Nayab Tehsildar Bharti -नायब तहसीलदारांची 35 पदे रिक्त
Nayab Tehsildar Recruitment 2022
Nayab Tehsildar Bharti 2022:Deputy Tehsildar posts are vacant in Chandrapur district. There is a total of 35 Posts are vacant of Deputy Tehsildar. The revenue department serves as an important link between farmers and the government. Deputy Tehsildars have been appointed in various departments for this purpose. In the last few months, there are 35 vacancies for Deputy Tehsildars in the district. Read More regarding Nayab Tehsildar Bharti 2022 as given below.
नायब तहसीलदारांची 35 पदे रिक्त
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे या रिक्त पदांचा अतिरिक्त भार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात महसूल विभागातील कामकाज रखडल्याचे चित्र आहे. रिक्त पदांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Nayab Tehsildar Recruitment 2022
शेतकरी व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून महसूल विभाग कार्य करतात. याकरिता विविध विभागात नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात नायब तहसीलदारांची ३५ पदे रिक्त आहे. यामुळे अनेक कामे रखडली आहे. रिक्त पदांचा कार्यभार इतर नायब तहसीलदार तसेच अव्वल कारकूनकडे देण्यात आला आहे. त्यामुळे वेळेत काम होत नसल्याची ओरड आहे. रिक्त पदे त्वरित भरून दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
तालुका पातळीवर तहसील कार्यालय हे महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. शेती संबंधित कागदपत्रांची पूर्तता तसेच सर्व कामे महसूल विभागामार्फत केले जाते. शेती संबंधित सातबारा दुरुस्ती, फेरफार, शेती संबंधित असणाया केसेस तहसील कार्यालयामार्फत चालविल्या जाते. नैसर्गिक आपत्ती, त्याचप्रमाणे शैक्षणिक कागदपब्रांसाठी महसूल विभाग महत्त्वाचा दुवा आहे. परंतु कामे रखडत असल्याने शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून रोष त्यात केला जात आहे