Online Employment Card- ऑनलाइन एम्प्लॉयमेंट कार्ड काढा!
Sarkari Yojana Benefits get through the Online Employment Card
Online Employment Card Registration
To get the benefits of various Sarkari Yojana then you have to apply for Online Employment Card. In order to get employment, self-employment through government schemes, it has become necessary for the educated unemployed youth to obtain online employment card from the ‘Mahaswayam’ website of District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre. For this candidate must be above 18 years and must have passed 4th class. We provide the details like how to register for online employment card, required documents for it etc., below on this apge. See the details and apply for the card as soon as possible.
Job Card Online Registration under MGNREGA
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन एम्प्लॉयमेंट कार्ड काढा!
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना संधी: रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न – शासकीय योजनांच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगार मिळविण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ‘महास्वयंम’ – संकेतस्थळावरून ऑनलाइन एम्प्लॉयमेंट कार्ड काढणे आवश्यक झाले आहे.
Eligibility for Employment Card
- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना, जिल्हास्तरीय योजनेंतर्गत विविध विषयांचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
- राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विविध व्यावसायिक प्रशिक्षण संस्था अधिकृत केल्या आहेत.
- या संस्थांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाते. शासकीय, निमशासकीय, तसेच खासगी आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यासाठी या यंत्रणांकडून नोंदणीकृत उमेदवारांच्या याद्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांकरवी मागविल्या जातात.
- यासाठी उमेदवार हा १८ वर्षांवरील व इयत्ता चौथी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- अशा उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून सेवायोजन कार्ड काढणे आवश्यक आहे.
Who is able to Registration for Employment Card
नोंदणी कोण करू शकतो?
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
- लाभार्थीनी शैक्षणिक पात्रता, अनुभव, संपादन केलेली कौशल्ये, संपर्क तपशील इत्यादी माहिती वेळोवेळी अपडेट करत राहणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- जर लाभार्थीकडे आधीच रोजगार असेल तर तो या पोर्टलवर नोंदणी करू शकत नाही.
Required Documents for Online Employment Card
काय कागदपत्रे लागतात?
- महाराष्ट्र महास्वयं पोर्टलसाठी कागदपत्रे आधार कार्ड,
- मोबाइल नंबर (तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे),
- पासपोर्ट आकाराचा फोटो,
- वय प्रमाणपत्र,
- पत्त्याचा पुरावा,
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र,
- शाळेच्या अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र,
- पालकांच्या राज्यात नोकरी प्रमाणपत्र,
- सरपंच किंवा नगर परिषदेने दिलेले प्रमाणपत्र.
Benefits of Online Employment Card
फायदे काय ?
- बेरोजगार तरुणांसाठी हे पोर्टल एक असे व्यासपीठ आहे की, ज्यावर ते नोंदणी करून रोजगार मिळवू शकतात.
- लाभार्थी युवक त्यांच्या पात्रता, कौशल्याच्या आधारावर नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
- बेरोजगार व्यक्ती घरी बसून रोजगाराची माहिती मिळवू शकतात.
- त्या कंपन्या आणि संस्था या पोर्टलवर नोंदणी करू शकतात, ज्यांना त्यांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत नियोक्ते आणि नोकरी शोधणारे दोघेही या महास्वयं रोजगार पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
- बेरोजगारांना रोजगार मिळेल. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
- सुशिक्षित बेरोजगार तरुणांची कौशल्ये वाढवून त्यांना सक्षम करणे.
- या पोर्टलच्या मदतीने कोणतीही संस्था किंवा कंपनी आपल्या जाहिराती देऊ शकतात.
- या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या तरुणांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे.
Online Employment Card Apply here