महाराष्ट्रात पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमीची सूट, गृह विभागाकडून अधिसूचना जारी- Police Bharti 2025
Police Bharti 2025 Physical Exam Details, Important Documents List, Pattern & Date
As per the latest update regarding Maharashtra Police Bharti is that The state government has given a relaxation of 5 cm to tribal candidates in the recruitment of the state government. This is a special provision for Scheduled Tribes. A few days ago, Deputy Chief Minister Devendra Fadnavis was asked by Kelapur-Arni MLA Dr. K.K. Patil to relax the height prescribed in the prescribed height of physical qualification for scheduled tribe category candidates in the state. Sandeep Dhurve had made a statement requesting the request. In this regard, the state government has issued a gazette notification on Friday, October 4, regarding the relaxation of five centimetres for tribal candidates, signed by the government’s deputy secretary D H Kadam.
महाराष्ट्रात पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमीची सूट, गृह विभागाकडून अधिसूचना जारी
- राज्य सरकारने राज्य सरकारने भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ सेंमीची सूट दिली आहे. ही अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद आहे. यामुळे राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गत काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी निवेदन देऊन विनंती केली होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी राजपत्र जारी केले असून त्यावर शासनाचे उपसचिव द. ह. कदम यांची स्वाक्षरी आहे.
- महाराष्ट्र पोलिस अधिनियम (१९५१चा २२) याच्या कलम ५ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नियमास महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम, २०२४ संबोधले जाणार आहे. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात, अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटर इतकी शिथिलता यापुढे पोलिस भरतीत देण्यात येणार आहे.
- केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने भारतीय पोलिस सेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व अन्य सेवेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आदिवासींना ५ सेंमीची सूट आहे; पण राज्यात ही सूट नव्हती. आता या निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांना खूप मोठा लाभ होणार आहे. राज्य शासनाने न्यायिक मागणी पूर्ण केली.-डॉ. संदीप धुर्वे, आमदार, केळापूर-आर्णी मतदारसंघ
Police Recruitment 2025 new 7500 posts will be filled this year : After recruiting around 35,000 police personnel in the state in the last two years, the recruitment will now be done again in December. Around 7,500 posts will be filled, including 1,200 for the Mumbai Police Force. A large number of police recruitment were announced in the state in 2022 and 2023. He will then rejoin the police in December. He did not join the state police force for nearly three years during the pandemic. Due to the increasing population, the police force is less in many places.
In the last two years, 18,000 and 17,000 posts were recruited in the state respectively. In comparison, another 7,000-8,000 police force is expected to be recruited in December for another 7,500 posts. Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
राज्यात पुन्हा पोलिस भरती, 7500 जागा भरणार, डिसेंबरमध्ये होणार मेगाभरती!
- राज्यात गेल्या 2 वर्षांत जवळपास 35 हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं आहेत. राज्यात 2022 आणि 2023 मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे 18 हजार आणि 17 हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. त्या तुलनेनं आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यताय.
- डिसेंबरमध्ये मेगा पोलिस भरती, मुंबईत सर्वाधिक जागा – कोरोना काळात 3 वर्ष भरती नाही. प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढण्यात येणार आहे. राज्यात 7500 पदं भरली जाणार आहेत. मुंबईत पोलीस दलात मनुष्यबळ वाढण्यात येणार आहे. १२०० पदे मुंबईमध्ये भरली जाणार आहे. भरतीसाठी पोलिसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत. गेल्या 3 वर्षात कोरोनामुळे पोलिस भरतीला ब्रेक लागला होता. तर पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदानं न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. मात्र, आता राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.त्यामुळे पोलिस दलातील मनुष्यबळ वाढणार आहे.
Police Bharti 2025 new 7000 posts will be filled this year. There will be another opportunity to recruit police this year. Another new recruitment process is scheduled for the end of 2024. According to the information received, recruitment is going on for 17,471 police posts which are currently vacant in the state in 2023 and the recruitment will end before September 1. According to senior sources in the home department, around 7,000 police personnel will be recruited between January 1 and December 31, 2024. Police have been recruited twice during the tenure of Home Minister Devendra Fadnavis. Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
- पोलीस भरती साठी या वर्षी अजून एक संधी प्राप्त होणार आहे. २०२४ च्या अखेरीस अजून एक नवीन भरती प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो, प्राप्त माहिती नुसार राज्यात सध्या २०२३ मधील रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ पोलिस जागांवर भरती सुरू असून १ सप्टेंबरपूर्वी ही भरती संपणार आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळातील अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोनवेळा पोलिस भरती झाली आहे.
- त्यांच्याच कार्यकाळात १९७६ चा गृह विभागाचा आकृतिबंध बदलून नवीन तयार केला. वाढती गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलिस ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार मागील अडीच-तीन वर्षांत ३० हजार पोलिसांची भरती झाली आहे. राज्यातील दहा पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढविण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे.
- तत्पूर्वी, १ सप्टेंबरपर्यंत सध्याची १४ हजार ४७१ जागांची पोलिस भरती पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. आतापर्यंत २५ जिल्ह्यांत पोलिस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅँडमॅनसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलिस भरतीला सुरवात होणार आहे.
Police Bharti 2025 Exam Steps पोलीस भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे
- सर्वप्रथम सरकारतर्फे पोलीस भरतीची घोषणा करण्यात येते
- पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केली जाते.
- पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि अर्जाची रक्कम भरावी लागते.
- पात्र उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी बोलविण्यात येते.
- मैदानी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते.
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाते.
- अंतिम यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयात 2-3 महिने प्रशिक्षण दिलं जातं.
- मुख्यालयातील प्रशिक्षणानंतर महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर 9 महिने प्रशिक्षण दिलं जातं.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयांमध्ये विविध विभागांमध्ये रुजू केलं जातं.
- सुरक्षा देणं, विविध कार्यालयांची सुरक्षा, आरोपींना न्यायालयात नेणं, आरोपींना आरोग्य चाचणीसाठी नेणं, शस्त्रागाराची सुरक्षा यांसारखी कामे दिली जातात.
- उमेदवारांच्या कौशल्यानुसार किंवा मधल्या काळात विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्यालयातून त्यांची बदली फोर्स वन, जलद प्रतिसाद पथक, लोकल क्राईम ब्रांच, पासपोर्ट डिव्हिजन, डॉग स्क्वॉड, बॉम्ब डिस्पोजल पथकामध्ये केली जाते.
Police Bharti 2025 How to apply अर्ज कसा भरायचा?
- 2019 पर्यंत भरतीचा क्रम पुढीलप्रमाणे असा होता- अर्ज भरणे, मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा. मात्र 2019 मध्ये पहिल्यांदाच लेखी परीक्षा आधी आणि नंतर मैदानी परीक्षा घेतली गेली होती.
