Pashusavardhan Vibhag Bharti Exam
Pashusavardhan Vibhag Exam
पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा
AHD Recruitment There were total 729 vacancies for group C and group D. The written exam for 729 posts is still not done. In the Animal Husbandry Department, the recruitment process for 729 vacant posts of ‘Group-C’ and ‘Group-D’ has been halted. In the month of August, all the exams were canceled between August 10 and 29, due to heavy rains due to heavy rains in Kolhapur. Information was uploaded on the Mahapariksha portal that the exam schedule will be available on September 29th. However, more than two months now, no suggestions have been made regarding the exam. In this regard, it is being said that when candidates contact the Inspector Portal, notification will come. Likewise, ‘Animal Husbandry Examination will be notified soon’ is being uploaded on the portal. More Details of Pashusavardhan Vibhag Exam are given below:
Pashusavardhan Vibhag Bharti
Pashusavardhan Exam Hall Ticket |
|
Department Name | Animal Husbandry Department, Maharashtra |
Name of Exam | Pashusavardha Exam |
Name of Posts | Pashudhan Paryavekshak, Parichar |
Total Posts | 729 Vacancies |
Official Website | ahd.maharashtra |
Publish Date | 30 July 2019 |
AHD Recruitment
पशुसंवर्धनच्या परीक्षेला मिळेना मुहूर्त
ऑगस्ट महिन्यात पूरस्थितीचे कारण देत टप्प्याटप्प्याने रद्द करण्यात आलेल्या पशुसंवर्धन परीक्षेचा ‘खो’ अद्यापही कायम आहे. परीक्षा रद्द होऊन दोन महिने उलटूनही उमेदवारांना कोणत्याही सूचना करण्यात न आल्याने गोंधळ अधिक वाढला आहे. दरम्यान, महापरीक्षातर्फे नव्या भरतीप्रक्रिया सुरू झाल्या असून, पशुसंवर्धनाच्या परीक्षेचा निर्णय मात्र घेतला जात नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
पशुसंवर्धन विभागात ‘गट – क’ व ‘गट – ड’ संवर्गाच्या ७२९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सध्या ठप्प झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सांगली, कोल्हापूरसह राज्यात इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १० ते २९ ऑगस्ट दरम्यानच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. पशुसंवर्धन परीक्षा पुढे ढकलल्याची सूचना महापरीक्षेतर्फे तीन वेळेस करण्यात आली. टप्प्याटप्प्याने परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांचा तेव्हाही गोंधळ उडाला होता. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करीत लवकरच परीक्षेची सूचना केली जाईल, असे महापरीक्षेतर्फे सांगण्यात आले. तसेच, १९ सप्टेंबर रोजी लवकरच परीक्षेचे वेळापत्रक येईल, अशी माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. मात्र, आता दोन महिने उलटूनही परीक्षेसंदर्भातील सूचना केलेल्या नाहीत. या संदर्भात उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टलकडे संपर्क साधल्यावर सूचना येईल, इतकेच सांगण्यात येत आहे. तसेच ‘पशुसंवर्धनच्या रखडलेल्या परीक्षेसंदर्भात लवकरच कळविण्यात येईल’, इतकेच सातत्याने पोर्टलवर अपलोड केले जात आहे. दरम्यान, हॉल तिकीट उमेदवारांना देऊनही आता परीक्षेचे नियोजन करण्यात दिरंगाई होत असल्याने पोर्टलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परीक्षेच्या संदर्भातील सूचना लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. ज्या तत्परतेने परीक्षा रद्द झाल्याची सूचना करण्यात आली, त्या तत्परतेने पुढील सूचना का करीत नाहीत, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
पशुसंवर्धन परीक्षेचे हॉल तिकीट ऑगस्ट महिन्यात दिले होते. पूरस्थितीमुळे परीक्षा रद्द झाली. मात्र, आता दोन महिने उलटूनही सूचना नाही. हॉल तिकीट दिले म्हणजे, परीक्षेची तयारी झाली होती. आता पुन्हा फक्त यंत्रणेची तयारी पूर्ण करायची आहे. मात्र, योग्य सूचना येत नसल्याने परीक्षेचा गोंधळ वाढतो आहे.
सौर्स : मटा
sar 2019-chi pariksha 2022 lagle tari ghetali jaat nahi problem kay ahe
sar pariksha ghet nacal tar amchi fee tari parat kara