचा मुदतीत अर्ज भरणे बंधनकारक आहे.
RTE Online Admission Link 2025-2026
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
APPLY HERE:
बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com वर इमेल पाठवावा.
RTE Admission Process 2025-2026 Online Registration – The 25 % free admission process under RTE in private schools to bring children from economically backward and deprived sections into the education stream has started from January 14. Admission is open until Jan. 27. With the process that started early this year and limited time to fill the form, parents are rushing to fill the online form and match the documents.
आरटीईअंतर्गत २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन प्रवेश -पालकांची ‘आरटीई’साठी धावपळ
आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के विनामूल्य प्रवेशप्रक्रिया १४ जानेवारीपासून सुरू झाली आहे. २७ जानेवारीपर्यंत प्रवेश नोंदविता येणार आहे. यंदा लवकर सुरू झालेली प्रक्रिया व अर्ज भरण्याकरिता मर्यादित कालावधी असल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता पालकांची धावपळ उडाली आहे. खाजगी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत ५,०७२ विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीमध्ये विनामूल्य प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. शाळा नोंदणीची प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पूर्ण झाली असून यामध्ये २०२५- २६ करिता जिल्ह्यातील २७२ शाळांनी नोंदणी केली आहे. ५,०७२ विद्यार्थ्यांना पहिलीत विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये देखील २५ टक्के जागा राखीव ठेवल्या गेल्या आहेत. पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी केले आहे.
Required Documents – आवश्यक कागदपत्रे
मोफत प्रवेशाकरिता बालकांचा निवासी पुरावा तसेच शाळेपर्यंतच्या अंतराचा उल्लेख, बालकाचा जन्माचा दाखला, वडिलांच्या उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, बालक व पालकांचे आधारकार्ड यासह इतरही कागदपत्रांची आवश्यकता आहे. पालकांच्या माहितीसाठी सदर माहिती असणारे परिपत्रक जिल्हा परिषद पालघर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.
RTE Admission Process 2025-2026 Online Registration – The student registration process for 25 per cent reserved seats in private schools under the Right to Education (RTE) Act will begin from Tuesday (January 14). More than 1.08 lakh seats across the state are available for admission and parents will be able to fill online applications from January 14 to 27.
आरटीई प्रवेशांसाठी अर्जप्रक्रिया आजपासून – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून (१४ जानेवारी) सुरू करण्यात येत आहे. राज्यभरातील १ लाख ८ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून, पालकांना १४ ते २७ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
- प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीचे शिक्षण मोफत दिले जाते. या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून शाळांना करण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळा नोंदणीसाठी ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले होते.
- राज्यभरात १ लाख ८ हजारांपेक्षा अधिक जागा – आरटीई पोर्टलवरील आकडेवारीनुसार राज्यभरातील ८ हजार ८४९ शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात. यंदाही पुणे जिल्ह्यातील ९५१ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यात १८ हजार ४५१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
RTE Admission Process 2025-2026 Online Registration – The process of school registration for the RTE admission process has been completed and students will be given the opportunity to register from January 13. More than one lakh seats have been made available for admission as 9,000 schools have registered so far. This year, the school registration process for the admission process started on December 18 and the deadline for registration was December 31. But the school registration was extended till January 4 due to non-availability of expected registration.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या १३ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी दिली जाणार आहे. ९ हजार शाळांनी आतापर्यंत नोंदणी केल्याने एक लाखांहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आणि नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती.
RTE Admission Process 2025-2026 Online Registration – School registration for the 2025-26 academic year began on December 18. The last date for registration was December 31. However, the director of education had extended the deadline till January 4 as most of the schools in the state were not registered. On the last day, various schools in the district have completed their registration on the RTE portal. Student registration will begin soon.
शाळांची आरटीईसाठी नोंदणी, लवकरच विद्यार्थी नोंदणी: सर्वाधिक नांदेड शहरातील शाळांचा समावेश
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीला सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबर नोंदणीची शेवटची तारीख होती. परंतु, राज्यातील बहुतांश शाळांची नोंदणी झाली नसल्याने शिक्षण संचालक यांनी ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील २३९ शाळांची आरटीईच्या पोर्टलवर नोंदणी पूर्ण झाली आहे. आता लवकरच विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होणार आहे.