- 2019 पर्यंत एका उमेदवाराला पात्रतेनुसार एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येत असत. उदा. पात्र उमेदवार एकाचवेळी चालक आणि बॅण्डसमन पदासाठी अर्ज करू शकत होता. मात्र 2019 मधील भरती प्रक्रियेत एका उमेदवाराला केवळ एकच अर्ज भरता आला. उमेदवारांच्या विरोधानंतर ही अट काढून टाकण्यात आली होती.
- अलीकडच्या काळात पोलीस भरतीच्या प्राथमिक अर्जाची जबाबदारी खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या कंपन्यांवर ही जबादारी सोपविण्यात आली होती. आता जाहीर झालेल्या भरतीसाठी कोणत्या कंपनीला हे कंत्राट मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
- पोलीस दलातील भरती काही हजार जागांसाठी होत असली तरी भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या काही लाखांमध्ये असते. एक उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतात. अर्ज भरताना खालील गोष्टी ध्यानात घ्यावा लागतात;
- वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नमूद केलेल्या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक.
- अर्जासोबत रक्कम भरणे गरजेचे. अर्जाची फी पूर्वी रूपये 350-400 रूपये असायची, मात्र गेल्या काही ही प्रक्रिया खाजगी कंपन्यांमार्फत राबवली जाऊ लागल्यानंतर अर्जाची किंमत खुल्या वर्गासाठी रूपये 1000 आणि इतर वर्गांसाठी रूपये 950 होती. आगामी भरतीसाठी अर्जाची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
- कोणत्या रिक्त पदासाठी अर्ज भरला जातोय, तो योग्य पर्याय निवडणे.
- कोणत्या सामाजिक गटात आपण मोडतोय त्याची निवड करणे. उदा. खुला गट, राखीव गट, भूकंपग्रस्त इ.
Required Document Police Recruitment 2025 अर्जासोबत सर्व उमेदवारांना पुढील तीन कागदपत्रे जोडणे आवश्यक असतं;
- शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका
- रहिवासी दाखला
- राखीव गटात मोडत असल्यास जास्त प्रमाणपत्र.
- याचबरोबर विशिष्ट पदांसाठी अर्ज भरताना संबंधित कौशल्य प्रमाणपत्रदेखील सोबत जोडावं लागतं. उदा. चालक पदासाठी अर्ज करताना ‘वाहन चालक परवाना’ जोडणं बंधनकारक आहे.
- मुलीचे लग्न झालेले असल्यास आणि लग्नानंतर नाव बदलेलं असल्यास त्याचा दाखला जोडावा लागतो.
- उमेदवार प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास अधिकृत सरकारी दाखला जोडणे बंधनकारक आहे.
- उमेदवारांना जिल्हानिहाय अर्ज भरणं आवश्यक असतं. महाराष्ट्रातील अनेक उमेदवार उमेदवार स्वत:च्या जिल्ह्यासोबतच मुंबई जिल्ह्याचादेखील अर्ज भरतात. कारण मुंबईत पदांची संख्या सर्वांत जास्त असते.
Eligibility / पात्रता
- मुलं आणि मुली अशा दोघांनाही रिक्त पदांसाठी अर्ज करता येतो.
- मुलींसाठी स्वतंत्र जागांची तरतूद असते आणि त्याचा जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला असतो.
Age / वय
- उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे.
- खुल्या वर्गासाठी वय 28 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. एससी, एसटी आणि ओबीसी इत्यादी राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना वयाच्या 33 वर्षापर्यंत अर्ज करता येतो.
Height / उंची
- मुलांची उंची 165 सेंटीमीटर असणे आवश्यक.
- सशस्त्र पोलीस दलासाठी मुलांची उंची 167 सेंटीमीटर असणे आवश्यक.
- मुलींची उंची 150 सेंटीमीटर असणे आवश्यक.
Weight / वजन
- मुलांचे वजन कमीतकमी 50 किलो असावे.
- मुलींचे वजन कमीतकमी 45 किलो असावे.
Educational Qualification / शिक्षण
- 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
- ड्रायव्हर आणि बॅण्डसमन पदासाठी उमेदवाराने 10 वी ची परीक्षा उर्तीर्ण असणे आवश्यक.
कौशल्ये
- ड्रायव्हर पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे वाहन चालक परवाना असायला हवा.
- बॅण्डसमन पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला यादीत नमूद कलेल्या वाद्यांपैकी एखादं वाद्य वाजवता येणं आवश्यक आहे. वाद्य प्रशिक्षण देणाऱ्या नोंदणीकृत संस्थेचं प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- कोणत्याही पद्धतीने दिव्यांग/अपंग व्यक्तीला पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करता येत नाही.
How to prepared for Police Bharti 2025 पोलीस भरतीसाठी तयारी कशी करायची?
- पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीसोबतच लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागतो. दोन्हीसाठी मिळून तयारीसाठी सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा असतो.
- शारीरिक आणि लेखी परीक्षा मिळून 150 गुणांची असते. यामध्ये 50 गुणांसाठी शारीरिक चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा असते.
- सर्वप्रथम शारीरिक चाचणीचं म्हणजेच मैदानी परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया.
मुलांसाठी
- गोळाफेक (15 गुण) : गोळ्याचे वजन 7 किलो 50 ग्रॅम असते. 8.5 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो.
- 100 मीटर धावणे (15 गुण) : कट ऑफ वेळ 11:50 सेकंद
- 1600 मीटर धावणे (20 गुण) : कट ऑफ वेळ 5 मिनिटे 10 सेकंद
मुलींसाठी
- गोळाफेक (15 गुण) : गोळ्याचे वजन 4 किलो असते. 6 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो.
- 100 मीटर धावणे (15 गुण) : कट ऑफ वेळ 14:00 सेकंद
- 800 मीटर धावणे (20 गुण) : कट ऑफ वेळ 2 मिनिटे 50 सेकंद
सराव कसा करावा?
- किमान सहा महिने दररोज धावण्याचा सराव करून स्टॅमिना वाढवावा.
- धावण्याच्या सरावासोबत शारीरिक कवायती आणि वजन उचलण्याचा सराव करणं गरजेचं.
- पूर्ण झोप घेणे आवश्यक. रात्री किमान 7 तास झोप घ्यावी. शरीराला रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी.
- परिपूर्ण आहार घ्यावा. आहारात चणा-हरभरा, डाळी, भाज्या, अंडी यांचा समावेश असावा.
Police Bharti 2025 Written examine लेखी परीक्षेचं स्वरूप
- लेखी परीक्षा 100 गुणांची असते. परीक्षेसाठी अंकगणित, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्यज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो. प्रत्येक विषयाला 25 गुण असतात. परीक्षेचा एकूण कालावधी दीड तासाचा असतो.
- प्रत्येक विषयांमध्ये कोणत्या गोष्टींची तयारी करणं आवश्यक?
- अंकगणित: संख्याप्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार, टक्केवारी, सरळव्याज सरासरी, लसावी-मसावी, गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ, कोन, क्षेत्रफळावरील प्रश्न, चाकाच्या फेऱ्या इ. समावेश असतो.
- बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, दिनदर्शिका, बेन आकृती, नातेसंबंध, दिशा, कूटप्रश्नक व इतर घटक असतात.
- मराठी व्याकरण: मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, वर्णमाला, समास, संधी, विभक्ती, अलंकार, म्हणी, वाकप्रचार, शुद्धलेखन, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द इ.
- सामान्यज्ञान व चालू घडामोडी: महाराष्ट्र, भारतातील ठिकाणं, नद्या, पर्वतरांगा, राजधान्या, ऐतिहासिक घटना, जगाचा भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, नियुक्त्या इ. गोष्टींवर प्रश्न विचारले जातात.
तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी दोन्ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. व्यायाम आणि अभ्यासाबरोबरच मन शांत ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
- परीक्षेत जितके महत्त्व व्यायाम आणि शारीरिक क्षमतेला आहे तितकेच महत्त्व बौद्धिक आणि आकलन क्षमतेला आहे. त्यामुळे रोज अभ्यास करणे आवश्यक ठरते.
- दररोजची वर्तमानपत्रे, पाक्षिकं वाचणे.
- मागील वर्षांचे पेपर सोडवणे.
- अभ्यास करताना महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवणे.
- वैकल्पिक पुस्तकांचे वाचन.
- गणितं सोडवण्याचा सराव करणे.
- परीक्षेमधील 70 टक्के गोष्टी सारख्याच असतात. फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलेलं असतं. 30 टक्के प्रश्न नवीन माहितीवर आधारित असतात.
- नजिकच्या पोलीस प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ शकता, जेणेकरून नेमका अभ्यासकम आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.
- पोलीस भरतीसाठीची तयारी, अर्ज भरणे, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, अंतिम यादी लागणे, प्रशिक्षण हा संपूर्ण कालावधी लक्षात घेतल्यास पोलीस शिपाई म्हणून रुजू होईपर्यंत किमान 2 वर्षांचा कालावधी जातो.
अशी असेल गुणदान पद्धत
गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) :
८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.
—————————————–
गोळाफेक (महिला : ४ किलोचा गोळा) :
६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ५.५० ते ६ मीटर : १२ गुण, ५ ते ५.५० मीटर : १० गुण, ४.५० ते ५ मीटर : ५ गुण, ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण ४.५० मीटरपेक्षा कमी : ३ गुण. चार मीटरपेक्षा कमी पडल्यास काहीच गुण मिळणार नाहीत.
———————————————————
१०० मीटर धावणे (पुरुष) :
११.५० सेकंद : १५ गुण, ११.५० सेकंदापेक्षा जास्त व १२. ५० सेकंदापेक्षा कमी : १२ गुण, १२.५० सेकंद व १३.५० सेकंदापेक्षा कमी : १० गुण, १३.५० सेकंद ते १४.५० सेकंद : ८ गुण, १४.५० ते १५.५० सेकंद : ६ गुण, १५.५० ते १६.५० सेकंद : ४ गुण, १६.५० ते १७.५० गुण : एक गुण.
———————————————
१०० मीटर धावणे (महिला) :
१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.
————————————————
८०० मीटर धावणे (महिला) :
२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण.
——————————————-
१६०० मीटर धावणे (पुरुष) :
५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.
Police Bharti 2025 new updates – As many as 17.76 lakh candidates have applied for 17,471 posts in the state in this phase through police recruitment. Considering the nomination papers, there are enough applications for police recruitment to take at least six months. Therefore, if the same candidate has applied for different posts in more than one district, they will now have to choose the same district. It has been made mandatory to give an undertaking for this. Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा; उमेदवारांना हमीपत्र देण्यासाठी दोन दिवसांची मुदत
पोलिस भरतीतून या टप्प्यात राज्यातील १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारी अर्जांचा विचार करता पोलिस भरतीसाठी किमान सहा महिने लागतील एवढे अर्ज आहेत. त्यामुळे एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यांना आता एकाच जिल्ह्याची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- सोलापूर ग्रामीणमध्ये चालकांच्या नऊ तर पोलिस शिपायाच्या ८५ जागांची भरती होत आहे. त्यासाठी ४५८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस खात्यातील जवळपास २०० पदांची भरती यावेळी होणार आहे. त्यासाठी दोन हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरूणांनी वेगवेगळ्या शहर- जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज केले आहेत.
उमेदवारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी हमीपत्र देण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या अलंकार हॉलमध्ये उपस्थित राहायचे आहे. उद्या (बुधवारी) व गुरुवारपर्यंत हमीपत्र देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून घेतल्यानंतर त्याचा अहवाल अप्पर पोलिस महासंचालकांना (प्रशिक्षण व खास पथके) पाठविला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. - ग्रामीण पोलिसांच्या उमेदवारांना सूचना – पोलिस भरती २०२२-२३ साठी सोलापूर जिल्ह्यात राहणाऱ्या ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एका एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत. अशा उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी एकाच जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र प्रत्यक्ष हजर राहून द्यायचे आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांच्या कार्यालयाकडून किंवा सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून ज्या उमेदवारांना मेसेज पाठविले आहेत किंवा मेसेज आले नाहीत पण अर्ज केला आहे, अशा सर्व उमेदवारांनी १५ व १६ मे रोजी सोलापूर शहरातील ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचे आहे. येताना उमेदवारांनी आधारकार्ड व त्याची छायांकित प्रत व भरलेल्या अर्जाची प्रत आणायची आहे.
- जिल्ह्यातील पोलिस भरतीची स्थिती
- (शहर पोलिस) – पोलिस शिपाई – 34
- चालक शिपाई – 16
- उमेदवारांचे अंदाजे अर्ज – 1600
- (ग्रामीण पोलिस) – चालक शिपाई – 9
- पोलिस शिपाई – 85
- उमेदवारांचे अंदाजे अर्ज – 458
Police Bharti 2025 new updates – During the police bharti process to be held in the Maharashtra state, candidates will be able to participate from the same district and any single section. The Home Department has advised candidates who have applied for the same post in different districts to choose any one district and submit an undertaking to the superintendent of police’s office. Around 17,000 police personnel are being recruited in the state. It has come to the notice of the Home Department that candidates have filed applications for different districts. Some seats remain vacant after the recruitment process as candidates apply at different places for the same post. This hurts some students on the waiting list. To avoid such a risk, candidates will be given the opportunity to participate in the recruitment process from any single district. Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पोलिस भरतीसाठी एकच अर्ज ग्राह्य; हमीपत्र द्यावे लागणार
राज्यात होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे, अशी सूचना गृह खात्याने दिली आहे. राज्यात सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरले आहेत, असे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे. उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. यातून प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते. असा धोका टाळण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
-
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध – Maharashtra SRPF Bharti 2025
-
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात – Police Bharti 2025
-
Domicile Certificate -पोलीस भरतीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक
-
Police Bharti Syllabus -पोलीस भरती परीक्षेचा सिलॅबस 2025
-
Police Bharti Document – पोलीस भरती कागदपत्रे 2025
Police Bharti 2025 non-eligible candidates updates – As many as 1.17 lakh candidates had applied for the post of district police driver. Of these, 2,897 candidates had applied for the same post from different districts through different e-mails and changing information. The court, however, refused to grant relief to the petitioners, saying the recruitment was for vacant posts in the police force and 97.5 per cent of the candidates could not be punished for the conduct of a handful of candidates. Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पोलीस भरतीतील 2 हजार पेक्षा जास्त उमेदवार न्यायालयाकडून अपात्र. नेमकं काय आहे कारण??
