जलसंपदा विभागात विविध पदे रिक्त

Jalsampada Vibhag Bharti 2021

Irrigation Dept Bharti 2021: The Jayakwadi Irrigation Department, known as the destiny line of Marathwada, currently has a large number of vacancies for officers and employees.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मराठवाड्याची भाग्य रेषा म्हणून परिचित असलेल्या जायकवाडी पाटबंधारे विभागात सध्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यामुळे पाणी असूनही त्याचे योग्य पध्दतीने नियोजन होत नसल्याचे दिसून येत आहे.

जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प बुधवारी (ता. 24) फेब्रुवारी रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला. जायकवाडी प्रकल्पानंतर मराठवाड्याचे हरीत सुजल सुफलाम मराठवाड्याचे स्वप्न जायकवाडी प्रकल्पावरच अवलंबून आहे. यावर्षी महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस झालेला आहे. जायकवाडी प्रकल्पात देखील समाधानकारक पाणीसाठी असून यापुढे देखील उन्हाळी पिकांसाठी अजून पाच पाणी पाळ्या देण्याचे सिंचन विभागाने निश्चित केले आहे. जायकवाडीचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. यासाठी पूर्वीच आपल्याकडे परभणी येथे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अथवा परभणी पाटबंधारे मंडळ स्थापन करावे, अशी मागणी भागीरथ पाणी परिषदेचे अभिजित जोशी- धानोरकर यांनी केली होती.

मंजुर पदांची संख्या 840 असून त्यापैकी 646 पदे सध्या रिक्त

सर्वाधिक लाभक्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन येथे सिंचन व्यवस्थापन आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सुधारीत आकृती बंधानुसार जानेवारी 2021 अखेर आकृतीबंधानुसार मंजुर पदांची संख्या 840 असून त्यापैकी 646 पदे सध्या रिक्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नवीन सिंचन व्यवस्थापनाचे कंत्राटीकरण करून सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे धोरण आखण्यात आले होते. पंरतू त्या दृष्टीने देखील अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

सिंचन क्षमतेवर रिक्त पदांचा विपरित परिणाम

97 हजार 400 हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या लाभक्षेत्रासाठी केवळ प्रत्यक्ष कार्यरत पदसंख्या 194 असून त्यात देखील कार्यकारी अभियंता 1, उप कार्यकारी अभियंता 1, उपविभागीय अभियंता 5, शाखा अभियंता 25, कालवा निरीक्षक 232, मोजणीदार 106, स्थानिक अभियांत्रिक सहाय्यक 30 इतकी पदे रिक्त आहेत. त्यामुळे सिंचन क्षमतेवर याचा विपरित परिणाम दिसून येत आहे


WRD Bharti 2021: The condition of Zilla Parishad’s Minor Irrigation Department is critical. 64 posts have been sanctioned for this department. None of these positions are filled. There are 104 vacancies in the technical category from Deputy Chief Executive Officer to Assistant Applicant in the district.

अलिबाग : एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे पाणी टंचाईवर उपाययोजना करणाऱ्या विभागांमध्येच रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते सहायक आवेदक अशी तांत्रिक संवर्गातील तब्बल १०४ पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांमुळेच  रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईवर कायमची मात्रा मिळविण्यात आणि पाणी योजना राबविण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासनाला जंग पछाडावे लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाची अवस्था बिकट आहे. या विभागासाठी ६४ पदे मंजूर आहेत. या पदांपैकी एकही पद भरलेले नाही. या रिक्त पदांमध्ये कार्यकारी अभियंता१, उपकार्यकारी अभियंता १, उप अभियंता स्थापत्य ८, कनिष्ठ अभियंता स्थापत्य मुख्यालय ४, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जिल्हा परिषद उपविभाग ४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक उपविभाग ८, आरेखक १ आणि कनिष्ठ आरेखक १ यांचा समावेश आहे.

 रा. जि. प.च्या ग्रामीण पुरवठा विभागामध्ये ७५ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी केवळ ३५ पदे भरण्यात आली आहेत. ४० पदे रिक्त आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी १, कार्यकारी अभियंता १, उपअभियंता स्थापत्य ४, उपअभियंता यांत्रिकी १, सहायक भूवैज्ञानिक १, कनिष्ठ भूवैज्ञानिक २, कनिष्ठ अभियंता स्थापत्य मुख्यालय ३, कनिष्ठ अभियंता स्थापत्य जिल्हा परिषद उपविभाग १५, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ३, आरेखक १, संगणक १, वायू सांपडिक चालक २, रिंगमन १, जॅक हॅमर ड्रिलर २ आणि सहाय्यक आवेदक २ यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि विज्ञानावरील जनतेची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सोर्स:लोकमत


In Water Resources Department various posts vacant due to delay in promotions. As all the important posts in Tapi Irrigation Corporation are vacant, the department is in charge. Vacancies are causing huge work stress to the officers. Corona has delayed the recruitment process in the state. Therefore, it is necessary to implement the recruitment process now.

जलसंपदा विभागात विविध पदे रिक्त

पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक पद रिक्त

राज्यात जलसंपदा विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. परिणामी, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण जाणवत आहे. दिवाळीपूर्वी जलसंपदा विभागातील अभियंत्यांना बढती देण्याचे जलसंपदामंत्र्यांनी आश्वासन दिले होते.

WRD Maharashtra Bharti 2021

राज्यातील जलसंपदा विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. पदोन्नत्या रखडल्यामुळे पदे रिक्त आहेत. तापी पाटबंधारे महामंडळातील महत्त्वाचे सर्व पदे रिक्त असल्याने विभागाचा कारभार प्रभारीवरच सुरू आहे. तब्बल ५० टक्क्यापर्यंत पदे उसनवारीवर सुरू आहेत. त्यामुळे राज्याचे जलसंपदामंत्री याबाबत काय निर्णय घेतील, याकडे लक्ष लागून आहे.

राज्यात जलसंपदा विभागाला (Jalsampada Vibhag Bharti 2021) रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. परिणामी, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण जाणवत आहे. दिवाळीपूर्वी जलसंपदा विभागातील अभियंत्यांना बढती देण्याचे जलसंपदामंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, काही पदे सोडले, तर उर्वरित पदावरील अभियंत्यांना अद्याप पदोन्नतीची प्रतीक्षा आहे.

रिक्त पदांचे ग्रहण (Vacancies in Patbandhare Vibhag & Jalsampada Vibhag 2021)

रिक्त पदांमुळे अधिकाऱ्यांना कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. त्यात कोरोनामुळे राज्यात भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता तरी भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Neharu says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!