नाशिक महापालिकेचा वैद्यकीय, अग्निशमन रिक्तपदांची भरती संकटात! ‘टीसीएस’ला ‘ड’ वर्ग पदे भरण्याचा अधिकार – Nashik Fire Bharti 2024

Nashik Fire Brigade Bharti 2024 Apply Here

Nashik Fire Bharti 2024 – In the wake of the paper leak case, the vacancies of Class A, B and C municipal corporations as well as the newly recruited posts will be taken up by the State Public Service Commission, which has put the recruitment of 624 posts of municipal corporations in jeopardy. Tata Consultancy Services will have the right to fill only the posts of ‘D’ class municipalities.  General elections were held in 1992. Subsequently, 7,092 posts were sanctioned to the Nashik Municipal Corporation as per the revised format. At that time, the municipality was given ‘C’ class status. Of the 7,092 posts, about 2,800 are vacant. Of these, 706 posts in the medical and fire departments were approved by the government to be filled up during Covid as an urgent matter. However, it was the government that appointed two companies, IBPS or TCS, while filling up the vacant posts. There were instructions to fill vacancies through one of these two companies. Accordingly, the Nashik Municipal Corporation (NMC) appointed Tata Consultancy Services( TCS).

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नाशिक महापालिकेचा वैद्यकीय, अग्निशमन रिक्तपदांची भरती संकटात! ‘टीसीएस’ला ‘ड’ वर्ग पदे भरण्याचा अधिकार

पेपरफुटी प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात अ, ब व क वर्ग महापालिकांची रिक्तपदे तसेच नव्याने भरती केली जाणारी पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची घोषणा करण्यात आल्याने महापालिकेच्या ६२४ पदांची नोकर भरती संकटात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीला फक्त ‘ड’ वर्ग महापालिकांची पदे भरण्याचा अधिकार राहणार आहे.  १९९२ ला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यानंतर नाशिक महापालिकेला सुधारित आकृतिबंधानुसार ७ हजार ९२ पदे मंजूर करण्यात आले. त्या वेळी महापालिकेला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला. ७ हजार ९२ पदांपैकी जवळपास २८०० पदे रिक्त झाली आहे. यातील वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०६ पदे अत्यावश्यक बाब म्हणून कोविडकाळात भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. मात्र रिक्त पदांची भरती करताना आयबीपीएस किंवा टीसीएस या दोन कंपन्यांची नियुक्ती शासनानेच करून दिली होती. या दोनपैकी एका कंपनीमार्फत रिक्त पदांची भरती करण्याच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीची नियुक्ती केली.

  • ‘अ’ वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केली जातात. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळून ६२४ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणी व लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अद्यापपर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. मात्र आता रिक्त पदांची भरती अडचणीत सापडली आहे.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वर्गातील नोकरभरतीदेखील राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याचे निर्देश दिल्याने आता सर्वच पदांसाठी स्पर्धा परीक्षाप्रमाणे अभ्यास करावा लागणार आहे.
  • अत्यावश्यक पदे सोडून इतर पदे भरतानादेखील तांत्रिक अडचण आहे. शासनाच्या नियमानुसार आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे असेल तर पदे भरता येत नाही. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च हा ४९ टक्क्यांच्या वर पोचला आहे. त्यामुळे ती भरतीदेखील करता येणार नाही.
  • “नाशिक महापालिकेचा वर्ग असताना त्या वेळी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी महत्त्वाच्या अग्निशामक व वैद्यकीय विभागातील पदांची भरती करण्यासाठी टीसीएस कंपनीमार्फत प्रक्रिया झाली होती. परंतु आता शासनाकडून नवीन सूचना आल्यास त्यानुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाईल.” – डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

These important posts are vacant in Nashik Municipal Corporation – Fireman, Leading Fireman, Driver or Operator, Wireless Operator, Sub Officers, Station Officer, Fire Officer, Deputy Fire Officer. The NASHIK municipal fire service relies on apprentices and paid firefighters, let alone fire stations. As the city expands and its population grows, it is the responsibility of the municipal corporation to provide infrastructure. The BMC started empowering the fire department in 1992. Considering the population at the time, there was a competent fire fighting system at that time. After 2011, however, it was neglected. According to the 2011 census, the position is that of the fire department. Thirteen years later, the same situation persists. Construction of buildings above 25 floors has begun in the city. Accordingly, the fire service needs to be as efficient as the medical and health departments. But this very important service is being neglected. Currently, there is a fire facility similar to that of a Class D municipality.

