नीट यूजी परीक्षा पेपर-पेन यांच्या सहाय्यानेच घेण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला..!- NEET UG 2024 Scam
NTA Scam | NEET UG Scam NEET UG 2025 Exam updates
NEET UG 2025 Exam updates – The Central Government has taken a very important decision to conduct the NEET UG examination for admission to medical courses with the help of paper and pen. The announcement was made on Thursday after consultations with the Union Health and Education Ministries. The National Testing Agency (NTA) said the government has carefully considered the two options of conducting the exam with the help of paper and pen or online.
पेपर, पेनच्या साहाय्यानेच होणार -यूजी परीक्षा
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पेपर-पेन यांच्या सहाय्यानेच घेण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य तसेच शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. ही परीक्षा पेपर- पेनच्या सहाय्याने की ऑनलाइन पद्धतीने घ्यावी या दोन पर्यायांवर सरकारने बारकाईने विचार केला अशी माहिती राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली.
एनटीएने सांगितले की, नीट-यूजी परीक्षा एकाच दिवशी व एकाच शिफ्टमध्ये पेपर, पेनच्या सहाय्याने घेतली जाईल असा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे. २०२४मध्ये नीट – यूजी परीक्षेस २४ लाख विद्यार्थी बसले होते.
सीबीआय कारवाईकडे लक्ष -यूजी व यूजीसी नेट या परीक्षांच्या प्रस्नपत्रिका फुटल्याचा आरोप असून त्या प्रकरणांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये काय कारवाई होते याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
NEET UG 2024 Scam – The NEET-UG exam was conducted on May 5 at 4,750 centres across the country. Around 24 lakh students had appeared for the exam. However, as many as 67 students scored 720 out of 720 marks, leading to a nationwide controversy over allegations of question papers being leaked and irregularities in the exams. Therefore, some petitions have been filed in the Supreme Court seeking cancellation and re-conduct of the exam. Some of these petitions will come up for hearing on Monday, July 8.
The Centre on Friday told the Supreme Court that the decision to cancel the NEET-UG 2024 exam, which is required for admission to medical courses, would not be rational and would hurt the interests of honest students. The National Testing Agency (NTA), which conducts the exam, has also said that such a decision would be against the larger public interest.
‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करण्यास विरोध – केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
वैद्याकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘नीट-यूजी’ २०२४ ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तर्कशुद्ध नसेल, त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हितसंबंधांना धक्का बसेल असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. तर, ही परीक्षा घेणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’नेही (एनटीए) असा निर्णय व्यापक जनहिताविरोधात असेल असे म्हटले आहे.
- यंदाची ‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी, तसेच परीक्षेमधील अनियमिततेचा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ला नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर शुक्रवारी केंद्र सरकार आणि ‘एनटीए’कडून स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे दाखल करून उत्तरे देण्यात आली. ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षा पूर्णपणे रद्द केल्यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे गंभीर नुकसान होईल आणि प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणात फुटल्याचा कोणताही पुरावा नसताना असा निर्णय घेणे अतार्किक असेल असे केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. ही परीक्षा देशव्यापी पातळीवर घेण्यात आली होती आणि त्याचा निकालही आधीच जाहीर झाला आहे याकडे केंद्र सरकारने न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच अनियमिततांच्या आरोपांचा सीबीआयकडून तपास सुरू आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
- प्रतिज्ञापत्रातील अन्य मुद्दे – कोणत्याही परीक्षेमध्ये स्पर्धात्मक अधिकार असतात आणि कोणत्याही अयोग्य मार्गाचा अवलंब न करणाऱ्या मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांचे नुकसान करता कामा नये. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या आणि त्यासाठी अनेक वर्षे मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे सरकारने न्यायालयाला सांगितले आहे.
- ‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी देशभरात ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. जवळपास २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण मिळाल्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याचे तसेच परीक्षेत अनियमितता झाल्याचे आरोप होऊन देशभरात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी काही याचिकांवर सोमवारी, ८ जुलैला सुनावणी होणार आहे.
- निर्णय व्यापक जनहिताविरोधात असेल!
- ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षा रद्द करण्यास ‘एनटीए’नेही विरोध दर्शवला आहे. असा कोणताही निर्णय घेतल्यास तो अतिशय प्रतिकूल आणि व्यापक जनहिताच्या विरोधात असेल असे या संस्थेच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
- विशेषत: जे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या कारकीर्दीला धक्का बसण्याची भीती असल्याचे ‘एनटीए’ने म्हटले आहे.
- प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित घटना ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यल्प असल्याचा दावा ‘एनटीए’ने केला आहे.
