UPSC चा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; पुणे विद्यापीठ करणार मदत
Pune University Started ICAC Course For Students Want To Join Civil Services
UPSC चा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; पुणे विद्यापीठ करणार मदत
पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पध्द्तीने शिकवला जाणार असून, २०२०-२१ साठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर त्यांना प्रवेश दिला जाईल. यामध्ये ८० टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन आणि २० टक्के ऑफलाईनच्या माध्यमातून शिकवला जाणार आहे, अशी माहिती प्रा. सी. आर. दास यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेत करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम (ICAC) अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याची २०२०-२१ या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.;हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत चालवला जातो.
MPSC, UPSC प्रशिक्षणही होणार आता ऑनलाइन
पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पध्द्तीने शिकवला जाणार असून, २०२०-२१ साठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर त्यांना प्रवेश दिला जाईल. यामध्ये ८० टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन आणि २० टक्के ऑफलाईनच्या माध्यमातून शिकवला जाणार आहे, अशी माहिती प्रा. सी. आर. दास यांनी दिली.
या अभ्यासक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन पातळ्यांवर तयारी करून घेण्यात येईल. लेखन सराव, व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी भाषेवर प्राविण्य मिळवण्याकरिता कार्यक्रम, वादविवाद कार्यक्रम, चर्चासत्र, वेबिनार या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी केली जाणार आहे.
सोर्स: सकाळ
UPSC CMS परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू
I need upsc study
That’s very good.