पोलिस पाटील पदाच्या अक्कलकुवा तालुक्यात तब्बल ९३ जागा रिक्त – Police Patil Bharti 2024

Police Patil Bharti 2024 Maharashtra Notification

Police Patil Bharti 2024

As many as 93 posts of police constables are vacant in Taloda and Akkalkuwa talukas. The villages concerned are functioning without police personnel. The villagers of the respective villages as well as the Police Patil Association have been demanding immediate filling up of the vacant posts. In Taloda sub-division, more than 93 posts of police patil are vacant in Taloda and Akkalkuwa talukas. Due to the vacancies, a police officer has been entrusted with the management of four to five villages. The police administration is facing the biggest problem as there is no police patil available in the village. No one in the village takes the initiative to inform the police after the incident. The administration has not received confidential reports on the social, political atmosphere, meetings of leaders, law and order in the village.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पोलिस पाटलांविना गावगाड्याला ‘ब्रेक’ – तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील ९३ जागा रिक्त

तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलिस पाटील पदाच्या तब्बल ९३ जागा रिक्त आहेत. पोलिस पाटलांविना संबंधित गावांचे कामकाज सुरू आहे. तत्काळ रिक्त जागा भरण्याची मागणी संबंधित गावांतील ग्रामस्थ तसेच पोलिस पाटील संघटनेमार्फत होत आहे. तळोदा उपविभागात तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलिस पाटील पदाच्या ९३ पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे एका पोलिस पाटलाकडे चार ते पाच गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. गावात पोलिस पाटील उपलब्ध नसल्याने सर्वाधिक अडचण पोलिस प्रशासनानी होत आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यासाठी गावातील कुणी पुढाकार घेत नाही. गावातील सामाजिक, राजकीय वातावरण, नेत्यांच्या भेटी, कायदा व सुव्यवस्था याबाबत गोपनीय अहवाल प्रशासनाला मिळेनासे झाले आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • अक्कलकुवा तालुक्यातील रिक्त पदे- अक्कलकुवा तालुक्यातील महुखाड, नैनशेवडी, ओघाणी, बामणी, रेथी, देवमोगरानगर, जुगलखेत, मांडवी, काठी, मोलगी, जामली (उमरकुवा), बारीसुरगस, धनखेडी, बिरीपाटील, सिंदुरी, चिमलखेडी, भराडीपादर, महुपाडा, उमरकुवा, गोठा बुद्रुक, रायसिंगपूर, पिंपरीपाडा, जुनानागमुठा, वाण्याविहीर खुर्द, घुनशी वाण्याविहीर बुद्रुक, खोडी, बोरीपाडा, गोटपाडा, वडफळी (नाला), कोली, सिंगपूर खुर्द, कुंभारखाण, कंकाळी, आमलीबारी, ब्रिटिश अंकुशविहीर, वडफळी, खापरान, मोवान, पिंपळगाव, मणिबेली, भगदरी, वालंबा (काठी), पळासखोब्रा, ठाणा, डनेल, मुखड़ी, सरी, वेरी, बालाघाट, माळ ओरपा, उखळसाग, वडली अशा ५६ गावांमध्ये पदे रिक्त आहेत.
  • तळोदा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील अमोणी, सिलिंगपूर, लक्कडकोट, बुधावली, रांझणी, नळगव्हाण, रापापूर, मेंढवळ, नवागाव, शेलवाई, सलसाडी, उमरकुवा, राणीपूर, कुंडवे, बंधारा, सावर, गढवली, राजविटीर अलतान टेकानी सिंगमपर झिरी, लाखापूर (रे), पाठडी, बोरद, बियामाळ, कढेल, आमलाड, खेडले, धवळीविहीर, मोहिदा, चौगाव, बुद्रुक, मोड, जुवाणी (फा.), आष्टेतर्फे बोरद, कळमसरे, छोटाधनगपूर, अशा ३७ गावांना पोलिस पाटील पदे रिक्त आहेत.