सिद्ध झालेल्या घटकांवर आधारित खऱ्या चिंतांचे निवारण केलेच पाहिजे, पण कोणताही तथ्यात्मक आधार नसलेल्या, केवळ अनुमानाच्या आधारे करण्यात आलेल्या अन्य याचिका फेटाळल्या पाहिजेत. जेणेकरून प्रामाणिक परीक्षार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अकारण त्रास आणि मनस्ताप होणार नाही. – केंद्र सरकार
NEET UG 2024 Scam – New information is coming to light every day from the interrogation of Manish Kumar and Ashutosh Kumar, who were arrested by the CBI in connection with the NEET-UG question paper leak. The CBI is trying to find out who is ‘Munnabhai’, who played a key role in the case. The court of Special Judicial Magistrate Harsh Vardhan Singh had remanded the accused after examining their mobile phones. Apart from this, the CBI will interrogate all the accused arrested so far in this regard. This has been allowed by the court.
The committee appointed to improve the examination system has invited suggestions from students, parents and all stakeholders related to the education sector on the subject by July 7. This information has been given by the Union Ministry of Education. Former ISRO chief R Radhakrishnan heads the committee. Amid a nationwide row over malpractices in various examinations, the committee has sought suggestions on the examination pattern, measures to be taken to ensure the safety of the examination system and the functioning of the National Testing Agency (NTA).
The committee includes former AIIMS Delhi Director Randeep Guleria, Central University of Hyderabad Vice-Chancellor B.S. Which. Rao, Professor Emeritus, Department of Civil Engineering, IIT Madras; They include Pankaj Bansal, co-founder of People Strong, Aditya Mittal, dean of student affairs at IIT Delhi, and Govind Jaiswal, joint secretary in the Ministry of External Affairs.
परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी ७ जुलैपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन
- परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणेसाठी नेमलेल्या समितीने या विषयाबाबत विद्यार्थी, पालक, तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्व घटकांकडून येत्या ७ जुलैपर्यंत सूचना मागविल्या आहेत. ही माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.
- इस्रोचे माजी प्रमुख आर. राधाकृष्णन हे या समितीचे प्रमुख आहेत. विविध परीक्षांमधील गैरप्रकारांवरून देशभरात वादंग सुरू असताना, या समितीने परीक्षा पद्धती, परीक्षा पद्धतीच्या सुरक्षेसंदर्भात योजण्याचे उपाय, नॅशनल टेस्टिंग एजन्सीची (एनटीए) कार्यपद्धती या विषयी सूचना मागविल्या आहेत.
- या समितीमध्ये एम्स दिल्लीचे माजी संचालक रणदीप गुलेरिया, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादचे कुलगुरू बी. जे. राव, आयआयटी मद्रासमधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्रोफेसर एमेरिटस के. राममूर्ती, पीपल स्ट्रॉंग या संस्थेचे सह-संस्थापक पंकज बन्सल, आयआयटी दिल्लीतील विद्यार्थीविषयक घडामोडीविषयक विभागाचे डीन आदित्य मित्तल आणि परराष्ट्र खात्याचे सहसचिव गोविंद जैस्वाल यांचा समावेश आहे.
नीट प्रकरणातील ‘मुन्नाभाई’च्या शोधासाठी सीबीआयचे पथक झारखंडमध्ये रवाना
- नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या मनीषकुमार, आशुतोषकुमार या आरोपींच्या चौकशीतून रोज नवीन माहिती उजेडात येत आहे. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारा ‘मुन्नाभाई’ कोण आहे, याचा सीबीआय शोध घेत आहे. दोघांच्या मोबाइलची तपासणी केल्यानंतर विशेष न्यायदंडाधिकारी हर्षवर्धनसिंह यांच्या न्यायालयाने या आरोपींचा रिमांड दिला होता. त्याशिवाय याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या सर्व आरोपींची सीबीआय कसून चौकशी करणार आहे. त्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे.
- अटक केलेल्या १३ आरोपींमध्ये आयुष राज, बिट्ठकुमार, सिकंदर यादवेंदू शिवनंदनकुमार, अवधेशकुमार, अमित आनंद, राणीकुमारी आदींचाही समावेश आहे. प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘मुन्नाभाई’च्या शोधात सीबीआय आहे. या प्रकरणातील एक आरोपी संजीव मुखिया याच्याबद्दलही तपासातून नवी माहिती उजेडात आली आहे. नालंदा कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर येथे नोकरीला असलेल्या संजीव मुखियाने मेडिकल प्रिस्क्रिप्शन सादर करून रजा मंजूर करून घेतली होती. हे प्रिस्क्रिप्शन बनावट असावे, असा तपास यंत्रणांना संशय आहे. सीबीआयचे पथक झारखंडमधील हजारीबाग येथेही धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे एका ई-रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले.
NEET UG 2024 Scam – A case was registered at Shivaji Nagar police station late on Sunday night against four zilla parishad teachers from Latur and one from Deglur (Nanded district) and one from Delhi in connection with the NEET paper leak case. In the case of NEET, the information is being verified with the help of anti-terrorism squad. On Saturday, two teachers were called for questioning and later released. According to the investigating agencies, references to hall tickets and some financial transactions were found on the mobile phones of the accused, a senior police officer said. Based on that information, a case was registered against the four late last night.
