कवयित्री बहिणाबाई चौधरी पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) सुरू झाली – PET Exam 2025

PET Exam 2025

PET Exam 2025

The PhD entrance preliminary examination (PET) of Kaviyatri Bahinabai Chaudhary North Maharashtra University began smoothly on Thursday, January 2. On the first day, 614 out of 806 students appeared for the exam. The PET exam has started at the university’s online examination centre and the exam for various subjects will be held till January 5. On the first day, exams for some subjects in the Faculty of Science and Technology were held in four sessions.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) गुरुवार, २ जानेवारीपासून सुरळीत सुरू झाली. पहिल्या दिवशी ८०६ विद्यार्थ्यांपैकी ६१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा केंद्रात पेट परीक्षा सुरू झाली असून ५ जानेवारीपर्यंत विविध विषयांची परीक्षा होणार आहे. पहिल्या दिवशी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील काही विषयांच्या चार सत्रात परीक्षा झाल्या. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रा. समीर नारखेडे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. मुख्य समन्वयक प्रा. मनोज पाटील, समन्वयक सुरेंद्र कापसे, केंद्र प्रमुख के. एफ. पवार, तांत्रिक अधिकारी दाऊदी हुसेन काम पाहत आहेत. संशोधन विभागाचे सहकार्य लाभत आहे.


PET Exam 2024 – Ph.D. on the basis of national level eligibility test (NET) marks. The University Grants Commission (UGC) has recently announced the implementation of the admission process. This year’s Ph.D. from Savitribai Phule Pune University The Eligibility Test (PET) is likely to be the last test in this system. The university is in talks with the UGC in this regard and may get permission for the final PET exam. According to senior officials, the exam will be held in the first week of June, starting accepting applications for the PET exam next week.

यंदाची ‘पेट’ ठरणार शेवटची ? – ‘यूजीसी’च्या नव्या नियमामुळे होणार बदल

राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा (नेट) गुणांच्या आधारे पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबविण्याची घोषणा विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच केली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची यंदाची पीएच.डी. पात्रता परीक्षा (पेट) ही या पद्धतीतील शेवटची परीक्षा ठरण्याची शक्यता आहे. विद्यापीठाकडून ‘यूजीसी’शी यासंबंधी पत्रव्यवहार केला जात असून, शेवटच्या ‘पेट’ परीक्षेसाठी परवानगी मिळू शकते. त्यामुळे पुढील आठवड्यात ‘पेट’ परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासह राज्य व देशभरातील विद्यार्थी ‘पेट’ परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ‘नेट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे पीएच. डी. देण्याची घोषणा झाल्याने विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा होणार की नाही, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू झाली होती. विद्यापीठानेसुद्धा ‘पेट’ परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, यूजीसीच्या घोषणेमुळे विद्यापीठाने सावध भूमिका घेत यूजीसीकडे पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून ‘पेट’ परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली जाणार आहे.

  • म्हणून शेवटची ‘पेट’ होईल – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यापीठाने पीएच. डी. प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाच्या संख्येत घट झाली आहे. त्यात केवळ ‘नेट’ परीक्षेच्या आधारे प्रवेश देण्याचा निर्णय झाला, तर विद्यार्थ्यांना आणखी काही महिने पीएच.डी. प्रवेशाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, यूजीसीकडून विद्यापीठाला शेवटची परीक्षा घेण्याची संधी दिली जाईल, अशी दाट शक्यता आहे…
  • रविवारी ‘सेट’ परीक्षा – सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) रविवारी (ता. ७) आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील एक लाख २५ हजारांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले असून, ऑफलाइन पद्धतीची ही शेवटची परीक्षा असणार आहे. सेट विभागाच्या वतीने परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र प्राप्त झाले आहेत.

Ph.D. from Savitribai Phule Pune University. D. The entrance test (PET) is likely to be held in the last week of April. Senior university officials said the event will be held after the state-level faculty eligibility test (SET). The SAT exam will be conducted by the university itself on The 7th in the first week of April. Hence, ph. D. The entrance exam is also likely to be conducted in the last week of the same month. An official announcement in this regard will be made by the university soon, it added.

पुणे विद्यापीठाची ‘पेट’ परीक्षा एप्रिलअखेरच अपेक्षित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. प्रवेश पूर्वपरीक्षा (पेट) एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’नंतर हे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

PET Exam 2024  – एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सात तारखेला विद्यापीठातर्फेच सेट परीक्षा होणार आहे. त्यामुळे पीएच. डी. प्रवेश पूर्वपरीक्षा ही त्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठातर्फे लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाने पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. परंतु, या नियमावलीला संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विरोध होत आहे. पीएच. डी. संशोधन केंद्र असणाऱ्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकवल्या जाणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनाच यापुढील काळात विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करता येणार आहे. परिणामी पीएच. डी. मार्गदर्शकांची संख्या कमी होणार आहे. पीएच.डी. मार्गदर्शकांकडे उपलब्ध असलेल्या जागा विचारात घेऊनच विद्यापीठाकडून प्रवेश पूर्वपरीक्षा घेतली जाते. त्यामुळे पुढील काही दिवसांत पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले जातील. परंतु, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी असणार आहे.

‘नेट’ला असते प्राधान्य ■ दरवर्षी विद्यापीठात पीएच.डी.साठी साधारण तीन हजार जागा उपलब्ध होतात. त्यानुसार यातील एक हजार ६५० जागा ‘नेट’ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यामुळे ‘पेट’ आणि ‘सेट’ मधून उर्वरित एक हजार ३५० जागांवर प्रवेश होतील. ‘नेट’च्या तुलनेत ‘पेट’ आणि ‘सेट’ची काठिण्यपातळी कमी असते. त्यामुळे ‘पेट’ आणि ‘सेट’ मधून विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते, असेही निदर्शनास आले आहे.


Pune University PET Exam 2022: Savitribai Phule Pune University has announced the date of PhD entrance exam. This exam will be conducted on November 6. The PET exam will be conducted online. The online application process will continue till September 30.  Read More details are given below .

विद्यापीठाची पेट परीक्षा ३ नोव्हेंबरला होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) 6 नोव्हेंबरला परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

या परीक्षेद्वारे विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न संशोधन केंद्रातील पीएचडी अभ्यासक्रमाच्या एकूण 3 हजार 187 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाने ‘पेट’साठी परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परिपत्रकानुसार 100 गुणांची ही परीक्षा होणार आहे. दोन तासांच्या परीक्षेत रिसर्च मेथडॉलॉजी आणि संबंधित विषय असे दोन पेपर होणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1000 रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 800 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

एमफिल, नेट, पेट 2021 अशा परीक्षा उत्तीर्ण असणार्‍या विद्यार्थ्यांना, ही परीक्षा देण्यापासून सवलत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जासोबतच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरून, सहभागी व्हावे लागणार आहे. या परीक्षेबाबत अधिक माहिती विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.

काही अभ्यासक्रमांसाठी नाममात्र जागा…

  • 3 हजार 187 हजार जागांसाठी पेट होणार असली, तरी काही विषयांसाठी फारच कमी जागा उपलब्ध आहेत.
  • त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण झाला, तरी त्याला प्रवेश मिळणे अवघड ठरणार आहे.
  • केमिकल अँड बायोटेक्नॉलॉजी, लायब-री अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस अशा काही विषयांमध्ये प्रत्येकी एकच जागा आहे, तर कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, म्युझिक, जिऑलॉजी अशा विषयांमध्ये प्रत्येकी चार जागा आहेत.
  • त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    PET Exam 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!