नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेची आन्सर कि उपलब्ध – Nashik Rural Police 2021 Answer Key
Nashik Rural Police Results 2021 Declared
Nashik Rural Police 2021 Answer Key
Nashik Rural Police 2021 Answer Key is available below for the examine held on 2nd April 2023.
नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेची आन्सर कि उपलब्ध
Nashik Rural Police Constable Results 2021 Declared
Nashik Rural Driver Police Recruitment 2021 Written Exam Result Declared now. The final result of the written examination conducted for the vacancies of 15 drivers in Nashik Rural Police Force has been declared. As there is no correct option in the multiple choice written test, all the candidates have been given one mark by the police force. Meanwhile, the final merit list will be announced based on the marks of field, driving skills and written test.
नाशिक पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
- नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १५ वाहनचालकांच्या रिक्तपदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. बहुपर्यायी असलेल्या लेखी परीक्षेत योग्य पर्याय नसल्याने पोलिस दलातर्फे सर्व उमेदवारांना एक गुण देण्यात आला आहे. दरम्यान, मैदानी, चालक कौशल्य व लेखी परीक्षेच्या गुणांवरून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
- नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या लेखी परीक्षेत १२४ पात्र उमेदवारांपैकी १२२ उमेदवारांनी हजेरी लावली होती. रविवारी (दि.२६) झालेल्या बहुपर्यायी परीक्षेत १०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी २०२३ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला, असा प्रश्न विचारला होता. मात्र प्रश्नपत्रिकेत उत्तरांत दिलेल्या चार पर्यायांपैकी एकही अचूक पर्याय नव्हता. ही बाब पोलिस दलाच्या लक्षात आल्याने अंतिम निकालात सर्वच उमेदवारांना एक गुण देण्यात आला आहे. लेखी परीक्षेच्या प्राप्त हरकती निकाली काढल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- अंतिम यादी प्रवर्गनिहाय – नाशिक ग्रामीण पोलिस दलात १५ वाहनचालकांच्या रिक्त जागांसाठी २,११४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ ते ४ जानेवारीदरम्यान मैदानी परीक्षेसाठी १,२४० उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यातून १,०२२ उमेदवारांनी वाहन चालवण्याची प्रत्यक्ष चाचणी दिली होती. त्यापैकी १२४ उमेदवारांची लेखी परीक्षेकरिता निवड झाली होती. अंतिम यादी प्रवर्गनिहाय जाहीर होणार आहे.
- ५२ जणांना ९० पार गुण – १०० गुणांच्या परीक्षेत अंकगणित, सामान्य घडामोडी, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालविण्यासह वाहतुकीसंदर्भातचे नियम यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. या परीक्षेत ५२ उमेदवारांनी ९० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. तसेच तीन उमेदवारांना ९७, सात उमेदवारांना ९६ आणि चार उमेदवारांना ९५ गुण मिळाले आहेत.
२६ – मार्च – २०२३ | Nashik Rural Police Recruitment for Police driver written Exam Answer key | |
२७ – मार्च – २०२३ | नाशिक ग्रामीण चालक पोलीस भरती २०२१ लेखी परीक्षा निकाल |
Superintendent of Police Nashik Rural Police Constable Driver Recruitment-2021 List of Eligible Candidates for Written Exam.
पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती -२०२१ च्या लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी.
Nashik Rural Police recruitment-2021 List of Candidates qualified for written examination for Police Constable are given below. Candidates see the complete nashik gramin police bharti results on this page. Nashik Rural Police Results 2022 Declared here.
- नाशिक : जिल्हा ग्रामीण पोलिस भरती २०२१ पोलिस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी बुधवारी (दि. १५) जाहीर करण्यात आली. पोलिस मैदानी चाचणी दिलेल्या ११ हजार २४४ उमेदवारांपैकी ४ हजार ५१८ उमेदवारांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले होते. त्यांच्या १:१० या प्रमाणात १ हजार ८६९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले असून, भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांना ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे.
- नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई यांची १६४ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात झाल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी एकूण १८ हजार ९३५ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी पोलिस मुख्यालयाच्या आडगाव येथील कवायत मैदानावर ४ ते २० जानेवारीदरम्यान घेण्यात आली. या चाचणीसाठी अर्ज केलेल्या एकूण १८ हजार ९३५ उमेदवारांपैकी १३ हजार ८६ उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. यातील ११ हजार २४४ उमेदवार शारीरिक मोजमापे व कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्याने त्यांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणीत मिळालेले गुण त्या त्या दिवशी नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते.
- त्यावरील शंका व तक्रारींचे निरसन करण्यात आल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी दिलेल्या ११ हजार २४४ उमेदवारांपैकी ४ हजार ५१८ उमेदवारांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहे. या उमेदवारांमधून १:१० या प्रमाणात १ हजार ८६९ एवढे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी बुधवारी (दि. १५) ग्रामीण पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Nashik Rural Police Constable Results 2022 Declared