This will be good news for the state’s police officers. Maharashtra State Police Patil Association state president Mahadevrao Nagargoje said that the police patil will be paid up to Rs 15,000 as the association has been consistent with the concerned ministers and secretaries at the ministry level and through regular representations, visits and discussions. Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Patil Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

This will be good news for the state’s police officers. Maharashtra State Police Patil Association state president Mahadevrao Nagargoje said patil will be paid up to Rs 15,000 as the association has been consistent with the concerned ministers and secretaries at the ministry level and has been instructed to take the pending demands to normalcy through regular representations, visits and discussions.

पोलिस पाटील यांच्यासाठी आनंदाची बातमी; मानधनात आता होणार भरघोस वाढ

राज्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन, भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्त्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजार रुपयांपर्यंत मानधन होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नागरगोजे यांनी व्यक्त केले. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

राज्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन, भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्त्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजार रुपयांपर्यंत मानधन होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नागरगोजे यांनी सांगितले.

स्थानिक विश्रामगृह शेगाव येथे आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. स्थानिक विश्रामगृह येथे बुलडाणा जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी समितीची आढावा बैठक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सभेचे प्रास्ताविक प्रसिद्धीप्रमुख संतोष मोरे पाटील किन्ही महादेव यांनी केले. ग्रामस्तरावर काम करणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मागण्यासंदर्भात संघटना प्रयत्नशील असून शासनाने सुद्धा मानधन वाढीसाठी अनुकूलता दर्शविली.

येणारा काळ पोलीस पाटील यांचेसाठी आशादायी असून, पोलीस पाटील यांनी आपल्या कामाप्रती जागरूक असावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी विषयी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी विस्तृत विवेचन करून पोलिस पाटील यांना नियमित भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राज्याध्यक्षांना अवगत केले. आढावा बैठकीसाठी जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.


Police Patil Bharti and their Pay Scale latest decision taken by government, see details here. Police Patil is a very important element in the rural system. The state government is positive about filling up the vacancies and increasing the salaries of the police officers. For many years, the salary of police officers was 3,000. It has been increased to 6,500 in the year 2019. A positive decision will be taken regarding further increase in this. Deputy Chief Minister Devendra Fadnavis informed in the Legislative Council that a government committee meeting will be held soon for this.

 उपविभाग भंडारा अंतर्गत पोलीस पाटील” पदांची भरती; १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी

Further he said the Instructions have been given to the concerned authorities to complete the process in time while completing the necessary documents for the renewal of the appointment of Police Patil. The renewal period has been made 10 years. Action will be taken to arrange their meeting in Gram Panchayat office. Family members of police officers who died in the line of duty during the ‘Covid’ period have been given charitable assistance. Deputy Chief Minister Fadnavis also said that the family members of eligible police officers will be assisted by further inquiry.

पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री

  1. ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
  2. राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
  3. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार होते. ते सन 2019 मध्ये वाढवून 6 हजार 500 इतके करण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्राम पोलीस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील.
  4. पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पुर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नूतनीकरणाचा कालावधी हा 10 वर्षाचा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल. ‘कोविड’ काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Sangli Police Patil Bharti 2023– Sub-divisional Magistrate Miraj and Walwa Subdivision Sangli invited application form for Police Patil Posts. Job Location for these posts is in Walwa (Sangli). There are total 40+ vacancies available for this posts in Sangli Police Patil Recruitment 2023. All Interested and Eligible applicants may submit application form to the given address. The last date for submission  of application form is 27th Feb 2023. Read More details are given below.

Aurangabad Police Patil Bharti-384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरती सुरु, अर्ज करा.

उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग, सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस पाटील” पदांच्या 40+ रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 फेब्रुवारी 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

ज्या उमेदवारांस पोलीस पाटील म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय येथे दिनांक 20/02/2023 ते दिनांक 27/02/2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत ( सकाळी 09.45 ते सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज करावेत. वरील तारखेनंतर तसेच वेळेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे खालील अटी पूर्ण करण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावे. अर्ज तहसिल कार्यालय मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व अपर तहसिल कार्यालय सांगली येथे उपलब्ध आहेत: सदरच्या अर्जासाठी उमेदवारांना र.रु. 100/- इतके शुल्क आकारण्यात येईल. राहावे

Sangli Police Patil Bharti 2023- Vacancy Details

  •  पदाचे नाव: पोलीस पाटील.
  • रिक्त पदे: 40+ पदे.
  • नोकरी ठिकाण:  सांगली.
  •  शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण.
  •  वयाची अट: 25 ते 45 वर्षे.
  •  अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन.
  • शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023.

