NMMS एनएमएमएसएस शिष्यवृत्ती अर्जांसाठी मुदतवाढ – NMMS Scholarship 2023

NMMS Scholarship Exam Results 2023

NMMS Scholarship Exam Results

The deadline for applications for the NMMSS scholarship exam of the school education and literacy department was 30th November 2023. However, as per the directions of the central government, it has now been extended and students can apply for the respective scholarship scheme till 31st December 2023, director of the Directorate of Schemes Mahesh Palkar said in a statement. According to Palkar, the deadline for the national scholarship website for the academic year 2023-24 has been fixed at the central government level. Also, as directed by the Central Government, the concerned districts have been instructed to complete the work of online registration of new and renewal applications within the stipulated time. Considering the deadline given by the central government, instructions should be given to all schools. “If any student who is entitled to the scholarship is denied the scholarship due to non-filling of the online information, the entire responsibility will be on the education officer,” he said.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

एनएमएमएसएस शिष्यवृत्ती अर्जांसाठी मुदतवाढ

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या एनएमएमएसएस शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यास आता मुदतवाढ देण्यात आली असून संबंधित शिष्यवृत्ती योजेनेसाठी विद्यार्थ्यांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी पत्रकाद्वारे दिली. पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२३ २४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळासाठी केंद्र शासन स्तरावरून कालमर्यादा ठरविण्यात आलेल्या आहेत. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्ह्यांनी नवीन आणि नूतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. केंद्र शासनाने दिलेली अंतिम तारीख विचारात घेता सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात. शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाइन माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


NMMS Scholarship Exam Results 2022 Declared ? Scholarship Examination for Students from Economically Weaker Sections (NMMS) was organized in December 2022. The final answer list along with the list of marks obtained by the students was released on the website of the Maharashtra State Examination Council. However, more than one and a half months have passed since the release of the mark list, and the final result has not been announced yet. So when will the result of the scholarship exam be available? This is being asked by students and parents. 1 lakh 97 thousand 170 students from 11 thousand 350 schools of the state appeared for the exam. Out of them 75 thousand 841 students have passed.

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कधी?

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ( एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेचे डिसेंबर २०२२ मध्ये आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या यादीसह अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, गुणांची यादी प्रसिद्ध करून दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून, अद्याप अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल केव्हा लागणार? अशी विचारणा विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे. राज्यातील ११ हजार ३५० शाळांमधील १ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७५ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Official Website


NMMS Result 2023 is going to be released for the National Means cum Merit Scholarship Exam. You can download the Results or check it from the website. The exam is held state-wise to give financial support to the children. Those who have already given the exam can find the relevant details on NMMS Result 2023 here.

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल जाहीर करण्यात आला. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार ७५ हजार ८४१ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.पालकांचे वार्षिक साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आणि अनुदानित शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेअंतर्गत गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार या प्रमाणे बारावीपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. यंदा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ डिसेंबरला एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती.

१ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ७५ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सविस्तर निकाल https://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या यादीतील विद्यार्थ्यांच्या नाव किंवा जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदींमध्ये दुरुस्ती असल्यास दुरुस्तीसाठी १७ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची यादी यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

Check NMMS Pune Exam Result 2022-23


NMMS Scholarship Exam: Maharashtra State Examination Council has declared the Answer Key For The National Means Cum-Merit Scholarship (NMMS) examination. Applicants who applied for these posts may check their answer key from the given link.

NMMS Scholarship Exam Answer Key: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता आठवीसाठी घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १९ जून २०२१ रोजी  घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या ‘www.mscepune.in/’ आणि ‘https://nmmsmsce.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

एनएमएमएस’ या परीक्षेच्या मॅट आणि सॅट पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे ४ जुलैपर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन आणि आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही, याची मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी. या अंतिम उत्तरसूचीनंतर एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे दराडे यांनी सांगितले.

प्रसिद्धीपत्रक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. १९/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. 


NMMS Scholarship Exam 2022: The National Economically Weak Students (NMMS) Scholarship Examination for Class VIII students has been extended. Now students can apply till Sunday (1st May 2022). Read more details as given below.

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना रविवार (ता.१) पर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या आधारे वितरित करण्यात येते. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी घेतल्यानंतर ही निवड घोषित करण्यात येते. मराठी, हिंदी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड आणि तेलगू या माध्यमांतून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते.

महत्त्वाच्या तारखा

  • – ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत : १ मे
  • – विलंबासहीत : ६ मे
  • – परीक्षा : १९ जून

संकेतस्थळ : https://www.mscepune.in/


NMMS Exam 2022- The National Means Cum-Merit Scholarship (NMMS) examination for students from economically weaker sections will be held in June. The application process started on Wednesday, April 6. Students will be able to fill up applications till April 26. The exam will be held on June 19.

