बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर – NCI Nursing Admission
Nursing Admission – The institutional admission process for the BSc nursing course ended on October 31. The council then announced an additional extension until November 30 to fill vacancies at the institutional level. As per the decision, the examination cell has announced a special round from November 19 for the vacant seats at the institutional level. There are five government and 173 private nursing colleges in the state. Details of seats for the special round will be announced on November 18. Students will then have to apply to colleges on November 19-21.
बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची नियमित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यामधील संस्थात्मक कोट्यातील सुमारे १५०० जागा रिक्त राहिल्या आहेत. देशभरातील रिक्त जागांची संख्या लक्षात घेता भारतीय परिचर्या परिषदेने परिचारिका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीएस्सी नर्सिंगच्या रिक्त राहिलेल्या संस्थात्मक जागांसाठी दुसरी विशेष फेरी जाहीर केली आहे. ही फेरी १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
- बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची संस्थात्मक प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर परिषदेने संस्थात्मक स्तरावर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अतिरिक्त मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार परीक्षा कक्षाने संस्थात्मक स्तरावरील रिक्त राहिलेल्या जागांसाठी १९ नोव्हेंबरपासून विशेष फेरी जाहीर केली आहे. राज्यामध्ये पाच सरकारी व १७३ खासगी नर्सिंग महाविद्यालये आहेत.
- सरकारी महाविद्यालयांमध्ये २५० जागा, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ९ हजार २०० जागा आहेत. खासगी महाविद्यालयातील काही जागा संस्थात्मक कोट्यामार्फत भरण्यात येतात. त्यामुळे संस्थात्मक कोट्यातील जवळपास १५०० जागा रिक्त राहिल्या आहेत. तीन नव्या महाविद्यालयांना भारतीय परिचर्या परिषदेने मान्यता दिल्याने १२० नव्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास १६२० जागांसाठी ही विशेष फेरी राबवली जाणार आहे.
- विशेष फेरीसाठी जागांचा तपशील १८ नोव्हेंबर जाहीर होईल. त्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये अर्ज करायचा आहे.
- तीन नवीन महाविद्यालयांना मान्यता – भारतीय परिचर्या परिषदेने राज्यामध्ये तीन नव्या नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामध्ये एक सरकारी व दोन खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे. सरकारी महाविद्यालयात ५०, तर खासगी महाविद्यालयात ७० जागा उपलब्ध आहेत. या तिन्ही महाविद्यालयांचा या प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.
NCI Nursing Admission – The Nursing Council of India has extended the admission process for various nursing courses for the second time. Students will be able to take admission in BSc Nursing, MSc Nursing, ANM, GNM PBBSC Nursing, Post Basic Diploma and Critical Care Course Nurse (NPCC) till November 30.
Earlier, the deadline for admission to nursing courses was September 30. It was first extended till October 31. However, since admissions are still going on, the deadline has been extended for the second time. It has been clarified that no extension will be granted after this. The guidelines on admissions have been published even as the council has extended the deadline for admissions. Accordingly, admissions made by October 31 will be considered for regular class admissions, the council said.
‘नर्सिंग’च्या प्रवेशाला मुदतवाढ – भारतीय नर्सिंग कौन्सिलतर्फे नर्सिंग विषयक विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएससी नर्सिंग, एम.एससी नर्सिंग, एएनएम, जीएनएम पीबीबीएस्सी नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि क्रिटिकल केअर अभ्यासक्रम परिचारिका (एनपीसीसी) आदी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.
नर्सिंग अभ्यासक्रम प्रवेशासाठी यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये पहिल्यांदा ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ केली होती. मात्र अजूनही प्रवेश सुरू असल्याने पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कौन्सिलने प्रवेशाला मुदतवाढ देत असतानाच प्रवेशाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेले प्रवेश नियमित वर्गातील प्रवेश गृहीत धरण्यात येणार असल्याचे कौन्सिलने स्पष्ट केले आहे.
स्टाफ नर्स भरती 2024 च्या नव्या नियमानुसार आम्ही आपणास रोज महत्वाच्या अपेक्षित प्रश्नांसह एक संभाव्य सराव पेपर देऊ. तेव्हा लागा अभ्यासाला.. आणि रोज सरावासाठी आणि स्टाफ नर्स भरती २०२३च्या पूर्ण माहिती साठी GovNokri.in भेट द्या..
NCI Nursing Admission