नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे नीट- यूजी फेरपरीक्षा होणार का ? वाचा माहिती – NEET UG Exam 2024 Results
NEET UG Exam 2024 Answer Key, Results
NEET UG Exam 2024 Results Scam – The cut-off in neet-ug exam results has increased due to grace marks, which will affect medical admissions in the state. The parents submitted a memorandum to the minister demanding an inquiry into the NEET-UG results by a third agency, cancellation of grace marks and declaration of revised results and suspension of the admission process in the state till then. There was no mention of neet or ug re-examination at all. However, medical education minister Hasan Mushrif has said that he will demand the National Testing Agency and the central government to re-conduct the examination, which has added to the unease of the parents.
नीट–यूजीच्या सदोष निकालामुळे हनीट– यूजी फेरपरीक्षा ? विद्यार्थी अस्वस्थ
नीट–यूजीच्या सदोष निकालामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी–पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थी–पालकांच्या अस्वस्थतेत भर घातली आहे. या गोंधळाबाबत मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तूर्तास तरी पालकांच्या तक्रारीवरून एनटीए आणि केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी केल्याची माहिती दिली.
- नीट–यूजीच्या सदोष निकालांवरून देशभरात विद्यार्थी–पालकांकडून रोष व्यक्त होत आहे. या निकालामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या नीट–यूजीच्या रैंकमध्ये ३० ते ४० हजाराचा फरक पडल्याची तक्रार आहे. मात्र, नीट घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या केंद्रीय यंत्रणेकडून याची दखल घेतली न गेल्याने ५० ते ६० हतबल विद्यार्थी–पालकांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची शुक्रवारी भेट घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
- ग्रेस मार्कामुळे कटऑफ वाढला असून, याचा परिणाम राज्यातील वैद्यकीय प्रवेशांवर होणार आहे. त्यामुळे नीट–यूजीच्या निकालाची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल जाहीर करण्यात यावा व तोपर्यंत राज्यातील प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन पालकांकडून मंत्र्यांना देण्यात आले. यात नीट– यूजीच्या फेरपरीक्षेचा बिलकूल उल्लेख नव्हता. तरीही पालकांचे म्हणणे समजून न घेता प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना ही परीक्षाच पुन्हा घेण्याची मागणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि केंद्र सरकारकडे करू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटल्याने पालकांच्या अस्वस्थतेत भर पडली आहे.
- मंत्र्यांनी आम्हाला अवघी १० मिनिटे दिली. बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पाहता, त्यांना आमचे म्हणणे कितपत समजले असावे, याबाबत शंकाच आहे, अशी प्रतिक्रिया पालकांच्या शिष्टमंडळातील एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
‘प्रकरणाचा तपास करणार‘
- याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पालकांच्या तक्रारी केंद्र सरकार आणि एनटीएपर्यंत पोहोचविल्याची माहिती ‘लोकमत‘ला दिली.
- आपण फेरपरीक्षेची मागणी केली आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, या प्रकाराची आधी चौकशी करावी लागेल. पालक म्हणतात त्याप्रमाणे गैरप्रकार झाला आहे का, हे तपासावे लागेल. त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवावी लागेल, असे उत्तर त्यांनी दिले.
- हा घोळ ग्रेसमार्क दिल्यामुळे झाला आहे. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये ग्रेसमार्क कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना एनटीएने १६०० विद्यार्थ्यांना प्रेसमार्क दिले आहेत. ते रद्द करून ओएमआरची पुन्हा तपासणी करून सुधारित निकाल लावण्यात यावा, इतकीच आमची मागणी आहे. आम्हाला फेरपरीक्षेला नको आहे. –डॉ. प्रीती व्यास, पालक
- ‘नीट‘च्या निकालाची निष्पक्ष समितीकडून चौकशी करण्यात यावी आणि तोपर्यंत राज्यातील प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली होती. फेरपरीक्षा हा यावरचा उपाय नाही; पण या सगळ्या प्रकारात बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जायला लावून त्यांच्या त्रासात भर टाकू नये. –डॉ. गीतांजली बोरकर, पालक
- दोन वर्षे नीटच्या तयारीसाठी अभ्यास केल्यानंतर आता पुन्हा या परीक्षेला सामोरे जाण्याची विद्यार्थ्यांची तयारी नाही. परीक्षेनंतर डिसेंबर उजाडेल. यात विद्यार्थ्यांचे आणखी नुकसान होणार आहे. –संदेश सावंत, पालक
NEET UG Exam 2024 Results – Medical Education Minister Hasan Mushrif on Friday said he will write to the Prime Minister’s Office (PMO) and the National Medical Commission (NMC) to conduct a forensic audit of the NEET UG exam and all the information related to the results and conduct a CBI probe into it. The Indian Medical Association (IMA) has also demanded a CBI probe and urged the National Medical Commission (NMC) not to start the admission process till the probe is completed.