नीट : लातूरच्या २ शिक्षकांसह नांदेड, दिल्लीच्या दोघांवर गुन्हा – मोबाइलवर हॉलतिकीट, आर्थिक व्यवहारांचे संदर्भ; एकाला घेतले ताब्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक तसेच देगलूर (जि. नांदेड) व दिल्लीतील एक अशा चौघांविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नीटप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाच्या साह्याने माहितीची पडताळणी करणे सुरू आहे. शनिवारी दोन शिक्षकांना चौकशीसाठी बोलावून नंतर सोडून देण्यात आले होते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाईलवर हॉलतिकिट व काही आर्थिक व्यवहारांचे संदर्भ आढळून आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे चौघांविरुद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.
नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांच्या फिर्यादीवरुन संजय तुकाराम जाधव (रा. लातूर), जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर), ईरन्ना मष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर जि. नांदेड ह.मु. आयटीआय उमरगा जि. धाराशिव) आणि गंगाधार (रा. दिल्ली) या चौघांविरोधात केंद्र सरकारने नव्याने केलेल्या पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यात जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर) याला पोलिसांनी रविवारी उशीरा रात्री ताब्यात घेतले आहे.
दोन शिक्षकांच्या चौकशीतून काय आले पुढे?
- संजय तुकाराम जाधव, जलिलखों उमरखान पठाण हे दोघे पैसे घेऊन परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवित असल्याची माहिती कळली. त्यावरुन एटीएसचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील नाईक हे पथकासह शनिवारी लातुरात दाखल झाले.
- प्राथमिक चौकशीसाठी दोघे शिक्षक स्वेच्छेने हजर झाले. त्यांच्या मोबाइलवरील माहिती, फोन गॅलरीमधील प्रवेशपत्र, चॅटिंगबाबत खुलासा करू शकले नाहीत. जलिलखाँ पठाण याने संजय जाधव यास प्रवेश पत्राच्या प्रति आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात लघुसंदेश पाठविल्याचे दिसून आले.
- जाधव याने अन्य एक संशयित ईरन्ना मष्णाजी कोनगलवार यास विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे व्हॉटसअपद्वारे पाठविले. पुढे ईरन्ना कोनगलवार याने दिल्लीतील गंगाधर नावाच्या व्यक्तीला संपर्क केला.
- प्रश्न विचारले. सोडून दिले – ज्या दोन शिक्षकांवर आरोप आहेत, त्यातील एकाने व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिले. पथक आमच्याकडे आले. पोलिस अधीक्षक कार्यालयात ऊन आमची चौकशी केली. काही प्रश्न विचारले. त्यानंतर आम्हाला घरी सोडून दिले असल्याचे त्याने सांगितले.
‘सीबीआय’ ची खास पथके बिहार, गुजरातला
- नीट पेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांकडून देशव्यापी आंदोलने सुरू असताना ‘सीबीआय’ने या प्रकरणात रविवारी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत ‘सीबीआय’ने विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके गोध्रा आणि पाटणा येथे पाठविण्यात आली.
- कट, फसवणूक, तोतयागिरी, विश्वासघात आणि उमेदवार, संस्था व मध्यस्थांकडून पुरावे नष्ट करणे, यासह व्यापक तपास करण्याची विनंती शिक्षण मंत्रालयाने ‘सीबीआय’ला केली आहे. ‘सीबीआय’ने आयपीसी १२० – बी (गुन्हेगारी कट) व ४२० ( फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
- ‘एनटीए’ची वेबसाइट, इतर पोर्टल सुरक्षित ‘एनटीए’ची वेबसाइट आणि इतर सर्व वेब पोर्टल पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि ते हॅक झाल्याचे वृत्त खोटे आणि दिशाभूल करणारे आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी एक परीक्षा पुढे ढकलली
- नॅशनल टेस्टिंग एजन्सी- मार्फत आयोजित संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट’ परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली.
- २५ ते २७ जून दरम्यान ही परीक्षा होणार होती.
किती जणांनी दिली फेरपरीक्षा?
- पूर्वी ग्रेस गुण मिळालेल्या १,५६३ विद्यार्थ्यांपैकी ८१३ विद्यार्थ्यांनी रविवारी पुन्हा परीक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ७ केंद्रांवर फेरपरीक्षा झाली.
- बिहारमधील केंद्रांवर ५ मे रोजी परीक्षेला बसलेल्या १७ विद्यार्थ्यांना ‘एनटीए ने प्रतिबंधित केले. एजन्सीने यापूर्वी ६३ उमेदवारांना परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल प्रतिबंधित केले होते.