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा ढासळली! शिकाऊ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निसुरक्षा

अग्निशमन केंद्रे तर सोडाच शिकाऊ व मानधनावरील अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर महापालिकेची अग्निशमन सेवा अवलंबून आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढत असताना पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने १९९२ मध्ये अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण सुरू केले. त्या वेळच्या लोकसंख्येचा विचार करता त्या वेळी सक्षम अशी अग्निशमन यंत्रणा होती. २०११ नंतर मात्र दुर्लक्ष होत गेले. २०११ च्या लोकसंख्येनुसार जी स्थिती अग्निशमन दलाची आहे. तीच स्थिती तेरा वर्षानंतरही कायम आहे. शहरात २५ मजल्याच्या वर इमारती बांधकाम सुरू झाले आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय व आरोग्य विभागाइतकीच अग्निशमन सेवा सक्षम असणे गरजेचे आहे. परंतु अतिशय महत्त्वाच्या या सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यःस्थितीत ‘ड’वर्ग नगरपालिकाप्रमाणे अग्निशमन सुविधा आहे.

  • पुन्हा परवानगी – तातडीची बाब म्हणून कोरोनाकाळात शासनाने अग्निशमन व वैद्यकीय विभागातील ३४८ पदे भरण्यास मंजुरी दिली. पदांची भरती करण्याचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला देण्यात आले. परंतु पदे भरण्याची मुदत संपुष्टात आल्याने आता नव्याने पदे भरण्याची परवानगी आवश्‍यक राहणार आहे.
  • ही महत्त्वाची पदे आहेत रिक्त – फायरमन, लीडिंग फायरमन, चालक किंवा यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर, सब ऑफिसर्स, स्टेशन ऑफिसर, फायर ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर.
  • अग्निशमन सेवेतील त्रुटी
    • – एक लाख लोकसंख्या किंवा १० चौरस किलोमीटर मागे किमान एक अग्निशमन केंद्राचे प्रमाण आहे. सद्यःस्थितीत सहा अग्निशमन केंद्रे आहेत. प्रत्यक्षात लोकसंख्येचा विचार करता २२ केंद्रे हवीत.
    • – सहा केंद्रात २९९ इतके फायरमन मंजूर आहेत. परंतु सद्यःस्थितीत १८ फायरमन तर ६० लिडींग फायरमन कार्यरत आहे.
  • सद्यःस्थितीतील अग्निशमन केंद्रे – सिडको, सातपूर, नाशिक रोड, अमृतधाम, मखमलाबाद नाका, शिंगाडा तलाव.
  • प्रस्तावित अग्निशमन केंद्रे – गांधीनगर, गंगापूर रोडवरील होरायझन ॲकॅडमी समोर, दसक-पंचक.
  • ”मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविता येत नाही. तीन वाढीव केंद्रांचे प्रस्ताव आहेत.”- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.

Nashik Fire Brigade Bharti 2024 | Nashik Mahanagarpalika Bharti 2024 – The much-awaited recruitment process for 587 posts in the medical and fire department of Nashik Municipal Corporation (NMC) has been postponed again. While the recruitment process was expected to begin in the last fortnight itself, prime minister Narendra Modi’s visit to Nashik, followed by the cleanliness drive launched in the city and now the ongoing survey on Maratha reservation, have delayed the recruitment process. With the model code of conduct for the Lok Sabha elections set to come into effect in March, there are signs that the recruitment will take place only after this election. Read the complete details given below and keep visit our website and follow us on Whatsapp Group for fast update.

The government had approved the establishment appendix of 7,092 posts of the BMC. Nashik Municipal Corporation was promoted to ‘B’ category in ‘C’ category. Accordingly, the number of employees is also expected to increase, while about 3,000 posts of officers and employees are vacant due to retirement and voluntary retirement every month. The civic body is being run on the strength of barely 4,100 employees. There are also 1,750 posts of sanitation workers. This is making it difficult to provide basic amenities to the citizens.

The civic body is preparing to submit the revised format to the government. However, the process of presenting the draft and getting the government’s approval for it is likely to take a long time. As an urgent matter during the corona period, the government has approved the recruitment of 706 posts, including 348 in the fire department and 358 in the medical department. Except for 82 posts of doctors, the BMC has selected TCS company as per the government’s directions to fill the remaining posts.

नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण

नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांची बहुप्रतीक्षित भरतीप्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. गेल्या पंधरवड्यातच ही भरतीप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा, त्यापाठोपाठ शहरात सुरू करण्यात आलेली स्वच्छता मोहीम आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यातच येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने या निवडणुकीनंतरच या नोकरभरतीला मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या ७,०९२ पदांच्या आस्थापना परिशिष्टाला शासनाने मंजुरी दिली होती. ‘क’ संवर्गातील नाशिक महापालिकेची ‘ब’ संवर्गात पदोन्नती झाली. त्यानुसार कर्मचारी संख्याही वाढणे अपेक्षित असताना दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. जेमतेम ४१०० कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर महापालिकेच्या कामकाजाचा गाडा हाकला जात आहे. त्यातही १७५० पदे ही सफाई कर्मचाऱ्यांची आहेत. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून सुधारित आकृतिबंध शासनाला सादर करण्याची तयारी केली जात आहे. मात्र आकृतिबंधाचे सादरीकरण व त्यास शासनाची मंजुरी या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. कोरोना काळात तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यातील डॉक्टरांची ८२ पदे वगळता उर्वरित पद भरतीसाठी महापालिकेने शासनाच्या निर्देशांनुसार टीसीएस कंपनीची निवड केली आहे.