पोलीस भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या २ हजार ८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
- जिल्हा पोलीस चालक पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीनंतर एक लाख १७ हजार उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ८९७ उमेदवारांनी एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ई-मेलवरून आणि माहिती बदलून अर्ज केले होते. मात्र, ही भरती पोलीस दलातील रिक्त पदांसाठी असून ९७.५ टक्के उमेदवारांना मोजक्या उमेदवारांच्या वर्तनाची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देताना स्पष्ट केले.
- पोलीस भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्याबद्दल निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत; त्यामुळे हे उमेदवार अपात्र ठरले आहेत.
Police Bharti 2025 Physical Exam Date – A total of 17,471 police posts are being recruited across the state of Maharashtra. For this, 17.76 lakh unemployed youth of the state have applied. It has come to light that most of the candidates, including those who have completed D.T.Ed. and B.Ed. with engineering degrees, are graduates. The physical test can usually take two-and-a-half to three months as the number of applications received for Maharashtra Police recruitment is high. Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
The Field tests will begin after June 4, after the model code of conduct ends. Given the intensity of the heat, the Field tests will be held only in the morning session. Generally, the written exam can be held before Diwali. However, the Home Department is planning to ensure that the exam is not hampered by the model code of conduct or functioning of the Assembly.
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 लेटेस्ट टेस्ट सिरीज
महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…
पोलिस भरतीसंबंधित मोठी बातमी! १७,४७१ जागेंसाठी १७.७६ लाख अर्ज, जूनपासून मैदानी चाचणी;
महाराष्ट्र राज्यभरात १७ हजार ४७१ पदांची पोलिस भरती होत आहे. त्यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत. त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुण- तरूणींसह डीटीएड, बीएड झालेल्यांसह बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणत: अडीच ते तीन महिने लागू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एकाचवेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे. मागील भरतीवेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती. यंदा तशाप्रकारेच घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
- राज्यातील बेरोजगारीचे दर्शन यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून समोर आला आहे. जिल्हा परिषद, तलाठी भरतीत देखील जागांच्या तुलनेत दहापट अर्ज आले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदभरतीत एका जागेसाठी तब्बल ७८० उमेदवार रिंगणात आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेकरिता २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहेत. एकूणच या पोलिस भरतीत एका जागेसाठी १०२ उमेदवारांची परीक्षा होईल. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
- लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच ४ जूननंतर मैदानी चाचणीला सुरवात होईल. उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रातच मैदानी चाचणी होणार आहेत. साधारणत: दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होवू शकते. पण, विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे.
- लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर- ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, यावेळी बहुसंख्य पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येवू शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे अशी सद्य: स्थिती आहे.
- Police Bharti 2025 Physical Exam Date पदनाम रिक्त पदे अर्ज
- पोलिस शिपाई ९,५९५ ८.२२ लाख
- चालक १,६८६ १.९८ लाख
- पोलिस बॅण्डसमन ४१ ३२,०००
- एसआरपीएफ ४,३४९ ३.५० लाख
- तुरुंग शिपाई १,८०० ३.७२ लाख
- एकूण १७,४७१ १७.७६ लाख
Police Bharti 2025 Physical Exam Date- Under the police bharti process The marks of the field and written tests will be combined and the merit list of those who scored the highest marks in both the tests will be published. Accordingly, police constables will be selected and drivers will have to pass the traffic-related test separately for the post of police constable. Police officers and personnel are on duty ahead of the Lok Sabha elections. Reliable sources in the home department’s training and special teams department said the last phase of polling will end on May 20 and an on-field test will be conducted after that.
The recruitment process for 17,471 police posts in the state ended on April 15. As many as 17.76 lakh candidates from the state have applied for the recruitment. It is clear that 102 candidates will be in the fray for one post. This will be the first on-field test for police recruitment. There will be 100m and 1600m runs (800m for women) and shot put. Candidates are required to score at least 40 per cent marks in the field test. After the field test, 10 candidates will be selected for the written examination for one post. At least 40 per cent marks are expected in the 100-mark written exam.
20 मेनंतर पोलिस भरती मैदानी चाचणी; उन्हामुळे सकाळीच होणार मैदानी चाचणी
राज्यात १७ हजार ४७१ पदांसाठी पोलिस भरती होत असून, त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलला संपली. राज्यातील तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार एका पदासाठी १०२ उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे. पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. त्यात १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. मैदानी चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत.
- मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी- कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
- उन्हामुळे सकाळी ४ तासच मैदानी चाचणी – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २० मेनंतर मैदानी चाचणीला सुरवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते १० या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणत: ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबरअखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.
- भरती अर्जातून ७१ कोटींचे शुल्क जमा – पोलिस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपयांचे शुल्क होते. सध्याच्या पोलिस भरतीसाठी राज्यभरातील १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात काही उमेदवारांनी दोन-तीन अर्ज केल्याचीही उदाहरणे आहेत. अर्जाच्या शुल्कातून अंदाजे ७१ कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत.
Police Bharti 2025 Physical Exam Date पोलिस भरतीसंदर्भात ठळक बाबी…
- एकूण जागा – १७,४७१
- उमेदवारांचे अर्ज – १७,७६,०००
- अर्जातून जमा शुल्क – ७१.०४ कोटी
- मैदानी चाचणीचा वेळ – सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत
It has been decided to give 10% reservation in education and jobs to Maratha candidates who are economically, socially and educationally backward. The government has extended the deadline for applying for police recruitment till April 15. However, in view of the upcoming government holidays, aspirants are worried about how they will get the certificates in such a short span of time as they get four to five days for actual work.
Maratha children are likely to be deprived of police recruitment as the new government decision and application for SEBC certificate is not available on the mahaonline portal by the government. Pramod Khandge Patil, coordinator of The Sakal Maratha Samaj, has demanded that the process of distributing SEBC certificates to Maratha youth should be started immediately.
Police Bharti 2025 Physical Exam Date‘एसईबीसी’ प्रमाणपत्राअभावी मराठा तरुणांची अडचण
‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासाठीचा नवीन शासन निर्णय व अर्ज शासनाकडून महाऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध नसल्याने मराठा मुले पोलिस भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याची मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रमोद खांडगे पाटील यांनी केली आहे.
- आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा तरुण, तरुणींना शैक्षणिक व नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र यापुढील काळात येणाऱ्या शासकीय सुट्टीचे दिवस पाहता प्रत्यक्ष कामकाजासाठी चार ते पाच दिवस मिळत असल्याने इतक्या कमी कालावधीत दाखले कसे मिळणार, याची इच्छुक उमेदवारांना चिंता भेडसावत आहे. जुन्नर तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य योगेश तोडकर, अनिल गावडे, सचिन थोरवे यांनी प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
- तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याशी खांडगे पाटील यांनी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘महापोर्टलवर प्रमाणपत्र अपलोड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु यासाठी काही कालावधी लागू शकतो. मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.’’
- ‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासाठी सुरुवातीला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चा दाखला वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. नोकर भरती व शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले लाभार्थींना तत्काळ मिळावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाचे संदेश बारवे यांनी केली.
Young men and women from the Maratha community could not get SEBC certificates due to the government’s delay. The last date for submission of applications for police recruitment was March 31. As a result, many young men and women would miss the recruitment due to lack of certificates. Sakal newspaper had raised its voice in this regard. Taking note of this, the government has extended the deadline to apply for recruitment till April 15.
At the same time, the process of issuing certificates has also started from today. This has put the lives of those interested in recruiting in jeopardy. Considering the demand of the Maratha community, the state government held a special session on February 20. It gave 10 per cent reservation to economically backward families of the Maratha community. It was also announced that the reservation will benefit education and jobs. Accordingly, the youth of SEBC will be able to apply for the ongoing police recruitment.
पोलिस भरतीसाठी SEBC चे दाखले मिळण्याचा मार्ग ‘खुला’; शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला पर्याय
मराठा समाजातील तरुण-तरुणींना सरकारच्या दप्तरदिरंगाईमुळे एसईबीसीचे दाखले मिळत नव्हते. त्यातच पोलिस भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च होती. त्यामुळे दाखल्याअभावी अनेक तरुण- तरुणी या भरतीला मुकणार होते. त्यासंदर्भात ‘सकाळ’ने आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन शासनाने भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
- त्याचबरोबर दाखले देण्यासाठीची कार्यवाहीही आजपासून सुरू केली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. मराठा समाजाची मागणी विचारात घेऊन राज्य सरकारने २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेतले. त्यात मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाचा लाभ शिक्षण व नोकरीत होईल, असेही जाहीर करण्यात आले. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीत एसईबीसीतील तरुणांना अर्ज करता येणार आहेत.
- शासनाने आरक्षण २६ फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २५ मार्चपर्यंत तरी दाखले मिळालेले नव्हते. मराठा समाजातील अनेक तरुण- तरुणींनी एसईबीसी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले. मात्र, शासनाच्या जात प्रमाणपत्र वितरित होणाऱ्या संकेतस्थळावर २०१४ मधील आरक्षणाचाच संदर्भ दिसत होता. त्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदारांनी त्यासंदर्भातील मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते. दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च होती.
- मात्र, एसईबीसी प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी या भरतीत आरक्षण देण्यात आले असूनही दाखले मिळत नसल्याने त्यांना अर्जच करता येत नव्हता. परिणामी, राज्य शासनाने ही भरतीच पुढे ढकलावी, अशी मागणी तरुणांनी केली होती. यासंदर्भात ‘सकाळ’नेही आवाज उठवला होता. त्याची दखल शासनाने घेऊन शासनाने आता पोलिस भरतीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर शासनाने ऑनलाइन संकेतस्थळावर एसईबीसाचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने दाखले मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
- एसईबीसीचे प्रमाणपत्र शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून मिळण्यास प्रारंभ झाला आहे. त्यासाठीची आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून दाखले घेण्यासाठीची कार्यवाही करावी. दाखले लवकरात लवकर देण्यासाठीची कार्यवाही सुरू करत आहोत. -विजय पवार, तहसीलदार, कऱ्हाड
Police Bharti 2025 – The government has made the option of SEBC available on the online website. Certificates of SEBC will be distributed to the applicant youth from tomorrow (Monday). But income certificates, non-creamy layers and then caste certificates from tehsildars will take a long time. All eyes are now on what the district administration will come up with.
The recruitment process of 17,000 police personnel is currently underway in the state and the deadline to apply for it is now April 15. There is reservation for economically and socially backward youth (SEBC) of the Maratha community in this recruitment. However, they are yet to get the SEBC certificate and since the tenure is 30 to 45 days, those applying for recruitment will get a receipt of it.
The government’s online website has now started getting SEBC certificates. Since the tehsildar’s income certificate is required initially to get that certificate, it has been planned that the youths applying for caste certificates will get the certificates in a few days. – Manisha Kumbhar, Resident Deputy Collector, Solapur
For noncreamilayer certification…
- ■ Aadhaar card, voting card of the applicant
- ■ Applicant’s proof of residence
- ■ Applicant’s school leaving certificate
- ■ Caste certificate certificate
- ■ Three-year income certificate of tehsil (of parents)
Documents for SEBC Certification
- ■ Applicant’s Aadhaar card
- ■ Voting cards
- ■ Applicant’s proof of residence
- ■ Applicant’s school leaving certificate or admission issue extract
- ■ School certificate of any two relatives in the applicant’s blood
- ■ Aadhaar card or voting card of both the relatives
- ■ 10th or 12th Charter (for spelling) Genealogy (a photo of parents if the applicant is less than 18 years of age)
मराठा तरुणांना आजपासून ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेअर अन् जात प्रमाणपत्राच्या मुदतीचे काय ? – मराठा समाजातील तरुणांना आता ‘एसईबीसी’चे (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक) प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ऑनलाइन संकेतस्थळावर ‘एसईबीसी’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उद्यापासून (सोमवार) अर्जदार तरुणांना एसईबीसीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. पण तहसीलदारांकडील उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर व त्यानंतर जात प्रमाणपत्र, यासाठी मोठा कालावधी लागेल. त्यावर आता जिल्हा प्रशासन काय मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सध्या १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिलपर्यंत आहे. मराठा समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास तरुणांना (एसईबीसी) या भरतीत आरक्षण आहे. पण, त्यांना अद्याप ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळाले नसून त्याची मुदत देखील ३० ते ४५ दिवस असल्याने भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना त्याची पोच पावती चालणार आहे. ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर आता मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, पण त्यांना वेळेत दाखला मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला सुक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रे बंद असून संपूर्ण मदार आपले सरकार सेवा केंद्रांवर आहे. त्यातही चारशे केंद्रे बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर नोकर भरती व शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले लाभार्थीना तत्काळ मिळावेत, एवढीच सर्वांची अपेक्षा आहे.
शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्यास सुरवात झाली आहे. ते प्रमाणपत्र काढण्यासाठी सुरवातीला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जरुरी असल्याने जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज करणाऱ्या तरुण-तरुणींना काही दिवसांत दाखले मिळतील, यादृष्टीने नियोजन केले आहे. – मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी…
- ■ अर्जदाराचे आधारकार्ड, मतदान कार्ड
■ अर्जदाराचा रहिवासी पुरावा
■ अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला
■ जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र
■ तहसीलचे तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)
एसईबीसी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे
- ■ अर्जदाराचे आधार कार्ड
■ मतदान कार्ड
■ अर्जदाराचा रहिवासी पुरावा
■ अर्जदाराची शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा
■ अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाइकांचा शाळेचा दाखला
■ त्या दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
■ दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) वंशावळ (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास पालकांचा एक फोटो)
In the special session of the legislature, a bill to provide 10 per cent reservation to the Maratha community was passed unanimously. Accordingly, it was decided to implement reservation in recruitment and admission in educational institutions for socially, educationally backward classes from February 26; But this government decision does not appear on the government’s website, but there is a reference to the government decision of 2014. As a result, there are difficulties in obtaining SEBC certificates. Meanwhile, the process of filling the application process for police recruitment is currently underway and the deadline is March 31, which is only two days away. Meanwhile, there is resentment among the youth over non-availability of SEBC certificates. Police Bharti 2024 Physical Exam Date updates are given below.
For further education after 10th-12th, domicile, tehsil income certificate, dongri, caste, non-creamy layer, EWS for caste without reservation, OBC for those with Kunbi registration, new SEBC certificate for those who do not have Kunbi registration, farmer certificate, small holder etc. certificates are required. The necessary documents have started to be reconciled.
मराठा तरूण – तरूणी पोलिस भरतीला मुकण्याची शक्यता एसईबीसीचे दाखले मिळण्यात अडचणी ; अर्जांची मुदत ३१ पर्यंतच
विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यानुसार सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी नोकरभरती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात २६ फेब्रुवारीपासून आरक्षण लागू करण्याचा निर्णय झाला; परंतु शासनाच्या संकेतस्थळावर हा शासन निर्णय दिसत नसून त्याठिकाणी २०१४ मधील शासन निर्णयाचाच संदर्भ दिसत आहे. त्यामुळे एसईबीसीचे दाखले मिळताना अडचणी येत आहेत. त्यातच सध्या पोलिस भरतीसाठी अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू असून, त्याची मुदत ३१ मार्च आहे, त्याला अवघे दोनच दिवस राहिले आहेत. त्यातच एसईबीसीचे दाखले मिळत नसल्याने युवकांमध्ये नाराजी आहे.
दहावी-बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी डोमीसिअल, तहसील उत्पन्न दाखला, डोंगरी, जातीचा, नॉन क्रिमीलेअर, आरक्षण नसलेल्या जातीसाठी ईडब्ल्यूएस, कुणबी नोंद असलेल्यांना ओबीसी, कुणबी नोंद नसणाऱ्यांसाठी नव्याने एसईबीसी दाखला, शेतकरी दाखला, अल्पभूधारक आदी दाखल्यांची गरज असते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
मराठा समाजाची मागणी विचारात घेऊन राज्य सरकारने २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेतले. त्यात मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाचा लाभ शिक्षण व नोकरीत होईल, असेही जाहीर करण्यात आले. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीत एसईबीसीतील तरुणांना अर्ज करता येणार आहेत. शासनाने आरक्षण २६ फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आजअखेर कोणालाही ते एसईबीसीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे पहिले पाढे पंच्चावन्न अशीच स्थिती झाली आहे.
———–
राज्याच्या गृह विभागाने सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. एसईबीसीसाठी अर्ज केले तरीदेखील प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही भरतीच राज्य शासनाने पुढे ढकलावी. म्हणजे युवकांना एसईबीसीसाठी वेळ मिळेल. –प्रथमेश साळवी, कार्यकर्ता, मराठा क्रांती मोर्चा चिपळूण
Police Bharti 2025 – Applications for police recruitment in the state have been extended till April 15. The government had earlier fixed March 31 as the last date to apply. However, the candidates had brought to the notice of the government that the candidates were facing some technical difficulties in getting the documents. Students will have an additional 15 days to apply.
According to a press release issued by the police department, mahait has been made available for submission of applications by March 31. The state government has recently passed the Maratha Reservation Bill,
Its implementation process is underway at the government level. As such, there is a delay in getting the SEBC certificate for the candidates. The last date for submission of applications for all candidates is April 15, 2019.
If the maratha community is delayed in getting the certificate due to technical problems, the candidates concerned can submit the post receipt of the application for the certificate along with the application form. However, at the time of verification of documents, they are required to submit all the documents in the prescribed format. The police department has clarified.
पोलिस भरतीच्या अर्जांना मुदतवाढ; मराठा आरक्षणासह एसईबीसी प्रमाणपत्रातील विलंबाचा विचार
- राज्यातील पोलिस भरतीच्या अर्जांना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाने पुर्वी ३१ मार्च ही अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली होती. मात्र, उमेदवारांना कागदपत्रांसाठी काही तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याचे परीक्षार्थींनी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा जास्तीचा कालावधी मिळणार आहे.
- पोलीस विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार येत्या दिनांक ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याबाबत Mahait या संकेतस्थावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून,
- त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळवण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत १५ एप्रिल पर्यंत देण्यात येत आहे.
- मराठा समाजातील तरुणांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यास संबंधित उमेदवार प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोस्ट पावती अर्जासोबत सादर करू शकतात. मात्र कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी त्यांचे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. असेही पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
Police Bharti 2025 Candidates from the Maratha community are being harassed in filling the police recruitment form. From which category should the application be filled as you are not getting SEBC certificate? Interested candidates have been found in this confusion. There are only six days left to fill out the forms. As a result, interested candidates have been demanding that the state government extend the deadline for filing nominations by at least one month. The last date for submission of applications is 31st March 2024.
The state government implemented Maratha reservation for police recruitment. However, due to this reservation implemented at the time of the final examination, there seems to be a huge rush of Maratha candidates to get documents. The online application process began on March 5. However, in the last 15 days, the SEBC (Socially and Educationally Backward Classes) certificate for Maratha reservation has not been received yet. While the documents take 12 to 15 days, the deadline for submission of applications is approaching.
पोलिस भरतीसाठी ‘एसईबीसी ’ प्रमाणपत्राची प्रतीक्षा
पोलिस भरतीचा अर्ज भरण्यास मराठा समाजातील उमेदवारांची हेळसांड होत आहे. ‘एसईबीसी’ प्रमाणपत्र मिळत नसल्याने अर्ज कोणत्या प्रवर्गातून भरावा ? या संभ्रमावस्थेत इच्छुक उमेदवार सापडले आहेत. अर्ज भरण्यासाठी केवळ सहा दिवस उरले आहेत. परिणामी, राज्य सरकारने अर्ज भरण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी इच्छुक उमेदवारांकडून होत आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे.
