‘एक्झिट’चे ग्रहण सध्या सुटले, डी. फार्म नोंदणी सुरू – Pharmacy Admission
Pharmacy Admission 2024-2025
D.Pharmacy Admission 2025-2026 Registration Process open – This year, despite the postponement of the exit, the website was asking for a certificate of examination and there was no registration until it was submitted. Lokmat had published a report highlighting the inconvenience caused to the student. Two-year-old D. Despite passing the farm course, the exit has been implemented for further progress. Only then will the diploma certificate be obtained and the license to open a drug store will also be obtained. However, this year, the exam has been put on hold and instructions have been issued to register the licence for a year. However, the next process was stopped as the students who had gone to register were only being asked for an ‘exit’. Following the Lokmat report, the Maharashtra State Council of Pharmaceutical Business has taken cognizance and issued an exit column. Student registration began on Wednesday.
‘एक्झिट’चे ग्रहण सध्या सुटले, डी. फार्म नोंदणी सुरू – औषध व्यवसाय परिषदेने घेतली दखल
डी. फार्मच्या २०२३-२४ सत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यावरचे ‘एक्झिट’ परीक्षेचे ग्रहण यंदापुरते सुटले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ‘एक्झिट’साठी अडकलेले परवाना रजिस्ट्रेशनचे कार्य अखेर सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे नोंदणीचे शुल्कही अर्ध्यावर आणण्यात आले आहे.
- यावर्षी एक्झिट स्थगित करूनही वेबसाइटवर परीक्षेचे प्रमाणपत्र मागण्यात येत होते व ते सादर केल्याशिवाय नोंदणीच होत नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने ठळकपणे वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्याच्या गैरसोयीला वाचा फोडली होती. दोन वर्षांचा डी. फार्मचा अभ्यासक्रम उत्तीर्ण करूनही पुढच्या वाटचालीसाठी एक्झिट लागू करण्यात आली आहे. त्यानंतरच पदविका प्रमाणपत्र प्राप्त होईल व औषधी दुकान सुरू करण्याचा परवानासुद्धा मिळणार आहे. मात्र, यावर्षी या परीक्षेला स्थगिती देत वर्षभरासाठी परवान्याची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, नोंदणी करायला गेलेल्या विद्यार्थ्यांना ‘एक्झिट’चीच मागणी केली जात असल्याने पुढची प्रक्रिया बंद पडत होती. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेने दखल घेत एक्झिटचा कॉलम काढला आहे. त्यामुळे बुधवारपासून विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू झाले.
- ‘एक्झिट’चे शुल्कही वापस – दरम्यान नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसद्वारे ‘एक्झिट’ परीक्षा लागू झाल्यानंतर विद्यार्थ्याकडून परीक्षा शुल्क घेतले गेले. परीक्षा स्थगित केल्यानंतरही हे शुल्क परत मिळण्यास विलंब होत होता. ‘लोकमत’ने या विषयालाही वाचा फोडली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही परत मिळणे सुरू झाले आहे.
- रजिस्ट्रेशन शुल्कही अर्ध्यावर – नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात नोंदणीची व्यवस्था केली आहे. त्यासाठी फार्मसी कॉन्सिलद्वारे नोंदणी शुल्कासाठी ३००० रुपये घेतले जात होते. कॉन्सिलने आता हे शुल्क कमी करून १२०० रुपये केले आहे.
The exit exam, which was to be conducted to register as pharmacists for students who have completed D.Pharmacy courses, has been postponed indefinitely. The Pharmacy Council of India has directed that students who have passed the D.Pharmacy course in 2023-2024 should be given a license to do business for one year on a temporary basis till the time the examination is conducted.
For the first time this year, the National Board of Examinations of the Department of Medical Sciences was to conduct an exit exam to register as pharmacists. However, the Pharmacy Council of India has postponed the exam scheduled to be held from October 3 to 5. Three papers were to be conducted for the exit exam. However, a fee of Rs 5,900 was to be charged for these three papers. There was outrage from the pharmacy sector. The faculty and students’ unions had also demanded that only one paper be held.
डी. फार्मच्या विद्यार्थ्यांची फार्मासिस्ट नोंदणी होणार, एक वर्षाचा परवाना देण्याचे निर्देश
- डी. फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी घेण्यात येणारी एग्झिट परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा होईपर्यंत २०२३- २०२४ मध्ये डी. फार्मसी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपात एका वर्षासाठी व्यवसाय करण्याचा परवाना द्यावा, असे निर्देश फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने दिले आहेत.
