पुणे जिल्हा सहकारी बँकेत एक हजार जागा व शरद बँकेत 67 जागांची होणार भरती, दिलीप वळसे पाटील- PDCC Bank Bharti 2024

PDCC Bank Bharti 2023

PDCC Bank Bharti 2024 https://www.pdccbank.co.in/ – PDCC une District Central Cooperative Bank Latest update is given here. One thousand will be recruited through Pune District Bank and 67 through Sharad Bank. Due to this, rightful employment will be available to many young men and women. Candidates Read the complete details given below on this page regarding the PDCC Bank Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पुणे जिल्हा सहकारी बँकेत एक हजार जागा व शरद बँकेत 67 जागांची होणार भरती

‘शरद सहकारी बँकेची स्थापना सहकार महर्षी माजी आमदार (स्व.) दत्तात्रय वळसे पाटील, (स्व.) प्रकाश शहा यांच्यासह जुन्या पिढीतील मान्यवरांनी ५१ वर्षांपूर्वी केली. अनेक अडचणींवर बँकेने मात केली आहे. बँकेची आर्थिक परस्थिती उत्तम आहे. बँकेच्या सध्या २७ शाखा असून लवकरच ५० शाखांचा टप्पा पूर्ण करेल. चार हजार कोटी रुपयांच्या पुढे वार्षिक उलाढाल होईल.’ असा विश्वास राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

  • अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे कवायत्री शांता शेळके सभागृहात रविवारी (ता. ८) शरद बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, अनुसया महिला उन्नती पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, विष्णू हिंगे, संचालक दत्तात्रय थोरात, शिवाजीराव लोंढे, अशोक आदक, किसन सैद, सुदाम काळे, जयसिंग थोरात, अजय घुले, संतोष धुमाळ, प्रदीप अमुंडकर, दौलत लोखंडे, मारुती लोहकरे, सुषमा शिंदे, रूपाली झोडगे, अँड संजय आर्वीकर, विजयकुमार शिंदे, अजित देवकर, अभय आवटे उपस्थित होते.
  • वळसे पाटील म्हणाले, ‘बँकेच्या थकीत खातेदाराची वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी वार्षिक सभेत मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतर संबंधित संस्थेला निर्णय घेता येतो. त्यानुसार शरद बँकेने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे पण नियमात बसणारी कर्ज तडजोडीने मिटवता येतील तोंड पाहून नियमबाह्य कामे करता येणार नाहीत.
  • संशयित व बुडीत निधी याचा अर्थ जर व्याज किंवा हफ्ते जमा झाले नाही तर यासाठी तरतूद आहे. याचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. पुणे जिल्हा बँकेमार्फत एक हजार व शरद बँकेमार्फत ६७ जागांची भरती होणार आहे. त्यामुळे अनेक युवक-युवतींना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे.’
  • ‘शरद बँकेची आस्था दाखविणाऱ्या स्वयंघोषित नेत्याने बँकेचे कर्ज बुडविणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन फिरू नये. जे बोलता ते कृतीतून दाखवून द्या. असा टोला देवदत्त निकम यांचे नाव न घेता देवेंद्र शहा यांनी लगवला. ते म्हणाले, ‘राजकारण बाजूला ठेऊन सहकारात काम करावे. अशी शिकवण दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेचा मी अध्यक्ष होतो. राजकीय घडामोडीनंतर मी राजीनामा दिला पण पतसंस्थेविषयी कधीही ब्र शब्द बोललो नाही.वेळोवेळी पतसंस्थेला मदत केली.’
  • अहवाल वाचन व सभेपुढील विषय वाचन संचालक पांडुरंग पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी केले. सभासद शांताराम घुमटकर, प्रभाकर बांगर, अँड. बाळासाहेब बाणखेले, राजू इनामदार, सोपान शिंदे, जे.के थोरात, सुनिल बाणखेले, विजय काळे, नंदू बोऱ्हाडे, तान्हाजी कवडे, आदींनी चर्चेत भाग घेतला. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन व शिवाजीराव लोंढे यांनी आभार मानले.
  • ‘शरद बँकेकडे सध्या तीन हजार ६२ कोटी ४४ लाख रुपये ठेवी आहेत. एक हजार ८०५ कोटी ६६७ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे.निव्वळ नफा १६ कोटी ७४ लाख ३३ हजार रुपये झाला आहे. सभासदांना बारा टक्क्याने लाभांश वाटप केला येईल.’- देवेंद्र शहा, अध्यक्ष शरद बँक.
  • ‘आंबेगाव तालुक्यात शरद बँक, लाला बँक, भैरवनाथ पतसंस्था, भीमाशंकर कारखान्यासह अनेक सहकारी संस्था विविध पक्षातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. नेत्यांमध्ये एकमेकांचा संघर्ष टोकाचा झाला पण गेल्या ५० वर्षात कोणत्याही संस्थेच्या वार्षिक सभेत गोंधळ झाला नाही. संचालकांना संचालक मंडळाच्या बैठकीत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.
  • वार्षिक सभेत संचालकांना विषय मांडता येत नाही. हे माहित असूनही जाणीवपूर्वक भीमाशंकरच्या वार्षिक सभेत गोंधळ घातला.त्यामुळे माणसाची नव्हे तर शेतकऱ्यांच्या संस्थेची बदनामी होते. याचे भान संबंधितानी ठेवायला पाहिजे होते. पण स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या संस्थेला वेठीस धरणे योग्य नाही.”- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री.
  • ‘शरद बँकेच्या वार्षिक सभेची नोटीस व अहवाल दिला नाही. पोलिसांनी माझ्यावर व सहकार्यावर दबाव आणण्यासाठी शनिवारी (ता. ७) रात्री उशिरा नोटीसा दिल्या. माझ्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी केली होती. त्यामुळे सभेला गेलो नाही. परंतु लोकशाही मार्गाने सतत जनतेचे प्रश्न मांडणार आहे.’- देवदत्त निकम, माजी अध्यक्ष भीमाशंकर साखर कारखाना.