- आता नीट-पीजीदेखील पुढे ढकलली आहे. या सरकारच्या राजवटीत उद्ध्वस्त झालेल्या शिक्षणव्यवस्थेचे हे आणखी एक दुर्देवी उदाहरण आहे. पेपर लीक करणारी टोळी आणि शिक्षण माफिया यांच्यासमोर सरकार हतबल आहे. -खासदार राहुल गांधी, काँग्रेस नेते
The Supreme Court on Friday refused to postpone the proposed counselling process for the controversial National Eligibility Entrance Test (NEET-UG) 2024 from July 6. “This process is not just about starting and closing,” the court said. Meanwhile, officials of the National Testing Agency (NTA) said the re-examination for 1,563 candidates who scored grace marks will be conducted at seven centres on Sunday.
The Supreme Court has issued notice to the National Testing Agency (NTA), the Central government and others on a plea seeking cancellation of NEET-UG due to alleged irregularities in the May 5 exam. Justice Vikram Nath and Justice S V. N. A vacation bench headed by Justice S.S. Bhati posted the matter for further hearing on July 8 along with other pending petitions alleging irregularities in the examination.
‘नीट’चे समुपदेशन होणारच, रविवारी ‘त्यांची’ फेरपरीक्षा सुप्रीम कोर्टात जोरदार सुनावणी; परीक्षा रद्द करण्याबाबत नोटीस जारी
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वादग्रस्त राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा पदवी (नीट-यूजी) २०२४ची प्रस्तावित समुपदेशन प्रक्रिया ६ जुलैपासून पुढे ढकलण्यास नकार दिला. ही प्रक्रिया निव्वळ सुरू करणे आणि बंद करण्याची नाही, असेही न्यायालयाने खडसावले. दरम्यान, ग्रेस गुण मिळालेल्या १,५६३ उमेदवारांसाठी येत्या रविवारी सात केंद्रांवर फेरपरीक्षा घेतली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) अधिकाऱ्यांनी दिली आहे.
- ५ मे रोजी झालेल्या परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे नीट-यूजी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए), केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस बजावली आहे.
- न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भाटी यांच्या सुटीतील खंडपीठाने परीक्षेत अफरातफरीचा आरोप करणाऱ्या इतर प्रलंबित याचिकांसह या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलैला ठेवली आहे.
- सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली यंदा २५ ते २७ जून या कालावधीत होणारी सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शुक्रवारी केली. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे एनटीएने म्हटले आहे.
- याचिकाकर्त्यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी खंडपीठाला विनंती केली की, समुपदेशन प्रक्रिया दोन दिवसांसाठी थांबवली जाऊ शकते. कारण सर्वोच्च न्यायालय ८ जुलै रोजी या सर्व याचिकांवर सुनावणी करणार आहे. मी समुपदेशनावर स्थगिती देण्याची विनंती करत नाही. मी फक्त प्रार्थना करत आहे.
- खंडपीठाने म्हटले की, “आम्ही अशाच प्रकारची विधाने ऐकत आहोत. समुपदेशन सुरू करणे आणि बंद करणे’ असा प्रकार नाही. ती एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ६ जुलैपासून सुरू होत आहे. समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलण्यास नकार देत खंडपीठाने सांगितले की, एनटीए, केंद्र आणि इतर प्रतिवादींसाठी उपस्थित असलेले वकील दोन आठवड्यांत याचिकेवर त्यांचे उत्तर दाखल करू शकतात”.
- विविध राज्यांत निदर्शने ‘नीट’ परीक्षेतील अनियमिततेच्या विरोधात काँग्रेसतर्फे देशभरात विविध राज्यांत निदर्शने करण्यात आली. समाजवादी पार्टीतर्फे उत्तर प्रदेशात आंदोलन करण्यात आले. बसपाच्या मायावती यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली, तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ‘नीट’ परीक्षेतील गोंधळ हा राष्ट्रीय प्रश्न झाला आहे, त्यातून विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे, अशी टीका केली.
- शिक्षणमंत्री अनुपस्थित – विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठात निदर्शने केल्याने तेथील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित राहिले नाहीत.
NTA Scam | NEET UG Scam 2024 – Union Education Minister Dharmendra Pradhan has changed his tone on the NEET exam. “We will not spare the culprits,” he said, adding that the NTA – National Testing Agency needs to be reformed. He assured the students that strict action would be taken against anyone found guilty in the case.
In Odisha, Pradhan said some students have been found to have been awarded grace marks due to short time, while on the other hand, irregularities have been reported in two places. The government has taken the matter seriously and students and parents should rest assured. We will take strict action. Strict action will be taken against officials of the National Testing Agency if they are also found guilty in the case. None of the convicts will be spared.
नीट परीक्षा स्कॅम २०२४ – सरकार उचलणार कठोर पाऊल; दोन पातळीवर चुका झाल्याचीही कबुली
नीट परीक्षेबाबतच्या वादानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतचा आपला सूर बदलला आहे. यातील दोषींना सोडणार नाहीत, असे स्पष्ट करतानाच त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी आश्वासन दिले की, जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
ओडिशामधील मतदारसंघात प्रधान म्हणाले की, काही विद्यार्थ्यांना कमी वेळेमुळे ग्रेस मार्क दिले गेल्याचे आढळले आहे तर दुसरीकडे दोन ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून, विद्यार्थी आणि पालकांनी निश्चिंत राहावे. आम्ही कडक कारवाई करणार आहोत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधील अधिकारीही या प्रकरणात दोषी असल्यास त्यांच्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही दोषींनी सोडले जाणार नाही.
