Nandurbar Police Patil Bharti -तळोदा तालुक्यासह जिल्ह्यात पोलीस पाटलाची विविध पदे रिक्त
Nandurbar Police Patil Bharti 2023
Nandurbar Police Patil Bharti 2023-Various posts of Police Patil are vacant in the district including Taloda Taluka. Due to the non-filling of vacant posts of Police Patil, difficulties arise. The state general secretary of Birsa Fighters Rajendra Padavi has demanded immediate filling of the vacant posts of police constables in the district including Taloda taluka.
Police Patil Bharti -पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरणार; वेळापत्रक जाहीर
नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस पाटलांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी बिरसा फायटरतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बिरसा फायटरतर्फे सहायक जिल्हाधिकारी व तळोदा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये रिक्त ठिकाणी पोलिस पाटलांची पदभरती सुरू झाली आहे. परंतु, नंदुरबार जिल्ह्यात वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते आहे. पोलिस पाटील हा महसूल व पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. गावपातळीवरील घटना, घडामोडी, तंटे, वाद गावातच सोडविण्याची कामे केली -जातात. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलिस पाटील करतात.
परंतु, जिल्ह्यातील अनेक गावांत पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गावात अनेक अडचणी येतात. तळोदा तालुक्यातील लक्कडकोट, बोरद, मेंढवढ, राजविहीर, अलवान, गाढवली, तुळाजा, झिरी, रापापूर, आमलाड, राणीपूर या महसुली गावांत अजूनही पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरली नसल्यामुळे अडचणी येतात. त्यातही बोरद, आमलाड, राजविहीर मोठ्या गावांमध्ये यांसारख्या पोलिस पाटलांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तळोदा तालुक्यासह जिल्ह्यात रिक्त असलेली पोलिस पाटलांची पदे त्वरित भरण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी निवेदनात केली आहे.