PDCC Bank Bharti 2023 https://www.pdccbank.co.in/ – PDCC une District Central Cooperative Bank recruitment process will be held soon. Deputy Chief Minister Ajit Pawar was speaking at the annual meeting of Pune District Central Cooperative Bank (PDCC) at Alp Bachat Bhavan on Monday (18). Deputy Chief Minister Ajit Pawar explained that we will take appropriate steps to recruit 800 vacant posts in the District Bank within the framework of the Cooperative Act. Candidates Read the complete details given below on this page regarding the PDCC Bank Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

पुणे जिल्हा बँकेत लवकरच 800 पदांची भरती; उपमुख्यमंत्री अजित पवार

https://www.pdccbank.co.in/ राज्यातील साखर कारखान्यांकडे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीपेक्षा जादा ऊस दर शेतकर्‍यांना देण्यासाठी रक्कम उपलब्ध असेल, तर त्यांनी त्यांच्या हिशोबाचा ताळेबंद साखर आयुक्तांना सादर करुन जास्तीचा ऊस दर देण्यासाठी मंजुरी घेऊन तो देता येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेत रिक्त असलेल्या 800 पदांची नोकर भरती ही सहकार कायद्याच्या नियमांच्या चौकटीत राहून करण्यासाठी योग्य तो मार्ग काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) अल्प बचत भवनात सोमवारी (दि.18) झालेल्या वार्षिक सभेत ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत बँकेचे संचालक राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक मंडळ सदस्य, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध देसाई, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आणि सभासद उपस्थित होते. या वेळी जिल्हा बँकेकडून सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याचा निर्णय झाला.

