पुजारी आणि ग्रंथींना १८ हजार रुपये मानधन – Priest Selection For Ram Mandir
Priest Bharti
Priest Bharti 2025 Salary updates – Though the date for the Delhi Assembly elections is yet to be announced, AAP supremo Arvind Kejriwal has been constantly trying to placate the BJP. Kejriwal on Monday announced that the Aam Aadmi Party (AAP) will provide Rs 18,000 per month as honorarium fund to priests and granthis if voted to power in Delhi.
पुजारी आणि ग्रंथींना १८ हजार रुपये मानधन
- विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर केजरीवाल यांची घोषणा; भाजपचा मुद्दा हायजॅक – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी भाजपचा हुकमी तीर निकामी केला. केजरीवाल यांनी पुजारी आणि ग्रंथी यांना दरमहा सन्मान राशी देण्याची घोषणा केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल भाजपला निरुत्तर करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत. दिल्लीत सरकार आले तर आम आदमी पक्ष पुजारी आणि ग्रंथी यांना दरमहा १८ हजार रुपये सन्मान निधी देईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी सोमवारी केली आहे. - हिंदुत्व आणि धार्मिक मुद्दे भाजपची संजीवनी आहे. मात्र, केजरीवाल यांनी भाजपच्या कमानीतील एक धार्मिक मुद्दा हिसकावून घेतला. मौलाना यांना पगार दिला जातो. मग, मंदिरातील पुजाऱ्यांना पगार का नाही, असा प्रश्न भाजपने अनेकदा उपस्थित केला आहे. आता केजरीवाल यांनी पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी यांच्यासाठी ‘पुजारी ग्रंथी सन्मान योजना’ जाहीर केली.
- केजरीवाल म्हणाले, “आज मी ज्या योजनेची घोषणा करीत आहे त्याचे नाव पुजारी ग्रंथी सन्मान योजना’ आहे. पुजारी आणि ग्रंथी हे आध्यात्मिक वातावरण तयार करण्याचे आणि सामाजिक सलोखा राखण्याचे काम करतात. यासाठी त्यांना दरमहा १८ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.” दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरातून या योजनेच्या नोंदणीची सुरुवात केली जाईल, असेही केजरीवाल यांनी जाहीर केले.
Priest Bharti 2025 – Varanasi: One of the thousands of people was selected for the post of priest of the Ram temple in Ayodhya. Now, the temple in Kashi-Varanasi Dham, the holy pilgrimage site of Hindus, is also being selected for the post of priest. A total of 50 priests will be selected for the Kashi Vishwanath temple. Accordingly, recruitment is being done for the post of Chief Priest as well as junior priest and assistant priest posts. The salary for the post of chief priest will be Rs 90,000. kashi vishwanath poojari vacancy details given here.
According to the temple administration, Rs 90,000 will be given on a monthly basis for the post of kashi vishwanath temple chief priest here. The salary for the post of junior priest will be Rs 80,000 and for the post of assistant priest, Rs 65,000 will be given.
काशी-विश्वनाथ मंदिरात ५० पुजारी पदांची भरती; मुख्य पुजाऱ्यास ९० हजार मानधन
वाराणसी – अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी हजारो जणांमधून एकाची निवड करण्यात आली होती. आता, हिंदू धर्मीयांचे पवित्र तिर्थक्षेत्र असलेल्या काशी-वाराणसी धाममधील मंदिरासाठीही पुजारी पदासाठी निवड करण्यात येत आहे. काशी विश्वनाथ मंदिरासाठी एकूण ५० पुजाऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार, मुख्य पुजारी पदासह कनिष्ठ पुजारी आणि सहायक पुजारी पदांसाठीही भरती होत आहे. त्यामध्ये, मुख्य पुजारी पदासाठी ९० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
- मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, येथील काशी विश्वनाथ मंदिर मुख्य पुजारी पदासाठी ९० हजार मानधन मासिक तत्वावर देण्यात येणार आहे. तर, कनिष्ठ पुजारी पदासाठी ८० हजार आणि सहायक पुजारी पदासाठी ६५ हजार रुपयांचे मानधन देण्यात येईल.
- काशी विश्वनाथ मंदिर न्यासच्या १०५ व्या बैठकीत ४१ वर्षांनतर पुजारी सेवा नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीवर बैठकीत एकमताने सहमती झाली. त्यामुळे, आता मंदिरासाठी पुजारी पदासाठी ५० जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंदिर पुजारी नियमावलीसह जिल्ह्यातील संस्कृत भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मंदिर न्यासकडून ड्रेस आणि पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत. तसेच, मंदिर न्यासकडून संस्कृत ज्ञान स्पर्धेचंही आयोजन करण्यात येणार असून संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयास अनुदानही दिले जाणार आहे.
