Pune University Professor Recruitment 2020
Pune University Professor Recruitment 2020
सहाय्यक प्राध्यापकांची भरती म्हणजे ‘बिनवासाची अगरबत्ती’!
Pune University Recruitment 2020 : As per the revised point sheet, the procedure for filling backward category reservation posts was not fixed while filling up of direct service posts with the SEBC and EWS classes in small cadre of posts 1 to 30. On August 21, 2019, the General Administration Department issued guidelines for the recruitment of small class posts. He was suspended by the government the next day. Since then this stagnation has been permanent. Because of this, this recruitment has stalled.
Pune University Recruitment 2020
उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली; वाढत्या बेरोजगारीने मात्र संताप
पुणे – “छोट्या संवर्गातील सुधारित बिंदूनामावलीच्या तपासणीस (रोस्टर) असलेली स्थगिती उठवून विद्यापीठ व महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदांची रिक्त पदे भरण्यास सुरुवात करू,’ अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. प्रत्यक्षात यावर कोणतीच कार्यवाही झाली नसून, भरतीची घोषणा हवेतच विरली आहे.
राज्यात नेट, सेट, पीएच.डी.धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना, सहायक प्राध्यापकांची पदे रिक्तच आहेत. ही पदे भरण्याबाबत राज्यकर्त्यांनी कधीच ठोस निर्णय घेतला नाही. घेतलेल्या निर्णयाची सक्षमपणे अंमलबजावणीही झालेली नाही. भरतीबाबत अनेकदा काढलेले आदेश अनेक कारणांमुळे कचाट्यात अडकले. त्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे.
सुधारित बिंदूनामावलीनुसार 1 ते 30 पदे असलेल्या छोट्या संवर्गामधील एसईबीसी व ईडब्लूएस वर्गासह सरळसेवेची पदे भरताना मागास प्रवर्गातील आरक्षणाची पदे भरण्यासाठी कार्यपद्धती निश्चित नव्हती. यावर 21 ऑगस्ट 2019 रोजी सामान्य प्रशासन विभागाने छोट्या संवर्गातील पद भरतीबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. त्याला दुसऱ्याच दिवशी शासनाने स्थगिती दिली. तेव्हापासून ही स्थगिती कायमच आहे. यामुळे ही भरती रखडली आहे.
महाविकास आघाडीतील उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत गेल्या महिन्यात पुणे दौऱ्यावर आले असताना, त्यांनी “रोस्टर तपासणीवरील स्थगिती तत्काळ उठवून भरती प्रक्रियेतील जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात होईल,’ अशी घोषणा केली होती.
यानंतर कार्यक्रम, बैठकांनिमित्त अनेक संघटना, पात्र उमेदवार शिक्षणमंत्र्यांना पाठपुराव्यासाठी भेटतच आहेत. त्यांनाही केवळ आश्वासनेच मिळत आहेत. पण, या भरती प्रक्रियेतील अजब कारभारावर संताप व्यक्त होत आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी मंत्र्यांनी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुलाखतींचा फक्त फार्स
बहुतांश शिक्षणसंस्था या राजकीय नेते, उद्योजकांच्याच आहेत. या संस्थांमध्ये प्राचार्य व सहायक प्राध्यापक भरतीसाठी थेट लाखो रुपयांची बोलीच लावण्यात येते. मुलाखती घेण्याचा केवळ फार्स असून, गुणवंतांना डावलून “सोयी’चा उमेदवार घ्यायचा अजब पायंडाच संस्थांनी पाडला आहे. निवड समितीतील विद्यापीठ, उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय, विषय तज्ज्ञ या सर्वच सदस्यांना अधिकार वापरण्याचे स्वातंत्र्य उरलेले नाही.
संस्था सांगेल त्याप्रमाणे उमेदवाराची निवड करावी लागते व त्या रिपोर्टवर गप्प बसून निमूटपणे सह्या कराव्या लागतात. संस्थेविरोधात जाण्याचा पवित्रा घेणाऱ्या सदस्यांना इतर ठिकाणी मुलाखतीला बोलावले जात नाही, अशी भीतीही असते. विविध कारणांनी काही सदस्य निवड समितीत जाण्यासही स्पष्ट नकार देतात. नुकत्याच एका बड्या संस्थेने सहायक प्राध्यापकांसाठी घेतलेल्या मुलाखतीत आपल्या ठराविक मतदार संघातीलच उमेदवारांची निवड करण्याची आधीच “फिक्सिंग’ केली होती. यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी मुलाखतीकडेच पाठ फिरवली. यासारखे भरतीचे आश्चर्यकारक प्रकार अनेकदा घडत आहेत.
Professor Recruitment 2020
Nagpur College Recruitment 2019
रिक्त जागांनी वाढली शिक्षकांमध्ये धाकधूक
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावीसाठी दोन वर्षांपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यात शहरातील 58 हजार 840 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी 37 हजार 580 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. 21 हजार 282 जागा रिक्त राहिल्या. यात बहुतांशी कला व एमसीव्हीसीच्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे या शाखेतील शिक्षकांमध्ये अतिरिक्त होण्याची धाकधूक वाढली आहे.
इंग्रजी शाळांचे वाढते वलय लक्षात घेता मराठी माध्यमांच्या शाळांना घरघर लागली असून, प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. यामुळे दरवर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत असून, समायोजनाची डोकेदुखी वाढली आहे. यात आता कनिष्ठ महाविद्यालयांचाही समावेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा संभाव्य धोका ओळखून अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू केली. मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा सीबीएसई शिक्षणाकडे वळला आहे. त्याचा फटका कनिष्ठ महाविद्यालयांना बसत आहे. यंदाच्या अकरावी प्रवेशातील रिक्त जागांची संख्या पाहता पुढील वर्षीपासून कनिष्ठ महाविद्यालयांना समायोजनाचा प्रश्न सुरू होण्याची दाट शक्यता आहे. यंदा केंद्रीय प्रवेश समितीमार्फत शहरातील 194 कनिष्ठ महाविद्यालयांतील 58 हजार 840 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी 37 हजार 580 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. 21 हजार 282 जागा रिक्त राहिल्या. यात द्विलक्षी अभ्यासक्रमातही यंदा जवळपास 6 हजारांवर जागा रिक्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा संभाव्य धोका वर्तविला जात आहे.
Nagpur 11th Admission Details :
एकूण जागा -58,840
केंद्रीय समितीमार्फत प्रवेश – 30,009
आरक्षित जागांचे प्रवेश – 7,529
एकूण प्रवेश – 37,558
रिक्त जागा – 21,282
प्रवेशाची टक्केवारी – 51.04
सौर्स : सकाळ