‘नीट’ च्या निकालाची सीबीआय चौकशी करा – वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह ‘आयएमए’ चीदेखील मागणी
नीट यूजी परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी व त्याची सीबीआयकडून चौकशी करण्याकरिता पंतप्रधान कार्यालयाला आणि नॅशनल मेडिकल कमिशनला (एनएमसी) पत्र लिहिणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देखील सीबीआय चौकशीची मागणी करुन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) केली आहे.
- वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशेच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन नीट-यूजीत देण्यात आलेले ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी केली. त्यावर विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
नीट यूजीच्या माहितीपत्रकात कुठेही वेळ कमी पडल्याने ग्रेस मार्क देण्याचा मुद्दा समाविष्ट नव्हता. तरीही दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याने ऑल इंडिया रैंकिंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ओएमआर शीट आणि गुण स्कोअर कार्डशी जुळत नसल्याची पालकांची तक्रार आहे. - एनटीएने ग्रेस मार्काच्या नावाखाली १०० ते १५० गुणांची खिरापत काही विद्यार्थ्यांना वाटली आहे. त्यामुळे कटऑफ वाढला असून, राज्यातील सरकारी कॉलेजात सोडाच खासगी मेडिकल कॉलेजलाही प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. -संदेश सावंत, पालक
- पालकांची भीती – राज्यातील अनेक विद्यार्थी बाहेरील संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकणार नाहीत. ऑल इंडिया कोट्यातील जागा त्यांना मिळणार नाहीत. अशाने सरकारी तर सोडाच राज्यातील खासगी कॉलेजातही प्रवेश मिळणार नाही.
NEET UG Exam 2024 Answer Key | NEET UG Exam 2024 Results date is declared now. Neet-UG, a common entrance test conducted at the national level for admission to medical degree courses this year, has been mired in controversy. As many as 67 students got 99.99 percentile (720 out of 720 marks), adding to the concerns of students and parents that the cut-off for admissions will remain high this year. Some parents are preparing to move the Supreme Court against this.
नीट-युजीचा कटऑफ वाढला; ग्रेस मार्कमुळे नीट-युजीच्या निकालाबाबत शंका
नीट-युजी ग्रेसमार्कच्या निर्णयामुळे यंदा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता देशस्तरावर घेण्यात आलेली नीट-युजी ही सामाईक प्रवेश परीक्षा वादाच्या भोवऱयात सापडली आहे. त्यात तब्बल ६७ विद्यार्थ्यांना ९९.९९ पर्सेंटाईल (७२० पैकी ७२० गुण) मिळाल्याने यंदा प्रवेशाचा कटऑफ चढा राहण्याच्या चर्चेने विद्यार्थी-पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. काही पालकांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.
- नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (एनटीए) मंगळवारी नीट-यूजीचा निकाल जाहीर कऱण्यात आला. यंदाचा खुल्या गटाचा कटऑफ ७२०-१३७ वरून ७२०-१६४ असा वाढला आहे. त्यात मिळालेल्या गुणांच्या तुलनेत देण्यात आलेल्या रँकमध्ये मोठा फरक असल्याने विद्यार्थी-पालक चक्रावून गेले आहेत. विद्यार्थ्यांना ९९.९६ पर्सेंटाईल मिळूनही ४५३ वा रँक मिळाल्याने अनेक मोठ्या कॉलेजात प्रवेश मिळविणे विद्यार्थ्यांना दुरापास्त होणार आहे. अवघ्या २० गुणांच्या फरकामुळे विद्यार्थ्यांचा रँक दोन हजाराने खाली आल्याचे दिसून येत आहे. उदाहरणार्थ ७२० पैकी ७०० गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला थेट १,९९३वा रँक मिळाला आहे. तर ६३५ गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याचा रँक आहे, ४२,८९८. देशात एमबीबीएसच्या मर्यादीत जागा असताना चांगले गुण मिळवूनही रँक घसरल्याने चांगल्या संस्थेत प्रवेश मिळविणे दुरापास्त होणार आहे. अंतिम उत्तरसूची जाहीर केल्यानंतर अवघ्या दुसऱया दिवशी नीट-युजीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याबाबतही शंका व्यक्त होत आहे.
- १३ लाख प्रवेश पात्र – देशभरातून २४ लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांनी नीट-यूजी दिली होती. त्यापैकी ५,४७,०३६ विद्यार्थी आणि ७,६९,२२२ विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यातील खुल्या गटातून ३,३३,९३२, ओबीसीतून ६,१८,८९०, एससीतून १,७८,७३८, एसटीतून ६८,४७९ आणि इडब्ल्यूएसमधून १,१६,२२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
- ग्रेस मार्कचा निर्णय वादात – परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांना काही कारणांमुळे वेळ कमी मिळाला त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार नॉर्मलायझेशनच्या सूत्राच्या आधारे ग्रेस मार्क देण्यात आल्याचे एनटीएने जाहीर केले आहे. त्यावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला आहे. ग्रेस मार्क दिलेल्या विद्यार्थ्यांना ७१८ किंवा ७१९ गुणही मिळालेले असू शकतात, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. परंतु, ग्रेस मार्क देण्याचा तुमचा फॉर्म्युला काय आहे, याबाबत स्पष्टता द्या, मागणी विद्यार्थी करत आहेत. काही पालकांनी या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे.