न्यायालय नियुक्त अधिकाऱ्यांकडून चौकशी – वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेबाबत वाद सुरु असताना या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करा अशी मागणी माजी मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी रविवारी केली. तसेच, सरकारने परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतींबाबत सर्व राज्यांशी सखोल चर्चा करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अधिवेशनात जोरदारपणे मुद्दा मांडावा : सिब्बल – आगामी संसदेच्या अधिवेशनात सर्व राजकीय पक्षांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडावा. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत सरकार चर्चेला परवानगी देणार नाही. त्यामुळे त्यावर चर्चा होण्याची फारशी आशा नाही. गुजरातमधील काही घटनांनी मला धक्का बसला आहे, असे सिब्बल म्हणाले.
- गुणवत्तेचे मोजमाप म्हणून सादर केली जाणारी नीट परीक्षा एक घोटाळा आहे. केंद्र सरकारने या परीक्षेची बाजू घेऊ नये. कारण ते विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात, सामाजिक न्याय आणि गरिबांच्या विरोधात आहे.- एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्री, तामिळनाडू
- नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ची सत्यनिष्ठा आणि नीट परीक्षा आयोजित करण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न आहे. नीटमध्ये भेदभाव होतो आहे का? गरीब विद्यार्थ्यांना संधीपासून वंचित ठेवले जात आहे का? महाराष्ट्रासारख्या इतर राज्यांनीही नीटबाबत शंका व्यक्त केली आहे. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस
NEET UG 2024 Exam New updates – Students who have passed 10+2 (12th Class) examinations with physics, chemistry and mathematics as the main subjects can still become doctors. As per the new guidelines of the National Medical Commission, one must have passed the examination with biology/biotechnology subject as an additional subject in 12th Class from any recognized board. According to a notification issued by National Medical Commission (NMC), “Candidates who have passed class 12 with Physics, Chemistry, Biology/Biotechnology and English. Such students will also be allowed to appear in NEET UG exam for admission to MBBS. These students will be able to take admission in BDS courses. Moreover, this legal proof provided by NMC to candidates interested in studying abroad will make them eligible to pursue undergraduate medical courses.
Earlier, to be eligible for MBBS or BDS, a candidate had to complete a two-year regular in physics, chemistry, biology/biotechnology subjects in class XI and XII. As per the old rules, the study of biology/biotechnology or any other necessary subject could not be completed as an additional subject after passing class XII. However, the new NMC order has changed and these new rules are against the old rules.
According to the NMC, the issue was discussed on June 14. It was then decided to relax the eligibility criteria for appearing for NEET-UG and approve the eligibility certificate to study medicine abroad.
NEET-UG च्या पात्रता निकषांमध्ये बदल, आता ‘हे’ विद्यार्थीही करू शकणार मेडिकल अभ्यासक्रमांसाठी अर्ज
- ज्या विद्यार्थ्यानी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या मुख्य विषयांसह १० + २ (बारावी) परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत ते अजूनही डॉक्टर बनू शकतात. नॅशनल मेडिकल कमिशनच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून बारावीमध्ये अतिरिक्त विषय म्हणून जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान विषयासह परीक्षा उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- एनएमसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, “ज्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान आणि इंग्रजीसह बारावी उत्तीर्ण झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांनाही एमबीबीएसच्या प्रवेशासाठी NEET – UG परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाईल. या विद्यार्थ्यांना बीडीएस अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. शिवाय, परदेशात शिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांना एनएमसीने दिलेला हा कायदेशीर पुरावा पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रम करण्यास पात्र ठरवणार आहे.
- यापूर्वी, एमबीबीएस किंवा बीडीएस करण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान या विषयांचा दोन वर्षांचा नियमित पूर्ण करणे आवश्यक होते. जुन्या नियमानुसार जीवशास्त्र /जै वतंत्रज्ञान किंवा इतर कोणत्याही आवश्यक विषयाचा अभ्यास बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषय म्हणून पूर्ण करता येत नव्हता. मात्र, नवीन एनएमसी आदेशानुसार बदल झाले असून, हे नवे नियम जुन्या नियमाच्या विरुध्द्ध आहेत.
- एनएमसीने सांगितल्या प्रमाणे १४ जून रोजी या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर एनईईटी-यूजीसाठी उपस्थित राहण्याचे निकष शिथिल करण्याचा आणि परदेशात औषधाचा अभ्यास करण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
NEET UG Counselling
NEET UG Counselling Date: National Eligibility-cum-Entrance Test- Undergraduate (NEET UG 2022) second round counseling is going to start soon. Its second is scheduled to start from November 2, 2022. MCC has announced the dates on the official website mcc.nic.in. Candidates can register till 7th November 2022.
