पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिला फायरमनची निवड – Pune Fire Brigade Bharti 2024
Pune Fire Brigade Recruitment 2024
Pune Fire Brigade Recruitment 2024 – As many as 167 candidates have been selected in the recruitment process for the Pune Municipal Corporation (PMC) fire brigade personnel recruitment process. For the first time, Meghna Mahendra Sapkal has been appointed as a woman fireman in the Pune Fire Service. The Pune Municipal Corporation (PMC) currently has 250 personnel in its fire brigade. Given the city’s growing size, the fire department’s manpower was inadequate. The BMC had decided to implement the recruitment process of 167 personnel. The recruitment process was carried out by the BMC. The fire course is mandatory for the recruitment process.
पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिला फायरमनची निवड…वाचा मेघना महेंद्र सपकाळ हिची कहाणी
पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवान भरती प्रक्रियेत १६७ उमेदवारांची निवड झाली आहे. पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिला फायरमनपदी मेघना महेंद्र सपकाळ यांची निवड झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात सध्या २५० जवान आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता अग्निशमन दलातील मनुष्यबळ अपुरे होते. महापालिकेने १६७ जवानांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेकडून जवान भरती प्रक्रिया राबविण्यात आली. भरती प्रक्रियेसाठी अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण अनिवार्य आहे.
- मेघना सपकाळचे वडील महेंद्र अग्निशमन दलात कार्यरत आहेत. तिचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ अग्निशमन दलात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. अग्निशमन दलातील सेवेची परंपरा सपकाळ कुटुंबीयांत आहे. मेघनाने अग्निशमन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
- महापालिकेकडून भरती प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर मेघनाने अर्ज केला. परीक्षा, तसेच पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या १६७ उमेदवारांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. महापालिकेने निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. मेघना भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झाली. अग्निशमन दलात निवड झाल्याने पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी तिचे कौतुक केले.
- अग्निशमन दलातील सेवेची सपकाळ कुटुंबीयांची परंपरा आहे. माझे आजोबा अग्निशमन दलातून निवृत्त झाले. माझे वडील अग्निशमन दलात कार्यरत आहेत. मी आता माझ्या वडिलांबरोबर काम करणार आहे. माझी आई हयात नाही, ती असती तर तिला खूप आनंद झाला असता.– मेघना महेंद्र सपकाळ
- मुंबईतील अग्निशमन दलात महिला – मुंबईतील अग्निशमन दलात महिलांची निवड करण्यात आली आहे. महिला आता सर्व क्षेत्रात कामगिरी करत आहेत. पोलीस, लष्करी सेवेत महिला असून, अग्निशमन दलात महिलांचे प्रमाण तसे कमी होते. मुंबईप्रमाणे आता पुणे अग्निशमन दलात महिला जवानांची भरती सुरू झाली आहे. मेघना सपकाळ पुणे अग्निशमन दलात निवड झालेली पहिली महिला ठरली आहे.
Pune Fire Brigade Recruitment 2023 – According to news source there are 4 women, who had applied for the post of Fire Men in the Fire Brigade of the Pune Municipal Corporation, approached the High Court. The petition was being heard by the court. Advocate A.S. Sharma, appearing for the petitioner women, said they refused to give them jobs on the ground that they did not fit the height criteria as their height was not 162 centimeters. Rao told the court. “As per the Maharashtra Fire Service Administration, it is mandatory for women candidates to have a minimum height of 152 cm; However, the municipal corporations of Pune, Thane, Mumbai and Nagpur have given 162 cm to women. The height has been fixed. Rao told the court that other civic bodies were following the 152 cm rule.
अग्निशमन दलातील भरती: ‘महिलांच्या उंचीच्या निकषांत समानता नसणे भेदभावपूर्ण’
Pune Fire Brigade Recruitment 2023 – राज्यातील विविध महापालिकांमध्ये अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी उंचीचे वेगवेगळे निकष असणे हे भेदभावपूर्ण धोरण असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. एकाच नोकरीसाठी वेगवेगळे निकष असू शकत नाही आणि अशा मनमानी धोरणांमुळे नाहक महिलांना त्रास दिला जाऊ शकत नाही, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. जितेंद्र जैन यांनी म्हटले.
पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात अग्निशामक या पदासाठी अर्ज केलेल्या चार महिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. संबंधित महिलांची उंची १६२ सेंटीमीटर नसल्याने त्या उंचीच्या निकषात बसत नसल्याचे सांगून त्यांना नोकरी देण्यास नकार दिला, अशी माहिती याचिकाकर्त्या महिलांचे वकील ए.एस. राव यांनी न्यायालयाला दिली. ‘महाराष्ट्र अग्निशमन दल सेवा प्रशासनानुसार महिला उमेदवारांची उंची किमान १५२ से.मी असणे बंधनकारक आहे; परंतु, पुणे , ठाणे, मुंबई आणि नागपूर या महापालिकांनी महिलांसाठी १६२ से.मी. उंची निश्चित केली आहे. अन्य महापालिका १५२ सें.मी.चा नियम पाळत आहेत, असे राव यांनी न्यायालयाला सांगितले.
Pune Fire Brigade Bharti 2023: As per latest information regarding the Fire Brigade Bharti in Pune City is that there are 1700 firemen post are still vacant. Due to insufficient manpower in the fire brigade department, there is a lot of stress on the firemen along with the officers. Pune Fire Brigade currently has only 380 firemen working. But as per the Population of the Pune City there is a need for more than 1700 firemen in working condition. Since last 10 years not a single post is filled in the any fire station in Pune. Read More details Pune Fire Brigade Recruitment 2022 are given below.
Fire Brigade – मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमन भरती पुढील महिन्यात
पुणे अग्निशामक दलात भरती प्रकिया सुरू; 1 हजार 700 जवानांची गरज
राज्यासह पुणे शहरात मागच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आहे. पुणे शहरात पंधरा दिवसात 200 हून अधिक झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर, 5 हून अधिक ठीकाणी भिंत कोसळल्या आहेत. तसेच 4 ते 5 ठीकाणी आगीच्या घटना घडल्या आहे. अशा या घटनांमध्ये रात्री अपरात्री कुठेही काहीही घटना घडली की, दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी संकटमोचक बनून धाव घेणाऱ्या पुणे अग्निशमन दलामध्ये सध्या फक्त 380 कर्मचारी हे काम करत आहे. गेल्या दहा वर्षापासून पुणे शहरातील अग्निशमन दलात भरती प्रक्रिया राबविली गेली नसून फक्त आश्वासनावर आश्वासन दिले जात आहे.
जवानांना ताण घेऊन करावं लागतं काम – शहरात कुठेही काहीही घटना घडली की, अग्निशमन दलातील जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून अडकलेल्यांची नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अग्निशमन दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांसह अग्निशामकांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे दलामधील रिक्त पदे भरावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, गेली दहा वर्ष झाली फक्त आश्वासनांवर आश्वासन दिले जाते आहे. पण प्रत्यक्षात आहे त्याच कर्मचाऱ्यांवर या जवानांना काम करावं लागतं आहे.
Vacancy Details of Pune Fire Brigade / रिक्त पदे भरली जाणार –
- 2014 साली सेवाप्रवेश नियम मान्य करण्यात आला होता. त्यावेळेस 900 हून अधिक जागा वाढवून मिळाल्या होत्या. पण त्यानंतर सेवा प्रवेश नियम मान्य न झाल्याने तो विषय प्रलंबित राहिला होता.
- पण, आता हे नियम 2 महिन्यांपूर्वी मान्य झाल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी भरती बाबत प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील गिलबिले यांनी यावेळी दिली.
खरंचं रिक्त पदे भरली जाणार का? –
जरी 2014 नुसार अग्निशमन दलात जी 900 पदे रिक्त होती, ती जरी भरली गेली तरी शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाहिजे तेवढी पदे भरली जाणार नाहीये. म्हणूनच आता तरी 2014 सालापासून 900 पदे जी रिक्त पदे आहे ती तरी भरली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अशी आहे शहरातील अग्निशमन दलाची परिस्थिती –
- पुणे शहराची आताची लोकसंख्या ही तब्बल 60 लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात अग्निशमन दलात तब्बल 1 हजार 700 हून अधिक जवानांची गरज आहे.
- तर, 70 हून अधिक अग्निशमन केंद्राची गरज आहे. असे असताना शहरातील पुणे अग्निशमन दलाची परिस्थिती पाहिली तर, शहरात फक्त 380 जवान हे कार्यरत आहे.
- तर 14 अग्निशमन केंद्र सध्या कार्यरत आहे. तर 7 नव्याने बांधण्यात आले आहेत. ते पुढील महिन्यात सुरू होणार आहे. एकूणच शहरात केवळ 21 केंद्र, 380 कर्मचारी हे अग्निशमन दलात काम करत आहे.
- एकूणच शहरात अजूनही 49 केंद्रांची गरज आहे. तर शहरात 1 हजार 320 पदे रिक्त असून गेल्या 10 वर्षापासून अग्निशमन केंद्रात एकही पद भरलेले नाही.
Fairman
fair man
Fireman
Shivaji nagar bhusawal