मागील शैक्षणिक वर्षात आरटीईच्या प्रवेशासाठी तीन महिने विलंब झाला होता. पुढील शैक्षणिक वर्षात विलंब होऊ नये, यासाठी पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संबंधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासंदर्भातील पत्र शिक्षण संचालक यांनी वरिष्ठ तांत्रिक संचालकांना जारी केले आहे. गतवर्षी आरटीई प्रवेशात गोंधळ झाला होता. त्यामुळे यावर्षी गोंधळ होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात जानेवारीत विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल, तर मार्च महिन्यात प्रवेशासाठीची लॉटरीही जाहीर केली जाणार आहे. २३९ नोंदणी झालेल्या शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.
Schools were given time till December 31 for school registration under RTE. However, as of Dec. 31, only 87 schools in the district have registered. Since many schools have not yet registered, the deadline for registration is likely to be extended. Read the more details given below.
आरटीई : विद्यार्थी नोंदणी जानेवारीत – आतापर्यंत ८७ शाळांनी केली नोंद: ९२२ जागा झाल्या राखीव
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेतील शाळांची नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी जिल्ह्यातील आतापर्यंत ८७ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमधील सध्या १२२ जागा राखीव झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. गतवर्षी १९७ शाळांनी नोंदणी केल्यामुळे २,०१४ जागा राखीव झाल्या होत्या.
- आर्थिक दुर्बल, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. गेल्या वर्षी शालेय शिक्षण विभागाने या प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलामुळे हे प्रकरण न्यायालयात गेल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली होती. पूर्वीच्या नियमांनुसार प्रक्रिया राबविण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.
- त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या. जिल्ह्यातील १९७ खासगी शाळांमधील २,०१४ जागांपैकी १,९१८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. परंतु, त्यापैकी केवळ १,४१५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला. या प्रक्रियेतील ५९७ जागा रिक्त राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरटीईची प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी पालकांनी केली होती. त्यानुसार शाळांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- शाळांना नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार
- ■ आरटीईअंतर्गत शाळा नोंदणीसाठी शाळांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
- ■ परंतु, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ८७ शाळांनी नोंदणी केली आहे. अद्याप अनेक शाळांनी नोंदणी केली नसल्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
Under the Right to Education (RTE) Act, the registration process of schools for admission is underway and the deadline for this has been given till December 31. As many as 2,272 schools and 31,950 vacancies have been registered across the state. The Aam Aadmi Party (AAP) parents’ union had submitted a memorandum to the director of education (primary) demanding early commencement of the RTE admission process.
आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी २ हजार २७२ शाळांची नोंदणी
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशप्रक्रियेसाठी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून, याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यभरातून २ हजार २७२ शाळांची आणि ३१ हजार ९५० रिक्त जागांची नोंदणी झालेली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टी (आप) पालक युनियनच्या वतीने शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना निवेदन देण्यात आले होते.
- २०२४-२५ मध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया प्रथम चुकीच्या निर्णयामुळे, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया आणि पुनःप्रक्रियेमुळे लांबली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. आगामी काळात सीबीएससी माध्यमांच्या शाळेच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणेच एसएससी बोर्डाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
- आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणाऱ्या बऱ्याचशा इंग्रजी शाळा या सीबीएससी माध्यमाच्या असल्याने आरटीई प्रवेश होईपर्यंत खुल्या वर्गातील मुलांचे शिक्षण पुढे गेलेले असते. त्यामुळे आरटीई प्रवेश घेतलेल्या मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. जानेवारीमध्ये बऱ्याच शाळांचे खुले प्रवेश पूर्ण झालेले असतात. यंदा प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू झाल्यास आरटीईमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना लॉटरी पद्धतीने प्रवेश न मिळाल्यास खुल्या गटातून प्रवेशाची संधी असेल, असे आपने नमूद केले आहे.
- शिक्षण हक्काचा उद्देश, तसेच त्यामधील जन्मदाखला, स्पेलिंगमधील किरकोळ चुका, पत्त्यामधील तांत्रिक चुका याबाबत पडताळणी समिती व शिक्षण अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी मागणीही या निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे..
RTE Admission Process 2025-2026 Online Registration – The admission process for RTE will be held on Wednesday (i.e December 18). The school registration will begin on December 18. Student registration will begin in January. A circular has been issued that the lottery for admission will be announced in the month of March. For the first time this year, the entire admission process will be completed in the months of June and July. Director of Education Sharad Gosavi has written a letter in this regard. For the first time in the academic year 2024-25, the RTE admission process was delayed due to court cases. Parents allege that students suffer academic losses.
आरटीईसाठी शाळांची नोंदणीला बुधवारपासून प्रारंभ – आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार दि. १८ डिसेंबरला शाळांच्या नोंदणीने सुरुवात होणार आहे. त्यानंतर जानेवारीपासून विद्यार्थी नोंदणी केली जाणार आहे. मार्च महिन्यात प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच जून, जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. याबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्र काढ आहे. सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रथमच न्यायालयीन प्रकरणांमुळे चांगलीच लांबली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची आरोड पालकांनी केली.
