अपडेट- तलाठी भरती 2020 – 2021
Talathi Bharti 2020
तलाठी भरती २०२० – २०२१ – ३ ऑगस्ट २०२० अपडेट: There are 30 percent vacancies in the state. For this, the revenue department recruited in 2019. The result was announced after taking the exam. However, eligible candidates have not yet been accommodated in the job. Therefore, the government has rubbed salt on the wounds of the working lakes. If these posts are not filled immediately, the Talathi Sangh will stage a statewide agitation, warned Dnyandev Dubal, president of the state Talathi Sangh
तलाठी भरती 2020 – 2021 संभाव्य प्रश्न संच.
तलाठी भरती २०२० – २०२१ – ३ ऑगस्ट २०२० अपडेट – राज्यात तलाठ्यांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी महसुल खात्याने 2019 मध्ये भरती केली. त्यातुन परिक्षा घेऊन निकाल जाहीर झाला. मात्र, पात्र उमेदवारांना अद्यापही नोकरीत सामावुन घेतलेले नाही. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले आहे. ही पदे तातडीने भरली नाहीत तर तलाठी संघ राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिला आहे.
श्री. डुबल म्हणाले,” राज्यात तलाठ्यांच्या 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलाठ्यांवर संबंधित तलाठ्यांच्या कामाचा बोजा येत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यांना शारिरीक व्याधी सुरु झाल्या आहेत. काहींचा त्यातच मृत्युही झाला आहे. त्याची माहिती वारंवार आम्ही शासनाला दिली आहे.
शासनाने मागील वर्षी 2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबवली. त्यात राज्यातील 1618 जागांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले होते. त्याच्या निकालाची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यानंतर काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी भरती प्रक्रीया पुर्ण करुन उमेदवारांना नियुक्ती दिली, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन ही कार्यवाही अंतिम टप्प्यात होती.
त्याच दरम्यान वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची भरती करु नये, असे निर्देश दिले.” भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या औरंगाबाद आणि नांदेड कार्यालयांनी तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे किंवा कसे याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते.
त्यावर शासनाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवुन अंतिम निवड यादी प्रसिध्द केली. निवड यादीनुसार उमेदवारांना नियुक्ती देणे किंवा पद भरती करणे योग्य नाही. चार मे 2020 च्या शासन निर्णयानुसार पद भरती करु नये. पद भरतीवरील निर्बंध उठल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा.
तसेच निवड यादी पुढील एक वर्षापर्यंत वापरण्याबाबत विभागाने सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घ्यावी, असे शासनाने यामध्ये कळविले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटास शासनाचा तळागाळातील प्रतिनिधी तथा शासनाच्या गाडीचा कणा म्हणून स्वतःच्या जिवाची व कुटुंबाची परवा न करता काम करणाऱ्या तलाठी व मंडलाधिकारी यांना महसूल दिनी शासनाने ही भेटच दिली आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त
Talathi Recruitment 2020
गाव देतोय तलाठ्याला हाक ; तलाठी घालतोय शासनाला साद…
सांगली – शासनाने तलाठी पदांची भरती केली नसल्याने राज्यात सुमारे पाच हजार पदे रिक्त आहेत. सात-बारा उतारा, नोंदीसह विविध कामांचा ताण सध्या तलाठ्यांवर वाढला आहे. परिणामी, शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास, योजनांशी निगडित कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे. तलाठ्यांची भरती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवीन सजांसाठी तलाठी पदांची भरती रखडली
राज्यात तलाठ्यांची १२ हजार ६३६ पदे आहेत. त्यापैकी १० हजार ३४० कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्न सोडविण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे. दोन ते चार गावांचा एक सजा असतो. एका सजाला एक तलाठी याप्रमाणे दोन ते चार गावांचा कारभार एक तलाठी सांभाळतो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या कामाची माहिती पुरवण्याचे कामही तलाठी करीत आहेत. शासनाच्या नवीन योजना गाव पातळीवर राबवण्याचे काम त्यांनाच करावे लागते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे कामदेखील तलाठ्यांकडे येणार आहे. महसूल मंडळावर कामाचा ताण वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी सातबारा, आठ अ उताऱ्यांची कामे रखडलीत. सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात.
Talathi Bharti Document Verification
Talathi Bharti Process Resume
तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त
शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात ३ हजार १६५ सजांची निर्मिती झाली आहे.
सन २०१६ ते २०१९ दरम्यानच्या चार वर्षांत ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पद भरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहे. परिमाणी, सात बारा उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे.
तीन वर्षांपासून पदभरती ठप्प
राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने तीन हजार १६५ नवीन तलाठे सज्जे निर्माण केले आहेत. नव्या पदांच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होईल. त्यात तीन हजार १६५ पदांना मंजुरी देण्यात आली. दरवर्षी २० टक्क्यांप्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, तीन वर्षांपासून पदभरती झालेली नाही.
राज्यातील तलाठी
तलाठी संख्या – १२ हजार ६३६
कार्यरत तलाठी – १० हजार ३४०
रिक्त पदे – २ हजार २९६
दृष्टिक्षेपात आकडे
नव्याने तयार झालेले सजे – ३ हजार १६५
नवीन सजेसाठी तलाठी पदे – ३ हजार १६५
नवीन मंडलाधिकारी पदे – ५२८
मंडलाधिकारी पदे
एकूण पदे – २१०६
रिक्त पदे – १९०
आम्ही वारंवार तलाठी पदाची भरती करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, शासनाने भरती केलेली नाही. नवीन तयार केलेल्या सजांमधील तलाठी पदे दरवर्षी २० टक्क्यांप्रमाणे भरणार, असे आश्वासन दिले होते. मात्र, पदभरतीचा कार्यक्रम रद्द झाला. आता महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही पुन्हा पदभरतीची मागणी करणार आहोत.
Talathi Papers Download
जुने पेपर्स – Old Question Papers
सौर्स : सकाळ
Age Limit For Talathi Bharti 2020
Talathi Bharti 2019 New Rules Age Limit Details are given below. Also the Age relaxation updates & Details are given here. Read Following updates & Details are given here.
Age Limit For Talathi Bharti 2020 |
|
For Open Category | 18 to 38 Years |
For Reserved Category | 18 to 43 Years |
For Projected / Earthquake Affected Candidates | 18 to 45 Years |
Application Fees Details of Talathi Bharti 2020
Talathi Bharti 2020 Examination Fees Details are given below.
Talathi Bharti 2020 Written Exam pattern
Talathi Bharti 2019 Examination patter is given below As per the Rules New Talathi Bharti written Examination is conducted For 200 Marks. There will be total 100 Question in Examinations. More Details about Talathi bharti Examination are given below. Also Important Questions of Talathi bharti 2020 are given on this Link.
Talathi Exam 2020 Examination Paper Pattern | ||
Subjects | Questions | Marks |
Marathi | 25 | 50 Marks |
English | 25 | 50 Marks |
General Knowledge | 25 | 50 Marks |
Mathematics | 25 | 50 Marks |
TOTAL | 100 Questions | 200 Marks |
Important Links For Talathi Bharti 2020
-
Talathi Bharti Online Apply Link
-
Talathi Bharti important Questions Papers(संभाव्य प्रश्नसंच)
-
Talathi Bharti Important Books
-
Talathi Bharti Model Question Papers With Solutions
-
Talathi bharti Previous Year Papers Download PDF With Answer Key
Gramsevak and panchayat sachiv vacancies are relised in Maharashtra Or not yet if the vacancies are relised then what is the application link