NEET PG Exam Result- या’ तारखेला जारी होणार Answer Key
NEET PG Exam Result
NEET PG Answer Key: National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) to release the answer key for the National Eligibility cum Entrance Test — Postgraduate soon. About 2.9 lakh students appeared for the NEET PG Exam 2023. The NEET PG result will be released on March 31, 2023. Once released, candidates can download the NEET PG answer key and NEET PG result through the official site of NBE at natboard.edu.in. NEET PG exam was conducted on March 5, 2023.
NEET PG परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. परीक्षेचा निकाल कधी जारी होणार त्याबाबतची तारीख जाहीर झाली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्स एक्झामिनेशन, NBEMS द्वारे NEET PG परीक्षा 5 मार्च 2023 रोजी घेण्यात आली. देशभरातील विविध शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. ज्यामध्ये सुमारे 2.9 लाख उमेदवारांनी हजेरी लावली. सध्या परीक्षार्थी परीक्षेच्या उत्तर कीच्या प्रतीक्षेत आहेत.
NEET PG परीक्षेच्या वेळापत्रकानुसार त्याचा निकाल 31 मार्च रोजी जाहीर होणार आहे. यासाठी सुमारे तीन आठवडे शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत बोर्ड परीक्षेची आन्सर की लवकरात लवकर प्रसिद्ध करेल. प्रथम तात्पुरती उत्तर की जारी केली जाईल, ज्यावर प्राप्त झालेल्या आक्षेपांच्या आधारे अंतिम आन्सर की आणि निकाल जाहीर केले जातील.
उमेदवार अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जाऊन NEET PG ची अन्सार की डाउनलोड करू शकतील. मुख्यपृष्ठावर आन्सर की लिंक उपलब्ध असेल. यासोबतच ऑनलाइन पद्धतीनेही हरकती नोंदवता येतील.
अशा पद्धतीनं डाउनलोड करा Answer Key
- NBEMS च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जा
- होम पेजवर उपलब्ध असलेल्या NEET PG 2023 Answer Key लिंकवर क्लिक करा
- NEET PG 2023 उत्तर की PDF फॉरमॅटमध्ये दिसेल.
- पीडीएफ फाइल तपासा, जतन करा आणि डाउनलोड करा
- भविष्यातील संदर्भासाठी फाइलची हार्ड कॉपी ठेवा.
पदव्युत्तर पदवीसाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा ही भारतातील विविध पदव्युत्तर डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD), मास्टर ऑफ सर्जरी (MS) आणि देशातील सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डिप्लोमा प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता आणि क्रमवारी परीक्षा आहे.