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा- अंडरग्रेजुएट (NEET UG 2022) दुसरी फेरी काउन्सिलिंग लवकरच सुरू होणार आहे. त्याचा दुसरा 2 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. MCC ने अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर तारखा जाहीर केल्या आहेत. उमेदवार 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत नोंदणी करू शकतात. 07 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांचे शुल्क भरता येणार आहे. चॉईस फिलिंग 3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर रात्री 11:55 वाजता फिलिंगसह लॉक केले जाऊ शकते.
विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी 7 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संबंधित विद्यापीठ आणि संस्थेत केली जाईल. दुसऱ्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल 11 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर, उमेदवारांना 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाटप केलेल्या संस्थेत प्रवेशासाठी अहवाल द्यावा लागेल.
या असतील महत्त्वाच्या तारखा
- दुसऱ्या फेरीच्या काउन्सिलिंगची नोंदणी – 2 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022
- फी जमा करण्याची तारीख – 2 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022
- चॉइस फिलिंग आणि लॉकिंग – 3 ते 8 नोव्हेंबर 2022
- कागदपत्रांची पडताळणी – 7 ते 8 नोव्हेंबर 2022
- जागा वाटप – 9 ते 10 नोव्हेंबर 2022
- NEET UG फेरी 2 जागा वाटप निकाल – 11 नोव्हेंबर 2022
- संस्थेत रिपोर्टिंग – 12 ते 18 नोव्हेंबर 2022
अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन
- सर्वप्रथम MCC च्या अधिकृत वेबसाईट mcc.nic.in वर जा.
- UG वैद्यकीय समुपदेशनासाठी लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी लिंकवर जा आणि तुमचा तपशील भरा आणि पोर्टलवर नोंदणी करा.
- आता लॉगिनसह नोंदणी फॉर्म पूर्ण करा.
- कागदपत्रे अपलोड करा आणि नोंदणी शुल्क जमा करा.
- आता तुमच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.
NEET UG Counselling 2022 Registration: Medical Counselling Committee, MCC will begin the registration process for NEET UG Counselling 2022 Round 1 on October 11, 2022. Candidates can register online through the official site of MCC at mcc.nic.in The registration process will close down on October 17, 2022. The choice filling/ locking window will open on October 14 and will end on October 18, 2022. The verification of internal candidates by the respective Universities/ Institutes will be done from October 17 to October 18, 2022.
राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह परीक्षा, NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 11 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल. NEET UG परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर भेट द्यावी लागेल आणि उद्याच्या आधी समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी करावी लागेल.
नोंदणी दरम्यान, उमेदवारांना त्यांची NEET UG कागदपत्रे, प्रवेशपत्र, स्कोअर कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे प्रदान करावी लागतील. फेरी 1 ची समुपदेशन प्रक्रिया 28 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल. समुपदेशनासाठी काही महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
काही महत्त्वाच्या तारखा
- नोंदणीची सुरुवात – 11 ऑक्टोबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022
- निवड भरणे – 14 ऑक्टोबर 2022
- चॉईस फिलिंग आणि लॉकिंगची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०२२
- अंतर्गत उमेदवारांची पडताळणी – 17-18 ऑक्टोबर 2022
- शीट वाटपाची प्रक्रिया – 19 -20 ऑक्टोबर 2022
- फेरी 1 जागा वाटप निकाल – 21 ऑक्टोबर
- अहवाल – 23-28 ऑक्टोबर 2022
त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी समुपदेशनाची प्रक्रिया २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जी 18 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर, MCC ने एक मॉप अप फेरी आयोजित करण्यात येणार आहे. हे उल्लेखनीय आहे की NEET UG च्या 15% अखिल भारतीय कोट्यासाठी आणि डीम्ड विद्यापीठे, ESIC, AFMS, AIIMS आणि JIPMER मधील सर्व जागांसाठी MCC द्वारे समुपदेशन केले जाईल.
काउन्सिलिंग साठी आवश्यक कागदपत्रं तयार ठेवण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे. जेणेकरून शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. काउन्सिलिंग साठी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ही कागदपत्रं आवश्यक
- NEET रँक कार्ड
- NEET प्रवेशपत्र
- डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- इयत्ता 10, 12 ची मार्कशीट
- Address प्रूफ
- कॅरेक्टर सर्टिफिकेट
- मायग्रेशन सर्टिफिकेट
- वैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो इ.
NEET UG Exam Results 2022: The result of the entrance test with National Eligibility (NEET UG 2021) has been announced soon. According to media reports, the result is likely to be announced today. The NEET UG exam was held on 17th July. Applicants who apply for these posts may check their results from the given link.
NEET Exam 2022 Result Link: नीट यूजी (NEET UG) निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. विद्यार्थ्यांना लवकरच त्यांचा निकाल पाहता येणार आहे. नीट पुनर्परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा, निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
या परीक्षेला बसलेल्या आणि निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना एनटीए नीट यूजी (NTA NEET UG) च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. नीट यूजी परीक्षा १७ जुलै रोजी झाली होती. त्यानंतर परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे.