- आयुर्विज्ञान विभागाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून यंदा प्रथमच फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी एग्झिट परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणारी ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. यामागे एग्झिट परीक्षेसाठी तीन पेपर घेतले जाणार होते. मात्र, या तीन पेपरसाठी ५,९०० रुपये शुल्क आकारले जाणार होते. त्यावर फार्मसी क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच केवळ एकच पेपर घ्यावा, अशी मागणी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनांनी केली होती.
- एक्झिट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यकच डी. फार्मसी अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन जवळपास सहा महिने उलटल्यानंतरही एक्झिट परीक्षा झाली नसल्याने हे विद्यार्थी फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करू शकले नाहीत. फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करून रोजगाराचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार पीसीआयने या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश राज्याच्या फार्मसी कौन्सिलला दिले आहेत. एका वर्षासाठी ही नोंदणी केली जाणार आहे. मात्र, एका वर्षाने पुन्हा नोंदणी करण्यापूर्वी फार्मसी एक्झिट परीक्षा उत्तीर्ण करणे या विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल.
Pharmacy Admission 2024-2025 – The admission process for the pharmacy stream has been delayed. The process was halted after two rounds. In these rounds, 60 per cent of the seats were filled. The course for these students did not begin. As a result, the academic future of 53,800 students is hanging in the balance. Moreover, the existence of 1,381 pharmacy colleges across the state is also under threat. The Pharmacy Council of India (PCI) allowed new pharmacy colleges. Moreover, the admission capacity of some colleges was increased. But the government has not taken a decision in this regard as the model code of conduct for assembly elections has been put in place. Till then, two rounds of admission to existing colleges had been completed. These include D.Pharm., B. Farm. and M. 60% of the farm seats were filled. The admission process was then put on hold.
‘फार्मसी’च् अभ्यासक्रम अद्याप सुरू न झाल्याने ५३ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
औषध निर्माणशास्त्र शाखेची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. दोन फेऱ्या झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आली. या फेऱ्यांमध्ये प्रवेश क्षमतेच्या ६० टक्के जागा भरण्यात आल्या. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू झाला नाही. परिणामी ५३ हजार ८०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. शिवाय, राज्यभरातील १३८१ फार्मसी महाविद्यालयाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) नवीन फार्मसी महाविद्यालयांना परवानगी दिली. शिवाय, काही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढविली. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या संदर्भातील शासन निर्णय झालेला नाही. त्यापूर्वी पर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांचे प्रवेशाचे दोन राऊंड पूर्ण झाले होते. यामध्ये डी.फार्म., बी. फार्म. आणि एम. फार्म.च्या ६० टक्के जागा भरण्यात आल्या. यानंतर प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली.
प्रवेश क्षमता
- अभ्यासक्रम महाविद्यालय क्षमता
- डी.फार्म. ६७१ ४०,२७०
- बी. फार्म. ५०५ ४०,५७०
- एम. फार्म. २०५ ७.३३७
फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेचा निर्णय शासनाने तातडीने घेतला पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. शिवाय, महाविद्यालयांनाही आर्थिक प्रश्न भेडसावणार नाही. – डॉ. ए. व्ही. चांदेवार, प्राचार्य, फार्मसी महाविद्यालय
रखडलेली प्रवेश प्रक्रिया
- प्रथम वर्षाचे पहिली सत्र परीक्षा १ डिसेंबरमध्ये घेतली जाते. यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आणखी प्रवेश प्रक्रियाही सुरु झालेली नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा घेणे अशक्य आहे.
- एका सत्रासाठी किमान ९० दिवसांचा अभ्यासाचा कालावधी आहे. आता सरकार स्थापनेनंतर शासन निर्णय होऊन प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यास मार्च महिन्यात पहिले सेमिस्टर होऊ शकते.
स्कॉलरशिपलाही उशीर
- महाराष्ट्रातील औषध निर्माणशास्त्र शाखेची सर्व महाविद्यालये विनाअनुदानित आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला विलंब झाल्याने त्यांची स्कॉलरशिप ही उशिरा सुरु होईल.
- तोपर्यंत महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन, दैनंदिन व्यवहार करताना महाविद्यालयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. केवळ शासनाचा खेळखंडोबा सुरु असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
pharmacists registration