अर्ज करण्यास खालील लिंकवर क्लिक करा 

वाळवा उपविभाग, सांगली मध्ये “पोलीस पाटील” रिक्त पदांची भरती-अर्ज सुरु

मिरज उपविभाग सांगली अंतर्गत पोलीस पाटील” पदांची भरती; १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी


Police Patil Bharti 2023: As per the latest news, The recruitment process for 500 police stations in Pune district was to be implemented. As the by-elections of Kasba and Chinchwad assembly constituencies have been announced, the Police Patil recruitment process has been put on hold. Read More details are given below.

जिल्ह्यातील 500 पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्याने भरती प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. पोलिस पाटील हे पद गावातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील 500 गावांमध्ये हे पद रिक्त आहे. ही पदे भरण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

Police Patil Bharti 2023

 त्यानुसार 2 फेब्रुवारीपासून प्रांत कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येणार होते. मात्र, कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ हे हवेली तालुक्यात येत असल्याने संपूर्ण भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.

 पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने गावागावांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे पदे भरण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने रिक्त पदांची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार पुणे शहर प्रांत कार्यालयांतर्गत 25, हवेली 50, भोर-वेल्हा 125, मावळ-मुळशी 92, दौंड-पुरंदर 39, जुन्नर-आंबेगाव 87, बारामती- इंदापूर 47  अशी एकूण 500 पदे भरली जाणार आहेत.


Police Patil Bharti 2023: As per the latest news regarding Police Patil Bharti is that 384 police station vacancies will be filled soon in Aurangabad district. The Collector has issued a letter in this regard. The recruitment process is scheduled to start from February 21. Candidates will be selected through written test. Read more details are given below.

Police Patil Recruitment 2023: औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवले जाणार आहे. तर 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठया संख्येने पदे रिक्त असल्या कारणाने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अशी अडचण निर्माण होऊन गावातील अपराधाचे प्रमाण वाढु नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राहिल, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल, यादृष्टीकोनातून पोलीस पाटीलांची सदर रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. या करीता जिल्हयामध्ये एकसूत्रीपणा असावा या दृष्टीकोनातून पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस पाटील भरतीचे निर्देश देत असल्याचं जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

पोलीस पाटील भरती वेळापत्रक 

अ.क्र. भरती प्रकियेचे टप्पे कार्यवाहीचा कालावधी
1 उपविभागीय अधिकारी यांनी रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे 5 जानेवारी 2023 पर्यंत
2 बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे 06 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 पर्यंत
3 गावनिहाय आरक्षण निश्चित करणे 21 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2023 पर्यंत
4 जाहिरात प्रसिद्ध करणे 06 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत
5 अर्ज मागविणे 21 फेब्रुवारी ते 08 मार्च 2023 पर्यंत
6 अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र पाठविणे 09 मार्च ते 23 मार्च 2023 पर्यंत
7 लेखी परीक्षा घेणे  29 मार्च रोजी
78 पत्र उमेदवारांची तोंडी परीक्षा (मुलाखती) घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 15 एप्रिल रोजी
9 पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देणे 26 एप्रिल रोजी

Police Patil Bharti 2022- Latest updates regarding Police Patil Bharti is that In Chandgad taluka of Kolhapur district, 142 posts of Police Patals are sanctioned. Out of them 113 posts are filled and 29 posts are vacant. Due to large number of vacant posts, there are difficulties in implementing various schemes of the government.

चंदगड तालुक्यातील २९ गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. महसूल विभाग, तसेच पोलिस खात्याला सहकार्य करणारा गावपातळीवरील शेवटचा घटक म्हणून या पदाला महत्त्व आहे. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने तेथे शासनाच्या विविध योजना राबवताना अडचणी येत आहेत.

