NVS 1925 Bharti Answer Key -NVS भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर
NVS Exam Answer Key
NVS Exam Answer Key Results: Navodaya Vidyalaya Samiti (Navodaya Vidyalaya Samiti, NVS) has announced the answer key of the examination for the recruitment of non-teaching posts. The examination for non-teaching posts was conducted by NVS from March 8 to March 13, 2022. Applicants who applied for these posts and attend the exam may check their answer key from the given link.
NVS भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर
NVS Recruitment Answer Key 2022: नवोदय विद्यालय समितीने (Navodaya Vidyalaya Samiti, NVS) शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. एनव्हीएसतर्फे ८ मार्च ते १३ मार्च २०२२ या कालावधीत शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेले उमेदवार एनव्हीएसची अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन उत्तरतालिका (NVS Recruitment Answer Key 2022) तपासू शकतात. या भरतीद्वारे ए, बी आणि सी ग्रुपमधील पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. शिक्षकेतर पदांवरील बंपर रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारी २०२२ रोजी बंद करण्यात आली.
नवोदय विद्यालय समितीने (NVS Bharti Answer Key 2022) जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया १२ जानेवारी २०२२ रोजी सुरू झाली. या रिक्त पदासाठी प्रवेशपत्र २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आले. परीक्षेत बसलेले उमेदवार परीक्षेचे संपूर्ण तपशील पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
NVS Recruitment Answer Key: अशी तपासा उत्तरतालिका
- उत्तरतालिका तपासण्यासाठी सर्वप्रथम वेबसाइट- navodaya.gov.in वर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवर भरती २०२२ च्या लिंकवर जा.
- यानंतर ‘NVS Various Non Teaching Post Exam Answer Key 2022’ लिंकवर जा.
- यानंतर Download वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करा.
- उमेदवार लॉगिन करून उत्तरतालिका तपासू शकतात.