इच्छुकांच्या पदरी निराशा – नोकरभरती प्रक्रिया लांबल्याने या भरतीप्रक्रियेकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुक उमेदवारांची मात्र घोर निराशा होणार आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदी यांचा दौरा झाला. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून शहरात ‘डीप क्लीन’ स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. पाठोपाठ मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर आली. त्यात नोकरभरतीची तयारी मागे पडली. आता आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता काळात नोकरभरतीची प्रक्रिया राबविता येत नाही. तेव्हा निवडणुकीनंतरच ही प्रक्रिया राबविता येईल. पाठोपाठ विधानसभा निवडणूकदेखील नोकरभरतीला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.


Nashik Fire Brigade Bharti 2023 for 90 Firemen Details are given here. Nashik Municipal Corporation has sanctioned 299 posts in Fireman cadre in the first phase. At present only 28 firemen are working due to retirement and voluntary retirement. 271 posts of Fireman are vacant. The Municipal Corporation has got ‘B’ class status. The expansion of the city has also increased. As the number and height of buildings are also increasing, there will be more need for firemen accordingly. Meanwhile, it has been decided to appoint 90 trainee firemen in the fire department to meet the need of firemen. A total of 90 firemen will be appointed for six months, 45 trainees who have completed fireman course of All India Local Self-Government Institute and 45 trainees who have completed fireman studies from State Fire Training Centre. They will be given a remuneration Rs. 8,000/- per month. Read the complete details given below regarding Nashik Fire Brigade Bharti 2023 and follow us on Whatsapp Group for fast update.

नाशिक महापालिकेत विद्यावेतनावर 90 फायरमनची भरती

नाशिक महापालिकेत अत्यावश्‍यक सेवेत गणल्या जाणाऱ्या अग्निशमन विभागात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रिक्त जागांची कमतरता भरण्यासाठी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी असे एकूण नव्वद फायरमनची भरती विद्यावेतनावर केली जाणार आहे.

  • नाशिक महापालिकेच्या पहिल्या आकृतिबंधात फायरमन संवर्गात २९९ पदे मंजूर करण्यात आली आहे. निवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे सद्यःस्थितीत अवघे २८ फायरमन कार्यरत आहे. फायरमनची २७१ पदे रिक्त आहेत.
  • महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. शहराचा विस्तारदेखील वाढला आहे. इमारतींची संख्या व उंचीदेखील वाढत असल्याने त्याअनुषंगाने फायरमनची अधिक गरज भासणार आहे.
  • अपुरे मनुष्यबळ असल्याने अग्निशमन विभागाच्या सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुदैवाने अद्यापपर्यंत दुर्दैवी घटना घडलेली नाही.
  • मात्र, भविष्यात अशी घटना घडल्यास अग्निशमन विभागाच्या रिक्त पदांचे पितळ बाहेर पडू शकते. कोविडकाळात राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून अत्यावश्‍यक सेवेतील वैद्यकीय व अग्निशमन या दोन विभागातील पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या.
    त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेने ‘टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस’ मार्फत पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. सदर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या प्रक्रियेला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
  • या दरम्यान फायरमनची गरज भागविण्यासाठी अग्निशमन विभागामध्ये ९० प्रशिक्षणार्थी फायरमन नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा फायरमन अभ्यासक्रम पूर्ण केलेले ४५ प्रशिक्षणार्थी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातून फायरमन अभ्यास पूर्ण केलेले ४५ प्रशिक्षणार्थी असे एकूण ९० फायरमनची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. त्यांना आठ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

Nashik Mahangarpalika Mega bharti updates – The much awaited recruitment process of 11 departments of Nashik Municipal Corporation will finally start next month. Along with 704 posts in fire and health department, the technical completion of recruitment of 2,500 vacancies in other departments is going on, and for this it will take four weeks i.e. one month. Therefore, it is likely that the online application will be invited by publishing the recruitment advertisement in the first or second week of August. Read the complete details given below and follow us on Whatsapp Group for fast update.