१६ लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
- नीट यूजी परीक्षेत १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नीट परीक्षेला १६ लाख विद्यार्थी बसले होते. नीट तात्पुरती उत्तरतालिका आधीच प्रसिद्ध झाली आहे. निकाल जाहीर होताच अंतिम उत्तरतालिका केली जाण्याची शक्यता आहे. निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
NEET UG Result: असा तपासा निकाल
- नीट यूजी परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जा.
- त्यानंतर होमपेजवर दिसणार्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर अशी मागितलेली माहिती भरा.
- निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- उमेदवार त्यांचा स्कोअर तपासून निकाल डाउनलोड करू शकतात.
नीट परीक्षेनंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश
नीट यूजी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. एमबीबीएस, आयुष अभ्यासक्रमांव्यतिरिक्त बीडीएस आणि बीएससी नर्सिंगचे विद्यार्थी इतर वैद्यकीय अभ्यासक्रम करू शकतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. नीट ही वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा आहे. जी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते. ही परीक्षा एनटीएद्वारे घेतली जाते.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
NEET UG Answer Key
NTF has released a scanned copy of OMR sheet of UG 2021 exam. Candidates appearing for this exam will be able to view the OMR sheet by visiting the official website. Candidates can view the OMR sheet till 9 pm on November 14. Candidates are requested to contact the helpline number 011-40759000 if they have any queries.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा नीट यूजी २०२१ च्या ओएमआर शीटची स्कॅन कॉपी जाहीर केली आहे. एनटीएद्वारे जाहीर केलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, ‘ओएमआर उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत न मिळालेल्या उमेदवारांकडून विनंत्या प्राप्त झाल्यानंतर, एनटीए आता नीट यूजीच्या ओएमआर उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात. तसेच बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलोकरुन डाऊनलोडदेखील करु शकतात. एनटीएने आधीच उमेदवारांना ओएमआर उत्तरपत्रिका पाठवली आहे.
How to Download NEET UG 2021 OMR Sheet
- उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट-neet.nta.nic.in ला भेट द्या.
- आता “NEET (UG) 2021 OMR DISPLAY” या नोटिफिकेशनवर क्लिक करा.
- एक नवीन विंडो उघडेल. उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारख्या क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा.
- यानंतर स्क्रीनवर ओएमआर शीट दिसेल.
- उमेदवार ओएमआर शीट डाउनलोड करण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करू शकतात.
उमेदवार १४ नोव्हेंबर रात्री ९ वाजेपर्यंत ओएमआर शीट पाहू शकतील. उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक-०११-४०७५९००० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी उमेदवार मेल [email protected] वर देखील लिहू शकतात.
NEET UG Exam Results
The result of the entrance test with National Eligibility (NEET UG 2021) has been announced. Students can view the results by visiting NTA’s official website neet.nta.nic.in. After successfully passing UG 2021, students can get admission for MBBS course in top medical colleges of the country.
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेचा (NEET UG 2021) निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी एनटीएच्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.inवर जाऊन निकाल पाहू शकतात. नीट यूजी २०२१ची परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर विद्यार्थी देशातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी अॅडमिशन घेऊ शकतात.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एनटीए ऑल इंडिया कोटा अंतर्गत १५ टक्के जागांसाठी एक गुणवत्ता यादी तयार करेल. यासोबत एनटीए राज्य कोट्यातील इतर ८५ टक्के जागांच्या काउंसलिंगसाठी सर्व राज्यातील पात्र विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागाला देईल. ज्याआधारावर राज्य आपली गुणवत्ता यादी तयार करेल.
असा पाहा नीटचा निकाल
- अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.inवर जा.
- होमपेजवर दिसणार निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- मग तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल्सवर नोंदवा आणि सब्मिट करा.
- त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर येईल, तो डाऊनलोड करा.
- निकालाची एक प्रिंट आऊट देखील काढा.
नीट यूजीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल
NEET UG Exam
The National Testing Agency (NTA) will close the UG 2021 correction window 26th Oct 2021 at 11.50 pm. Candidates who want to amend their UG application in 2021 can apply from the link activated on the examination portal, neet.nta.nic.in.
NEET 2021: पदवीपूर्व वैद्यकीय आणि दंत प्रवेश परीक्षा ‘नीट यूजी २०२१’ च्या अर्जात सुधारणा करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२१ ही शेवटची संधी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे रात्री ११.५० वाजता नीट यूजी २०२१ च्या अर्जातील दुरुस्तीची विंडो बंद केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या नीट यूजी अर्ज २०२१ मध्ये सुधारणा करायच्या आहेत ते परीक्षा पोर्टल, neet.nta.nic.in वर सक्रिय केलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात.