तालुक्यात पोलिस पाटलांची १४२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११३ भरलेली असून २९ पदे रिक्त आहेत. यामध्ये मोटणवाडी, कानडी, मोरेवाडी, इनाम कोळिंद्रे, दाटे, सावर्डे खालसा, सुळये, आंबेवाडी, शिवणगे, उत्साळी, बुक्कीहाळ, हेरे, मिरवेल, तुडये, पिळणी, शिरोली, उमगाव, डुक्करवाडी, भोगोली, कुरणी, गवसे, इब्राहीमपूर, दुंडगे, होसूर, दिंडलकोप, कोदाळी, ढोलगरवाडी, यर्तनहट्टी या गावांचा समावेश आहे. पदांसंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना माहिती पाठवल्याचे निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले


पोलिस पाटील भरतीला मुहूर्त सापडेना ; आदेश देऊन भरती प्रक्रिया रखडली

Ahmednagar Police Patil Bharti 2022 updates : Ahmedngar District Collector Dr. Rajendra Bhosle had directed all the 7  sub-divisional officers to implement the recruitment process of Police Patil Posts within one and a half months and submit a report. Three months have passed since the order was issued by him. But the Police Patil Recruitment process has not yet started in the Ahmednagar district. Sometimes due to drought, sometimes Maratha reservation and sometimes due to indifference of officials, the recruitment process has been stalled for last 10 years. Therefore, the administration of 765 villages in the district is going on without Police Patil posts. More details regarding this and Vacant seat details briefly given below:

Ahmednagar Police Patil Bharti Vacancy Details

तालुकानिहाय एकूण रिक्त जागा

  1. श्रीगोंदा 34,
  2. पारनेर 108,
  3. कर्जत 33,
  4. जामखेड 23,
  5. पाथर्डी 109,
  6. शेवगाव 82,
  7. नगर 83,
  8. नेवासा 38,
  9. श्रीरामपूर 19,
  10. राहुरी 45,
  11. कोपरगाव 31,
  12. राहाता 18,
  13. संगमनेर 71,
  14. अकोले 71.

अहमदनगर पोलीस पाटील भरती 2022 अपडेट

  1. नगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दीड महिन्यांत पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया राबवून अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वच सात उपविभागीय अधिकारी यांना दिले होते. आदेश देऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु अद्याप जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. कधी दुष्काळ, कधी मराठा आरक्षण तर कधी अधिकार्‍यांची उदासीनता आदी कारणामुळे भरती प्रक्रिया दहा वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 765 गावांचा कारभार पोलिस पाटलांविनाच सुरु आहे. स्वातंत्र्यापूर्वी पोलिस पाटलांची नियुक्ती वंशपरंपरेने होत होती. पाटलांच्या नावाने गावे ओळखली जात होती. स्वातंत्र्यानंतरही दोन अडीच दशके पोलिस पाटलांचा दबदबा सुरुच होता. त्यानंतर मात्र, पोलिस पाटलांचे महत्त्व कमी होत गेले.
  2. 1980 ते 85 दरम्यान, उपविभागीय अधिकारी हे पोलिस पाटलांची नियुक्ती करु लागले. त्यामुळे अनेक गावांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती पोलिस पाटील झाले आहेत. कोल्हार भगवतीसारख्या गावात खर्डेंच्या जागी बर्डे पाटील झाले.
  3. सन 2010 च्या आसपास पोलिस पाटलांची सरळसेवेने भरती होऊ लागली. त्यामुळे महिला देखील पोलिस पाटील म्हणून गावकारभार सांभाळू लागल्या आहेत. 2012 -13 या वर्षांत संगमनेर आणि श्रीरामपूर उपविभागीय अधिकार्‍यांनी पोलिस पाटील भरती केली होती. त्यानंतर दुष्काळ व इतर कारणामुळे राज्य सरकारने काही काळ भरती थांबवली. त्यामुळे पोलिस पाटलांच्या रिक्त जागांची संख्या वर्षागणिक वाढू लागली.
  4. जिल्ह्यात पोलिस पाटलांची एकूण 1 हजार 385 मंजूर आहेत. सध्या 620 गावांत पोलिस पाटील आहेत. उर्वरित 765 गावांत पोलिस पाटलांअभावी गावकारभार सुरु आहे. पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, यासाठी निवेदने, आंदोलने करण्यात आली. चार पाच वर्षांपूर्वी पोलिस पाटील पदांचा शासनाच्या तरतुदीनुसार बिंदूनामावली तपासणीचे काम उपविभागीय कार्यालयांकडून सुरु होते.
  5. मध्यंतरी पोलिस पाटील पद भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, नगर, कर्जत, पाथर्डी व श्रीगोंदा -पारनेर या सात उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रचलित शासन नियमानुसार बिंदूनामावली तपासणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करुन घेतली. तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देखील पाठविला.
  6. त्यानुसार 16 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे मंजूर बिंदूनामावलीनुसार पदे भरण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. उपविभागीय स्तरावर कालबध्द कार्यक्रम तयार करुन दीड महिन्यात पोलिस पाटील पद भरती प्रक्रिया पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांना दिले होते. याबाबत 1 जुलै 2022 रोजी सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांना पत्र पाठविण्यात आले. 15 ऑगस्टपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप उपविभागीय कार्यालयांमध्ये भरतीबाबत कोणतीच कार्यवाही सुरु नसल्याचे चित्र आहे.
  7. तीन महिन्यांपूर्वी पोलिस पाटील भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मराठा आरक्षणात बदल झाला. त्यामुळे बिंदूनामावलीत अडचणी आल्या आहेत.भरती प्रक्रियेबाबत लवकरच पुन्हा उपविभागीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.
    -डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
  8. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे बिंदूनामावली दोन तीनदा बदलावी लागली. त्यामध्ये वेळ गेला. आता पोलिस पाटील पद रिक्त असलेल्या गावांतून जातनिहाय लोकसंख्या उपलब्ध होताच आरक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर लगेच भरतीची जाहिरात प्रसिध्द केली जाईल.
    -गोविंद शिंदे, उपविभागीय अधिकारी, शिर्डी.