तरुणांनो तयारीला लागा, पुढील महिन्यात मनपाची मेगा पदभरती

नाशिक येथील महापालिकेच्या ११ विभागांच्या बहुप्रतिक्षित भरतीप्रक्रियेला अखेर पुढील महिन्यात प्रारंभ होणार आहे. अग्निशमन व आरोग्य विभागातील ७०४ पदांसोबतच इतर विभागांतील अडीच हजार रिक्तपदांच्या भरतीबाबत तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू असून, यासाठी चार आठवड्यांचा म्हणजेच साधारणत: एक महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून आॅनलाइन अर्ज मागविले जाण्याची शक्यता आहे.

  • नाशिक महापालिकेतील ११ विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर मेगाभरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या एजन्सीवरून वादंग निर्माण झाल्याने ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान, राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फतच भरती होणार असल्याचे स्पष्ट केल्याने भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आस्थापन परिशिष्टावर तब्बल सात हजार घ्यायची पदे मंजूर असून, त्यातील २,८०० पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकाच टेबलवर दोन ते तीन टेबलचे काम सुरू असल्याने, कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नसल्याने, मनपा प्रशासनही भरतीसाठी आग्रही आहे.
  • दरम्यान, पदभरतीबाबतचे सर्व वादंग निवळल्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून तांत्रिक बाजू पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या आॅनलाइन अर्ज प्रणालीत येणारे अडथळे दूर करण्यावर काम सुरू असून, यासाठी साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासाठी ‘टीसीएस’कडून स्वतंत्र वेबसाइट तयार केली जाणार असून, ही वेबसाइट नाशिक महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटला कनेक्ट केली जाणार आहे. त्यानंतर टीसीएसच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

As per the news regarding nashik mahanagarpalika the recruitment of posts in the fire and medical department is going on in the month of July, the state government has called for the job chart of the necessary vacant posts from the municipal corporation as per the revised format. Accordingly, the administration department has requested detailed information regarding vacant posts and the requirement of those posts from 43 departments of the nashik mahanagarpalika.
As per the old framework 7090 was approved in Nashik Municipal Corporation. The state government had given instructions to introduce a new format as the municipal corporation got B class status. Accordingly, the framework of almost double i.e. 14715 posts has been submitted to the state government. No approval has been received from the state government. Out of the earlier 7090 posts, nearly 2800 posts have become vacant due to retirement and other reasons. Therefore, the number of vacancies in the municipal corporation has increased. Due to vacancies, the regular staff has been responsible for maintaining two to three tables. Meanwhile, in the wake of Covid, the state government has given permission to fill nearly 706 posts in the fire department and medical department as a matter of urgency.
  • अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदांच्या भरतीचा जुलै महिन्यात नारळ फुटत असतानाच राज्य शासनाने सुधारित आकृतिबंधानुसार महापालिकेकडे रिक्त असलेल्या आवश्यक पदांचा जॉब चार्ट मागविला आहे.
  • त्याअनुषंगाने प्रशासन विभागाने महापालिकेच्या ४३ विभागांकडून रिक्त पदे व त्या पदांची आवश्यकता या संदर्भात सविस्तर माहिती मागविली आहे.
    नाशिक महापालिकेमध्ये ७०९० पर्यंतचा पहिला आकृतिबंध मंजूर करण्यात आला होता. महापालिकेला ब वर्गाचा दर्जा मिळाल्याने नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या.
  • त्याअनुषंगाने जवळपास दुप्पट म्हणजे १४७१५ पदांचा आकृतिबंध राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. पूर्वीच्या ७०९० पदांपैकी जवळपास २८०० पदे सेवानिवृत्ती व अन्य कारणांमुळे रिक्त झाली आहे.
  • त्यामुळे महापालिकेत रिक्त पदांची संख्या वाढली आहे. रिक्त पदांमुळे नियमित कर्मचाऱ्यांवर दोन ते तीन टेबल सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. दरम्यान, कोविड पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यावश्यक बाब म्हणून अग्निशमन व वैद्यकीय विभागातील जवळपास ७०६ पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे.

As per the latest news the Recruitment process will be implemented through TCS organization in Nashik Mahanagarpalika. Nashik Municipal Corporation has accepted the proposal given to TCS Company for the recruitment process for a total of 706 posts such as 348 posts in Fire Department and 358 posts in Health and Medical Department. The recruitment process will be implemented in accordance with the government decision and as per the direction of the commissioner. The rules and conditions have been submitted by the municipal administration. Earlier the recruitment process was to be conducted through IBPS organization. However, after showing incapacity, the municipal administration submitted a recruitment proposal to Tata Consultancy Services. Read the complete details given below and follow us on Whatsapp Group for fast update.