राज्य सरकारने पोलिस भरतीसाठी मराठा आरक्षण लागू केले. मात्र, ऐन परीक्षेच्यावेळी लागू केलेल्या या आरक्षणामुळे कागदपत्रे काढण्यासाठी मराठा उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होताना दिसत आहे. ५ मार्चला ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, मागील पंधरा दिवसांत मराठा आरक्षणासाठीचे ‘एसईबीसी’ (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक) प्रमाणपत्र अद्यापही मिळू शकले नाही. कागदपत्रांसाठी १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागत असताना अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे.
- शासनाच्या संकेतस्थळावर २०१५ मधील निर्णय – मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतरही शासनाच्या संकेतस्थळावर फेब्रुवारी २०२४ चा शासन निर्णय दिसत नसून त्याठिकाणी २०१५ मधील शासन निर्णयाचाच संदर्भ दिसत आहे. तर ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळेना अशी परिस्थिती आहे. त्यामुळे, तहसील कार्यालय देखील संभ्रमावस्थेत आहे. परिणामी, कोणत्याही उमेदवारांचे नुकसान होऊ नये हा हेतू मनात ठेवून गृह विभागाने अर्ज दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
- मराठा उमेदवारांसाठी दहा टक्के जागा – राज्य सरकारने १७ हजार ४३० जागांवरील पोलिस भरतीसाठी ५ ते ३१ मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये १० टक्के जागा मराठा समाजातील उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असून त्यासाठी मोठा वेळ जात आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. मराठा समाजातील तरुणांना एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक), नॉन क्रिमीलेअर यासारखी कागदपत्रे काढण्यासाठी काही तांत्रिक कारणांमुळे वेळ लागत आहे. त्यामुळे, उमेदवारांच्या भविष्याचा विचार गृह विभाग करणार का? किंवा काय निर्णय घेणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- ‘‘मी मराठा समाजाचा आहे. पोलिस भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होऊन महिना संपला, तरी देखील अद्याप कोणालाच ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळालेले नाही.’’ – योगेश पाटील, इच्छुक उमेदवार
- ‘‘सध्या कुणबी दाखले देत आहोत. शासनाकडून ‘एसईबीसी’ प्रमाणपत्राविषयी काही अपडेट आलेले नाहीत. अद्याप ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र दिलेले नाहीत.’’ – जयराज देशमुख, तहसिलदार
Police Bharti 2025 Physical Exam Date – In the special session of the legislature, a bill to provide 10 per cent reservation to the Maratha community was unanimously passed and it was decided to implement reservation in recruitment and admission in educational institutions for socially, educationally backward classes from February 26. But the government’s website does not show the government decision of February 2024, but there is a reference to the government decision of 2015. In a confused state, the tehsildar has sought guidance from the district collector on how to distribute caste certificates. A month after the reservation decision was taken, no one is yet to get the SEBC certificate.
The home department has started the recruitment process of around 17,000 police personnel in the state. The deadline to apply for recruitment is March 31 and there are now nine days left for the same. Reservation has also been given in this recruitment for the youth of SEBC category, but many have applied only from the open category as they are not getting caste certificates. The fact is that even if you apply for SEBC in four-five days, it can take at least 15 to 30 days to get the certificate.
मराठा आरक्षणानंतरही ‘SEBC’चे प्रमाणपत्र मिळेना! शासन संकेतस्थळावर २०१५मधील निर्णयाचाच संदर्भ; पोलिस भरतीमुळे तहसीलदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर झाले आणि सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी नोकरभरती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात २६ फेब्रुवारीपासून आरक्षण लागू करण्याचा निर्णय झाला. परंतु शासनाच्या संकेतस्थळावर फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णय दिसत नसून त्याठिकाणी २०१५ मधील शासन निर्णयाचाच संदर्भ दिसत आहे. संभ्रमावस्थेतील तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जात प्रमाणपत्र वितरित करायचे कसे, यासंदर्भातील मार्गदर्शन मागविले आहे. आरक्षणाचा निर्णय होऊन महिना संपला, तरीदेखील अद्याप कोणालाच ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळालेले नाही.
- मराठा समाजाची मागणी विचारात घेऊन २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन पार पडले. शासनाने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी १० टक्के आरक्षण दिले. या आरक्षणाचा लाभ शिक्षण व नोकरीत होणार आहे. सध्या अनेक शासकीय विभागांची भरती थांबली असून सध्या सुरु असलेल्या पोलिस भरतीत देखील ‘एसईबीसी’तील तरुणांना अर्ज करता येणार आहेत. शासनाने आरक्षण २६ फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याला आता २६ दिवस होऊन गेले, तरीही कोणालाच ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळालेले नाही.
- शासनाच्या जात प्रमाणपत्र वितरित होणाऱ्या संकेतस्थळावर अद्याप २०१५ मधील आरक्षणाचाच संदर्भ दिसत आहे. त्यानुसार प्रमाणपत्र वितरित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक तरुण- तरुणींनी ‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असून त्यासंदर्भात काय निर्णय घ्यावा, यासंबंधीचे मार्गदर्शन तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले आहे. पण, जिल्हा प्रशासनाने त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागविले असून अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही अशी सद्य:स्थिती आहे.
- शासन स्तरावरून लवकरच प्रश्न सुटेल – तालुकास्तरावर प्राप्त मराठा तरुणांच्या मागणीनुसार त्यांना ‘एसईबीसी’ प्रमाणपत्र देताना शासनाच्या संकेतस्थळावर अडचणी येत असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लाभार्थींना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र तत्काळ मिळावे, यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. लवकरच त्यांचा प्रश्न सुटेल. – मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
- Police Bharti 2025 Physical Exam Dateपोलिस भरतीसाठी ‘खुल्या’तूनच अर्ज – गृह विभागाने राज्यात जवळपास १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असून आता त्यासाठी नऊ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ‘एसईबीसी’ प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी देखील या भरतीत आरक्षण देण्यात आले आहे, पण जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांनी खुल्या प्रवर्गातूनच अर्ज केले आहेत. आता अर्ज चार-पाच दिवसांत ‘एसईबीसी’साठी अर्ज केले तरीदेखील प्रमाणपत्र मिळण्यासाठी किमान १५ ते ३० दिवस लागू शकतात अशी वस्तुस्थिती आहे.
Police Bharti 2025 Physical Test Details – Though the last date for submission of applications for police recruitment is March 31, confusion continues as to when the physical ability test will be conducted. In the run-up to the Lok Sabha elections, the police machinery will get involved in a double whammy. Also, there is no clarity on whether the physical ability test will be conducted before or after the monsoon as the next schedule of recruitment has not been announced.
There are 17,430 seats in the state. The online application process for the same will begin on March 5. The deadline is March 31.
Candidates waiting for recruitment have prepared hard for it. However, there is unease among them as the next recruitment schedule has not been announced. In March itself, the mercury has reached 36 degrees. They are worried about how much it will increase in April-May. They face the challenge of field exams in the heat. They are demanding that the next schedule be announced soon as the police machinery will be involved in security.