Police Patil bharti in Panvel – There are 100 vacancies for the post of Police Patil in Panvel and Uran taluka. For this, reservation has been announced in these taluks. So now the recruitment of 100 Police Patil posts in this taluk i.e. Panvel and Uran will be done soon. Candidates read the details carefully and keep visiting us.

पनवेल आणि उरण तालुकयात पोलीस पाटील पदाच्या १०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी ह्या तालुक्यांमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ह्या तालुकात म्हणजे पनवेल आणि उरणमधील १०० पोलीस पाटील पदाची भरती लवकरच केली जाणार आहे.

Police Patil Bharti 2022

Police Patil Bharti 2022- There are 89 vacancies for Police Patil  in Dapoli taluka of Ratnagiri district. In Dapoli taluka 177 posts of Police Patil  have been sanctioned, out of which 88 Police Patil  are working and the remaining 89 posts are vacant. Read More details regarding Police Patil Bharti 2022 as given below.

पोलिसांनंतर गावात शांतता राखण्याचे काम करणाऱ्या पोलिस पाटलांची दापोली तालुक्यात ८९ पदे रिक्त असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना दाखल्यासाठी दुसऱ्या पोलिस पाटलांकडे पायपीट करत हेलपाटे मारावे लागत आहे.

  • गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती पोलिस पाटील यांच्याकडून शासनाला दिली जाते. गावात शांतता राखण्याचे कामही याच पोलिस पाटलांच्या खांद्यावर असते. त्याचबरोबर शासकीय कामांसाठी पोलिस पाटलांकडून रहिवासी दाखला घ्यावा लागतो.
  • दापोली तालुक्यात पोलिस पाटलांची १७७ पदे मंजूर असून, त्यातील ८८ पोलिस पाटील कार्यरत असून उर्वरित ८९ पदे रिक्त आहेत
  • दापोलीत काही महत्वपूर्ण गावे आहेत; मात्र या गावांमध्ये विशिष्ट समाजासाठी आरक्षण पडल्यामुळे उमेदवार न मिळाल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत.
  • तीन ते चार वर्षांपूर्वी पोलिस पाटील पदासाठी आरक्षणे जाहीर झाली; मात्र या समाजातील उमेदवार न मिळाल्याने त्या गावातील पदे अद्याप रिक्त आहेत.
  • ज्या गावात पोलिस पाटील पद रिक्त आहे त्या ठिकाणी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
  • त्यामुळे पोलिस पाटील रिक्त असलेल्या गावातील नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांना भेटण्यासाठी जावे. त्यामुळे पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

Police Patil Bharti 2022: There are vacancies for Police Patlil in Shrigonde taluka of Ahmednagar district. These posts have not been filled for last 10 years. The important posts of Kotwal and Police Patil have been vacant for many years. Due to this, people are facing difficulties on a daily basis. Read More details regarding Police Patil Bharti 2022 are given below.