महापालिकेतील भरतीसाठी TCS ने प्रस्ताव स्वीकारला; महापलिका प्रशासनाकडून नियम, अटी सादर

  1. नाशिक महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदासाठीच्या भरतीची प्रक्रियेसाठी महापालिकेने टीसीएस कंपनीला दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे.
  2. नियम व अटी महापालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी आयबीपीएस संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु, असमर्थता दर्शविण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नोकर भरतीचा प्रस्ताव सादर केला.
  3. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची गरज असताना २४ वर्षांपासून महापालिकेत कुठलीही नोकरभरती झाली नाही.
  4. महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली.
  5. महापालिकेत सद्यःस्थितीत जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकर भरतीला अडचणीची ठरत आहे.
  6. परंतु, कोरोना काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती.
  7. परंतु,सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती. अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली.
  8. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) मार्फतच भरतीच्या सूचना दिल्या. त्यानुसार आयबीपीएसने प्रथम प्रस्ताव स्वीकारला. कराराच्या अटी व शर्तींवर स्वाक्षरी करण्याची वेळ आल्यानंतर अकार्यक्षमता दर्शविण्यात आली. त्यामुळे टीसीएसकडे प्रस्ताव सादर केला.

कालबाह्य ५११ पदे रद्द

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांच्या घेतलेल्या बैठकीत रिक्त पदांची भरती करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने सेवा व शर्ती नियमावली मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.
  • त्यानुसार नाशिक महापालिकेत सुधारित पदांचा आराखडा तयार करताना प्रशासनाने 11 विभागांच्या सेवा व शर्ती नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. काळाची गरज ओळखून ज्या पदांची आवश्यकता नाही.
  • अशी पदे रद्द करण्यात आली आहे. जवळपास कालबाह्य ठरणारी ५११ पदे रद्द करण्यात आली. बिगारी संवर्गातील 362 पदे, खत प्रकल्पावरील 84 पदे तसेच अन्य विभागातील पदे कालबाह्य ठरविण्यात आली. सुरक्षारक्षकांच्या मध्ये वॉचमन संवर्गातील ११६ पदे समायोजित करण्यात आली. माळी संवर्गातील ६४ पदे मंजूर आहेत.
  • “टीसीएस संस्थेमार्फत नोकर भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिकेचा प्रस्ताव संस्थेने मान्य केला आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने व आयुक्तांच्या निर्देशानुसार नोकरभरतीचा प्रक्रिया राबविण्यात येईल.”  मनोज घोडे- पाटील, प्रशासन उपायुक्त.

NMC Fire Brigade Recruitment 2023 will be held through TCS Portal. NMC Recruitment Alternative to TCS for Fire Medical Vacancies recruitment process. Because At the time of signing the contract with IBPS, a letter will also be given to TCS for the recruitment of a total of 706 posts, including 348 posts in the fire department and 358 posts in the health and medical department. Read the complete details given below and keep visit our website and follow us on Whatsapp Group for fast update.

नाशिक महापालिकेतील अग्निशमन, वैद्यकीयच्या रिक्त पदांसाठी TCS चा पर्याय

  1. आयबीपीएस या संस्थेशी करार करण्याची वेळ आली असतानाच महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांवर भरतीसाठी टिसीएस या संस्थेलादेखील पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणार आहे. आयबीपीएस संस्थेने महापालिकेच्या भरती प्रक्रियेसंदर्भात टाकलेल्या अटी व शर्तींवर निर्णय न दिल्याने टिसीएस संस्थेकडे देखील पत्र व्यवहार केला जाणार आहे.
  2. पालिका प्रशासनाने दोन्ही संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव मागविले. आयबीपीएस या संस्थेने प्रस्ताव सादर केल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्याची प्रशासकीय तयारी करण्यात आली. परंतू पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडली.२ फेब्रुवारीला आचारसंहिता संपुष्टात आल्याने पुन्हा भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतू आयबीपीएसकडून करारातील अटी व शर्तीसंदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याने टिसीएसकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली.
  3. “रिक्त पदांच्या भरतीसाठी टिसीएसकडून देखील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. दोन्ही प्रस्तावांची छाननी करून अंतिम निर्णय घेतला जाईल.”
    -मनोज घोडे-पाटील, उपायुक्त, प्रशासन विभाग

Vacancy Details of NMC Bharti 2023

  • महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ इतकी असताना सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली आहे. पालिकेत सद्यस्थितीत जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.
  • परिणामी नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला आहे. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे. परंतु, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारीत आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती.
  • परंतु, २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाईल मंत्रालयात मंजूरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती. अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने या पदांच्या भरतीसाठी टिसीएस (टाटा कन्सल्टींग सर्विसेस), आयबीपीपीएस (इन्टिस्टिट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थांना अधिकार दिले.





Nashik Municipal Corporation has cleared the way for recruitment in Fire Brigade department.  The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has prepared for the recruitment of fire and medical department vacancies, and it is likely that the recruitment process will  start in the first week of January.