- काशी-विश्वनाथ मंदिर न्यायची १०५ वी बैठक गुरुवारी कमिश्नरी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मंदिर न्यायचे अध्यक्ष प्रा. नांगेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीची सुरुवात मंदिराचे ट्रस्टी वेंकट रमन घनपाठी यांच्याकडून वैदीक मंत्रांद्वारे करण्यात आली. त्यानंतर, मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णूपालक मिश्रा यांच्याकडून गतबैठकीतील निर्णयांचे आणि त्यांच्या सद्यस्थितीचे वाचन करुन दाखवले, त्यावरही सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत तब्बल ४ दशकांनंतर पुजारी सेवा नियमावरीलवर चर्चा होऊन नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.
Priest Bharti Process, Selection For Ram Mandir – A grand abhishek ceremony of Ram Lalla will be held on January 22 at the grand Ram temple in Ayodhya. Invitations have been sent to eminent personalities from across the country and abroad for the event. But before that, priests were appointed to serve Ram Lalla. For this, a large recruitment process was carried out. For this recruitment process, 3000 vedarthis and priests were interviewed from across the country. Some of them have been selected to serve Lord Ram in the grand Ram temple in Ayodhya. The selected arches will now be given six months of training and a training system has been introduced.
How to apply for Priest Bharti
- Mohit Pandey studied at Dudheshwar Ved University in Ghaziabad for seven years. He also holds a Sastri degree from Sri Venkateswara Vedic University, affiliated to the Tirumala Tirupati Devasthanams in Tirupati.
- In 2023, Mohit studied Samaveda and earned a master’s degree. He is also a scholar of Ramanandiya tradition. Mohit Pandey specializes in Vedas, Shastras and Sanskrit.
- Mohit Pandey has studied vidya under the supervision of Mahant Shri Mahant Narayan Giri Maharaj of Dudheshwar Nath Math Mahadev Temple, Panch Dashnam Juna Akhara, National President of Delhi Sant Mahamandal and President of United Hindu Alliance Shri Mahant Narayan Giri Maharaj of Dudheshwar University, Ghaziabad.
इंटरव्यू, ट्रेनिंग अन् फायनल एग्जाम; अयोध्येत रामललाच्या सेवेसाठी पुजाऱ्यांची नियुक्ती, जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया
अयोध्येतील भव्य राम मंदिरात 22 जानेवारीला रामललाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील नामांकित व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आली आहेत. पण, त्यापूर्वी रामललाची सेवा करण्यासाठी पुजारी नियुक्त करण्यात आले. त्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली. या भरती प्रक्रियेसाठी देशभरातून 3000 वेदार्थी आणि पुजारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून काहींची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामाची सेवा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आता निवड झालेल्या अर्चकांना 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार असून प्रशिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
- अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी देशभरातील तब्बल 3 हजार वेदार्थ्यांमधून काहीचीं निवड करण्यात आली आहे. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. पुजारी पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी 24 अर्चकांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 21 अर्चकांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितलं की, निवड करण्यात आलेल्या अर्चकांचं प्रशिक्षण अजुनही सुरू आहे. सर्व अर्चकांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणानंतर, परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर सर्वात योग्य व्यक्तींची रामललाच्या सेवेसाठी नियुक्ती केली जाईल. सध्या 21 जण केवळ प्रशिक्षणासाठी आले आहेत.
- प्रशिक्षणादरम्यान, प्रत्येक उमेदवाराला दरमहा 2,000 रुपये दिले जाणार आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. अभिषेक झाल्यानंतर श्री रामजन्मभूमी मंदिरातील विधी आणि पूजेचं स्वरूप बदलणार आहे. 22 जानेवारीला रामललाला तात्पुरत्या मंदिरातून भव्य मंदिरात हलवण्यात येणार आहे.
- मंदिरात रामललाची पूजा करण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर अर्चकांची (पुजारी) निवड केली जात आहे. प्रत्येक मंदिरात दोन पुजारी नियुक्त केले जातील, जे 8 तासांच्या शिफ्टमध्ये सेवा देतील. याशिवाय भंडारी कोठारी आणि सेवादारही असतील.
रामललाच्या सेवेसाठी मोहित पांडेंची नियुक्ती
मोहित पांडे यांनी गाझियाबाद येथील दुधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्ष शिक्षण घेतलं आहे. यासोबतच, त्यांनी तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमशी संलग्न असलेल्या श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठातून शास्त्री पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर 2023 मध्ये मोहितनं सामवेदाचा अभ्यास करून पदव्युत्तर पदवी मिळवली. ते रामानंदीय परंपरेचेही अभ्यासक आहेत. मोहित पांडे यांचं वेद, शास्त्र आणि संस्कृतमध्ये प्राविण्य आहे. मोहित पांडे यांनी गाझियाबाद येथील दूधेश्वर विद्यापीठातील दूधेश्वर नाथ मठ महादेव मंदिराचे महंत श्री महंत नारायण गिरी महाराज, पंच दशनम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते, दिल्ली संत महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संयुक्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष श्री महंत नारायण गिरी महाराज यांच्या देखरेखीखाली विद्येचं शिक्षण घेतलं आहे.
Priest Selection For Ram Mandir