अर्ज दुरुस्ती विंडोच्या कालावधीबाबत उमेदवारांकडून विनंत्या प्राप्त झाल्या होत्या. त्या लक्षात घेऊन नीट यूजी २०२१ अर्जामध्ये पहिल्या टप्प्यात भरल्या गेलेल्या मर्यादित तपशीलामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्व तपशीलांमधील त्रुटी सुधरणा करण्यासाठी अर्ज दुरुस्ती विंडो खुली करण्यात आली.
२१ ऑक्टोबरला नोटीस जाहीर करुन अर्ज दुरुस्ती विंडो खुली आली होती. एनटीद्वारे फेज १ मधील नीट यूजी २०२१ च्या अर्जामध्ये लिंग, राष्ट्रीयत्व, ईमेल पत्ता, श्रेणी, उप-श्रेणी यामध्ये दुरुस्त्या किंवा त्रुटी सुधारता येणार आहेत. तसेच फेज २ मध्ये भरलेल्या सर्व तपशीलांच्या दुरुस्त्या किंवा त्रुटी सुधारता येणार आहेत. ही प्रक्रिया करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगिन करावे लागेल
अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी क्लिक करा
NEET UG Exam Results
Candidates awaiting the results of National Eligibility Test (UG) -2021 will have to wait a few more days. The National Testing Agency (NTA), which is conducting the exams, has once again opened the application correction window for National Eligibility cum Entrance (UG) -2021 (NEG) 2021 for admission in medical and dental courses
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (यूजी) – २०२१ च्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मडिकल आणि डेंटल कोर्सेजमध्ये प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेंस (यूजी) -२०२१ म्हणजेच नीट (यूजी) २०२१ साठी अर्ज सुधारणा विंडो पुन्हा एकदा खुली केली आहे. यामुळे उमेदवारांना अर्जातील त्रुटी सुधारता येणार आहेत.
NEET 2021- नीट यूजी परीक्षेची उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार
२१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्जात करेक्शन करण्यासाठी विंडो खुली राहणार आहे. अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. अर्जातील करेक्शन झाल्यानंतर एनटीएकडून नीट रिझल्ट २०२१ ची घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
NEET PG Results: NEET PG परीक्षेचे स्कोअरकार्ड जारी
नीट यूजी २०२१ निकालाच्या घोषणेआधी एनटीए परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करेल. त्यानंतर त्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात येतील. त्यांच्या समीक्षेनंतरच अंतिम उत्तरतालिका आणि निकाल घोषित केले जातील.
या लिंकवरुन करा अर्जात सुधारणा
NEET UG Exam
The National Testing Agency (NTA) is expected to release an update on the results of the Medical and BDS Entrance Examination, National Eligibility Test (NEET UG) -2021 soon. The results are likely to be published on the examination portal, neet.nta.nic.in or on the official website, nta.ac.in. Candidates appearing for this exam should visit the website regularly to know the updates.
NEET Result 2021: राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे मेडीकल आणि बीडीएस प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG)-2021 निकालाच्या घोषणेसंदर्भातील अपडेट लवकरच जारी केले जाण्याची शक्यता आहे. परीक्षा पोर्टल, neet.nta.nic.in वर किंवा अधिकृत वेबसाइट, nta.ac.in वर निकालासंदर्भातील माहिती जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी वेबसाइटवर नियमितपणे भेट देत अपडेट्स जाणून घ्यावेत.
एनटीएने नीट यूजी २०२१ प्रवेश परीक्षेचे आयोजन १२ सप्टेंबर २०२१ रोजी देशभरात आणि परदेशातही विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. नीट २०२१ परीक्षेत सुमारे १६ लाख उमेदवार सहभागी झाले होते.
आतापर्यंतचे अपडेट जाणून घ्या…
सप्टेंबर २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात नीट यूजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर परीक्षेच्या निकालासंदर्भातील घोषणा सप्टेंबर अखेरपर्यंत केली जाणार होती. मात्र, या दरम्यान, एनटीएने नीट २०२१ साठी अर्जाची दुसरी फेरी सुरू केली.
दुसऱ्या टप्प्यातील रजिस्ट्रेशनसाठी अॅप्लिकेशन विंडो १ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत खुली करण्यात आली होती. यानंतर या अर्जांमधील दुरुस्तीसाठी उमदेवारांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्याने दुरुस्तीसाठी करेक्शन विंडो उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.५० पर्यंत ही विंडो दुरुस्तीसाठी अॅक्टिव्ह असणार आहे. यानंतर आता एनटीएद्वारे निकालाच्या घोषणेबाबत अपडेट येऊ शकते असं म्हटलं जात आहे.
उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की नीट यूजी 2021 निकालाच्या घोषणेआधी एनटीए परीक्षेची प्रोव्हिजनल ‘आंसर की’ जारी करेल. त्यानंतर त्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात येतील. त्यांच्या समीक्षेनंतरच अंतिम उत्तरतालिका आणि निकाल घोषित केले जातील.
NEET UG 2024 Exam updates