NMMS Scholarship Time Table

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना(National Means Cum-Merit Scholarship, NMMS) परीक्षा जूनमध्ये होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार ६ एप्रिलपासून सुरू झाली. २६ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. परीक्षा १९ जून रोजी होणार आहे. करोनामुळे एनएमएमएस विविध परीक्षांचे वेळापत्रक लांबले. इयत्ता आठवीसाठी २०२१-२२ एनएमएमएस परीक्षेचे वेळापत्रक कधी येते याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते.

-: वेळापत्रक :-

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्ध्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS (२०२१-२२) इ. ८ वी साठी परीक्षा दिनांक १९ जून २०२२

अ.क्र. विषयाचे नाव एकूण गुण एकूण प्रश्न कालावधी वेळ पात्रता गुण(एकत्रित)
बौध्दिक क्षमता चाचणी
Mental Ability Test
९० ९० दीड तास (फक्त दुष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ) १०.३० ते १२.०० 40 %*
विश्रांती १२.३० ते १३.३०
शालेय क्षमता चाचणी.
Scholoastic Apptitude Test
९० ९० दीड तास (फक्त दुष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ) १३.३० ते १५. ००

* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्ध्यांसाठी पात्रता गुण ४० % मिळणे आवश्यक आहेत.
(ST ,SC ,व दिव्यांग विद्यार्ध्यांसाठी पात्रता गुण ३२ % मिळणे आवश्यक आहेत.)

  • राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार १९ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. २००७-०८पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. www.mscepune.in आणि https://nmmsmsce.in या वेबसाईटवर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  • नियमित शुल्कासह २६ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह २७ एप्रिल ते १ मेपर्यंत तर अतिविलंब शुल्कानुसार २ ते ६ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

विद्यार्थ्याच्या पालकाला २०२०-२१च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागेल. सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असावा. तर विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालयात, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी परीक्षेला अपात्र आहेत. लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड होते. पात्र विद्यार्थ्यांना दर वर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

एनएमएमएस शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक येथे पहा

NMMS Examine 2022


NMMS Scholarship Exam 2022: The dates for the National Economic Weakness Scholarship (NMMS) examination for the year 2021-22 have been announced. This year, the scholarship examination for the eighth standard students will be held on April 10, and the application process has started from January 19, according to the education department.

  1. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचे २०२१-२२ या वर्षातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा १० एप्रिलला होणार असून, १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
  2. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्याही शासकीय अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेत आठवीत शिकत असलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी पाहिजे, तसेच सातवीत सर्वसाधारण संवर्गासाठी किमान ५५ टक्के उत्तीर्ण व आरक्षित संवर्गासाठी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतो.
  3. या परीक्षेसाठी १९ जानेवारीपासून https://www.mscepune.in किंवा https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १९ जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत असून, ऑनलाइन विलंब अर्ज दाखल करण्याची मुदत २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या परीक्षेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

NMMS Scholarship Merit List

The merit list of NMMS Scholarship for National Economically Weaker Students has been announced. The scholarship examination for class VIII of economically weaker students was held on April 6, 2021.The list of students receiving these scholarships has been published on two official websites www.mscepune.in www.nmms.mscescolarshipexam.in.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात NMMS स्कॉलरशिपची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती.

पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पाहता येईल. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची यासाठी परीक्षा झाली होती. शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 18 ऑगस्टपासून परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर इथे उपलब्ध आहे.  या लिंकवर इथेही क्लिक केलंत तर तुमच्या पाल्याचं नाव आहे का हे दिसेल.

राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण धोक्यात; श्रेणी सुधार परीक्षा नाही 6 एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या केंद्रीय शिष्यवृत्तीमध्ये महाराष्ट्रासाठी 11682 एवढा कोटा आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 11682 विद्यार्थ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळू शकते. ZP च्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार; अतिदुर्गम भागात देतात शिक्षणाचे धडे महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण धोरणानुसार संबंधित विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.

अपंगांसाठी 4 टक्के आरक्षण यात राज्य सरकारने ठेवलं आहे. प्रत्येक जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे. या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची यादी www.mscepune.in www.nmms.mscescolarshipexam.in या दोन अधिकृत संकेस्थळांवर जाहीर करण्यात आली आहे. शाळांनी ही यादी याच संकेतस्थळांवरून डाउनलोड करून संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वितरण करावं अशी सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची सोय आहे.


NMMS Scholarship Final Answer Key

NMMS Scholarship Final Answer Key- Maharashtra State Council of Examination has released the final Answer key for National Means-cum-Merit Scholarship Scheme (N.M.M.S.S) Exam.2021. Applicants who applied for these may check their answer key from the given link.