  1. अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेचा एकमेव प्रस्ताव सादर झाल्याने याच संस्थेमार्फत भरती केली जाणार असून, साधारण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होईल.
  2. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे. मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही.
  3. मात्र, राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते.
  4. त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला नाही. त्यामुळे आयबीपीएस संस्थेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
  5. “अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला असून, यामार्फतच भरती प्रक्रिया राबविली जाईल.”

Nashik महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरती जानेवारी महिन्यात

  1. अग्निशमन व वैद्यकीय विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) संस्थेने तयारी दर्शवली असून, यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होऊन जानेवारी महिन्यात नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.
  2. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय आरोग्य तसेच अग्निशमन विभागाची रिक्तपदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही पदे भरली जाणार आहे.
  3. मागील महिन्यात राज्य शासनाने या संदर्भात आदेश पारित करून टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन संस्थांमार्फतच भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही, मात्र राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागाची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून आयबीपीएस व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव गेले होते. त्यातील आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे.
  4. सदर संस्थेने नाशिक महापालिकेला प्रस्ताव दिला असून, या प्रस्तावाचा अभ्यास प्रशासनाच्या मार्फत सुरू आहे. पुढील आठवड्यात आयबीपीएस संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीनेदेखील प्रस्ताव दिल्यास या मार्फतदेखील विचार होणार आहे. दोन्ही संस्थांमार्फत रिक्त पदांची भरती होईल किंवा महापालिकेला परवडेल, अशा एकाच संस्थेच्या माध्यमातून भरती होईल. जानेवारी महिन्यात रिक्त जागा भरल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
  5. “अग्निशमन व वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या टीसीएस व आयबीपीएस या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यातील आयबीपीएस संस्थेने प्रस्ताव स्वीकारला आहे.

Nashik Fire Department 2023- The urban development department has cleared the way for the recruitment of 706 posts including 348 posts in fire department and 358 posts in health and medical department. The state government had not given instructions regarding the organization through which the recruitment of these posts should be done.

महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे.

राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर एक कंपनी महापालिकेकडून अंतिम केली जाणार आहे.

असा आहे मंजुरीचा प्रवास

शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत होती. परंतु, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली. दुसरीकडे सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.

अखेर नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी यासंदर्भातील निर्देश दिले नव्हते.

परंतु, टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्विसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला गेला. यानंतर महापालिकेने या दोन्ही कंपन्यांना मंगळवारी (दि. २९ नोव्हेंबर) पत्र पाठवून त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भातील पदनिहाय सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिल्याने या भरती प्रक्रियेला चालना मिळाली.

राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेकडून टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर प्रस्ताव मागवण्यात आले असून, त्यानंतर एक कंपनीची भरतीसाठी निश्चिती केली जाईल.

महापालिकेत पदांची आकडेवारी…

  • ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदे : ७,०८२
  • सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्तपदे : २,६०० च्या वर
  • सद्य:स्थितीत कार्यरत अधिकारी, कर्मचारी : ४,५००





Latest updates regarding about Nashik Fire Brigade Recruitment 2022 is that 706 fireman posts vacant in fire department of Nashik Municipal Corporation are getting approval. These vacancies will be filled soon. Nashik Municipal Corporation has decided to do this recruitment through third TCS & IPBS The recruitment process for a total of 706 posts including 348 in the fire department and 358 in the health and medical department of the municipal corporation will be started within 15 days.. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Fire Brigade Recruitment and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नाशिक महापालिकेच्या अग्निशामक आणि आरोग्य विभागात बंपर भरती; १५ दिवसात भरती

राज्य सरकारने या भरतीसाठी टीसीएस, तसेच आयबीपीपीएस या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीकडून भरती करण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. यासोबतच उर्वरित दोन हजार पदासांठी नगरविकास विभागात प्रलंबित सेवा प्रवेश नियमावलीबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत आता नोकरभरतीचा बिगुल वाजला आहे.

नाशिक शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची गरज असताना गेल्या चोवीस वर्षांपासून महापालिकेत नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या २,६०० वर गेली आहे.

महापालिकेत सद्य:स्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला आहे. सरकारच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे. मात्र, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागांतील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती. मात्र, २०१७ पासून महापालिकेची सेवाप्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.

अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशामक विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवाप्रवेश नियमावली मंजुर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. राज्य सरकारने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी, या संदर्भातील निर्देश दिले नव्हते. त्यानंतर सरकारने राज्यातील सर्व भरतीप्रक्रिया आयबीपीपीएस किंवा टीसीएसमार्फत करण्याचा निर्णय घेतला असून, त्या संदर्भातील पत्र महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

टीसीएस किंवा आयबीपीपीएसमार्फत भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब , क, ड या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धापरीक्षा प्रक्रिया टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासननिर्णय निर्गमित केलेला आहे. हा आदेश मंग‌ळवारी (दि. २३) महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे महापालिका या ७०६ पदांसाठीच्या नोकरभरतीसाठी या दोन संस्थांपैकी एका संस्थेची निवड करणार आहे.

