Police Adhikari Bharti-पोलिसांना अधिकारी पदांच्या ६३० जागा रिक्त
Police Adhikari Bharti 2023 For 630 Posts
Police Adhikari Bharti 2023 Updates
Police Adhikari Bharti 2023 Details & Exam info. : There are 630 vacant posts of police officers in police department. Constables recruited in the police department can go up to the rank of Naik of Police, Constable to Assistant Sub-Inspector of Police by promotion. But if one wants to become an officer i.e. sub-inspector, the police are given an opportunity to take the exam within the department. The examination is conducted every year under departmental department through Maharashtra Public Service Commission. The exam was conducted in the year 2022 after about five years after the year 2017. But during this examination only 249 posts were filled without filling all the 750 vacancies. Examination was not conducted for remaining posts. By the end of the year 2022, when the updated information of such reserved posts was taken, it was found that about 630 posts were vacant. Read the complete details given below:
Police Adhikari Recruitment 2023
पोलिस खात्यामध्ये भरती होणाऱ्या शिपायास पदोन्नतीने पोलिस नाईक, हवालदार ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत जाता येते. मात्र अधिकारी म्हणजेच उपनिरीक्षक व्हायचे असेल तर पोलिसांना खात्यांतर्गत परीक्षा देण्याची संधी दिली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत विभागीय खात्यांतर्गत परीक्षा दरवर्षी घेतली जाते. सन २०१७नंतर सुमारे पाच वर्षांनी सन २०२२मध्ये परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेदरम्यान रिक्त असलेल्या सर्व ७५० जागा न भरता केवळ २४९ पदे भरण्यात आली. उर्वरित पदांसाठी परीक्षा घेतली गेली नाही. सन २०२२ अखेरीस अशा राखीव पदांची अद्ययावत माहिती काढण्यात आली असता सुमारे ६३० पदे रिक्त असल्याचे दिसून आले आहे.
Police Adhikari Bharti 2023 Exam
- पोलिस दलामध्ये शिपाई म्हणून भरती होणाऱ्या पोलिसांना अधिकारी होता यावे यासाठी पोलिस दलामध्ये काही राखीव जागा ठेवण्यात येतात. पोलिस दलातील उच्चशिक्षित पोलिस कॉन्स्टेबल यांना खात्यांतर्गत परीक्षा देऊन अधिकारी होता येते. राखीव असलेल्या ६३० पदांसाठी शासनाच्या वतीने परीक्षा घेण्याचे कोणतेही आदेश जारी होत नसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात तयारीला लागलेल्या पोलिसांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची भीती आहे. एक बाजूला वय वाढत असून दुसऱ्या बाजूला परीक्षेसाठी चालढकल होत असल्याने पोलिस शिपायांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
- पोलिस शिपायांना आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि अधिकारी होण्याची ही परीक्षा म्हणजे एक संधी असते. शिपाईपदी भरती झालेले राज्यातील हजारो पोलिस या परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र मार्च महिना उलटला तरी अद्याप परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याने पोलिसांमध्ये प्रचंड रोष आहे. ही रिक्त पदे डिसेंबर २०२३पर्यंत भरली जाण्याचे अपेक्षित असले तरी ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी होत आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाने याबाबत गृहविभागाकडे कळविले असूनही अद्याप परीक्षा घेतली जात नसल्याने पोलिसांमध्ये रोष आहे.
वय वाढत असल्याने चिंता – परीक्षेसाठी वयोमर्यादा असल्यामुळे ठराविक वय निघून गेले की आम्हाला परीक्षेला बसण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर खात्यांतर्गत उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा घेण्याच्या सूचना एमपीएससीला कराव्यात, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.