NMMS परीक्षा २०२०-२१  – घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मंगळवार दि.०६.०४.२०२१ अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in   व https://nmms.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


NMMS Scholarship Exam 2021

NMMS Scholarship Exam Admit Card: Maharashtra State Council of Examination has released the hall ticket for National Means-cum-Merit Scholarship Scheme (N.M.M.S.S) Exam. The Scholarship examination will be conducted on 06th April 2021. Applicants who applied for these exam may download the exam admit card from the given link. Applicants should having Username and password for downloads admit card

Download Admit Card


NMMS Scholarship Exam 2021: The National Economically Weak Component Scholarship Scheme Examination (NMMS) was to be held on March 21 at various centers across the state. However, the Maharashtra Leaks Service Commission has announced to hold the state pre-service examination on March 21, so the scholarship examination has been postponed and now it will be held on 6th April 2021.

Scholarship Exams 2021 : NMMS शिष्यवृत्ती परीक्षा आता ६ एप्रिल ला  होणार – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)21 मार्च रोजी राज्यभरात विविध केंद्रांवर होणार होती. मात्र, महाराष्ट्र लीक्सेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च घेण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता हि परीक्षा 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

Scholarship Exams 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 21 मार्च रोजी राज्यभरात 37 जिल्ह्यांतील 761 उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी घेण्यात येते.


NMMS Scholarship Exam 2021: The schedule for online school enrollment and filling up of student application forms for the National Financially Weak Component Scholarship Scheme Examination (NMMS 2020-21) has been revised. Regular applications for the scholarship can now be filled online till December 31, said Shailja Darade, Deputy Commissioner, Maharashtra State Examination Council.

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी (एनएमएमएस 2020-21) ऑनलाइन शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीसाठी आता 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नियमित आवेदनपत्रे भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

 पुणे – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी (एनएमएमएस 2020-21) ऑनलाइन शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीसाठी आता 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नियमित आवेदनपत्रे भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या “www.mscepune.in’ आणि “http://nmms.mscescholarshipexam.in’ या संकेतस्थळावर एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी शाळांना ऑनलाइन नोंदणी आणि विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरता येणार आहेत. नोंदणी आणि आवेदनपत्रे भरण्याच्या वेळापत्रकात आतापर्यंत दोनदा बदल करण्यात आला आहे. आता सुधारित वेळापत्रकानुसार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन नियमित आवेदनपत्रे 31 डिसेंबरपर्यंत भरता येतील. तर विलंब शुल्कासह 5 जानेवारी 2021पर्यंत अर्ज करता येणार आहे. शिष्यवृत्तीसाठी अतिविलंब आवेदनपत्रे लागू राहणार नाहीत, असेही राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.


आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी NMMS स्कॉलरशीप परीक्षा घेण्यात येते….

NMMS scholarship exam 2021: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नियमित अर्ज ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत, तर विलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने ९ ते १६ डिसेंबर आणि अतिविलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने १७ ते २३ डिसेंबरपर्यंत भरता येणार असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेसाठी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अर्ज करता येतो. शाळेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया www.mscepune.in आणि http://nmms.mscescholarshipexam.in या वेबसाइटवर करता येणार आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र ठरतात. शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येते. राज्यात १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांचा यात समावेश असतो. पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास यांचा समावेश आहे.

प्रत्येक पेपर हा ९० गुणांचा असून, यात पात्रता गुण ४० टक्के मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२ टक्के असा निकष आहे. संबंधित परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेमार्फत सांगण्यात आले.

NMMS Exam 2019 Date Declared

On 8th December, Maharashtra State Examination will be going to conduct National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2019-20) in all over 377 centers. For this examination 1 lakh 30 thousand 63 students have applied from 8 thousand 466 different schools. Hall Ticket for the examinations is now available on the official website to download.

NMMS Exam 2019 Application Form

National Means cum Merit Scholarship Scheme Exam 2019-20 will be conduct in to two different papers. Each paper will be have multiple choice question. First paper will be based on Aptitude for 90 questions for 90 marks. Second paper will be based on School Aptitude Test which also having 90 questions for 90 marks. To solve each paper 1 hour 30 minutes duration will be provided. Students who will score minimum 40% marks in the examination will be eligible for scholarship examination. Result of the examinations will be declared on second or third week of February 2019.

This examinations being conduct from 2007 – 08 to provide the scholarship to Financially weak students for higher education. Students who are learning in 8th standard can be apply for the examination. Also the students parents having less than 1.5 lakh yearly income are only eligible for the examination.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    NMMS Scholarship Exam Results

  2. Aakansha says

    I am Aakansha, Feb 2020 just 12th passout this scholarship is very important .but me just read this scholarship . I can apply for the scholarship.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!