दोन हजार पदांसाठीही भरतीप्रक्रिया

सद्य:स्थितीत ७०६ पदांची भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार असून, उर्वरित दोन हजार पदांसाठीही प्रलंबित असलेल्या सेवाप्रवेश नियमावलीबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. या संदर्भात १५ दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित दोन हजार पदांच्या भरती प्रक्रियेलाही गती येणार असल्याचे चित्र आहे.

महापालिका क्षेत्रातील रिक्त पदे सरळसेवेने भरताना स्पर्धापरीक्षा प्रक्रिया टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांमार्फत राबविण्याबाबत शासननिर्णय निर्गमित होऊन तो महापालिकेला प्राप्त झाला आहे. या शासननिर्णयाच्या अनुषंगाने व आयुक्तांच्या निर्देशानुसार नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येईल.


Nashik Municipal Corporation has cleared the way for recruitment in Fire Brigade department. Work pressure has increased on the manpower available in the Nashik Municipal Corporation. The government approved the recruitment of some posts in the health-medical, fire department after following up the administration to recruit the officers and employees of health-medical, fire-fighting, technical departments with minimum essential services. Last year, the government sanctioned 875 new posts related to essential services including health-medical, fire fighting, following the follow-up of the Nashik Municipal Corporation. But, due to increasing establishment costs, the recruitment of these posts could not be approved. 348 posts were sanctioned for recruitment excluding the establishment cost condition. However, the recruitment of these posts was also stalled due to non-approval of service entry rules. Now, if the rules are approved, the pending issue of recruitment in the municipal corporation will also be resolved. Read the more details given below and keep visit us for the further updates.

अग्निशमन विभागातील 348 फायरमन भरतीचा मार्ग मोकळा

वैद्यकीय, अग्निशमनची भरती होणार : 
महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर शासनाने गेल्यावर्षी आरोग्य-वैद्यकीय, अग्निशमनसह अत्यावश्यक सेवेशी संबंधित ८७५ नवीन पदांना मंजुरी दिली होती. परंतु, वाढत्या आस्थापना खर्चामुळे या पदांच्या भरतीला मंजुरी मिळू शकलेली नव्हती. आस्थापना खर्चाची अट वगळून भरतीसाठी ३४८ पदांना मंजुरी दिली गेली. परंतु, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे या पदांचीही भरती रखडली होती. आता नियमावली मंजूर झाल्यास महापालिकेतील नोकरभरतीचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लागू शकणार आहे.

महापालिकेतील सेवा प्रवेश नियमावलीचा प्रस्ताव २०१७ पासून शासन दरबारी प्रलंबित आहे. सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळेच महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाच्या प्रस्तावाला शासनाने अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यामुळे नोकरभरतीला मान्यता मिळू शकलेली नाही. नाशिक महापालिकेचा ‘ब’ संवर्गात समावेश होऊन आता बरीच वर्षे उलटल्यानंतरही क संवर्गातील आस्थापन परिशिष्ट कायम आहे. त्यातही या परिशिष्टातील विविध संवर्गातील ७, हजार ९२ मंजूर पदांपैकी अधिकारी, कर्मचाऱ्यांची २,६०० हून अधिक पदे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीसह विविध कारणांमुळे रिक्त आहेत. मनपात सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या आस्थापना खर्चाचे कारण देत महापालिकेतील नोकरभरतीला शासनाकडून मंजूरी दिली जात नव्हती. किमान अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य-वैद्यकीय, अग्निशामक, तांत्रिक संवगार्तील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती व्हावी, यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केल्यानंतर आरोग्य-वैद्यकीय, अग्निशमन विभागातील काही पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली. मात्र ही भरतीदेखील सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे अडखळली. सेवा प्रवेश नियमावलीच्या प्रलंबित प्रस्तावाला प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आता चालना मिळाली आहे. या प्रस्तावाची नगरविकास विभागाकडून छाननी सुरू झाली आहे. प्रस्तावातील काही त्रुटींबाबत नगरविकास विभागाकडून महापालिकेला विचारणा झाली होती. त्यामुळे पालिकेतील आस्थापना विभागातील प्रतिनिधीने बुधवारी(दि.२८) मंत्रालयात हजेरी लावत आवश्यक माहितीचे सादरीकरण केले. त्यामुळे शासनाकडून सेवा प्रवेश नियमावली लवकरच मंजूर केली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रलंबित नोकरभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.


