अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
Under the Police Peon Recruitment Pre-Examination Training Scheme, more and more candidates from Muslim, Christian, Buddhist, Sikh, Parsi, Jain and Jewish minority communities will be prepared for the opportunity. Eligible candidates may submit their application form before 5th April 2021.
पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजने अंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. खालील दिलेल्या पूर्तता करण्याऱ्या उमेदवारांनी दि. 05/04/2021 पर्यंत पोहोच होतील असे कागद पत्रांच्या झेरॉक्स जोडून संपूर्ण पत्ता, इमेल आय डी संपर्क क्रमांक /व्हाट्सअप नंबर नमूद करावा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
- जिल्हाधिकारी सांगली यांचे कार्यालय
Read Full Notification for Police Shipai Recruitment Pre-Exam Training 2021 Here
Police Bharti Free Training for minority candidates: Minority Development Minister Nawab Malik said that pre-recruitment training would be imparted to more and more minority youths in the state. At present, the process of selection of aspiring trainees from 14 districts of the state has been started for this training and it will be started soon in the remaining districts as well, he said.
राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स
सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरु करण्यात येईल, असं ते म्हणाले. राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती ; गृहमंत्री देशमुखांचे आदेश
उमेदवारांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे.
उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर सदर जिल्ह्यांमध्येही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील, असं मंत्री मलिक यांनी सांगितले.
महत्वाचे! पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते? जाणून घ्या.
शिकवणार काय?
’ प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
’ याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी १ हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी ३०० रुपये, प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी ३ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज न्याहारी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्यांचे असेल.
पोलीस भरती कागदपत्रे 2020
’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी साधारण ५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र एखाद्या जिल्ह्य़ात किमान ३० विद्यार्थी आले तरी त्यांना प्रशिक्षण देणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.
Sir dhule district saathi kadhi hoil
Buldhana district sathi kuth apply karych last date Kay aahe
How to apply
How to apply sir for it