तालुक्‍याची आर्थिक राजधानी, अशी ओळख असलेल्या काष्टी गावावर प्रशासनाची अवकृपा सुरू आहे. मागील 14 महिन्यांपासून येथील सरपंचपद रिक्त आहे. कोतवाल, पोलिस पाटलांच्या जागा तर 10 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही भरलेल्या नाहीत. विशेषत: पंचायत समिती सदस्यही अपात्र ठरल्याने, काष्टीबाबत ‘ना’ चा पाढा सुरू असल्याचेच दिसते. या पदाअभावी काष्टीकरांना रोजच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आमदार बबनराव पाचपुते यांचे गाव म्हणून काष्टीची राज्यभर ओळख आहे. येथील जनावरांच्या आठवडे बाजारात राज्यासह परराज्यांतून व्यापारी-शेतकरी येतात. तेथील सहकारी सेवा संस्था तर आशिया खंडात गाजली आहे. तालुक्‍याचे अर्थकारण, राजकारण याच गावातून अनेक वर्षांपासून फिरत आले आहे.

काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक चार वर्षांपूर्वी झाली. जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने लोकनियुक्त सरपंच सुलोचना वाघ यांना अपात्र ठरविले गेले. गेले 14 महिने गावाला सरपंच नाहीत. आता नवा सरपंच जनतेतून नव्हे, तर ग्रामपंचायत सदस्यांमधूनच निवडला जाणार आहे. मात्र, अजून तरी त्यालाही मुहूर्त मिळालेला नाही. शिवाय, त्यासाठी जुने की नवे आरक्षण लागू होणार, याबद्दलही गोंधळ आहे.

दरम्यान, काष्टीत कोतवाल व पोलिस पाटील ही महत्त्वाची पदेही अनेक वर्षे रिक्तच आहेत. ती भरण्याबाबतही कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य संदीप पाचपुते म्हणाले, सरपंचासह रिक्त पदे भरण्याबाबत आम्ही मोठा पाठपुरावा करीत आहोत. ग्रामपंचायतीचे ठरावही दिले. मात्र, प्रशासन दाद देत नाही. आता सरपंचनिवडीसाठी आंदोलनाची वेळ आली आहे.”

काष्टी येथील सरपंचनिवडीबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करीत आहोत. नवा सरपंच सदस्यांमधून होणार असला, तरी आरक्षण कुठले लागणार, याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. तेथील पंचायत समिती सदस्याची निवडणूक मात्र लवकरच होणार असून, त्याबाबत कार्यक्रम सुरू आहे.


Police Patil Bharti 2022- In Lakhandur Taluka there is 29 police patils have been vacant for the last 12 years. Lakhandur taluka covers a total of 84 villages. Lakhandur 30, Dihori 13 and Palandur 12 aye 55 police patils are working in it. Read More details regarding Police Patil Bharti 2022 are given below.

लाखांदूर : तालुक्यातील एकूण ८४ गावांअंतर्गत केवळ ५५ पोलीस पाटील कार्यरत असून १२ वर्षांपासून २९ पोलीस पाटील पद रिक्त आहे. लाखांदूर तालुक्यात एकूण ८४ गावांचा समावेश आहे. त्यात लाखांदूर ठाण्यांतर्गत ४८, दिघोरी ठाण्यांतर्गत २३ व पालांदूर अंतर्गत १३ गावांचा  समावेश आहे. त्यात लाखांदूर ३०, दिहोरी १३ व पालांदूर 12 अये ५५ पोलीस पाटील कार्यरत आहे. २९ गावातील पोलीस पाटील पद रिक्त आहेत. 