Nashik Fire Brigade Bharti 2023: Latest updates regarding about Nashik Fire Brigade Recruitment 2022 is that 208 fireman posts vacant in fire department of Nashik Municipal Corporation are getting approval. These vacancies will be filled soon. Nashik Municipal Corporation has decided to do this recruitment through third party. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Fire Brigade Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अग्निशमन विभागातील २०८ फायरमन भरतीचा मार्ग मोकळा

महापालिकेच्या रखडलेल्या नोकरभरतीस शिंदे-फडणवीस सरकारने हिरवा कंदील दाखविला असून, पहिल्या टप्प्यात अतितातडीचे म्हणून अग्निशमन विभागातील २०८ फायरमनच्या भरतीचा शासनाने मार्ग मोकळा केला आहे. या पदासाठी आवश्यक असलेल्या सेवा प्रवेश नियमावली तसेच आरक्षण बिंदू नामावलीस नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून, ही भरती थर्ड पार्टीमार्फत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार भरतीकरता मनपाने टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या संस्थांना पत्र पाठवून भरती करण्याबाबत विचारणा केल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेतील बहुप्रतिक्षित नोकरभरतीचा बिगूल वाजला आहे.

Nashik Fire Brigade Bharti 2023

  •  नाशिक शहराचा विस्तार वाढत असल्याने तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अग्निशमन दल सुसज्ज करण्यासाठी नोकरभरती करणे आवश्यक आहे.
  • महापालिकेत गेल्याने पंधरा ते वीस वर्षांपासून कुठल्याही प्रकारची सरळ सेवेने कायमस्वरूपी नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत ‘क’ वर्ग संवगार्तील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्तपदांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे.
  • सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे.
  • कोरोनाकाळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन या महत्वाच्या विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती. परंतु, मनपाची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने भरतीप्रक्रिया रखडली होती.

Nashik Fire Brigade Bharti 2023: As per latest information regarding the Nashik Fire department is that 209 Fireman Posts Vacant in Nashik Fire Brigade. However, since there is no recruitment, drivers from other departments of the Municipal Corporation have been appointed for the past many years. Therefore, the fire department is facing many problems due to the lack of permanent driver. Read More details regarding Nashik Fire Brigade Recruitment 2022/ Nashik Fire Brigade Bharti 2022 are given below.

नाशिक अग्निशामक दलात २०९ फायरमन पदे रिक्त

Nashik Fire Brigade Bharti 2022: राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन या पदासह विविध संवर्गांतील पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार भरतीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू असतानाच, मनपा आयुक्त रमेश पवार यांची दांडी उडाल्याने या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत गरजेची असून, याबाबत नूतन आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

Fire Department – मुंबई अग्निशमन दलामध्ये ९०२ फायरमन भरती पुढील महिन्यात

Pune Fire Brigade Bharti-पुणे अग्निशामक दलात भरती प्रकिया सुरू; 1 हजार 700 जवानांची गरज


  • राज्य शासनाने फायरमन, लीडिंग फायरमन, सबऑफिसर, चालक यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर या पदांसाठी सध्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त आणखी जागा नव्याने मंजूर केल्या आहेत.
  • या मंजूर पदांपैकी फायरमन या पदाकरिताच सेवा प्रवेश नियमावली मंजूर असल्याने या पदांसाठी भरती करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली. फायरमन या संवर्गाच्या सध्या आस्थापनेवर 151 जागा असून, नव्याने 148 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.
  • परंतु, सध्या केवळ 90 फायरमन असून, 209 जागा रिक्त आहेत. यासंदर्भातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.
  • त्यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्यासमोर प्रस्ताव सादर करण्यात आला. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्याकरिता एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • त्यानुसार प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच, राज्य शासनाकडून रमेश पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आणि भरती प्रक्रियेचा प्रस्तावही अधुराच राहिला.
  • आता नवनियुक्त आयुक्त याबाबत काय आणि कशी भूमिका घेतात, यावरच फायरमन पदाच्या भरतीची दिशा ठरणार आहे.
  •  इतर विभागांचेच वाहनचालक  राज्य शासनाने अग्निशमन विभागासाठी नव्याने 98 चालक यंत्रचालकाची पदे मंजूर केली आहेत. परंतु, भरतीच नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील इतर विभागांतील वाहनचालकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी वाहनचालक नसल्याने अग्निशमन विभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच वायरलेस ऑपरेटरची सहा पदेही शासनाने मंजूर केलेली आहेत.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    Nashik Fire Bharti 2023

  2. Sunil more says

    Fireman good job

  3. Aakash Mahale says

    Ok

  4. Admin says

    नाशिक अग्निशामक दलात २०९ फायरमन पदे रिक्त

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!