शासनाकडून पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीची पन्नास टक्के रक्कम प्राप्त झाली आहे. उर्वरित सर्व माहितीचे संकलन जिल्हा उपनिबंधकांनी करावे आणि शेतकर्‍यांची संख्या, रक्कमेची माहिती 15 ऑक्टोंबरपर्यंत मला दयावी. 7 डिसेंबरपासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यावर आर्थिक तरतूद करतो आणि पुरवण्या मागण्यांमध्ये ते मंजूर करुन घेतो, असे आश्वासन पवार यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील माळेगांव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी यंदा चांगला दर दिला असून अन्य कारखान्यांना ते का जमत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकार नवीन सहकार कायदा घेऊन येत असून, ग्रामीण भागातील विकास सोसायट्यांच्या बळकटीकरणास त्यांनी प्राधान्य दिले आहे. या संस्था 150 व्यवसाय करु शकतील. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध देसाई यांनी आभार मानले.


PDCC Bank Bharti 2023 In 2020, the Department of Cooperatives had duly given permission to the District Bank to fill the vacancies of Clerk posts in the Pune District Bank. After this permission, District Bank started this recruitment process in 2021. This recruitment process was started to fill a total of 356 vacancies for the post of Clerk. The recruitment process has been stuck in the same state since the filing of candidature applications till now. The eyes of 32 thousand 320 candidates who have applied for these vacancies in Pune city and district are on this recruitment process. Candidates Read the complete details given below on this page regarding the PDCC Bank Clerk Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

पुणे जिल्हा बॅंकेचा लेखनिक भरतीसाठी ३२ हजार ३२० उमेदवार प्रतीक्षेत..!

PDCC Bank Bharti 2024

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (पीडीसीसी) लेखनिक (लिपिक) पदाची भरती मागील दोन वर्षांपासून सरकारी नियमांच्या कात्रीत अडकून पडली आहे. लेखनिक पदाच्या एकूण ३५६ रिक्त जागा भरण्यासाठी ही नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यापासून आतापर्यंत ही भरती प्रक्रिया जैसे थे स्थितीत अडकून पडली आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज केलेल्या पुणे शहर व जिल्ह्यातील ३२ हजार ३२० उमेदवारांचे डोळे या भरती प्रक्रियेकडे लागले आहेत.

  1. पुणे जिल्हा बँकेतील लेखनिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी सहकार विभागाने २०२० मध्येच जिल्हा बँकेला रीतसर परवानगी दिली होती. या परवानगीनंतर जिल्हा बँकेने २०२१ मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु केली होती.
  2. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सहकारी बँकांना नोकरभरती करण्यासाठी सहकार विभागाची परवानगी घ्यावी लागते.  तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करून दोन वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे. त्यामुळे आता ही पूर्वीची भरती प्रक्रिया राबवावी की, नाही? या संभ्रमात जिल्हा बँकेचे नवीन संचालक मंडळ पडले होते.
  3. भरतीसाठी अमरावती येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेने इच्छुकांकडून परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरून घेतलेले आहेत. त्यानंतर मात्र त्यापुढची सर्व प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आलेली असल्याचे यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
  4. अमरावती येथील ज्या संस्थेची या कर्मचारी भरतीसाठी नेमणूक करण्यात आली होती, त्याच संस्थेकडे सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीचेही काम होते.
    मात्र सांगली बँकेच्या नोकर भरतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आणि त्यात अमरावती येथील या संस्थेलाही प्रतिवादी करण्यात आले.

PDCC जिल्हा बँक भरती दृष्टिक्षेपात

  1. बँकेत भरावयाच्या पदाचे नाव – लेखनिक
  2. लेखनिक पदाच्या रिक्त जागा – ३५६
  3. जाहिरातीत नमूद केलेल्या जागा – ३५६
  4. दाखल झालेले एकूण उमेदवारी अर्ज – ३२, ३२०
  5. परीक्षेसाठी आकारलेले शुल्क (प्रति विद्यार्थी) – ८२५ रुपये
  6. परीक्षा शुल्कापोटी जमा झालेला महसूल – २६,६६,०४, ००० रुपये
  7. लेखनिक पदाच्या भरतीसाठी आवश्यक असलेले राज्यस्तरीय पॅनेल अद्याप अस्तित्वात आलेले नाही.  हे पॅनेल नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. पॅनेलच्या अस्तित्वावर जिल्हा बँकेची लेखनिक भरती अवलंबून.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Pallavi Amol Bhagat says

    Pdcc bank exams kadi honar

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!