Latest Police Bharti 2022 Update: Despite the fact that Police Patil is a very important post, the government is neglecting to recruit for this post. Police Patil posts are vacant in various talukas. As a result, the villagers are facing a lot of delays. And those who are currently working in Police Patil posts have to handle extra work.

पोलीस पाटील हे खूप महत्वाचे पदे असूनही शासनाचे या पदाच्या पद भरतीकडे दुर्लक्ष होत आहे. विविध तालुकांमध्ये पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. त्यामुळे गावकरांना बराच त्यांची कामे काढून घेणार विलंब होत आहे. आणि पोलीस पाटील पदांवर सद्य रुजू असणाऱ्याना कामाचा अतिरिक्त भर सांभाळावा लागत आहे.

पोलीस पाटलांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करा

Police Patil Recruitment 2022- महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन पोलीस पाटलाचे सेवानिवृतीचे वय ६५ करावे व सेवानिवृत्ती योजना सुरु करण्याची मागणी केली. 

Police Patil, Home Guard Pay scale पोलीस पाटील, गृह रक्षक वेतनमान

Home Guard Bharti – महाराष्ट्र होमगार्ड भरती 2022

Police Bharti 2022 खूशखबर! राज्यात ७,२३१ पोलिसांची होणार भरती

Police Patil Bharti 2022: As per the latest news, The role of police patil is important in maintaining law and order in the village. Therefore, Home Minister Dilip Walse Patil directed to immediately start the process of filling up the vacancies of Police Patil in the state and also to pay the honorarium of Police Patil on time.

पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

Rajya Police Patil Bharti 2022

यावेळी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले,

  • पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे, याबाबत गृह व महसूल विभागाने त्वरीत कार्यवाही करावी.
  • तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील यांना प्रति वर्षी पुरस्कार देण्यात येतात.
  • मागील काही वर्षात सदर पुरस्कार देण्याचे बंद झालेले आहे.
  • हे पुरस्कार देण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देशही वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

Police Patil Recruitment 2022

  • तसेच अतिरिक्त कामकाजासाठी अतिरिक्त भत्ता देण्याचे निर्देश त्यांनी गृह विभागास दिले. पोलीस पाटलांना प्रत्येक जिल्हयामध्ये पोलीस पाटील भवन उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारतीमध्ये पोलीस पाटील यांच्यासाठी एक कक्ष निश्चित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे.
  • त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत ग्रामविकास विभागास कळविण्यात यावे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भवन उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्री स्तरावर निर्णय घेण्याबाबत कळविण्यात यावेत. असेही त्यांनी सांगितले.
  • पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे, या प्रमुख मागण्यांवर यावेही सकारात्मक चर्चा झाली.

पोलीस पाटील पदे भरती सोडत उद्या

Police Patil Posts Bharti Sodat for Reservation will be conducted in Phaltan Taluka. Candidates who apply for Police Patil post they should be attend the Sodat Program which is held on 17th February 2022 at Tehsil Office Phaltan… Read the complete information below

पोलीस पाटील पदासाठी आरक्षण सोडत उद्या दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी तहसील कार्यालय फलटण येथे आयोजित केली आहे… संपूर्ण माहिती खाली वाचा

Police Patil Bharti 2022 Sodat

लवकरच 712 जागांची पोलीस पाटील भरती

Police Patil Bharti 2022 will be held soon for 712 posts. Police Patil is working at the village level as an important link between the revenue department and the police department. From time to time the police patils are informing the district and police department about the incidents and developments in the village. Due to this, the post of Police Patil is important at the village level. For the post of Police Patil for a period of five years, recruitment is done by the Revenue Department and an honorarium of Rs. 5,000 per month is paid by the Police Department to the concerned Police Patil. After the last three-four years, Police Patil will be recruited in the district again soon. At present there are 712 vacancies in the district and the district administration has sought necessary guidelines from the government to fill these vacancies. For the last four years, no time has been found to fill the vacancies of Police Patil. The Corona crisis caused further delays. But now that the process has begun, the work of removing the reservation is about to begin. There are 1911 revenue villages in Pune district and so far 1130 posts have been filled. It will soon be recruiting for 712 posts.

