नाशिक महानगरपालिकेतील स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती NMC Recruitment 2023
Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2023
Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2023
As per the latest news the postponement of recruitment of Safai kamgar in Nashik Municipal Corporation. As the decision taken by the government regarding the recommendation of the Lad and Page Committee while appointing sanitation workers in local self-government bodies has been challenged in the High Court, the High Court has stayed any other decision including the recruitment of sanitation workers. Therefore, administrative work including recruitment cannot be done in the municipal corporation. In order to bring the Meghwal, Mehtar and Valmiki communities into the mainstream, the government formed the Lad and Page Committee for economic upliftment. The committee has suggested that cleaning work should be given to them to bring the mila flowing from the head into the mainstream.
NMC Recruitment : स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कर्मचारी नियुक्त करताना लाड व पागे समितीच्या शिफारशी संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसह अन्य कुठलाही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेत भरतीसह प्रशासकीय कामकाज करता येणार नाही. मेघवाळ, मेहतर व वाल्मीकी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने शासनाने लाड व पागे समिती गठित केली. या समितीने डोक्यावरून मैला वाहणाऱ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वच्छतेचे काम त्यांनाच द्यावे अशा सूचना केल्या आहेत.
- त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाल्मीक मेहतर व मेघवाळ समाजाच्या नागरिकांना स्वच्छतेचे काम दिले जात होते. परंतु २०१६ मध्ये तत्कालीन शासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बदल केला. त्यात मेघवाळ, वाल्मीकी व मेहतर समाजाव्यतिरिक्त स्वच्छतेचे काम करणारा प्रत्येक घटक या व्याख्येत बसविण्यात आला.
- शौचालय स्वच्छता, घाणीशी संबंधित तसेच मलनिस्सारण व्यवस्था नाली व गटारे ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग, डोक्यावरून महिला वाहून नेणारा वर्ग यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बसविण्यात आले.
- तसेच, सफाई कामगारांकरिता वारसा हक्काची तरतूददेखील करण्यात आली. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या वारसांना त्यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्या आधारे नेमणूक वर्ग चार किंवा वर्ग तीनमध्ये करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या. शासनाच्या या निर्णयामुळे वाल्मीकी, मेहता व मेघवाळ समाजा व्यतिरिक्त अन्य लोक सफाई कामाचे हकदार ठरले.
- परंतु असे असले तरी स्वच्छतेचे काम करणाऱ्यांचे नोकरी पदेदेखील घटली. लाड व पागे समितीच्या शिफारशी कायम करावे याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. यावर १८ एप्रिलला पुढील सुनावणी देण्याचे सूचित करताना तोपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना संदर्भात कुठलाही निर्णय घेऊ नये, अशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.
- “शासन निर्णयामुळे वाल्मीकी मेहतर व मेघवाळ समाजावर अन्याय झाला आहे. लाड व पागे समितीने केलेल्या शिफारशी पुन्हा लागू कराव्या, अशी आमची मागणी असून शासनाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.” – सुरेश मारू, कार्याध्यक्ष, मेहतर, मेघवाळ, वाल्मीकी समाज संस्था.
Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2023
नाशिक महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी भरती
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : There were 5000 seats are vacant for Safai Kamgar in Nashik Mahanagarpalika. As per the news the Nashik Mahanagarpalika decided to recruiting 700 safai karmchari very soon through the outsourcing process. Read the complete details carefully given below :
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
नाशिक : शहरात स्वच्छता करण्यासाठी लोकसंख्येनुसार पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना, सध्या सतराशे कर्मचाऱ्यांवर सफाई केली जात आहे. पालिकेने आऊटसोर्सिंद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला असला तरी, तो न्यायालयात अडकून पडला आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नियमित साफसफाईसाठी दोन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करावी अशी मागणी शहरातील तीनही आमदारांसह महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी, आमदार अॅड. राहुल ढिकले, सिमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे उपस्थित होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात स्वच्छता व जंतुनाशक फवारणी नियमित होणे आवश्यक आहे. सध्याच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. आऊटसोर्सिंगने ७०० सफाई कर्मचारी भरती प्रक्रियेस उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी शासनाच्या सचिवांशी चर्चा करून किमान दोन महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचारी तातडीने भरावे, लॉकडाऊन मुळे नाशिक मध्ये नागरिकांना औषधे व जीवनावश्यक वस्तू घेण्यात अडचणी येत असल्याने महापालिकेने मोबाईल अॅप्लिकेशन तयार करून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची संपूर्ण नावे व त्यांच्या फोन नंबर अॅपवर द्यावा. शहरातील भाजी मार्केट मध्ये सामाजिक आंतर पाळणे, भाजीपाला हाताळताना संसर्ग होऊ नये तसेच पैशाची देवाण-घेवाण करताना संसर्ग होऊ नये यासाठी पेटीएम क्रेडिट कार्डची सुविधा वापरावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
सौर्स : मटा
Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2023
Gautam Nagar ambad MIDC Nashik
[email protected]
10pass
Email:[email protected]
Add:- Lili apt flat no 4 Shanti park upnagar takali road nashik-06