- राज्यनिहाय निवड झालेले विद्यार्थी
उत्तर प्रदेश – १६५०४७
महाराष्ट्र – १४२६६५
राजस्थान – १२१२४०
तामिळनाडू – ८९४२६
कर्नाटक – ८९०८८
केरळ – ८६६८१
बिहार – ७४७४३
प.बंगाल – ६३१३५
मध्य प्रदेश – ६००७३
गुजरात – ५७१९७
तेलंगणा – ४७३७१
दिल्ली – ४६७९४
आंध्र – ४३८५८
NEET UG Exam 2024 Answer Key | NEET UG Exam 2024 Results date is declared now. The application process for NEET UG Exam 2024 began on 09 February 2024. Candidates were given time till March 16, 2024 to apply. The exam for the vacancy was held on May 5, 2024. The result has been declared on June 4, 2024. The NEET UG cut-off had increased last year, but this time the cut-off may be reduced. Last year, the normal range had a score of 720-137, this year it could be 715-130. Students will have to participate in counselling after neet ug result is declared. Details for NEET UG counselling will be announced a few days after the results.
NEET UG परीक्षा 2024 साठी अर्ज प्रक्रिया 09 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झाली. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 16 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. या रिक्त पदासाठी 5 मे 2024 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल आता 14 जून 2024 रोजी जाहीर होणार आहे.
NEET UG Expected Cut Off 2024
- कॅटेगरी | पर्सेटेज | कट ऑफ मार्क्स
- General Candidate – 50th percentile – 715-130 cut-off marks
- General-PH Candidate – 45th percentile – 129-119 cut-off marks
- SC/ST/OBC Candidate – 40th percentile – 129-105 cut-off marks
- SC/OBC-PH Candidate – 40th percentile – 118-105 cut-off marks
- ST-PH Candidate – 40th percentile – 118-105 cut-off marks
गेल्या वर्षी NEET UG कट ऑफमध्ये वाढ झाली होती, परंतु यावेळी कट ऑफ कमी होऊ शकतो. गेल्या वर्षी बद्दल बोलायचे तर, सामान्य श्रेणीत 720-137 गुण होते, यावर्षी ते 715-130 असू शकतात. NEET UG निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काउंसलिंगमध्ये सहभागी व्हावे लागेल. रिझल्टनंतर काही दिवसांनी NEET UG काउंसलिंगसाठी तपशील जाहीर केले जातील.
NEET UG Exam 2024 Answer Key is given here and also the link of Challenge of Provisional Answer Key is given below. To download the NEET UG 2024 answer key and response sheet, students have to login in candidate’s login portal with the help of the allotted credentials. The credentials required to download the NEET 2024 answer key by NTA are the application number and password/date of birth. National Testing Agency conducted the National Eligibility cum Entrance Test (UG) – 2024 for more than 24 lakh candidates at 4750 different Centres located in 571 Cities throughout the country including 14 Cities outside India on 05 May 2024 (Sunday) from 02:00 P.M. to 05:20 P.M. (IST). The National Testing Agency has uploaded the Provisional Answer Keys, Scanned Images of OMR Answer Sheet and Recorded Responses for NEET (UG) – 2024 on the website https://exams.nta.ac.in/NEET for candidates to challenge as per following details:
Challenge of Provisional Answer Key, Display of Scanned Images of OMR Answer Sheet and Display of Recorded Response for National Eligibility cum EntranceTest (UG) – 2024
नीट-यूजीच्या उत्तरतालिकेत २ उत्तरांवर आक्षेप
- वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता ५ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट- यूजी या सामाईक प्रवेश परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील दोन प्रश्नांच्या उत्तरांबाबत विद्यार्थी-पालकांकडून मोठ्या संख्येने आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. यातील एक प्रश्न इकोसिस्टीमवर आधारित आहे, तर दुसरा अणूवर आधारित आहे.
- विद्यार्थ्यांच्या मते या प्रश्नांची उत्तरे चुकीची नोंदविण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना ज्या प्रश्नाच्या उत्तराबाबत आक्षेप आहे, त्यासाठी प्रत्येकी २०० रुपये शुल्क भरून आपला आक्षेप नोंदविता येतो. ३१ मेपर्यंत सकाळी ११.५० वाजेपर्यंत या आक्षेपांची नोंद घेतली जाईल. त्यानंतर अंतिम उत्तरतालिका प्रकाशित केली जाईल. देशभरातून २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. लाखो विद्यार्थी याकरिता २०० रुपये शुल्क भरून आक्षेप नोंदविणार आहेत. हा पालकांना विनाकारण भुर्दड आहे, अशी प्रतिक्रिया पालकांच्या प्रतिनिधी सुधा शेणॉय यांनी व्यक्त केली.
NEET 2024 Answer Key Challenge Link
Click here for NEET 2024 Answer Key Challenge!
NEET UG Exam 2024 Provisional Answer Key