8000 Teachers Recruitment in Maharashtra State

8000 Teachers Recruitment in Maharashtra State

राज्यातील आठ हजार शिक्षकांना दिलासा

Teachers Recruitment 2020-2021 : The High Court has stayed the order of the Education Department to reduce the work of aided teachers in private and public schools across the state, which did not pass the Teacher Eligibility Test (TET) till March 30, 2019, due to the primary education. Immediate relief. Read the complete details carefully which is given below:

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शिक्षक भरती एप्रिलनंतर – update on 27th March 2020

टीईटी अनुत्तीर्णांच्या वेतनाबाबतच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती

High Court adjourns decision on salaries of TET failures

रावणगाव – प्राथमिकच्या 13 फेब्रुवारी 2013 नंतर रुजू झालेल्या, मात्र 30 मार्च 2019 पर्यंत शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) उत्तीर्ण न झालेल्या राज्यभरातील खासगी-सरकारी शाळांतील साहाय्यक शिक्षकांना कामावरून कमी करण्याच्या तसेच त्यांचे वेतन थांबवण्याच्या शिक्षण विभागाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, त्यामुळे राज्यभरातील आठ हजार शिक्षकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचलनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी एका परिपत्रकाद्वारे शिक्षक पात्रता परीक्षा (टीइटी) अनुत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा आदेश 24 डिसेंबर 2019 ला काढला होता. या आदेशानुसार सर्व खासगी आणि सरकारी शाळांनी 30 मार्च 2019 पर्यंत टीईटी उत्तीर्ण न होणाऱ्या सहाय्यक शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तसे न केल्यास त्यांचे वेतन सरकारकडून दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानंतर 31 डिसेंबर 2019 रोजी नवा अध्यादेश काढून त्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा फटका राज्यातील 8 हजार शिक्षकांना बसणार होता, त्यामुळे या आदेशाला संपूर्ण महाराष्ट्रातील टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांनी तीव्र विरोध करून या आदेशाविरोधात एक याचिका दाखल केली होती, तसेच विविध शिक्षक संघटनांनी देखील या आदेशाला विरोध दर्शवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण सचिव, शिक्षणमंत्री यांना निवेदने दिली होती.

याचिकेनुसार, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 31 मार्च 2010 ला केंद्र सरकारने एक अध्यादेश काढला. त्यानुसार प्राथमिकच्या साहाय्यक शिक्षकांना किमान पात्रता बारावी, डीएड आणि टीईटी बंधनकारक करण्यात आली. याच धर्तीवर राज्य सरकारनेही 13 फेब्रुवारी 2013 रोजी अध्यादेश काढून हाच नियम कार्यरत असलेल्या प्राथमिकच्या साहाय्यक शिक्षकांना लागू केला.

नव्या अध्यादेशानुसार पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी स्वतंत्र “टीईटी’ बंधनकारक करण्यात आले. यावेळी बऱ्याच शिक्षकांनी “टीईटी’ दिली. त्यात काही उत्तीर्ण झाले, तर काही अनुत्तीर्ण झाले. 26 ऑगस्ट 2018 मध्ये शिक्षण विभागाने आणखी एक अध्यादेश काढला. त्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांनी 30 मार्च 2019 पर्यंत “टीईटी’ उत्तीर्ण करण्याची अट घालण्यात आली होती.

खंडपीठाने केली मागणी मान्य
या आदेशामुळे बाधित झालेल्या राज्यभरातील विविध खासगी आणि सरकारी 35 शाळांतील शंभरच्या आसपास शिक्षकांनी ऍड. सुरेश पाकळेंमार्फत शिक्षण विभागाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या आदेशाचा फटका आठ हजार शिक्षकांना बसणार असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे, त्यामुळे कामावरून कमी करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याचे, तसेच वेतन सुरू करण्याचे आदेश देण्याची विनंती शिक्षकांनी केली होती. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने ही मागणी मान्य करत त्यांना दिलासा दिला.

सौर्स : प्रभात वृत्तसेवा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!