पोलीस ड्रायव्हर कॉन्स्टेबल तात्पुरता मैदानी परीक्षा निकाल जाहीर – Pune Police Bharti Results
Pune Police Bharti Results
Pune city police Driver constable posts physical Test temporarily result declared now. See the below given pdf file.
The list of qualified candidates for Pune Driver Police Constable written exam has been released today. Driving skill test has been conducted for the post of Police Constable Driver in Pune City Police Force. A list of candidates who have qualified for the written test by securing 40 percent marks has been prepared. Deputy Commissioner of Police Rohidas Pawar has informed that the list has been published on the website Pune Police.gov.in of Pune City Police Force. This recruitment process has been going on for the past few months. This process was suspended during the election period. The release of the list has given relief to the candidates.
पुणे ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
पुणे शहर पोलिस दलातील पोलिस शिपाई चालक पदाची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे. त्यात ४० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. यादी पुणे शहर पोलिस दलाच्या पुणे पोलिस डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही भरतीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या काळात ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यादी प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
Pune Police Bharti Results: 870 candidates who have secured 50 percent marks in the field test for the post of police constable drivers will undergo the driving skill test from February 28 to March 5. For this, the candidates have been given a schedule on this website.
पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत होणाऱ्या पोलीस शिपाई चालक भरती – 2021 च्या पुढच्या कौशल्य चाचणीला आजपासून (दि.28) सुरुवात होणार आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई चालक पदाच्या मैदानी चाचणीमध्ये 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या 870 उमेदवारांची 28 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत वाहन चालविण्याच्या कौशल्य चचाणी होणार आहे. यासाठी उमेदवारांना या संकेत स्थळावर वेळापत्रक देण्यात आले आहे.
तरी पात्र उमेदवारांनी त्यांच्या ठाराविक वेळेनुसार पहाटे साडे पाच वाजल्यापासून सी.ई.ओ.पी. टेक्नॉलॉजीकल युनीव्हर्सिटी शिवाजीनगर येथील मैदानावर उपस्थित रहावे अशा सुचना पोलीस आयुक्तालया तर्फे दिल्या आहेत.
The Final selection list of 870 candidates who have qualified for driving skill test has been released on the website of Pune City Police Force. The select list is available on the website www.punepolice.gov.in. Also, the selection list has also been posted at the police headquarters.
पोलीस चालक भरतीची महत्वाची बातमी असून पोलिस चालक भरती-२०२१ साठी कौशल्य चाचणीसाठी पुणे शहर पोलिसांनी (pune police) त्यांच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
संबधीत उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या तारखेस पहाटे ५.३० वाजता सीओईपी शिवाजीनगर या ठिकाणी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर कौशल्य चाचणीची अंतिम यादी
The provisional selection list of 870 candidates who have qualified for driving skill test has been released on the website of Pune City Police Force. The select list is available on the website www.punepolice.gov.in. Also, the selection list has also been posted at the police headquarters.
वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या ८७० उमेदवारांची तात्पुरती निवडसूची पुणे शहर पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर निवडसूची उपलब्ध आहे. तसेच निवडसूची पोलिस मुख्यालयातदेखील लावण्यात आली आहे.
पोलिस शिपाई, चालकपदाच्या भरतीत मैदानी चाचणीत ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात आली. निवडसूचीबाबत कोणाची तक्रार/आक्षेप असल्यास १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलिस नियंत्रण कक्ष पुणे शहर येथील ई-मेलवर ([email protected]) लेखी अर्ज सादर करावेत, असे पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी कळविले आहे.
दरम्यान कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पोलिस शिपाई व पोलिस शिपाई चालक पद भरतीप्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे.
पोलीस शिपाई चालक भरती २०२१ तात्पुरत्या स्वरूपातील निवड यादी
Pune Police Bharti Results 2022