RTE 25% Admission Portal
Academic Year : 2025-2026 – सन 2025-2026 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरु होत आहॆ. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
RTE Admission Process 2024-2025 Online Registration – Under the Right of Children to Free and Compulsory Education (RTE) Act, some parents used fake documents to get their children admitted to reputed schools. He also gained admission in schools. However, the scam came to light during the education department’s verification. Sitabuldi police have registered cases against 17 parents in this connection. A committee was formed by the education department to verify the documents. The committee also included employees of private schools and officials from the education department. The committee found that some parents had used forged documents. Further investigation revealed that a large gang was operating in it.
RTE Admission 2024-2025 Lottery Results
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
‘आरटीई’ प्रवेशाचा मोठा घोटाळा उघड – बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या १७ पालकांवर गुन्हे
- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आपल्या पाल्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी काही पालकांनी बनावट कागदपत्रांचा वापर केला. त्याद्वारे शाळांमध्ये प्रवेशही मिळवला. परंतु, शिक्षण विभागाच्या पडताळणीत हा घोटाळा उघड झाला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी १७ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
- आर्थिक स्थितीने कमकुवत असलेल्यांच्या मुलांना खासगी शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा आणला. त्यानुसार, शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र तसेच पालकांच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. आरोपींनी यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली व दलालांमार्फत प्रवेश मिळवला. पडताळणीत ही बाब उघड झाल्याने शिक्षण विभागाचे अधिकारी रमेश गंगाधर हरडे (मानेवाडा रिंग रोड) यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी १७ पालकांवर गुन्हे दाखल केले.
- सध्या आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवणाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. यात दलालांची मोठी टोळी सक्रिय असून अनेक बनावट विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असण्याची शक्यता आहे. तपासाअंती आरोपींची संख्या वाढू शकते.- आसाराम चोरमोले, ठाणेदार, सीताबर्डी.
- मोठी टोळी सक्रिय – कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता शिक्षण विभागाकडून समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये खासगी शाळेतील कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी यांचाही समावेश होता. काही पालकांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे या समितीच्या निदर्शनास आले. अधिक तपास केला असता यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले.
New and Latest updates regarding the RTE Admission 2023-2024 is here. The government has decided to give admission to children who have lost their parents due to Corona to reserved seats under the admission process under the Right to Education Act (RTE). The online application process for admission to 25% reserved seats in private schools under the Right to Education Act (RTE) has started from 3 pm on Wednesday (1st March 2023) Tthe admission process will be implemented till March 17 and the education department has given strict instructions that no application will be considered after the deadline.
करोनाने पालक गमावलेल्या पाल्यांना “आरटीई’ प्रवेश
करोनाने पालक गमावलेल्या बालकांना बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी (दि.1) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झाली आहे. दि. 17 मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून मुदतीनंतर कुठल्याही अर्जाची दखल घेणार नसल्याच्या सक्त सूचना शिक्षण विभागाने दिल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
RTE Admission Process 2023-2024
- दुर्बल वंचित घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
- या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
- पालकांना https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.
- शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया भरण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
- त्यानुसार करोना काळात म्हणजे एक एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत दोन्ही पालक अथवा आई किंवा वडील गमावलेल्या बालकांना यंदा या प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.
- अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर मदत केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
- दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी जन्म तारखेचा पुरावा- जन्मदाखला, पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन, निवासी पुरावा- रेशन कार्ड, वाहन परवाना, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचा अथवा बालकांचा जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागणार आहेत.
How to registered in RTE Portal
- “आरटीई” अंतर्गत अर्ज करताना पालकांनी पाल्यांचा परिपूर्ण अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावा.
- अर्ज करताना अचूक व खरी माहिती द्यावी.
- आरटीईअंतर्गत 25 टक्के अंतर्गत एखाद्या शाळेत प्रवेश घेतल्यास त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- आर्थिक वर्षात पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटांमध्ये समावेश होतो.
- 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी दहा शाळांची निवड करावी, ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाने 17 मार्चपर्यंत मुदत दिली असून त्यानंतर सोडत काढण्यात येईल.
- पालकांनी पाल्यांचा मुदतीत अर्ज भरणे बंधनकारक आहे.
RTE Online Admission Link 2023-2024
Corona Issue – RTE Admission Process 2023-2024 Online Registration