NITI Aayog Internship- Golden Chance! नीती आयोगामध्ये इंटर्नशीप करण्याची संधी
Golden Chance! नीती आयोगामध्ये इंटर्नशीप करण्याची संधी
There is an opportunity to do an internship in the National Institute of Transforming India (NITI Aayog) under the Government of India. Candidates will be able to apply online. The Policy Commission acts as a think tank for public policy of the Government of India. Graduate candidates will be able to apply for the trainee post in the Policy Commission. An advertisement has been published for this and details of educational qualification, work experience, age limit, work allowance, application process, last date of application have been given.
भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नीती आयोगामध्ये (National Institute of Transforming India, NITI Aayog) इंटर्नशीप करण्याची संधी चालून आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. नीती आयोग हे भारत सरकारच्या सार्वजनिक धोरणांसाठी थिंक टँक म्हणून काम करते. पदवीधर उमेदवारांना नीती आयोगामध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, वयोमर्यदा, कामाचा भत्ता, अर्ज प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
FSSAI Internship – FSSAI मध्ये इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी-जाणून…
NITI Aayog Internship -2022
नीती आयोगामध्ये इंटर्नशीप (Niti Aayog Internship) करण्यासाठी उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाइटवर फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. याद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नीती आयोगामधील विविध विभागांच्या आणि युनिट्समध्ये कामाचा अनुभव मिळणार आहे. तसेच त्यांना इम्पेरिकल कलेक्शन आणि कलेक्शन इन हाऊस याद्वारे माहिती गोळा करण्याचे काम देण्यात येईल.
पदवीच्या दुसऱ्या किंवा चौथ्या सेमिस्टरची परीक्षा दिलेले विद्यार्थी इंटर्नशीप पदासाठी अर्ज करु शकतात. यासोबतच विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान ८५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या पहिल्या वर्षाच्या/दुसऱ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा पूर्ण केलेल्या/दिलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीपसाठी अर्ज करता येणार आहे.
रिसर्च किंवा पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये ७० टक्केंपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. नुकतेच ग्रॅज्युएशन/पीजी पूर्ण केलेले किंवा अंतिम परीक्षा देणारे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.
कोणते उमेदवार असतील पात्र- Eligibilty Criteria For NITI Aayog Internship Program 2022
- UG उमेदवार –
- जे विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या वर्ष किंवा 4थ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा दिलेले आहेत असे विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत.
- तसंच अशा विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान 85% गुण मिळाले असणं आवश्यक आहे.
- ग्रॅज्युएट उमेदवार –
- पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या पहिल्या वर्षाच्या/दुसऱ्या सेमिस्टरच्या टर्म-एंड परीक्षा पूर्ण केलेल्या/दिल्या आहेत किंवा संशोधन/पीएचडी करत आहेत आणि ग्रॅज्युएशनमध्ये 70% पेक्षा जास्त गुण आहेत असे विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत.
- जे विद्यार्थी अंतिम परीक्षेत बसले आहेत किंवा नुकतेच ग्रॅज्युएशन/पीजी पूर्ण केले आहेत आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची वाट पाहत आहेत त्यांचाही इंटर्नशिपसाठी विचार केला जाऊ शकतो.
NITI Aayog Intership 2022 -Apply Online
अशा पद्धतीनं करा अप्लाय – How to Apply For NITI Aayog Internship Scheme 2021
- इच्छुक अर्जदार 10 डिसेंबर 2021 पर्यंत केवळ NITI आयोगाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्ज फक्त सहा महिने अगोदर केला जाऊ शकतो परंतु ज्या महिन्यात इंटर्नशिप हवी आहे त्या महिन्याच्या 2 महिन्यांपूर्वी नाही.
- अर्जदारांनी स्वारस्य असलेले क्षेत्र देखील स्पष्टपणे सूचित केले पाहिजे.
- कृपया लक्षात ठेवा: उमेदवार एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतो.
- निवडलेल्या अर्जदाराने रुजू होताना कॉलेज/संस्थेकडून मूळ गुणपत्रिका आणि NOC सादर करणे आवश्यक आहे, असे न केल्यास त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
[email protected]