महसूल आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. यामुळे गाव पातळीवर पोलीस पाटील पदाला महत्व आहे. पाच वर्षांसाठी असलेले पोलीस पाटील पदासाठी महसूल विभागाकडून भरती केली जाते आणि पोलीस विभागाकडून संबंधित पोलीस पाटील यांना दर महा 5 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. गेल्या तीन- चार वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा लवकरच पोलीस पाटील भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 712 जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितले आहे. गेले चार वर्षांपासून पोलीस पाटीलच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. कोरोना संकटामुळे यासाठी अधिक विलंब झाला. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, आरक्षण सोडत काढण्याचे काम सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यात 1911 महसुली गावे असून, आतापर्यंत 1130 पदे भरण्यात आली आहेत. आता लवकरच 712 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.


Police Patil Bharti 2022

पोलिस पाटलांची १२ हजार ४२२ पदे रिक्त

Maharashtra Police Patil Bharti 2022 –  Police Patil Bharti 2021Process will be started soon. As per the latest news received there were Appr. 12,422 Posts are vacant for Police Patil. This Recruitment will be held on Thane & Konkan, West Maharashtra, North Maharashtra and Marathwada Division. Read the more details given below on this page.

  • Thane & Konkan – 1140 Posts
  • West Maharashtra – 1890 Posts
  • North Maharashtra – 1842 Posts
  • Marathwada – 4050 Post

१२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त

  • राज्यात तब्बल १२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त असून, एकाच पोलिस पाटलांवर तीन ते चार गावांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस पाटीलच नव्हे, तर नागरिकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
  • महसूल आणि पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलिस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलिस पाटील करीत असतात.
  • मात्र, रिक्त जागा भरण्याचा शासन आणि गृह विभागाला चार वर्षांपासून मुहूर्त सापडत नाही.
  • राज्यात एकूण ३८ हजार ७१२ पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी २६ हजार २९० पदे भरली; तर १२ हजार ४२२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलिस पाटलांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलिस पाटलांची सर्वाधिक पदे ही मराठवाड्यात रिक्त आहेत.
  • कोरोना संक्रमणामुळे पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्याने नव्याने बिंदूनामावली तयार करण्यात आली होती. मात्र, पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आता नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागणार आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळेही पोलिस पाटील भरतीला विलंब होत आहे.
  • ग्रामीण भागात गावातील तंटे गावातच सोडवून शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलिस पाटलांची मोलाची भूमिका असते. मात्र, तुटपुंज्या मानधनावर सरकार पोलिस पाटलांची बोळवण करीत आहे.

Department wise Vacancy Details Of Police Patil Bharti 2022 – विभागनिहाय पोलिस पाटलांची रिक्त पदे –

  • ठाणे आणि कोकण विभाग – ११४०
  • पश्चिम महाराष्ट्र – १८९०
  • उत्तर महाराष्ट्र – १८४२
  • मराठवाडा – ४०५०

Police Patil Bharti 2022

Maharashtra state conduct recruitment process for Police Patil post in years 2018 – 2019. This recruitment is conduct in various regions of the Maharashtra state. The recruitment details regarding the recruitment process conduct for police patil post can be found on this single page. All details of recruitment to the post to be conduct in Maharashtra state as recruitment process, results, selection process, admit cards are available here. Also the various district of the Maharashtra state conduct for the recruitment process to police patil posts are given serially in the following links

All latest updates regarding police patil recruitment process conduct for Maharashtra state with details information in available on this page. This page will gives full details information regarding the Police Patil recruitment process. All Maharashtra districts which conduct the police patil recruitment are listed in the below link. Applicants can click on the following official links to get all latest information regarding police patil recruitment process.

Maharashtra District Police Patil Recruitment 2022

In Maharashtra district all recruitment process carried out for police patil posts ins given with details information in below link. Following is the list of Police Patil recruitment process conduct till today’s date.

Police Patil Answer Key / Result :

Question Paper Download :


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    Police Patil Bharti 2023 complete update and apply link are given here.

  2. Prashant Shigwan says

    Please Online Bharti Apply

  3. Anita Hana Padvi says
  4. Amin says

    Chandrapur jilha ki jagah hai kya

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!