पोलिस भरतीची शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा कधी ? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परीक्षार्थीत संभ्रम
पोलिस भरतीसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असली तरी शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा कधी होणार, याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा दोबस्तात गुंतणार आहे. त्यातही भरतीचे पुढील वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा पावसाळ्यापूर्वी की पावसाळ्यानंतर होणार, याची स्पष्टता नसल्याने उमेदवारांत चिंता वाढली आहे.
- Police Bharti 2025 Physical Exam Date कोल्हापूर व इचलकरंजी लोकसभा मतदारसंघांसाठी सात मे रोजी मतदान, तर निकाल चार जूनला आहे. परिणामी पोलिस यंत्रणेवर बंदोबस्ताचा ताण आहे. तत्पूर्वी, राज्यात १७ हजार ४३० जागांसाठी झाली आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पाच मार्चपासून सुरू आहे. त्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस शिपाई पदाच्या १५४, तर चालकाच्या ५९ जागा आहे. सशस्त्र पोलिस (राखीव बटालियन) पदासाठी १८२ व कारागृह पदाकरिता पश्चिम विभागात १८०० जागांची भरती केली जाणार आहे.
- भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी त्यासाठी जोरदार तयार केली आहे. मात्र, भरतीचे पुढील वेळापत्रक जाहीर नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. मार्चमध्येच उन्हाचा पारा ३६ अंशावर पोचला आहे. एप्रिल-मेमध्ये तो किती वाढेल, याची चिंता त्यांना आहे. उन्हाच्या तडाख्यात मैदानी परीक्षेचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पोलिस यंत्रणा बंदोबस्तात गुंतणार असल्याने पुढील वेळापत्रक लवकर जाहीर करावे, अशी मागणी त्यांच्यातून आहे.
- पोलिस भरती जाहीर केल्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, मैदानी अर्थात शारीरिक क्षमता चाचणी कधी होणार, हे कळत नाही. त्याचे वेळापत्रक लवकर जाहीर झाले तर आमच्यावरील ताण कमी होईल. काही विद्यार्थी काम बंद करून तयारीला लागले आहेत. परीक्षेचे निश्चित वेळापत्रक कळाले तर त्यांना आर्थिक नियोजन करणे सोयीचे होईल. – ऋतुराज पाटील, परीक्षार्थी
Police Bharti 2025 Physical Exam Date, Written Exam, Education Details, who to prepared for examine etc., given here. etc., As many as 17,441, police constable posts will be filled in the state. The finance department has approved filling up of 100 per cent vacant posts. The state government has announced to fill up the posts of police constable cadre required to maintain law and order in the state. As per the government order of 2022, the finance department has approved the revised framework, allowing departments to fill up 50 %of the vacant posts outside the purview of the Maharashtra Public Service Commission. However, it has been exempted for police recruitment, paving the way for filling up 100 % posts of police constables. The vacancies include police constable, police driver, bandsman (police band squad), armed police, prison constable.
पोलीस भरती कधी होणार, फॉर्म कसा भरायचा आणि कशी करायची तयारी? सविस्तर समजून घ्या
राज्यात पोलीत भरतीचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल 17,441 हजार पोलीस शिपायांची पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाने 100 टक्के रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस शिपाई संवर्गातील पदे भरण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. 2022 च्या शासन आदेशानुसार वित्त विभागाने सुधारित आकृतीबंध मंजूर केले असून, विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्यास अनुमती दिली आहे. मात्र पोलीस भरतीसाठी त्यामध्ये सूट दिली असल्याने पोलीस शिपायांची 100 टक्के पदं भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, बॅण्डसमन (पोलीस बॅंड पथक) , सशस्त्र पोलीस, कारागृह शिपाई या पदांचा रिक्त पदांमध्ये समावेश आहे.
Police Bharti 2025 Physical Exam Date पोलीस भरती कधी होणार?
- दरवर्षी राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालयं आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांमधून निवृत्त झालेल्या रिक्त पदांची भरती सरकारला करावी लागते. ज्येष्ठतेच्या निकषानुसार दरवर्षी ठराविक जागा रिक्त होत असतात, मात्र दरवर्षी भरती केलीच जाते असं नाही.
- गेली अनेक वर्ष पोलीस भरतीचं गणित बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार अनेकदा अचानक रिक्त पदांच्या भरतीसाठी एकगठ्ठा मंजूरी देतं.
- सरकारने नव्याने मान्यता दिलेल्या 17, 441 हजार पदांच्या भरतीचे वेळापत्रक अद्याप निश्चित केलेले नाही. सरकारने केवळ शासन निर्णय काढला आहे.
- भरती प्रक्रियेसाठी सर्वप्रथम प्रशिक्षण व खास पथकांच्या पोलीस महासंचालकांद्वारे बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड केली जाईल.
- या कंपनीतर्फे अर्ज स्वीकृती, छाननी करण्यात येईल. यापूर्वीची पद्धत पाहता यावेळेची परिक्षादेखील ऑनलाइन पद्धतीने घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Police Bharti 2025 Physical Exam Date
According to Maharashtra Police Bharti 2022 new GR The first phase of selection is Physical Test. The Government has revised the Maharashtra Police Constable Service Entry Rules. According to this, the first physical test will be conducted for police recruitment. Only the candidates who pass the field test will be conducted in the written test.
Police Bharti 2025 Physical Exam Date Maha Police Bharti -Physical Test Details
Physical test criteria for police Bharti is different for male and female. But, the distribution of marks for the test will be the same for both.
Maha Police Shipai Physical Test Exam Pattern 2025:
Physical Test for Males
-
- 1600m Running)- 20 Marks
- 100 Meters Running)- 15 Marks
- Shot Put- 15 Marks
- Total – 50 Marks
Physical Test for Females
-
- 800 Meters Running- 20 Marks
- 1100 Meters Running – 15 गुण
- Shot Put- 15 Marks
- Total – 5 0Marks
Maha Police Shipai Driver Physical Test Exam Pattern 2025
Physical Test Males :
-
- 1600m Running- 30 Marks
- Shot Put- 20 Marks
- Total – 50 Marks
Physical Test Females:
-
- 800 Meters Running- 30 Marks
- Shot Put- 20 Marks
- एकूण गुण (Total) – 50 Marks
Police Bharti 2025 Physical Exam Date
- Candidates securing minimum 50 percent marks in physical test will be eligible for written test of 100 marks in ratio 1:10 of advertised vacancies in respective category, written test will have questions based on Arithmetic, General Knowledge & Current Affairs, Intelligence Test Marathi Grammar.
- The questions asked in the written test will be of multiple choice type. The examination will be conducted in Marathi language. Also the duration of this written test will be 90 minutes. Candidates must secure minimum 40 percent marks in written test.
- Candidates with less than 40 percent marks in the written test will be considered ineligible. The government has approved the OMR (Optical Mark Recognition) method for conducting the written examination in the said police recruitment as a special matter.
Police Bharti 2024 Physical Exam Details, Important Documents List, Pattern & Date